-ः निकालपत्र ः- द्वारा- मा.सदस्या, सौ.ज्योती मांधळे. 1. तक्रारकर्तीची थोडक्यात तक्रार खालीलप्रमाणे- सन 1997 मध्ये सामनेवालेनी सर्व्हे नं.114, हि.नं.1 बी अँड टु, गाव उर्सोली, ता.पनवेल, जि.रायगड येथे सदनिका बांधण्याचे ठरवले. तक्रारदाराना सदनिका घेण्यात स्वारस्य नसल्यामुळे त्यांनी या भूखंडावर माहिती काढली. त्याप्रमाणे त्यांनी सदनिका क्र.102, बिल्डींग नं.3, 575 चौ.फूट ही सदनिका त्या भूखंडावरील खरेदी करण्याचे ठरवले. सदर सदनिकेची किंमत रु.3,45,000/- ठरली होती. त्याप्रमाणे दि.8-8-97 रोजी तक्रारदारानी सामनेवालेस रक्कम रु.3,45,000/- व त्याप्रमाणे सामनेवालेनी त्याना पावती दिली. तसेच त्याच दिवशी त्यांनी तक्रारदाराला अलॉटमेंट लेटर दिले. सामनेवालेनी त्याला सदेर सदनिकेचा करार करण्याचा प्रस्ताव ठेवला. त्यावर सामनेवालेनी सांगितले की ताबा देताना ते नोंदणीकृत करारनामा करुन देतील. तक्रारदारानी खूप दिवस करारनामा करण्यासाठी वाट पाहिली पण सामनेवालेनी तिला प्रतिसाद न दिल्यामुळे तिने सदर भूखंडावर जाऊन बांधकामाची परिस्थिती पाहिली. परंतु तिला लक्षात आले की, सामनेवालेनी अजून बांधकाम पूर्ण केलेले नाही. त्यानंतर काही काळाने सामनेवालेनी तिच्या सोबत बिनतारखेचा करारनामा केला व सदर करारनाम्यामध्ये माहे डिसेंबर 07 पर्यंत ते तिला ताबा देतील असा उल्लेख केला परंतु माहे डिसेंबर 07 पर्यंत सामनेवालेनी तिला ताबा दिला नाही म्हणून पुन्हा तिने जाऊन इमारतीच्या बांधकामाची परिस्थिती पाहिली. तेव्हा तिच्या लक्षात आले की, सामनेवालेनी सदर भूखंडावर इमारतीचे बांधकाम पूर्ण केले आहे व तिला सदरच्या सदनिकेमध्ये कोणीतरी कुटुंब रहात आहे व त्यासंबंधी तिने चौकशी कली की, सदरची सदनिका भाडयाने दिली आहे का विकली आहे त्यासबंधी तिने सामनेवालेकडे माहिती विचारली तेव्हा सामनेवालेनी सांगितले की, लवकरात लवकर ते हा प्रश्न सोडवतील. तक्रारदारानी ताबडतोब दि.11-8-09 रोजी तिच्या वकीलातर्फे सामनेवालेस नोटीस पाठवली. तक्रारदार सामनेवालेसोबत करानामा करण्यासाठी सदैन तयार होती परंतु सामनेवालेनी तिला प्रतिसाद दिला नाही. तेव्हा ती सदर सदनकेचा ताबा मिळणेस किंवा तिने दिलेले रु.3,45,000/- इतकी रक्कम 25 टक्के व्याजासह मिळण्यास पात्र आहे. तक्रारकर्तीची अशी विनंती की, सामनेवालेनी तिला ताबडतोब सदर सदनिकेचा करारनामा करुन देण्याबाबतचा आदेश मंचाने करावा, तसेच सदनिका क्र.102 चा ताबा तिला मिळावा किंवा तिने सदर सदनिकेपोटी भरलेली रक्कम रु.3,45,000/- 25 टक्के व्याजाने तिला सामनेवालेनी परत करण्याचा आदेश मंचाने पारित करावा, तसेच तिला झालेल्या मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई रु.एक लाख व तक्रारअर्जाचा खर्च मिळावा अशी तिने तक्रारीत मागणी केली आहे. 2. तक्रारदारानी अर्जासोबत नि.2 व 3 अन्वये प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. नि.4 अन्वये कागदपत्राची यादी दाखल केली आहे. त्यात मुख्यतः सर्व्हे नं.104, हि.नं.1 बी अँड 2 बिल्डिंग नं.3, गाव उर्सोली, पनवेल जि.रायगड, येथील सदनिका क्र.102 चे अलॉटमेंट लेटर विनातारखेचा करारनामा, तिने सामनेवालेस पाठवलेली नोटीस इ.कागदपत्रे दाखल करणेत आली आहेत. 3. नि.6 अन्वये मंचाने सामनेवालेस नोटीस पाठवून लेखी जबाब दाखल करणेचे निर्देश दिले. नि.11 अन्वये सामनेवालेनी लेखी जबाब दाखल केला. त्यात ते म्हणतात की, तक्रारदार ही तिच्या पतीच्या माध्यमातून सदरचा व्यवहार करीत आहे. तक्रारदाराचा पती मोठया प्रमाणात सदनिका खरेदी विक्रीचा व्यवहार करतो. त्यानुसार तक्रारदारानी त्यांच्याकडे वेगवेगळया इमारतीत 23 सदनिका बुक केल्या आहेत. 1995 ते 2000 या काळात तक्रारकर्तीने खरेदी केलेली वर्सोली, कोपरखैरणे मधील सदनिका विकल्या आहेत. त्यानुसार दिलेले अलॉटमेंट लेटर तिने परत केले आहे. त्याप्रमाणे त्यानी विकत घेतलेल्या सदनिका क्र.102, बिल्डींग नं.32 मधील सदनिका तयार होती व त्यांनी सामनेवालेस सदनिकेची उर्वरित रक्कम भरणेस सांगितले होते व ताबा घेण्यास कळवले होते. परंतु तक्रारकर्तीने उर्वरित रक्कम भरणेस नकार दिला व ताबा घेतला नाही. तक्रारदारानी सदरची सदनिका वाणिज्य कामासाठी व त्यावर नफा मिळवणेचे हेतूने घेतली आहे त्यामुळे ग्राहक संरक्षण कायदयाच्या तरतुदीनुसार ग्राहक होत नाही. त्यामुळे तिने दाखल केलेली तक्रार खर्चासह फेटाळण्यात यावी असे सामनेवालेचे म्हणणे आहे. नि.12 अन्वये सामनेवालेनी कागदपत्राची यादी दाखल केली आहे. त्यात वेगवेगळया 23 सदनिकांचे अलॉटमेंट लटर व पेमेंट शेडयूल इ.कागदपत्रे दाखल करणेत आली आहेत. नि.13 अन्वये तक्रारदारानी सामनेवालेच्या जबाबाला प्रतिउत्तर दाखल केले आहे. त्यात तिने हे अमान्य केले आहे की, तिने सामनेवालेसोबत ते बांधत असलेल्या वेगवेगळया इमारतीमध्ये 23 सदनिका खरेदी केल्या आहेत. तिने फक्त सामनेवाले बांधत असलेल्या उर्सोली गावातील सदनिका बुक केली आहे व सामनेवालेनी जे अलॉटमेंट लेटर दाखल केले आहे ते खोटे व बनावट आहे. सामनेवालेना नि.14 अन्वये तक्रारदाराच्या वकीलांनी दि. 16-8-00, 1-6-02, 1-8-02 रोजी नोटीस पाठवल्या त्या दाखल केल्या आहेत तसेच नि.15 अन्वये मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडींगचा कागद दाखल करण्यात आला आहे. 4. दि.3-3-11 रोजी सदरची तक्रार अंतिम सुनावणीसाठी आली असता तक्रारदार व सामनेवालेचे वकील हजर होते. उभय पक्षकारांचे वकीलांचे युक्तीवाद ऐकण्यात आले व मंचाने तक्रारीची सुनावणी अंतिम आदेशासाठी स्थगित केली. 5. तक्रारदारानी दाखल केलेला तक्रारअर्ज, प्रतिज्ञापत्र, कागदपत्रे, तसेच सामनेवालेनी दाखल केलेला जबाब, प्रतिज्ञापत्र, दस्तऐवजी या सर्वाचा विचार करुन मंचाने खालील मुद्दयाचा विचार केला- मुद्दा क्र.1- तक्रारकर्ती सामनेवालेची ग्राहक आहे काय? उत्तर - नाही. विवेचन मुद्दा क्र.1- 6. या मुद्दयाबाबत मंचाचे असे मत आहे की, तक्रारदारानी सामनेवाले 2 यांच्याकडे ते बांधत असलेल्या भूखंड क्र.114, हि.नं.1 बी अँड टु गाव उर्सोली, ता.पनवेल, जि.रायगड येथे सदनिका क्र.102, इमारत क्र.3, क्षेत्र.575 चौ.फू. चा बुक कला होता. साक्षांकित प्लॅन प्रमाणे सदर सदनिकेची किंमत रु.3,45,000/- ठरली आहे. त्याप्रमाणे तक्रारदारानी दि.8-8-97 रोजी सदर सदनिकेची संपूर्ण रक्कम सामनेवालेंकडे भरली होती व त्याप्रमाणे सामनेवालेनी तक्रारकर्तीला अलॉटमेंट लेटर दिले होते. अलॉटमेंट लेटर देताना असे आश्वासन दिले होते की, सदर सदनिकेचा ताबा देताना ते त्यांना नोंदणीकृत करारनामा करुन देतील. परंतु सामनेवालेनी त्यांना विनातारखेचा करारनामा करुन दिला व सदर करारनाम्यामध्ये ते तक्रारदाराना