आदेश (दिः 14 /03/2011 ) द्वारा श्री.एम.जी.रहाटगावकर - मा.अध्यक्ष 1. सदर तीन दरखास्त प्रकरणे या एकत्रीत आदेशान्वये निकाली काढण्यात येत आहेत कारण सर्व प्रकरणातील गैरअर्जदार एकच आहे. तसेच मुळ तक्रार प्रकरणे एकाच आदेशान्वये निकाली काढण्यात आले होते त्या आदेशाविरुध्द वरीष्ठ ... 2 ... (दरखास्त क्र.70,72,73/2007) न्यायालयात झालेल्या अपीलाची सुनावणी एवढेच नव्हेतर तीन्ही दाखल प्रकरणात सुनावणी उभयपक्षांच्या सम्मतीने एकाच वेळी घेण्यात आली होती.
2. मंचाच्या मुळ तक्रार प्रकरणातील दि.11/12/2006 रोजीच्या आदेशाविरुध्द मा. राज्य आयोगासमक्ष याचीका दाखल करण्यात आली होती या याचीकांचा निकाल दि.14/05/2009 रोजी लागला व राज्य आयोगाने अपील खारीज केले. मा.राज्य आयोगाच्या आदेशाविरुध्द मा. राष्ट्रीय आयोग यांचे समक्ष रिव्हिजन दाखल करण्यात आले. ती याचिका देखील राष्ट्रीय आयोगाने दि.19/03/2010 रोजी खारीज केली. 3. गैरअर्जदारांनी राज्य आयोगाकडे जमा केलेली रक्कम 8,86,454/- या मंचाकडे दि.27/10/2010 रोजी वर्ग करण्यात आली. त्याआधी दि.05/04/2007 रोजी रु.25,000/-, 03/04/2007 रोजी 25,000/- एवढी रक्कम विरुध्द पक्षानी या मंचाकडे जमा केली होती. एकुण रु.9,36,454/- तीनही प्रकरणात एकत्रीतरित्या विरुध्द पक्षातर्फे या मंचात जमा करणेत आली आहे असा अहवाल प्रबंधक ठाणे मंच यांनी सादर केला. आदेशाची पुर्तता करण्यासाठी प्रत्येक प्रकरणातील अर्जदाराला मंचाने आदेशानुसार रक्कम देण्यास हरकत नाही असे गैरअर्जदारांनी दि.7/02/2011 रोजी लेखी निवेदन केले. तसेच अर्जदार क्र. 1 व2 यांनी मंचाकडे जमा असणारी रक्कम आपल्याला देण्यात यावी असा अर्ज दि.15/02/2011 रोजी केला. अर्जदार क्र. 2 यांनी प्रतिज्ञापत्रासह अर्ज सादर केला व नमुद केले की, ''श्री.गणपत आशिष को.हॉ.सो.लि.,'' या नावाने त्यांना धनादेशाद्वारे आदेशान्वीत रक्क्म देण्यात यावी.
4. मंचाने उभयपक्षांचे म्हणणे विचारात घेतले तसेच त्यांनी दाखल केलेल्या दस्तएवजांचे अवलोकन केले. मंचाच्या आदेशाला कोणत्याही वरिष्ठ न्यायालयाची तहकुबी नाही. मा. राष्ट्रीय आयोगाने रिव्हिजन पिटीशन खारीज केलेले आहे. त्यामुळे आदेश पुर्ततेसाठी गैरअर्जदारांनी मंचाकडे जमा केलेली रक्कम अर्जदारांना देणे आवश्यक आहे. सदर रक्कम मुदत ठेवीत गुंतवली असल्यास जमा झालेल्या व्याजासह अर्जदारांना देण्यात यावी. प्रबंधक, ठाणे मंच यांना निर्देश देण्यात येतो की त्यांना खाली नमुद केल्याप्रमाणे अर्जदारांना रक्कम द्यावी अर्जदार क्र. 2 चा धनादेश श्री. गणपती आशिष को. ऑप. हॉ. सो. लि., या नावाने तयार करण्यात यावा. दरखास्त क्र.70/2007 अर्जदार क्र. 1 बाळु शांताराम वयंदे रु.4,94,419/- अर्जदार क्र.2 गणपती आशिष सहकारी संस्था रु.1,34,419/ - दरखास्त क्र.72/2007 अर्जदार क्र. 1 धनाजी शंकर दळवी रु.69,137/- अर्जदार क्र. 2 गणपती आशिष सहकारी संस्था रु.54,137/- दरखास्त क्र.73/2007 अर्जदार क्र. 1 लहु धाऊ घायवट रु.94,172/- अर्जदार क्र. 2 गणपती आशिष सहकारी संस्था रु.64,172/-
... 3 ... (दरखास्त क्र.70,72,73/2007) 5. उपरोक्त निर्देशानुसार मंचाकडे जमा असणारी रक्कम अर्जदारांना देण्यात यावी. मंचाच्या मुळ तक्रार प्रकरणातील आदेशाची पुर्तता विरुध्द पक्षांनी केलेली असल्याने दरखास्त क्र. 70/2007, 72/2007, 73/2007 निकाली काढण्यात येतात. दिनांक – 14 /03/2011 ठिकाण – ठाणे (ज्योती अय्यर) (एम.जी.रहाटगावकर ) सदस्या अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे
| [HONABLE MRS. Jyoti Iyyer] MEMBER[HONABLE MR. M.G. RAHATGAONKAR] PRESIDENT | |