Maharashtra

Thane

CC/424/2014

Dr. Ramesh Nimbaji Badgujar - Complainant(s)

Versus

Mr. Radheshyam Verma - Opp.Party(s)

21 Oct 2015

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे .
 
Complaint Case No. CC/424/2014
 
1. Dr. Ramesh Nimbaji Badgujar
At. Mayur co op hgs society ltd, Bhawani nagar,Forest colony , opp prem petrol pump,Birla colleghe road, Kalyan (W)
Thane
MH
...........Complainant(s)
Versus
1. Mr. Radheshyam Verma
At. Machindra Ghude chawl, room No.1, opp. Shri vithal mandir, Milind nagar, Koliwada,Birla college Rd, Kalyan (W) 421301
Thane
MH
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. MANOHAR Y. MANKAR PRESIDENT
 HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE MEMBER
 HON'BLE MR. N D Kadam MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

Dated The 21 Oct 2015

               न्‍यायनिर्णय   

               (द्वारा सौ. माधुरी एस. विश्‍वरुपे- मा. सदस्‍या)

 

 

  1.              तक्रारदार हे वैदयकीय व्‍यवसाय करत असून त्‍यांचे क्लिनिकचे भिंतीचे प्‍लास्‍टरींग, रंगाचे काम व इतर किरकोळ बांधकाम दिवाळीचे आधी पूर्ण करण्‍यासाठी सामनेवाले यांना रक्‍कम रु. 15,000/- देण्‍याचे ठरले. त्‍याप्रमाणे तक्रादारांनी दिवाळीच्‍या एक आठवडापूर्वी रु. 11,900/- व लक्ष्‍मीपूजनाचे दिवशी रु. 2,000/- अशी एकूण रक्‍कम रु. 13,900/- बांधकामापोटी अदा केली. परंतु सामनेवाले यांनी याबाबतची पावती दिली नाही.
  2.            सामनेवाले यांनी तक्रारदारांचे क्लिनिकचे ठरवून दिलेले बांधकाम व्‍यवस्थितपणे केले नाही. तक्रारदारांनी सामनेवाले यांना कामातील त्रुटी दूर करुन उर्वरीत रक्‍कम रु. 1100/- घेऊन जाण्‍यास सांगितले. परंतु त्‍यानंतर सामनेवाले यांनी सदरचे बांधकाम पूर्ण करण्‍यासाठी आले नाहीत.
  3.       सामनेवाले यांनी अशाप्रकारे इतर लोकांची फसवणूक केल्‍याचे तक्रारदारांना समजले. तक्रारदारांनी सामनेवाले यांना पाठवलेली कायदेशीर नोटीस “Unclaimed” या शे-यासह परत आली. सामनेवाले यांनी तक्रारदारांचे उर्वरीत बांधकाम पूर्ण करावे अन्‍यथा रक्‍कम रु. 13,900/- द.सा.द.शे. 9% व्‍याजदरासहीत परत मिळण्‍यासाठी तक्रारदारांनी प्रस्‍तुत तक्रार दाखल केली आहे.
  4.          तक्रारदारांना पाठविलेली तक्रारीची नोटीस “intimation” या शे-यासह परत आलेली आ‍हे. सामनेवाले नोटीसीमध्‍ये नमूद केलेल्‍या पत्‍त्‍यावर राहतात याबाबतचे शपथपत्र मंचात दाखल केले आहे. सामनेवाले यांना मंचासमोर हजर राहून लेखी कैफियत दाखल करण्‍यासाठी संधी देऊनही गैरहजर असल्‍यामुळे दि. 09/06/2015 रोजी त्‍यांचेविरुध्‍द प्रकरण एकतर्फा चालविण्‍याचा आदेश पारीत करण्‍यात आला.
  5.         तक्रारदारांची तक्रार, दाखल कागदपत्रे, पुरावा शपथपत्र, लेखी  युक्‍तीवाद व दाखल कागदपत्रे यांचे सखोल वाचन केले. तसेच तक्रारदार यांचा तोंडी युक्‍तीवाद ऐकण्‍यात आला. यावरुन खालीलप्रमाणे बाबी स्‍पष्‍ट होतातः
  6.  
  1.   तक्रारदारांचा पुरावा अबाधित आहे. तक्रारीतील मजकूरास सामनेवाले यांचेतर्फे आक्षेप दाखल नाही. अशा परिस्थितीत तक्रारदारांनी तक्रारीत नमूद केलेला मजकूर ग्राहय धरणे उचित होईल असे मंचाचे मत आहे.

