Complaint Case No. CC/244/2016 | ( Date of Filing : 25 Oct 2016 ) |
| | 1. HASMUKH VELJI VISAVADIA | 604/A, LOTUS AGARWAL & DOSHI COMPLEX, BHABOLA, VASAI-(WEST), DIST. PALGHAR 401202 |
| ...........Complainant(s) | |
Versus | 1. MR. SAYED NURULLA QUADRI | 53, MARUTI LANE, NEAR, HANDLOOM HOUSE, FORT, MUMBAI 400 001. | 2. MR. MOHD IQBAL MOHD ISHAQUE | 53, MARUTI LANE, NEAR, HANDLOOM HOUSE, FORT, MUMBAI 400 001. | 3. MRS. RAZIA ZUBAIR SAYED | 53, MARUTI LANE, NEAR, HANDLOOM HOUSE, FORT, MUMBAI 400 001. | 4. MRS. RAYEESABEGAM DASTGIR | 53, MARUTI LANE, NEAR, HANDLOOM HOUSE, FORT, MUMBAI 400 001. | 5. MR. SADIQUE ANWAR KORADIA | 53, MARUTI LANE, NEAR, HANDLOOM HOUSE, FORT, MUMBAI 400 001. |
| ............Opp.Party(s) |
|
|
Final Order / Judgement | द्वारा - श्रीमती. स्नेहा म्हात्रे, अध्यक्षा तक्रारदार श्री. हसमुख वेलजी विसावाडिया स्वत: त्यांचे वकील श्री.डी.एम.टेलर यांच्यासह हजर. सामनेवाले क्र. 5 श्री. सादिक अन्वर कोराडिया स्वतः करीता तसेच सामनेवाले 1 ते 4 यांचे मुखत्यार म्हणून सामनेवाले 1 ते 4 करिता हजर. सदर प्रकरणामध्ये दि.09.06.2022 रोजी उभय पक्षांनी कन्सेंट टर्म दाखल केले असून त्याखाली तक्रारदार तसेच तक्रारदारांचे वकील म्हणून वकील श्री.मनोज एस भट यांची स्वाक्षरी दिसून येते. तसेच सामनेवाले यांचेकडून सामनेवाले क्र. 5 यांनी सामनेवाले 1 ते 4 यांचे मुखत्यार म्हणून 1 ते 4 यांच्याकरीता व स्वतः करिता स्वाक्षरी केली आहे. तसेच सामनेवाले यांचे तर्फे वकील श्री.एन.डी.जयवंत यांची स्वाक्षरी कन्सेंट टर्म वर दिसून येते. सदर प्रकरणामध्ये सामनेवाले यांनी तक्रारदारांना दि.09.06.2022 रोजी कन्सेंट टर्म मध्ये नमूद सदनिकेचा ताबा दिला असून, त्यामध्ये नमूद रक्कम रु.11,67,500/- बाबत 04 पोस्ट डेटेड चेक्स दिले असल्याचे लेखी निवेदन तक्रारदाराच्या वकीलांनी तक्रारदाराच्या स्वाक्षरीसह आजरोजी दाखल केले. तसेच सदर रक्कम ही प्रस्तूत प्रकरणामध्ये अंतिम तडजोडीपोटी दिली असल्याचे त्यामध्ये लेखी नमूद केल्याचे दिसून येते. सदर प्रकरणामध्ये सामनेवाले यांनी कन्सेंट टर्मच्या परिच्छेद क्र.5 ते 9 या मध्ये अंडरटेकिंग दिले असून ते तसेच कन्सेंट टर्मसमधील इतर अटी शर्ती प्रस्तूत आदेशाचा अविभाज्य भाग समजण्यात याव्यात. तक्रारदाराच्या वकीलांनी उभय पक्षांनी दाखल केलेल्या दि.09.06.2022 रोजीच्या कन्सेंट टर्म विचारात घेऊन प्रस्तूत प्रकरण निकाली काढावे असे लेखी निवेदन दिले. सबब, उभय पक्षाच्या विनंतीवरुन तसेच प्रस्तूत प्रकरणात उभय पक्षानी स्वाक्षरीत केलेल्या कन्सेंट टर्मचा विचार करुन व उभय पक्षात तडजोड झाली असल्याने प्रकरण निकाली काढण्यात येते. | |