जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे यांचे समोर दरखास्त क्र. 196/2010(731/2009) जालींदर जयराम जगताप घर आंगण हौसिंग सोसायटी, इ विंग, पहिला माळा, खोली क्र.102, टिटवाळा(पुर्व), ता. कल्याण, ठाणे. ...तक्रारकर्ता /अजदार विरूध्द भाऊराव बाबुराव पांडे विघ्नहर्ता कन्सट्रक्शन नेतविली, हाजीमलंग रोंड, मराठी शाळेसमोर, कल्याण(प), जि - ठाणे. ...विरुध्दपक्ष /गैरअर्जदार समक्ष - श्री.एम.जी.रहाटगावकर - मा. अध्यक्ष श्रीमती. ज्योती अय्यर - मा. सदस्या उपस्थिती - अर्जदार हजर आदेश (दिः 22 /02/2011 ) द्वारा श्री.एम.जी.रहाटगावकर - मा.अध्यक्ष 1. सदर प्रकरण 04/02/2011 रोजी सुनावणीस आले असता उभयपक्ष मंचासमोर स्वतः हजर होते. त्यांच्या स्वाक्षरीसह संयुक्त समझोतापत्र दाखल करण्यात आले. उभयपक्षात तळजोड होऊन रु.1,00,000/- डि.डि द्वारे गैरअर्जदारांचे कडुन अर्जदाराला देण्यात आले व राहिलेल्या रु.70,000/- रकमेचा 30/04/2011 रोजीचा पुढील तारखेचा धनादेश गैरअर्जदारांनी दिलेला आहे. त्यामुळे त्यांच्यातील वादाचे निराकरण झाल्याचे त्यांनी नमुद केले. 2. सबब अंतीम आदेश पारित करण्यात येते की- आदेश 1.चर्चेद्वारे उभयपक्षांतील वादाचे निराकरण झाल्याने दरखास्त क्र.196/2010 निकाली काढण्यात येते. 2.न्यायिक खर्चाचे वहन उभयपक्षांनी स्वतः करावे.
दिनांक – 22 /02/2011 ठिकाण - ठाणे
(ज्योती अय्यर) (एम.जी.रहाटगावकर ) सदस्या अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे
| [HONABLE MRS. Jyoti Iyyer] MEMBER[HONABLE MR. M.G. RAHATGAONKAR] PRESIDENT | |