Maharashtra

Kolhapur

CC/13/10

Mr. Saheblal Ismail Jamadar - Complainant(s)

Versus

Mr.Sanjay Shyamrao Patil, Managing Director, Kop.Dist.Shekari Winkar Sahakari Sut Girani, Ltd., Icha - Opp.Party(s)

Mrs.Suchita B.Ghatage

20 Aug 2013

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, KOLHAPUR
Central Administrative Building, South Side, Second Floor,
Kasaba Bawada Road, Kolhapur.
Phone No. 0231-2651327, Fax No. 0231-2651127
Email- confo-ko-mh@nic.in, Website- www.confonet.nic.in
 
Complaint Case No. CC/13/10
 
1. Mr. Saheblal Ismail Jamadar
At post Kondigre, Tal.Shirol,
Kolhapur
2. Mrs. Jahaara Saheblal Jamadar
At post Kondigre, Tal.Shirol,
Kolhapur
3. Smt.Makbulabi Ismail Jamadar
at post Kondigre, Tal.Shirol,
Kolhapur
...........Complainant(s)
Versus
1. Mr.Sanjay Shyamrao Patil, Managing Director, Kop.Dist.Shekari Winkar Sahakari Sut Girani, Ltd., Ichalkaranji
Rajiv Gandhi Nagar, Tal.Shirol,
Kolhapur
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. Sanjay P. Borwal PRESIDENT
 HON'ABLE MR. Dinesh S. Gavali MEMBER
 HON'ABLE MRS. Rupali D. Ghatage MEMBER
 
PRESENT:
Adv. Sucheta Ghatage
 
 
वि.प.तर्फे प्रतिनिधी हजर
 
ORDER

निकालपत्र : (दिनांक: 20-08-2013 ) (व्‍दाराः- मा. श्री. संजय पी. बोरवाल, अध्‍यक्ष)  

1.     तक्रारदार यांनी सामनेवाले कोल्‍हापूर जिल्‍हा शेतकरी सहकारी सुतगिरणी लि. इचलकरंजी या संस्‍थेत  बिनव्‍याजी ठेव व  मुदत बंद ठेवीं स्‍वरुपात गुंतवलेल्‍या रक्‍कमा मागणी करुनही परत दिल्‍या नाहीत म्‍हणून तक्रारदारांनी प्रस्‍तुतचा तक्रार अर्ज या मंचात दाखल केला आहे.

2.          तक्रारदार यांची थोडक्‍यात तक्रार अशी आहे की,  तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडे नोकरीस असताना  सामनेवाला सुत गिरणीकडे ठेवीं स्‍वरुपात रक्‍कमा  सामनेवाले - कोल्‍हापूर जिल्‍हा शेतकरी सहकारी सुतगिरणी लि. इचलकरंजी (यापुढे संक्षिप्‍तेसाठी संस्‍था असे संबोधण्‍यात येईल) या संस्‍थेत  बिनव्‍याजी ठेव व मुदत बंद ठेव  स्‍वरुपात रक्‍कमा गुंतविल्‍या होत्‍या त्‍याचा तपशील खालीलप्रमाणेः-

अ.

क्र.

ठेव पावती क्र.

रक्‍कम ठेवलेली रक्‍कम रु.

ठेव ठेवलेली

दिनांक

ठेवीची मुदत संपलेची दिनांक

व्‍याज दर/

मुदतीनंतर मिळणारी रक्‍कम रुपये

1

87

3090/-

29-06-2000

-

3090/-

2

296

2740/-

31-08-2000

-

2740/-

3

100

2025-40

01-10-1996

01-10-2000

4050.80

4

588

5,000/-

20-10-1998

20-04-2003

10,000/-

5

464

5,000/-

03-03-1998

03-09-2002

10,000/-

    

