Maharashtra

Nagpur

CC/624/2018

MRS. AMINA LUQMAN ZAVERI - Complainant(s)

Versus

MR. SURYAKANT VITTHALRAO MOTHARE - Opp.Party(s)

ADV. SHRIRAM DEORAS

12 Feb 2020

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/624/2018
( Date of Filing : 05 Oct 2018 )
 
1. MRS. AMINA LUQMAN ZAVERI
ZAVERI NURSING HOME, 774, VAISHALI NAGAR, KAMAL TALKIES ROAD, NAGPUR 440017
NAGPUR
MAHARASHTRA
2. MR. FIROZ KASIMBADAR
ZAVERI NURSING HOME, 774, VAISHALI NAGAR, KAMAL TALKIES ROAD, NAGPUR 440017
NAGPUR
MAHARASHTRA
3. MRS SHEBA FIROZ BADAR
ZAVERI NURSING HOME, 774, VAISHALI NAGAR, KAMAL TALKIES ROAD, NAGPUR 440017
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. MR. SURYAKANT VITTHALRAO MOTHARE
PLOT NO 1, INDRAPRASTHA LAYOUT, KHAMLA, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 12 Feb 2020
Final Order / Judgement

(आदेश पारित व्‍दारा- श्री एस.आर.आजने, मा. सदस्‍य)

  1. तक्रारकर्ती हिने प्रस्‍तुत तक्रार ही ग्राहक संरक्षण कायदा, १९८६ चे कलम १२ अन्‍वये दाखल केली आहे.
  2. विरुध्‍द पक्ष यांनी प्‍लॉट १०७१, खसरा नंबर ३०, ६२, ६८/२, भुमापन क्रमांक ३०९९ मौजा बिनाकी, एकूण क्षेञफळ ७०९६.०५ चौरस फुट जमिनीवर बहुमजली ईमारत, तारामती भुमी या नावाने बांधावयाचे ठरले. सदर बांधकामास नगर रचना विभाग महानगरपालिका यांनी परमीट नंबर १६२५/टीपी डब्‍ल्‍यु/एन.एम.सी./२३२, दिनांक १५/११/२००६ अन्‍वये मंजुरात दिली होती. विरुध्‍द पक्षाने वरील नमुद जमिनीवर बहुमजली ईमारतीचे बांधकामास सुरवात केली. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडे संपर्क साधला व सदर बहुमजली ईमारतीतील बांधलेल्‍या कमर्शियल दुकानातील चेंबर नंबर ०१(On Upper Ground Floor) एकूण क्षेञफळ १५.७२ चौरस मिटर व्‍यापारी दृष्‍टीकोनातुन (Commercial Use)  एकूण रुपये ८,४५,०००/- मध्‍ये विकत घेण्‍याचे ठरविले. विरुध्‍द पक्ष व तक्रारकर्ता यांचेमध्‍ये सदर दुकान विकत घेण्‍याबाबतचा रजिस्‍टर्ड करार दिनांक २७/०८/२०१३ रोजी करण्‍यात आला.कराराचे दिवशी तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाला धनादेश क्रमांक १९३२९७, आय.डी.बी.आय. बॅंक अन्‍वये रुपये ३,००,०००/- अदा केले व त्‍याबाबतची पावती विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दिले. तक्रारकर्ता करारानुसार विरुध्‍द पक्षाला उर्वरीत रक्‍कम करार तारखेपासुन ३ महिण्‍याचे आत देण्‍याचे ठरले. बहुमजली ईमारतीचे संपूर्ण बांधकाम झाल्‍यानंतर विरुध्‍द पक्ष तक्रारकर्त्‍याला दुकानाचे विक्रीपञ नोंदणी करुन देणार होते. विरुध्‍द पक्ष दुकानाचे ईन्‍टेरीअर चे काम करणार होते व त्‍याकरीता विरुध्‍दपक्ष तक्रारकर्त्‍याला दुकान व त्‍याचे ईन्‍टेरीअर चे कामापोटी एक संपूर्ण रक्‍कम रुपये १३,००,०००/- द्यावयाचे सांगितले ज्‍यामध्‍ये दुकानाची किंमत स्‍टॅम्‍प ड्युटी, नोंदनी शुल्‍क, लिगल फीस फॉर रजिस्‍ट्रेशन अॅग्रीमेंट चा समावेश होता. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाला दिनांक १८/६/२०१३ रोजी रुपये २,००,०००/-, दिनांक २५/६/२०१३ रोजी रुपये ६,००,०००/- व दिनांक २२/६/२०१३ रोजी रुपये २,००,०००/- अदा केले असे एकूण रुपये १३,००,०००/- दुकानाचे खरेदीपोटी विरुध्‍द पक्षाला अदा केले परंतू संपूर्ण रक्‍कम मिळाल्‍यानंतरही विरुध्‍द पक्षाने बहुमजली ईमारतीचे बांधकाम केले नाही व तक्रारकर्त्‍याला दुकानाचे विक्रीपञ नोंदनी करुन दिली नाही. त्‍यानंतर विरुध्‍दपक्षाला स्‍थानिक वर्तमानपञातुन कळले की, विरुध्‍दपक्षाने सदरची मालमत्‍ता निर्मल उज्‍वल क्रेडीट को-ऑपरेटीव्‍ह सोसायटी यांचेकडे रुपये १०००००००/- करीता गहाण ठेवली. विरुध्‍द पक्षाने सदर गहान ठेवलेल्‍या मालमत्‍तेवर घेतलेल्‍या कर्जाची परतफेड न केल्‍यामुळे निर्मल बॅंक को-ऑपरेटीव्‍ह सोसायटी Arbitration Proceeding vide No. ARB/MUCC/M/S/01/2015 अन्‍वये कार्यवाही सुरु केली व त्‍याव्‍दारे सर्व लोकांना आव्‍हान केले की, सदर मालमत्‍तेच्‍या संदर्भात कोणीही व्‍यवहार करु नये.
  3. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाशी संपर्क साधला असता विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला निर्मल बॅंकेकडुन घेतलेले कर्ज त्‍वरीत फेडुन दुकानाचे विक्रीपञ नोंदनी करुन देण्‍याबाबत आश्‍वासीत केले. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने काही काळ वाट बघीतली परंतू विरुध्‍द पक्षाकडुन दुकान विक्रीपञ नोंदणीबाबत नेहमीच टाळाटाळ करण्‍यात आली त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने दिनांक ६/५/२०१७ रोजी तसेच दिनांक ३१/०३/२०१८ रोजी विरुध्‍द पक्षाला कायदेशीर नोटीस बजावली व त्‍याव्‍दारे निर्मल बॅंकेला सुद्धा सुचित करण्‍यात आले. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाशी करार केला आहे. विरुध्‍द पक्षाने निर्मल बॅंकेच्‍या कर्जाची परतफेड केली नाही त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने मा. मंचासमोर तक्रार दाखल करुन खालिलप्रमाणे मागणी केली आहे.
  1. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा देऊन अनुचित व्‍यापार पद्धतीचा अवलंब केला आहे असे घोषित करावे.
  2. विरुध्‍दपक्षाला निर्देश द्यावे की, विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला वादातील दुकानाचे विक्रीपञ करुन द्यावे किंवा विरुध्‍द पक्षाला वादातील दुकानाचे विक्रीपञ करुन देणे शक्‍य नसल्‍यास विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याकडुन दुकान विक्रीपोटी घेतलेली रक्‍कम रुपये १३,००,०००/- तक्रारकर्त्‍याला अदा करावी व  त्‍यावर द.सा.द.शे. १८ टक्‍के दराने व्‍याज तक्रारकर्त्‍याला संपूर्ण रक्‍कम प्रत्‍यक्ष अदायगी होईपर्यंत अदा करावी व मानसिक व शारिरीक ञासाकरीता रुपये ५०,०००/- व तक्रारीचा खर्च रुपये १०,०००/- अदा करावा.
  1. विरुध्‍द पक्षाला स्‍थानिक वर्तमानपञातुन जाहीर नोटीस पाठवुन मंचासमक्ष हजर राहण्‍याबाबत  कळविले असतांनाही विरुध्‍द पक्ष मंचात हजर झाले नाही. करीता विरुध्‍द पक्ष विरुध्‍द एकतर्फी चालविण्‍याचा आदेश मंचामार्फत दिनांक ३/५/२०१९ रोजी पारित करण्‍यात आला.
  2. तक्रारकर्त्‍याने तक्रारीसोबत निशानी क्रमांक २ वर दाखल दस्‍ताऐवजाचे तसेच लेखी युक्‍तीवाद व तोंडी युक्‍तीवाद याचे वाचन केल्‍यावर निकालीकामी खालिल मुद्दे उपस्थित करुन त्‍यावरील निष्‍कर्षे खालिलप्रमाणे नमुद आहे.

 

   अ.क्र.                      मुद्दे                                                           उत्‍तर

  1. तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ?                 नाही
  2. काय आदेश ?                                                         अंतिम आदेशाप्रमाणे

 

कारणमिमांसा

  1. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडुन मौजा बिनाकी, खसरा नंबर ३०, ६२,६८/२, भुमापन क्रमांक ३०९९  प्‍लॉट नंबर १०७१, एकूण क्षेञफळ ७०९६.५ चौरस फुट या जमिनीवर विरुध्द पक्षाने बांधलेल्‍या तारामती भुमी या     बहुमजली ईमारतीतील बांधलेल्‍या कमर्शियल दुकानापैकी, चेंबर नंबर १      (On Upper Ground Floor) एकूण क्षेञफळ १५.७२ चौरस मिटर व्‍यापारी दृष्‍टीकोनातुन (Commercial Use)एकूण रुपये ८,४५,०००/- मध्‍ये विकत घेतला व त्‍याबाबतचा रजिस्‍टर्ड करारनामा दिनांक २७/८/२०१३ रोजी करण्‍यात आला. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडुन व्‍यापार करण्‍याचा दृष्‍टीने सदरचा गाळा विकत घेतला आहे. त्‍यामुळे तक्रारकर्ता ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 2‍d नुसार ग्राहक होत नाही. सबब तक्रार या न्‍यायमंचात चालू शकत नाही. करीता खालिलप्रमाणे आदेश पारित करण्‍यात येत आहे.

अंतिम आदेश

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार खारीज करण्‍यात येते.
  2. खर्चाबाबत आदेश नाही.
  3. उभयपक्षांना आदेशाची प्रत निशुल्‍क देण्‍यात यावी.
  4. तक्रारकर्त्‍याला प्रकरणाची ब व क फाईल परत करावी.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.