ग्राहक तक्रार क्रमांकः-66/2009 तक्रार दाखल दिनांकः-05/02/2009 निकाल तारीखः-17/04/2010 कालावधीः-01वर्ष02महिने12दिवस समक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे श्री.कालीदास यादवराव चव्हाण रा-301,तक्षशिला,निर्मलनगर, मुलूंड (प),मुंबई.400 080 ...तक्रारकर्ता विरुध्द श्री.मुकूंद भोईर प्रोप्रा.राज बिल्डर्स/पवन बिल्डर्स, एफ/3,मातृ अलंकार,गुजराथी शाळेसमोर, फडके रोड,डोंबिवली(पू)जि.ठाणे421 201 ...वि.प. उपस्थितीः-तक्रारकर्त्यातर्फे वकीलः-श्री.एन.टी.पाशिलकर विरुध्दपक्षातर्फे वकीलः-श्रीमती स्वाती पुराणिक गणपूर्तीः- 1.सौ.शशिकला श.पाटील, मा.अध्यक्षा 2.सौ.भावना पिसाळ , मा.सदस्या 3.श्री.पां.ना.शिरसाट, मा.सदस्य -निकालपत्र - (पारित दिनांक-17/04/2010) सौ.भावना पिसाळ , मा.सदस्या यांचेद्वारे आदेशः- 1)सदरहू तक्रार श्री.कालीदास चव्हाण यांनी श्री.मुकूंद भोईर प्रोप्रायटर राज/पावन बिल्डर्स यांचेविरुध्द दाखल केली आहे. यामध्ये त्यांनी विरुध्दपक्षकाराकडे बुकींग करुन करारनामा केलेल्या सदनिकेचा ताबा, व नुकसान भरपाई मागितली आहे. 2)तक्रारदार यांनी विरुध्दपक्षकार बिल्डर यांचेकडे दिनांक24/10/1991 रोजी नोंदणीकृत करारनामा करुन त्यांनी बांधलेल्या चानूर भवन इमारतीमध्ये 600 चौ.फूटाची सदनिका नं.305, 3रा माळा सी.विंगमध्ये नवी डोंबिवली धनश्याम रोड येथे रुपये2,00,000/-किंमतीला ठरवून त्यापैकी प्रथम रुपये70,000/- एवढी रक्कम फेडून विकत घेतली. त्यानंतर विरुध्दपक्षकार यांनी बहुतांशी बांधकाम पुर्ण केले तरी तक्रारदार यांना त्याच्या सदनिकेचा 2/- ताबा ठरलेल्या वेळेत दिला नाही. तक्रारदार यांनी राहीलेली रक्कम विरुध्दपक्षकार यांना देण्याची तयारी दाखवली. तरीही सदर रक्कम विरुध्दपक्षकार यांनी स्विकारली नाही. कारण त्यावेळेपर्यंत जागाचे भाव खूप वाढले होते. व विरुध्दपक्षकार यांना इतर गि-हाईकांना सदर सदनिका सहज जास्त किंमतीला विकता येत होती. विरुध्दपक्षकार याचा इरादा लक्षात आल्यावर तक्रारदार यांनी विरुध्दपक्षकार यांना वकीलाची नोटीस देऊन सदनिकेचा ताबा मागितला. 3)विरुध्दपक्षकार यांनी त्यांची लेखी कैफियत दिनांक08/04/2009 रोजी नि.8वर दाखल केली आहे. यामध्ये त्यांनी उभय पक्षात सदर सदनिकेबाबत करारनामा होऊन रुपये70,000/- तक्रारदार यांचेकडून मिळाल्याबद्दल कबूली दिली आहे. परंतु त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी बाकी राहीलेल्या रकमेबाबत डिमांड नोटीस 92व93साली पाठवूनही तक्रारदार यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. व तक्रारदार यांनी नवीन पत्ता कळवला नाही अशी तक्रार मांडली आहे. त्यामुळे ताबा देण्याबाबत ते जबाबदार नाहीत व अपु-या फेडलेल्या किंमतीमुळे बांधकामही पुढे पुर्ण करता आले नाही असे म्हणणे मांडले आहे. तसेच मध्यंतरीच्या काळात त्यांनी त्यांचे बांधकामाचे अधिकार दुस-या बिल्डरला सोपवले असल्यामुळे त्यांची कोणतीही जबाबदारी राहीली नाही असे स्पष्टीकरण दिले आहे. 4)उभय पक्षकारांची शपथपत्रे,पुरावा कागदपत्रे, लेखी कैफियत व लेखी युक्तीवाद मंचाने पडताळून पाहीले व पुढील एकमेव प्रश्न उपस्थित होतो. प्रश्नः-विरुध्दपक्षकार यांच्या सेवेत त्रुटी व कमतरता आढळते का? वरील प्रश्नाचे उत्तर हे मंच होकारार्थी देत असून पुढील कारण मिमांसा देत आहे. कारण मिमांसा तक्रारदार यांनी विरुध्दपक्षकार यांनी बांधलेल्या चानूर भवन या नवी डोंबिवली येथील इमारतीमध्ये सी.विंग सदनिका नं.305 सुमारे 600 चौ.फुट क्षेत्रफळाची सदनिका रुपये2,00,000/- एवढया किंमतीला ठरविली होती व त्यापैकी रुपये 70,000/- विरुध्दपक्षकार यांना फेडले होते. विरुध्दपक्षकार यांनी त्यांच्या कंपनीचे नांव राज बिल्डर्स ऐवजी पावन बिल्डर्स असे बदलून घेतले. परंतु विरुध्दपक्षकार यांच्या म्हणण्याप्रमाणे दुस-या बिल्डर्सला कंपनी दिली असल्याचा पुरावा दाखल केलेला नाही. तसेच त्यांनी तक्रारदारांना 92व93 साली पाठवलेल्या डिमांड नोटीसांची पोच पावतीही दाखल केलेली 3/- नाही. मंचाच्या मते सदर दाखल केलेल्या नोटीसवर मुळ प्रती सारख्या पेनाने लिहीलेल्या तारखा दिसल्या, यावरुन सदर डिमांड नोटीस विश्वासपात्र ठरू शकत नाहीत. तक्रारदार यांच्याशी सदनिकांबाबत नोंदणीकृत करारनामा करुनही 1ते 1 1/2 वर्षात ताबा देण्यास विरुध्दपक्षकार यांनी दिरंगाई दाखवली आहे. तक्रारदार हे उर्वरीत रक्कम देण्यास तयार आहेत. त्यामुळे विरुध्दपक्षकार यांनी ठरलेल्या सदनिकेचा ताबा कोणताही तिस-या पक्षकारांचा हस्तक्षेप न करता तक्रारदारास देण्याची जबाबदारी पार पाडली पाहीजे. म्हणून हे मंच पुढील अंतिम आदेश देत आहे. -आदेश - 1)तक्रार क्रमांक 66/2009 ही अंशतः मंजूर करण्यात येत असून या तक्रारीचा खर्च रु.500/-(रु.पाचशे फक्त) विरुध्दपक्षकार यांनी तक्रारदारास द्यावा. व स्वतःचा खर्च स्वतः सोसावा. 2)विरुध्दपक्षकार यांनी तक्रारदारास दिनांक24/10/1991 च्या नोंदणीकृत करारनाम्याप्रमाणे 'चानूर भवन' नवी डोंबिवली येथील सदनिका नं.305 कोणत्याही तिस-या व्यक्तीचा हस्तक्षेप न करता सर्व अँमेनीटीज देऊन ताबा द्यावा. व त्याचवेळेस तक्रारदार यांनी बाकी राहीलेली रक्कम रु1,30,000/-(रु.एक लाख तीस हजार फक्त) विरुध्दपक्षकार यांना द्यावी. या आदेशाचे पालन या आदेशाची प्रत मिळाल्यापासून दोन महिन्याच्या आत करावे. अन्यथा तदनंतर रुपये70,000/-(रु.सत्तर हजार फक्त)रकमेवर दरमहा 15टक्के दराने व्याज द्यावे लागेल. 3)विरुध्दपक्षकार यांनी तक्रारदार यांस मानसिक त्रासाचे रुपये5,000/-(रुपये पांच हजार फक्त)द्यावेत. 4)सदर आदेशाची प्रत उभय पक्षकारांना निःशुल्क देण्यात यावी. दिनांकः-17/04/2010 ठिकाणः-ठाणे
(श्री.पां.ना.शिरसाट) (सौ.भावना पिसाळ) (सौ.शशिकला श.पाटील) सदस्य सदस्या अध्यक्षा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे
ग्राहक तक्रार क्रमांकः-66/2009 तक्रार दाखल दिनांकः-05/02/2009 निकाल तारीखः-17/04/2010 कालावधीः-01वर्ष02महिने12दिवस समक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे श्री.कालीदास यादवराव चव्हाण रा-301,तक्षशिला,निर्मलनगर, मुलूंड (प),मुंबई.400 080 ...तक्रारकर्ता विरुध्द श्री.मुकूंद भोईर प्रोप्रा.राज बिल्डर्स/पवन बिल्डर्स, एफ/3,मातृ अलंकार,गुजराथी शाळेसमोर, फडके रोड,डोंबिवली(पू)जि.ठाणे421 201 ...वि.प.
उपस्थितीः-तक्रारकर्त्यातर्फे वकीलः-श्री.एन.टी.पाशिलकर विरुध्दपक्षातर्फे वकीलः-श्रीमती स्वाती पुराणिक गणपूर्तीः- 1.सौ.शशिकला श.पाटील, मा.अध्यक्षा 2.सौ.भावना पिसाळ , मा.सदस्या 3.श्री.पां.ना.शिरसाट, मा.सदस्य -दुरुस्ती निकालपत्र - (पारित दिनांक-12/05/2010) सौ.भावना पिसाळ , मा.सदस्या यांचेद्वारे आदेशः-
1)तक्रार क्रमांक 66/2009 मधील अंतीम आदेश क्र.2 मध्ये इमारतीचे नाव ''छन्नूर भवन'' वाचावे. टंकलेखनातील चुकीने ते ''चानूर भवन'' लिहीले गेले आहे. म्हणून चुकीची दुरुस्ती करुन पुढील प्रमाणे वाचावे. 2)विरुध्दपक्षकार यांनी तक्रारदारास दिनांक24/10/1991 च्या नोंदणीकृत करारनाम्याप्रमाणे 'छानूर भवन' नवी डोंबिवली येथील सदनिका नं.305 कोणत्याही तिस-या व्यक्तीचा हस्तक्षेप न करता सर्व अँमेनीटीज देऊन ताबा द्यावा. व त्याचवेळेस तक्रारदार यांनी बाकी राहीलेली रक्कम 2/- रु1,30,000/-(रु.एक लाख तीस हजार फक्त) विरुध्दपक्षकार यांना द्यावी. दिनांकः-12/05/2010 ठिकाणः-ठाणे
(श्री.पां.ना.शिरसाट) (सौ.भावना पिसाळ) (सौ.शशिकला श.पाटील) सदस्य सदस्या अध्यक्षा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे |