उभय पक्ष हजर
आदेश
द्वाराश्री.एम.जी.रहाटगावकर - मा.अध्यक्ष
दि. 16/1/2012 रोजी सदर प्रकरण सुनावणीस आले असता अर्जदाराने अर्ज दाखल केला व नमूद केले की गैरअर्जदार/विरुध्द पक्षाने मंचाकडे जमा केलेली रक्कम रु. 9,642/- त्यांना देण्यात यावी.
मूळ तक्रार प्रकरण 321/2007 यात मंचाने दि. 17/11/2008 रोजी पारीत केलेल्या आदेशाच्या पूर्ततेसंदर्भात सदर दरखास्त प्रकरण दाखल करण्यात आले. गैरअर्जदार/मूळ विरुध्द पक्ष यांनी राज्य आयोगाकडे क्र. 347/2009 चे अपिल दाखल केले. अपिल प्रकरणी रु, 7,500/- कॉस्ट तक्रारदारास दिल्यास अपिल दाखल करण्यास झालेला विलंब माफ करण्यात येईल असे मा.राज्य आयोगाने नमूद केले. मात्र या अटींचे पालन गैरअर्जदारांनी न केल्याने मा. राज्य आयोगाने दि. 15/12/2010 रोजी अपिल निकाली काढले. मंचाचा आदेश कायम होऊनही त्याची पूर्तता गैरअर्जदारांनी केली नाही अथवा ते मंचासमोर हजर झाले नाही. त्यामुळे त्याविरुध्द वॉरंट जारी करणे भाग पडले. दि. 11/1/2012 रोजी गैरअर्जदारांनी मंचाकडे रु. 9,642/- रक्कम जमा केली.
मंचाकडे जमा करण्यात आलेली आदेशान्वीत रक्कम अर्जदाराला देणे आवश्यक आहे. गैरअर्जदारांनी मूळ तक्रार प्रकरणातील मंचातील आदेशाची पूर्तता केल्याचे स्पष्ट होते. सबब अंतीम आदेश पारीत करण्त
येतोः
1. प्रबंधक, ठाणे मंच यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारदारास सदर
प्रकरणी मंचाकडे जमा असलेली रक्कम रु. 9,642/- (अक्षरी रुपये नऊ
हजार सहाशे बेचाळीस) अर्जदारास दयावी.
2. आदेश पूर्तता झाल्याने दरखास्त क्र. 112/2009 निकाली काढण्यात येते.
3. खर्चाचे वहन उभय पक्षांनी करावे
दिनांकः 16/ 01/2012 (ज्योती अय्यर) (एम.जी.रहाटगावकर )
सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे