आदेश (दिः 23 /02/2011) द्वारा श्री.एम.जी.रहाटगावकर - मा.अध्यक्ष 1. तक्रार क्र.184/2004 या प्रकरणी मंचाने 03/07/2006 रोजी पारित केलेल्या आदेशासंदर्भात सदर प्रकरण दाखल करण्यात आले. गैरअर्जदारांवर कलम 25 अन्वये लेखी सुचनापत्र जारी करण्यात आले. मंचाच्या आदेशाविरुध्द मा. राज्य आयोगासमक्ष याचीका दाखल करण्यात आलेली. याचीका क्र.877/2008 दि.21/01/2010 रोजीच्या आदेशान्वये राज्य आयोगाने निकाली काढली. याचीका खारीज झाल्याने स्वाभाविकपणेच मंचाचा आदेश कायम झाला. अर्जदाराने कलम 25(3) अन्वये आदेशान्वीत रकमेच्या वसुलीचा दाखला जारी करण्यात यावा असा अर्ज सादर केला. 2. मंचाच्या सुचनेची तामिली विरुध्द पक्षावर झालेली आहे. सदर प्रकरणी 2004 पासुन अनेक तारखा झाल्यात एवढेच नव्हे तर मा. राज्य आयोगाचा दि.21/01/2010 रोजीचा निकाल लागल्यानंतर देखील अनेक तारखा झाल्यात. विरुध्द पक्षांनी आदेशाचे पालन केले नाही असे स्पष्ट होते. त्यामुळे आदेशान्वीत रक्कम वसुलीसाठी ग्राहक कायद्याचे कलम 25(3) अन्वये वसुलीचा दाखल जारी करणे आवश्यक आहे. 3. मुळ तक्रार प्रकरण 184/2004, 03/07/2010 रोजीचा आदेश खालील प्रमाणे आहे. 1. Complaint no. 184/2004 is partly allowed. 2.Opponent do pay Rs.1,50,000/- (Rs. One lakh Fifty Thousand Only) to the Complainant and cost of Rs.5,000/- (Rs. Five Thousand Only) in toto. 3. Opponent shall comply with this order within 2 months from the date of receipt of the copy of the payment failing which opponent shall be liable to pay interest @12%p.a on Rs.1,00,000/- from the date of order till its final recovery. 4.Certified copy of this order be furnished to the parties.
4. उपरोक्त आदेशानुसार रु.1,55,000/- तसेच रु.1,00,000/- रकमेवरील 03/07/2006 ते 14/02/2011 पर्यंत व्याजाची रक्कम 48,070/- असे एकुण 2,03,070/- विरुध्द पक्षाकडुन वसुल करावयाचे आहेत असा तपशिल अर्जदाराने दाखल केला. तसेच गैरअर्जदारांची मालमत्ता 322 दुर्गा पार्क रो-हाऊस नं. 1, वालवली बदलापुर येथे आहे असेही त्यांनी नमुद केले. गैरअर्जदाराच्या स्थावर मिळकतीतुन अर्जदाराला उपरोक्त रक्कम रु.2,03,070/- वसुल करुन मिळणे आवश्यक आहे. सबब या आदेशासोबत कलम 25(3) अन्वये स्वतंत्र वसुलीचा दाखला जारी करणेत येत आहे. 5. प्रबंधक ठाणे मंच यांना निर्देश देण्यात येतो की त्यांनी वसुलीचा दाखला तसेच सदर आदेशाची प्रमाणित प्रत वसुली कार्यवाहीसाठी मा. जिल्हाधिकारी ठाणे यांच्याकडे अग्रेषित करावे. दिनांक – 23/02/2011 ठिकाण - ठाणे (ज्योती अय्यर) (एम.जी.रहाटगावकर ) सदस्या अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे
| [HONABLE MRS. Jyoti Iyyer] MEMBER[HONABLE MR. M.G. RAHATGAONKAR] PRESIDENT | |