तक्रार क्रमांक – 204/2008 तक्रार दाखल दिनांक – 0/0/2008 निकालपञ दिनांक – 06/03/2010 कालावधी - 00 वर्ष 00महिने 00दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे यांचे समोर लक्ष्मीप्रसाद को. हॉ. सो. लि., सिटी सर्व्हे नं. 34, टिका क्र.16, सहयोग मंदिर रोड, घंटाळी, नौपाडा, ठाणे 400 602. .. तक्रारदार विरूध्द 1. श्री. सावजी विरजी ठक्कर, द्वारा श्री.अमीत व्हि. ठक्कर, तळ मजला, लक्ष्मीप्रसाद को. हॉ. सो. लि., सिटी सर्व्हे नं. 34, टिका क्र.16, सहयोग मंदिर रोड, घंटाळी, नौपाडा, ठाणे 400 602. 2. श्री. प्रभाकर दत्तात्रे साठे फ्लॅट नं. 201,लक्ष्मीप्रसाद को. हॉ. सो. लि., सिटी सर्व्हे नं. 34, टिका क्र.16, सहयोग मंदिर रोड, घंटाळी, नौपाडा, ठाणे 400 602. .. विरुध्दपक्ष समक्ष - सौ. भावना पिसाळ - प्र. अध्यक्षा श्री. पी. एन. शिरसाट - सदस्य उपस्थितीः- त.क तर्फे वकिल आशिष गोकटे वि.प एकतर्फा एकतर्फा आदेश (पारित दिः 06/03/2010) मा. प्र. अध्यक्षा सौ. भावना पिसाळ, यांचे आदेशानुसार 1. सदरहु तक्रार लक्ष्मीप्रसाद हाऊसिंग सोसायटी लि,. यांनी सेक्रेटरी तर्फे यांनी सावजी विरजी ठक्कर व इतर यांचे विरुध्द दाखल केली आहे. यामध्ये त्यांनी विरूध्द पक्षकाराकडुन कन्व्हेयन्स करुन मागितला आहे तसेच करारनाम्यातील अटींना बांधिल असलेल्या सर्व गोष्टींची पुर्तता केलेली आहे. 2. तक्रारदार सोसायटी ही सदर प्लॉट सीटी सर्व्हे नं. 34 टिका नं.16 सहयोग मंदीर रोड, घंटाळी, नौपाडा, ठाणे या जागेवर आहे. या जागेचे मालक विरुध्द पक्षकार नं.2 व 3 असुन विरुध्द पक्षकार 1 हे बिल्डर आहेत. सुरवातीला हि सोसायटी मगनलाल अर्पामेंट म्हणुन ओळखली जात होती. सोसायटी बनवुन झाल्यावरही अद्यापी विरुध्द पक्षकार यांनी सोसायटीच्या जागेचे कन्व्हेयन्स करुन दिलेले नाही तसेच OC, CC दिलेले नाही. म्युनिसिपालीटीची अप्रुड प्लॉनची कॉपी .. 2 .. दिलेली नाही. विरुध्द पक्षकार यांनी विकल्या न गेलेल्या सदिनिकेचे प्रॉपर्टी टॅक्स, NA टॅक्स भरलेले नाही. तसेच सोसायटीच्या आजुबाजुचा व स्टिल्ट एरियाचा स्वताःच्या आर्थिक फायद्यासाठी विरुध्द पक्षकार दुरुपयोग करित आहे. सदर रिकाम्या जागेवर सोसायटीचा व त्यांच्या सदस्यांचा पुर्ण अधिकार असतांना त्यांच्या परवानगी शिवाय विरुध्द पक्षकार सदर जागा स्वःताच्या आर्थिक फायद्यासाठी वापरु शकत नाही असे या मंचाचे मत आहे. विरुध्द पक्षकार हे त्यांच्या कायदेशिर जबाबादारीकडे दुर्लक्ष व निष्काळजीपणा दाखवित आहेत. विरुध्द पक्षकार हे कायद्येशिररित्य व करारनाम्याप्रमाणे वरील सर्व गोष्टींची पुर्तता करण्यास बांधिल आहेत. 3. विरुध्द पक्षकार यांना मंचाने नोटिस बजावुनही विरुध्द पक्षकार हजर राहिले नाहीत व त्याची लेखी कैफीयत त्यांनी दाखल केली म्हणुन मंचाने विरुध्द पक्षकार नं. 1 विरुध्द दि.16/12/2009 रोजी ’नो डब्ल्यु एस’ आदेश दिला व दि.04/12/2008 रोजी विरुध्द पक्षकार 2 व 3 यांचे विरुध्द ’नो डब्ल्यु एस’ आदेश केला तदनंतर एकतर्फा चौकशी घेऊन मंच पुढील एकतर्फा अंतिम आदेश पारित केला. अंतीम आदेश
1.तक्रार क्र. 204/2008 हि अंशतः मंजुर करण्यात येत आहे. विरुध्द पक्षकार यांनी या तक्रारीचा खर्च रु.2,000/- (रु.दोन हजार फक्त) तक्रारदार यांस द्यावा. 2.विरुध्द पक्षकार यांनी सदर तक्रारदार सोसायटीची म्युनिसिपल प्लौन कॉपी, OC, CC conveyance करुन द्यावे. सोसायटीचे एन.ए. टॅक्स रिकाम्या सदनिकेचे प्रॉपर्टी टॅक्स भरावेत. तसेच सोसायटी बनेपर्यंतचा सोसायटीच्या मेन्टेनेंसचा खर्च सोसायटिस द्यावा. सोसाटीतील रिकामी जागा विरुध्द पक्षकार हे सोसायटीच्या परवांनगी शिवाय वापरु शकत नाहीत. सदर जागेचा उपभोग सोसायटी व त्यांचे सदस्यांनाच घेता येईल. या आदेशाचे पालन या आदेशाची प्रत मिळाल्यापासुन 3 महिन्याच्या आत करावे. 3.विरुध्द पक्षकार यांनी तक्रारदारास मानसिक त्रास व नुकसान भरपाई पोटी रु. 5,000/-(रु. पाच हजार फक्त) द्यावे. 4.उभयपक्षकारांना या आदेशाची सही शिक्याची प्रत निःशुल्क देण्यात यावी.
5.तक्रारकर्ता-यांनी मा.सदस्यां करिता दाखल केलेले सेट (2 प्रती) त्वरित परत घ्याव्यात, मुदती नंतर मंचाची जबाबदारी नाही. दिनांक – 06/03/2010 ठिकान - ठाणे
(श्री.पी.एन.शिरसाट )(सौ.भावना पिसाळ ) सदस्य प्र.अध्यक्षा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे
|