मध्य मुंबई ग्राहक तक्रार न्याय निवारण मंच, परेल मुंबई दरखास्त क्रमांक – 07/2011 दरखास्त दाखल दिनांक – 29/01/2011 आदेश दिनांक - 03/03/2011 श्रीमती प्रिता किन्नरकर, 7/5, गुरुदेव सोसायटी, प्रभादेवी, सीफेस, मुंबई 400 025. ........ अर्जदार/मूळ तक्रारदार विरुध्द
1) द प्रोप्रायटर, इंटिरीअर पॉईंट, ए-43/44, तळ मजला, श्री. पुनिल नगर को. ऑप.हौ.सो., पोईसर डेपोजवळ, एस.व्ही.रोड, बोरीवली (वेस्ट), मुंबई – 92.
2) तनविर सिद्दिकी, इंटिरीअर पॉईंट, ए-43/44, तळ मजला, श्री. पुनिल नगर को. ऑप.हौ.सो., पोईसर डेपोजवळ, एस.व्ही.रोड, बोरीवली (वेस्ट), मुंबई – 92. ......... गैरअर्जदार/मूळ सामनेवाले क्रं.1 व 2
समक्ष – मा. अध्यक्ष, श्री. नलिन मजिठिया मा. सदस्या, श्रीमती भावना पिसाळ उपस्थिती – तक्रारदार स्वतः हजर विरुध्दपक्ष क्रं.2 तर्फे सिद्दिकी व त्यांचे वकील विजय माने हजर
- आदेश - - द्वारा - मा. अध्यक्ष, श्री. नलिन मजिठिया प्रस्तुत दरखास्त अर्ज अर्जदार हिने ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 27 अंतर्गत दाखल केलेला असून मंचाने मूळ तक्रार क्रमांक 234/2009, प्रिता किन्नरकर विरुध्द इंटिरीअर पॉईंट अधिक 1 यात दिनांक 17/03/2010 रोजी एकतर्फा आदेश पारित केला होता. सदर आदेशाच्या अमंलबजावणी करीता प्रस्तुत दरखास्त अर्ज दाखल केला होता. अर्जदार हिने अर्ज दाखल करुन त्यांचा वाद आपसी तडजोडीने सोडविण्यात आलेला आहे असे नमूद केलेले आहे. प्रस्तुत गैरअर्जदार यांनी तक्रारदार हिला रुपये 12,623/- (रुपये बारा हजार सहाशे तेवीस फक्त) दिनांक 03/03/2011 रोजी आय.सी.आय.सी.आय.बँक लि. चा धनादेश दिलेला आहे. उभयपक्षातील समझोत्याप्रमाणे त्यांच्यात आपसी तडजोड झाल्यामुळे मंच खालील प्रमाणे आदेश पारित करीत आहेत. – - आदेश - 1) प्रस्तुत प्रकरणातील वाद आपसी तडजोडीने मिटल्यामुळे सदर दरखास्त निकाली काढण्यात येते.
2) प्रस्तुत दरखास्तीचा खर्च रुपये 250/- (रुपये दोनश पन्नास फक्त) गैरअर्जदार यांनी तक्रारकर्तीला द्यावा. 3) सदर आदेशाची प्रत नियमाप्रमाणे उभयपक्षांना पाठविण्यात यावी. दिनांक – 03/03/2011 ठिकाण - मध्य मुंबई, परेल. सही/- सही/- (भावना पिसाळ) (नलिन मजिठिया) सदस्या अध्यक्ष मध्य मुंबई ग्राहक तक्रार न्याय निवारण मंच, परेल मुंबई
एम.एम.टी./- |