Maharashtra

Nandurbar

cc/12/50

Mr.Daulatsing Surupsing Valvi - Complainant(s)

Versus

Mr.Sachin Morankar,Chairman Shivvandan Sah.Gruh Nirman Sanstha Nandurbar - Opp.Party(s)

Mr.Rahul D Kulkarni

08 Jul 2014

ORDER

Dist.Consumer Disputes Redressal Forum,Nandurbr
Near New Court Building,Tokar talav road,Nandurbar.
 
Complaint Case No. cc/12/50
 
1. Mr.Daulatsing Surupsing Valvi
Talavipada Po.Shegva Tel.Navapur Dist.Nandurbar
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. V.V.Dani PRESIDENT
 HON'BLE MRS. N. N. Desai MEMBER
 HON'BLE MR. M.S.Bodas MEMBER
 
For the Complainant:Mr.Rahul D Kulkarni, Advocate
For the Opp. Party: Mr.P N Deshpande, Advocate
ORDER

निशाणी नं.१ वरील आदेश

 

(१)       सामनेवाले यांनी घरकुल योजनेत सेवा देण्‍यात त्रुटी केली आहे असे नमूद करुन, सामनेवालेंनी फरकाची रक्‍कम स्‍वीकारावी, घरकुलाचा प्रत्‍यक्ष कब्‍जा द्यावा इ. मागणीसाठी तक्रारदार यांनी सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा कलम १२ अन्‍वये या मंचात दाखल केली आहे. 

 

(२)       सदर प्रकरणी मंचासमोर कामकाज सुरु असतांना दि.०८-०७-२०१४ रोजी तक्रारदार क्र.१ यांनी नि.नं. ११ वर पुरसीस दाखल केली आहे आणि सामनेवाले क्र.२ यांनी नि.नं. १० वर शपथेवर पुरसीस दाखल केली आहे.  त्‍यात सामनेवाले क्र.२ यांनी असे नमूद केले आहे की,  “माझ्या गैर समजुतीमुळे व पूर्णपणे माहिती नसल्‍याने इरत तक्रारदारांसोबत मी ही तक्रार दाखल केली होती.  सदर संस्‍थेविरुध्‍द व सचिन मोराणकर विरुध्‍द माझी आता काहीएक तक्रार राहिली नसल्‍याने मी माझी तक्रार मागे घेत आहे.  तरी त्‍या तक्रारीतील माझे नांव कमी करण्‍यात यावे व तक्रार काढून टाकणेत यावी.” त्‍यावर तक्रारदार क्र.२ व त्‍यांच्‍या विद्वान वकीलांची स्‍वाक्षरी आहे.  तसेच सामनेवाले क्र.१ यांनी असे नमूद केले आहे की,  “माझी सदनिकेबाबत आलेली रक्‍कम आणि मी जमा केलेली रक्‍कम तसेच संस्‍थेच्‍या कामकाजाबाबत माझी आजरोजी कोणत्‍याही स्‍वरुपाची तक्रार नाही.  कृपया ग्राहक मंचाने माझी तक्रार मागे घ्‍यावी हि नम्र विनंती ” त्‍यावर तक्रारदार क्र.१ यांची स्‍वाक्षरी आहे. 

 

(३)       तक्रारदारांनी दाखल केलेल्‍या पुरसीसचे अवलोकन करता, तक्रारदार व सामनेवाले यांच्‍यात मंचाबाहेर आपसात सामंजस्‍याने तडजोड झाली असून, उभयतात कोणताही वाद शिल्‍लक राहिला नसल्‍याचे स्‍पष्‍ट होते.  त्‍यामुळे तक्रारदारांच्‍या तक्रारीचे निवारण झाले असल्‍याने सदर प्रकरण निकाली काढणे योग्‍य होईल असे मंचाचे मत आहे.   सबब तक्रारदारांची पुरसीस मंजूर करण्‍यात आली आहे आणि खालील प्रमाणे आदेश करण्‍यात येत आहे.

 

 

 

 

आदेश

 

 (अ)  तक्रारदार यांची तक्रार निकाली काढण्‍यात येत आहे. 

      (ब)  तक्रार अर्जाचे खर्चाबाबत कोणताही आदेश नाही. 

 

 

नंदुरबार

दिनांक : ०८-०७-२०१४

 

 
 
[HON'BLE MRS. V.V.Dani]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. N. N. Desai]
MEMBER
 
[HON'BLE MR. M.S.Bodas]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.