3.           तक्रारदार यांनी सामनेवाले संस्‍थेकडे बिन व्‍याजी ठेव व मुदत बंद ठेव पावत्‍यांची  मुदत संपलेनंतर रक्‍कमेची मागणी व्‍याजासह केली असता संस्‍थेने रक्‍कमा दिल्‍या नाहीत तसेच सामनेवाले यांनी तक्रारदारांची फसवणुक केली. तक्रारदारांना ठेवींच्‍या रक्‍कमांची निकड होती तेव्‍हा तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडे मुदत संपलेनंतर रक्‍कमांची मागणी केली असता, सामनेवाले यांनी तक्रारदार यांना ठेवीच्‍या रक्‍कमा  दिल्‍या नाहीत. तथापि तक्रारदारांनी  दि. 03-10-2012 रोजी वकिलामार्फत नोटीस पाठवून पाठवून  सदर नोटीसीस खोटे उत्‍तर देऊन सामनेवाले यांनी वर नमूद ठेवीच्‍या रक्‍कमा देण्‍यास टाळाटाळ केली अशी तक्रारदार यांची तक्रार आहे. सबब, सामनेवाले यांनी तक्रारदारास सामनेवाले यांचेकडून ठेव पावत्‍याच्‍या रक्‍कमा तसेच त्‍यावरील व्‍याजाची मागणी केली. तक्रारदारांनी त्‍यांचे वर नमूद परिच्‍छेद कलम-2 नुसार  होणारी ठेव रक्‍कम, तसेच तक्रारदारांना झालेल्‍या मान‍सिक व शारिरीक त्रासापोटी रक्‍कम रु. 2,000/- व या तक्रार अर्जाचा खर्च रक्‍कम रु. 3,000/- अशी एकुण ठेव पावत्‍या आणि मानसिक व शारिरीक त्रासासाठी झालेल्‍या रक्‍कमा तक्रारदारांना वसुल होऊन मिळाव्‍यात अशी मागणी केलेली आहे.

4.    तक्रारदारांनी त्‍यांचे तक्रारीसोबत  बिन व्‍याजी ठेव व मुदत बंद ठेवींच्‍या पावत्‍याच्‍या  प्रमाणित प्रती,  व वकिलामार्फत पाठविलेली नोटीस दि. 3-10-2012 व  सामनेवाला यांन दिलेले नोटीसीस उत्‍तर     तक्रारीसोबत शपथपत्र दाखल केले आहे. 

5.      सामनेवाले यांचेवर नोटीसची बजावणी झालेवर सामनेवाले हजर  होऊन त्‍यांनी  म्‍हणणे दाखल केले. 

6.           सामनेवाले यांनी  तक्रारदारांच्‍या तक्रारीस लेखी म्‍हणणे देऊन तक्रारदारांची तक्रार परिच्‍छेदनिहाय नाकारली आहे.  तक्रारदारांची तक्रार मुदतीत नाही. विलंब माफी अर्ज नाही.  सामनेवाला यांनी तक्रारदारांनी ठेवी ठेवलेचे मान्‍य केलेले आहे. तक्रारदारांच्‍या ठेवींच्‍या रक्‍कमा देण्‍यास कधीही टाळाटाळ केलेली नाही. तक्रारदारांना ठेवींचे मुदतीनंतर व्‍याज मागणेचा अधिकार नाही.   तक्रारदारांनी सदरच्‍या ठेवी 1995, 1996, 1998, 1999, 2000 व 2002 मधील आहेत त्‍यामुळे तक्रार अर्ज मुदत नाही.  प्रस्‍तुतच्‍या तक्रारीस  मुदतीचा बाध येतो.   सबब, तक्रारदारांचा तक्रार अर्ज खर्चासह  फेटाळण्‍यात यावा अशी विनंती सामनेवाले यांनी केली आहे.   

7.           तक्रारदार यांची तक्रार, दाखल कागदपत्रे तसेच अनुषांगिक कागदपत्रे व सामनेवाले यांचे म्‍हणणे  तसेच तक्रारदार यांचे वकील व सामनेवाला यांचे प्रतिनिधी यांच्‍या युक्‍तीवादाचा विचार करता, तक्रारीच्‍या न्‍यायनिर्णयासाठी खालील मुद्दे मंचापुढे उपस्थित होतात.

अ.क्र.

मुद्दे

    उत्‍तर

 1

तक्रारदार हे ग्राहक आहे‍त काय ?

    होय

 2

सामनेवाले यांनी तक्रारदार यांना दयावयाच्‍या सेवेत त्रुटी केली आहे काय ?

    होय

 3

तक्रारदार कोणता मानसिक त्रासापोटी / अनुतोष मिळण्‍यास पात्र आहेत काय ?

अंतिम आदेशाप्रमाणे

 4

आदेश काय ?

तक्रार अंशतः मंजूर

विवेचन-

  मुद्दा क्र. 1 -   तक्रारदार यांनी बिनव्‍याजी व मुदत बंद ठेव स्‍वरुपात गुंतविलेल्‍या रक्‍कमांच्‍या पावत्‍याच्‍या छायांकित प्रतीं सादर केलेल्‍या आहेत. सामनेवाले यांनी तक्रारदार यांची ठेव स्‍वरुपात भरलेल्‍या रक्‍कमा सामनेवाले यांनी नाकारलेल्‍या नाहीत.  ठेव स्‍वरुपात गुंतविलेल्‍या रक्‍कमांचा विचार होता, तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे, म्‍हणुन मुद्दा क्र.1 चे उत्‍तर मंच होकारार्थी देत आहे.