ब.         तक्रारदारांनी तक्रारीत नमूद केल्‍याप्रमाणे सामनेवाले यांना रु. 15,000/- एवढी रक्‍कम देऊन क्लिनिकचे प्‍लास्‍टर व रंगकाम व इतर किरकोळ कामे करण्‍याकरीता देण्‍याचे ठरले होते. तक्रारदारांनी सामनेवाले यांना  रु. 13,900/- एवढी रक्‍कम दिली आहे व उर्वरीत रक्‍कम देण्‍यास तक्रारदार तयार आहेत. परंतु सामनेवाले यांनी दिलेले काम पूर्ण केले नाही व केलेले कामही व्‍यवस्थितपणे केले नाही. तक्रारदारांनी यासंदर्भात क्लिनिकचे फोटो मंचात दाखल केले आहेत. सदर फोटोंवरुन क्लिनिकचे आतील बाजूला प्‍लॅस्‍टर व रंगकाम चांगल्‍याप्रकारे न झाल्‍याचे दिसून येते.

क.         तक्रारदारांनी दाखल केलेल्‍या पुराव्‍यानुसार सामनेवाले यांनी ठरवून दिल्‍याप्रमाणे किती काम केले? व किती काम अपूर्ण आहे? याबाबतचा पुरावा मंचासमोर नाही. परंतु फोटोवरुन क्लिनिकच्‍या भिंतीचे काम व्‍यवस्थित नसल्‍याचे दिसते. सामनेवाले यांनी तक्रारदारांकडून रक्‍कम रु. 13,900/- घेऊनही अर्धवट बांधकाम केले. तसेच केलेले काम व्‍यवस्थितपणे न करुन त्रुटीची सेवा दिली आहे. अशा परिस्थितीत सामनेवाले यांनी तक्रारदारांना रक्‍कम रु. 5,000/- नुकसान भरपाईची रक्‍कम व रु. 1,000/- तक्रारीच्‍या खर्चाची रक्‍कम देणे योग्‍य आहे असे मंचाचे मत आहे.

 

       सबब खालीलप्रमाणे आदेश करण्‍यात येतोः

               आ दे श

  1. तक्रार क्र. 424/2014 अंशतः मान्‍य करण्‍यात येते.
  2. सामनेवाले यांनी रक्‍कम रु. 13,900/- घेऊन तक्रारदारांचे बांधकाम अर्धवट केले तसेच दिलेले काम चांगल्‍याप्रकारे न करुन तक्रारदारांना त्रुटीची सेवा दिल्‍याचे जाहिर करण्‍यात येते.
  3. सामनेवाले यांना आदेश देण्‍यात येतो की त्‍यांनी तक्रारदारांना नुकसान भरपाईची रक्‍कम रु. 5,000/- (अक्षरी रुपये पाच हजार) व तक्रारीचा खर्च रु. 1,000/- (अक्षरी रुपये एक हजार) दि. 07/12/2015 पर्यंत दयावी  विहीत  मुदतीत अदा न केल्‍यास दि. 08/12/2015 पासून द.सा.द.शे. 9% व्‍याजदराने दयाव्‍यात.
  4. संचिकेच्‍या अतिरिक्‍त प्रती तक्रारदारांना परत करण्‍यात याव्‍यात.
  5. आदेशाच्‍या प्रती उभय पक्षांना विनाविलंब व विनामुल्‍य पोष्‍टाने पाठविण्‍यात   याव्‍यात.
 
 
 
 
[HON'BLE MR. MANOHAR Y. MANKAR]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE]
MEMBER
 
[HON'BLE MR. N D Kadam]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.