डिसेंबर 97 पर्यंत ताबा देतील असा उल्लेख केला होता, परंतु सामनेवालेनी त्यांना अदयापपर्यंत ताबा दिलेला नाही. सामनेवालेनी आपल्या लेखी जबाबात असे नमूद केले आहे की, तक्रारदार त्यांची ग्राहक नाही. कारण तक्रारदाराने सदरची सदनिका नफा मिळवण्याचे हेतूने विकत घेतली आहे. तिने त्यांच्याकडे आजपर्यंत 23 सदनिका बुक केल्या आहेत. 1995 ते 2000 या काळात तिने विकत घेतलेल्या सदनिका विकत घेतल्या आहेत, त्याप्रमाणे तिचे अलॉटमेंट लेटर तिने परत पाठवले आहे. मोठया प्रमाणात सदनिका बुक करायच्या व नंतर त्या विकायच्या हा तक्रारदाराचा व्यवसाय आहे असे सामनेवालेचे म्हणणे आहे. मंचाच्या मते सामनेवालेनी आपल्या लेखी जबाबासोबत कागदपत्राची यादी दाखल केली आहे व त्याप्रमाणे तक्रारदारानी सामनेवालेकडून विकत घेतलेल्या वेगवेगळया सदनिकाचे 23 अलॉटमेंट लेटर्स दाखल केले आहेत. तसेच सदर सदनिका खरेदी करण्याबाबतचे पेमेंट शेडयूल दाखल करण्यात आले आहे. याचा अर्थ तक्रारदारानी सामनेवालेंकडे सदर सदनिका विकत घेऊन त्यांना विकण्याचा व्यवसाय करत असल्याचे लक्षात येते. सदरचा व्यवसाय नफा कमावण्याचे हेतूने तक्रारदार करीत असल्यामुळे ती ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदीनुसार सामनेवालेंची ग्राहक होत नाही. तसेच नि.14 अन्वये दाखल केलेल्या दि.16-8-00, 1-6-02, 1-8-02 या तक्रारदारानी त्यांच्या वकीलातर्फे सामनेवालेस नोटीसा पाठवल्या आहेत. त्यामध्ये तिने असा उल्लेख केला आहे की, तिने सामनेवाले बांधत असलेल्या प्रकल्पात 13 सदनिका बुक केल्या आहेत. त्यामधील इमारत 3 मध्ये सदनिका क्र.102, 201, 202, ज्याचे क्षेत्र 575 चौ.फूट आहे हे तिला सामनेवालेनी दिले आहे. 23 सदनिकाचे एकूण क्षेत्रफळ 1725 चौ.फूट होते. त्याप्रमाणे तिन्ही सदनिकांची किंमत एकूण रु.10,35,000/- होते व ते तक्रारदारानी सामनेवालेस दिले आहेत. तसेच इमारत क्र.4 मध्ये सदनिका क्र.01/609, 202 ज्याचे क्षेत्र 575 चौ.फूट आहे, त्याबाबत सुध्दा तक्रारदारानी रु.7.10 लाख सामनेवालेस दिले आहेत. इमारत क्र.5 मध्ये सदनिका क्र.101, 102, 201, 202 हे रु.13,80 लाखात तक्रारदारानी सामनेवालेकडून विकत घेतले आहेत. इमारत क्र.7 मध्ये 01/985 हे रु.5,91 लाखास विकत घेतले आहेत. इमारत क्र.14/01 रु.3,84 लाख, इमारत क्र.16 मध्ये 102, व 103 हे रु.20.24 लाखास विकत घेतले आहेत. तक्रारदार आपल्या नोटीसीत असे म्हणतात की, इमारत क्र.3,4,5,7 14, 16 या इमारतीमध्ये तिने 13 सदनिका रु.61.24 लाखास विकत घेतल्या आहेत. त्यावरुन असे स्पष्ट आहे की, तक्रारदारानी सामनेवालेंकडे सदर सदनिका नफा मिळवण्याचे हेतूने विकत घेतल्या आहेत. त्यामुळे ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदीनुसार ती सामनेवालेची ग्राहक होत नाही. 7. सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करण्यात येतो- -ः आदेश ः- 1. तक्रार क्र.211/09 खर्चासह नामंजूर करण्यात येते. 2. उभय पक्षकारांना आदेशाच्या सत्यप्रती पाठवण्यात याव्यात. ठिकाण- कोकणभवन, नवी मुंबई. दि.15-3-2011. (ज्योती अभय मांधळे) (आर.डी.म्हेत्रस) सदस्या अध्यक्ष अति.ठाणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच नवी मुंबई
| Hon'ble Mrs.Jyoti A.Mandhle, MEMBER | Hon'ble Mr. R. D. Mhetras, PRESIDENT | , | |