ग्राहक तक्रार क्रमांकः-224/2009 तक्रार दाखल दिनांकः-27/10/2009 निकाल तारीखः-30/03/2010 कालावधीः-0वर्ष05महिने03दिवस समक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे श्री.खुशालचंद शामलजी देसाई डायरेक्टर ऑफ टेक्नो इकॉनॉमीक सर्व्हीसेस प्रा.लि. ए-323,रोड नं.21,वागळे इंडस्ट्रिज इस्टेट, ठाणे. 400 604 ...तक्रारकर्ता विरुध्द श्री.पांडये प्रोप्रायटर ऑफ आझाद हिंद सिक्युरिटी फोर्स, सी.पी.तलाव,हनुमान मंदीर जवळ, रोड नं.28, वागळे इस्टेट,ठाणे. 400 604 ...वि.प. उपस्थितीः-तक्रारकर्ताः-स्वतः विरुध्दपक्षातर्फे वकीलः-पद्मा ठाकूर गणपूर्तीः- 1.सौ.भावना पिसाळ , मा. सदस्या 2.श्री.पां.ना.शिरसाट, मा.सदस्य -निकालपत्र - (पारित दिनांक-30/03/2010) सौ.भावना पिसाळ , मा. सदस्या, यांचेद्वारे आदेशः- 1)सदरहू तक्रार खुशालचंद देसाई यांनी श्री.पांडे प्रोपरायटर, आझाद हिंद सिक्युरिटी फोर्स यांचे विरुध्द दाखल केली आहे. यामध्ये त्यांनी विरुध्दपक्षकाराकडे रुपये4,39,674/- रकमेची मागणी केली आहे. 2)तक्रारदार यांची मे.टेक्नो इकॉनॉमीक सर्व्हीसेस प्रा.लि ही कंपनी वागळे इंडस्ट्रियल इस्टेट ठाणे येथे आहे. त्यांच्याकडे ही फॅक्टरी चालवण्यासाठी लागणारी सर्व कायदेशीर लायसन्स आहेत. विरुध्दपक्षकार यांची आझाद हिंद सिक्युरिटी फोर्स ही नोंदणीकृत फर्म आहे व या फर्मव्दारे ते गरजूना सिक्युरिटी सर्व्हीस व कामगार पुरवतात. विरुध्दपक्षकार हे तक्रारदार यांना डिसेंबर2003 पासून ऑगष्ट2007 पर्यंत सिक्युरिटी सर्व्हीस पुर्ण दिवस रात्र 24तास ठेऊन चो-या,दरोडे यापासून संरक्षण देण्यासाठी पुरवत होते. एप्रिल2007 मध्ये 2/- 250कि.ग्रॅ. Erythromycin stearate कंपनीच्या गोडाऊनमध्ये ठेवले होते. तदनंतर जून2007 मध्ये हा सर्व माल चोरी झाल्याचे निदर्शनास आले. प्रत्यक्षात सदर माल रुपये 4,27,274/- एवढया रकमेचा असल्याचा बील पुरावा जोडला आहे. विरुध्दपक्षकार यांनी सदर चोरीचा एफ.आय.आर. नं.1340/2007 दिनांक06/09/2007 रोजी दाखल केलेला होता तो मंचापुढे दाखल आहे. तक्रारदार यांच्यामते विरुध्दपक्षकार यांच्या सिक्युरिटी देण्यामध्ये त्रृटी व दोष असल्याने कबुल केलेली तत्सम सेवा देण्यामध्ये त्यांनी निष्काळजीपणा दाखवला असल्याने ही चोरी झाली. म्हणून तक्रारदार यांनी झालेली नुकसान भरपाई रुपये 4,39,674/-विरुध्दपक्षकार यांचेकडे मागितली आहे. 3)विरुध्दपक्षकार यांनी त्यांची लेखी कैफियत दिनांक27/10/2007 रोजी दाखल केली आहे. यामध्ये सदर कंपनीमध्ये त्यांची सिक्युरिटी असतांना 250किग्रॅ.माल चोरीला गेल्याबद्दल दुमत नाही. परंतु सदर ड्रम गेटच्या आत आल्यावर त्याची कस्टडी केमिस्ट व सुपरवायझर व वॉचमनच्या ताब्यात असते व त्या गोडाऊनची चावीही याच तिघांकडे असते. तक्रारदार यांनी एप्रिल2007मध्ये नवीन केमिस्टची नेमणूक केली होती. व मे 2007 च्या पगारावरुन त्यांच्यात भांडणे झाली होती व जून 2007 मध्ये त्यांनी ही नोकरी राजीनामा देऊन सोडली होती व त्यानंतर सदरचे चोरीचे प्रकरण उघडकीस आले असे विरुध्दपक्षकार यांचे म्हणणे आहे. ही चोरी होणे हे विरुध्दपक्षकार यांच्या आवाक्याबाहेरच्या परिस्थितीमुळे घडून आली होती. त्यामुळे ते या चोरीस जबाबदार ठरु शकत नाही असे त्यांचे म्हणणे आहे. 4)उभय पक्षकारांची शपथपत्रे, लेखी कैफियत,पुराव्याची कागदपत्रे व लेखी युक्तीवाद मंचाने पडताळून पाहीला व मंचापुढे पुढील एकमेव प्रश्न उपस्थित होतो. प्रश्नः-विरुध्दपक्षकार यांच्या सेवेत त्रुटी व निष्काळजीपणा आढळतो कां.? उत्तरः-वरील प्रश्नाचे उत्तर हे मंच होकारार्थी देत असून पुढील कारणमिमांसा देत आहे. कारण मिमांसा विरुध्दपक्षकार यांनी तक्रारदार यांच्या फॅक्टरीमध्ये 24तास दरोडे व चो-यापासून संरक्षणार्थ सिक्युरिटी फोर्स दिला होता व तक्रारदाराकडून त्याबद्दल मोबदलाही त्यांना नियमित मिळत होता. तक्रारदार सदर फॅक्टरीत जून2007 मध्ये गोडावूनमध्ये एप्रिल2007 मध्ये ठेवलेला 250किग्रॅ एरिस्रोमायसीन 3/- स्टीरेटचा ड्रममध्ये ठेवलेला रुपये 4,27,274/- एवढया रकमेचा माल चोरीस गेला. तसा संबंधीत पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर नोंदवलेला आहे. एवढा मोठया मालाचा साठा सिक्युरिटीच्या नजरेआड चोरी होऊ शकला. म्हणजेच सिक्युरिटी निकृष्ट दर्जाची होती. सदर सुरक्षा इतकी कमकुवत ठरली की चोरी होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आलेच नाही. यावरुन विरुध्दपक्षकार यांनी सुरक्षा देण्याच्या सेवेत निष्काळजीपणा दाखवलेला आढळतो व त्यामुळे तक्रारदार हे त्यांच्या चोरी झालेल्या मालाची नुकसान भरपाई घेण्यास पात्र ठरतात असे या मंचाचे मत असल्याने हे मंच पुढील अंतिम आदेश देत आहे. -आदेश - 1)तक्रार क्रमांक 224/2009 ही अंशतः मंजूर करण्यात येत असून विरुध्दपक्षकार यांनी या तक्रारीचा खर्च रुपये 1,000/-(रुपये एक हजार फक्त) तक्रारदारास द्यावेत. 2)विरुध्दपक्षकार यांनी सिक्युरिटी देण्याच्या सेवेत निष्काळजीपणा दाखवला त्याबद्दल चोरी झालेल्या मालाची किंमत रुपये 4,27,274/-(रुपये चार लाख सत्तावीस हजार दोनशे चव-याहत्तर फक्त) एवढी रक्कम तक्रारदार यांस द्यावेत. या आदेशाचे पालन या आदेशाची प्रत मिळाल्यापासून दोन महिन्याच्या आत करावे. अन्यथा तदनंतर वरील रकमेवर पुर्ण रक्कम फिटे पावेतो 7टक्के व्याज द्यावे लागेल. 3)विरुध्दपक्षकार यांनी तक्रारदार यांस मानसिक त्रासाचे रुपये 5,000/-(रुपये पांच हजार फक्त)द्यावेत. 4)सदर आदेशाची प्रत उभय पक्षकारांना निःशुल्क देण्यात यावी. दिनांकः-30/03/2010 ठिकाणः-ठाणे
(श्री.पां.ना.शिरसाट) (सौ.भावना पिसाळ) सदस्य सदस्या जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे
|