 मुद्दा क्र. 2 -  प्रस्‍तुत प्रकरणात तक्रारदार यांनी तक्रारीचे अनुषंगाने दाखल केलेली कागदपत्रे पाहता, तक्रारदार यांनी पतसंस्‍थेत बिनव्‍याजी ठेव व  मुदत बंद ठेव स्‍वरुपात रक्‍कमा गुंतविलेल्‍या आहेत ही बाब सिध्‍द होते. तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्‍याकडे ठेवीच्‍या स्‍वरुपात गुंतविलेल्‍या रक्‍कमा परत करणे हे पतसंस्‍थेचे कर्तव्‍य होते. परंतु मागणी करुनही रक्‍कम न देणे ही सामनेवाले यांची तक्रारदार यांना दयावयाच्‍या सेवेतील त्रुटी आहे असे या मंचाचे मत आहे,  म्‍हणुन मुद्दा क्र. 2 चे उत्‍तर मंच होकारार्थी देत आहे.

  मुद्दा क्र. 3तक्रारदार यांनी दाखल केलेली ठेव रक्‍कमेवर व्‍याजासह होणारी रक्‍कम सामनेवाले  कोल्‍हापूर जिल्‍हा शेतकरी सहकारी सुतगिरणी लि. इचलकरंजी यांच्‍याकडून वर नमुद न्‍यायनिर्णयातील कलम 2 मधील नमूद बिनव्‍याजी व  मुदत बंद  ठेवींत गुंतविलेल्‍या रक्‍कमा मिळण्‍यास पात्र आहेत. तसेच बिनव्‍याजी व मुदत बंद ठेवीच्‍या रक्‍कमा परत देण्‍यास सामनेवाले कोल्‍हापूर जिल्‍हा शेतकरी सहकारी सुतगिरणी लि. इचलकरंजी हे  देय तारखेपासून ठेव पावती क्र. 100, 588 व 464 या मुदत ठेव पावत्‍यांवर  द.सा.द.शे. 6 टक्‍के व्‍याजासह देण्‍यास सामनेवाले हे जबाबदार आहेत असे या मंचाचे मत आहे.    तसेच, तक्रारदार यांना सामनेवाले यांनी बिनव्‍याजी व  मुदत बंद ठेव खात्‍यातील रक्‍कमा न दिल्‍याने सेवेत त्रुटी केली आहे, त्‍यामुळे तक्रारदारांना मानसिक त्रास झाला तसेच सदरची तक्रार दाखल करणे भाग पडले. त्‍यामुळे सामनेवाले कोल्‍हापूर जिल्‍हा शेतकरी सहकारी सुतगिरणी लि. इचलकरंजी यांच्‍याकडून मानसिक त्रासापोटी रु.1,000/- व अर्जाच्‍या खर्चापोटी रक्‍कम रु. 500/- वसुल होऊन मिळण्‍यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे.

  मुद्दा क्र.4 -   सबब, मंच पुढीलप्रमाणे आदेश देत आहे.

                                                                 आदेश

1 .       तक्रारदारांचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्‍यात येतो.

2 .       सामनेवाले कोल्‍हापूर जिल्‍हा शेतकरी सहकारी सुतगिरणी लि. इचलकरंजी यांनी तक्रारदार यांना न्‍यायनिर्णयातील परिच्‍छेद कलम-2 मध्‍ये नमुद असलेल्‍या बिनव्‍याजी व मुदत बंद ठेवींत गुंतविलेल्‍या रक्‍कमा ठरलेल्‍या व्‍याज दरानुसार 30 दिवसांत अदा करावे.  व ठेव पावती क्र. 100, 588 व 464 या मुदत ठेव पावत्‍यांवर मुदत संपले तारखेपासून संपुर्ण रक्‍कम फीटेपर्यंत  द.सा.द.शे. 6 टक्‍के व्‍याज अदा करावे.

3.     सामनेवाले कोल्‍हापूर जिल्‍हा शेतकरी सहकारी सुतगिरणी लि. इचलकरंजी यांनी तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी रु.1,000/- (अक्षरी रुपये एक हजार फक्‍त) तसेच तक्रार अर्जाचा खर्च रक्‍कम रु. 500/-(अक्षरी रुपये पाचशे फक्‍त) अदा करावेत.

4.     आदेशाच्‍या प्रमाणित प्रतीं उभय पक्षकारांना विनामुल्‍य पाठविण्‍यात याव्‍यात.

 
 
[HON'ABLE MR. Sanjay P. Borwal]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. Dinesh S. Gavali]
MEMBER
 
[HON'ABLE MRS. Rupali D. Ghatage]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.