Maharashtra

Additional DCF, Thane

CC/23/157

Mrs.Vandana Vijay More - Complainant(s)

Versus

Mr. Pratik Sharad Bhoir, - Opp.Party(s)

ADV.JYOTI S. CHANDANSHIVE

17 Aug 2023

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, THANE ADDITIONAL
Room no. 428 and 429, Konkan Bhavan Annex Building, 4th Floor,
C.B.D. Belapur, Navi Mumbai 400 614
 
Complaint Case No. CC/23/151
( Date of Filing : 02 May 2023 )
 
1. MR.JAYVANT RAMJI KAMANE
house NO. 304, 3rd Floor, Property NO. 1750, Shiravane-Jui Pada,Juinagar, Navi Mumbai
...........Complainant(s)
Versus
1. Mr. Pratik Sharad Bhoir,
JUINAGAR VILLAGE PO. Sanpada, House No. Padaji Smriti, Sec. 23, Ta. Dist. Thane Navi Mumbai
............Opp.Party(s)
Complaint Case No. CC/23/152
( Date of Filing : 02 May 2023 )
 
1. Mr. Anil Atmaram Chavan
house no. 301, 3rd Floor, Property no. 1750, Shiravane-Jui Pada,juinagar navi mumbai
...........Complainant(s)
Versus
1. Mr. Pratik Sharad Bhoir,
JUINAGAR VILLAGE PO. Sanpada, House No. Padaji Smriti, Sec. 23, Ta. Dist. Thane Navi Mumbai
............Opp.Party(s)
Complaint Case No. CC/23/153
( Date of Filing : 02 May 2023 )
 
1. Mr.Prakash Baburao Tetme
Living house No. 102, 3rd Floor, Property No. 1750, Shiravane-Jui Pada, Juinagar, Navi Mumbai,
...........Complainant(s)
Versus
1. Mr. Pratik Sharad Bhoir,
Juinagar Village P.O. Sanpada, House No. 1712, Padaji Smriti, sec. 23 , Dist. Thane Navi Mumbai,
............Opp.Party(s)
Complaint Case No. CC/23/154
( Date of Filing : 02 May 2023 )
 
1. mr.Kisan Sitaram Botre
Living house c. 204, 3rd Floor, Property c. 1750, Shiravane-Jui Pada,Juinagar, Navi Mumbai,
...........Complainant(s)
Versus
1. Mr. Pratik Sharad Bhoir,
Juinagar Village P.O. Sanpada, House No. 1712, Padaji Smriti, sec. 23 Ta. Dist. Thane Navi Mumbai,
............Opp.Party(s)
Complaint Case No. CC/23/155
( Date of Filing : 02 May 2023 )
 
1. Mr. Ashok Gourya Patil
House No. 302, 3rd Floor, Property No. 1750, Shiravane-Jui Pada, Juinagar, Navi Mumbai
...........Complainant(s)
Versus
1. Mr. Pratik Sharad Bhoir,
Juinagar Village P.O. Sanpada, House No. 1712, Padaji Smriti, sec. 23 Ta. Dist. Thane Navi Mumbai,
............Opp.Party(s)
Complaint Case No. CC/23/156
( Date of Filing : 02 May 2023 )
 
1. Mrs. Taramati Hari Pervi
Living house No. 202, Second Floor, Property No. 1750, Shiravane - Jui Pada, Juinagar, Navi Mumbai,
...........Complainant(s)
Versus
1. Mr. Pratik Sharad Bhoir,
Juinagar Village P.O. Sanpada, House No. 1712, Padaji Smriti, sec. 23 Ta. Dist. Thane Navi Mumbai
............Opp.Party(s)
Complaint Case No. CC/23/157
( Date of Filing : 02 May 2023 )
 
1. Mrs.Vandana Vijay More
Living house No. 203, Second Floor, Property No. 1750, Shiravane-Jui Pada, Juinagar, Navi Mumbai,
...........Complainant(s)
Versus
1. Mr. Pratik Sharad Bhoir,
Juinagar Village P.O. Sanpada, House No. 1712, Padaji Smriti, sec. 23 Ta. Dist. Thane Navi Mumbai
............Opp.Party(s)
Complaint Case No. CC/23/158
( Date of Filing : 02 May 2023 )
 
1. Mr.Sakharam Nathuram Fhutak
house No. 303, 3rd Floor, Property No. 1750, Shiravane-Jui Pada, Juinagar, Navi Mumbai,
...........Complainant(s)
Versus
1. Mr. Pratik Sharad Bhoir,
Juinagar Village P.O. Sanpada, House No. 1712, Padaji Smriti, sec. 23 Ta. Dist. Thane Navi Mumbai,
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. R.P.Nagre PRESIDENT
 HON'BLE MS. Gauri M. Kapse MEMBER
 HON'BLE MRS. Sheetal A.Petkar MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 17 Aug 2023
Final Order / Judgement

द्वारा- श्रीमती गौरी कापसे, सदस्‍या

तक्रारदाराच्या विलंब माफीच्या अर्जावर तसेच निशाणी 1 वर आदेश

1) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार खालील प्रमाणे आहे तक्रारदाराने सामनेवाले यांच्याकडून वादातील सदनीका दिनांक 26/11/2013 च्या विक्री कराराद्वारे विकत घेतली.  तसेच सदर सदनिकेचा प्रत्यक्ष ताबा दिनांक 30/07/2014 रोजी घेतला सदर वादातीत सदनिकेचा ताबा मिळाल्यापासून तक्रारदारास खालील नमूद केले प्रमाणे त्रुटी असल्याने त्रास सहन करावा लागत आहे:

     अ)किचनमध्ये व बाथरूम मध्ये गळती/ लिकेज होते.

     ब)खिडक्यांच्या काचा तुटलेल्या आहेत.

     क)संपूर्ण सदनिकेत गळती होत आहे व त्यामुळे भिंती व पंखे खराब झाले आहे.

     ड)नळ व पाणी जोडणीकरिता रक्कम रुपये 18000 रोखीने सामनेवाले यांना अदा करूनही  जोडणी करून दिलेली नाही.

     इ)सदनिकेच्या कराची पावती तक्रारदाराच्या नावे करून दिलेली नाही.

२) वर नमूद त्रुटी दूर होऊन मिळणे कामी तक्रारदाराने वारंवार सामनेवाले यांना विनंती करून देखील त्यांनी तक्रारदाराची विनंती फेटाळून लावली व कोणताही प्रतिसाद दिला नाही त्यानंतर तक्रारदाराने सामनेवाले यांना दिनांक 15/11/2022 रोजी वकिलांमार्फत नोटीस पाठवून देखील त्यांनी काही एक उत्तर आजपावेतो दिलेले नाही.  सबब सामनेवाले यांनी इमारत बांधकामासाठी निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याने तक्रारदारांना वर नमूद त्रुटींचा सामना करावा लागल्याने त्यांना मानसिक त्रास होणार आर्थिक नुकसानही होत असल्याने सदरची तक्रार त्यांच्याविरुद्ध दाखल करून खालील मागण्या पूर्ण होऊन मिळण्याची विनंती केली आहे.

     1. सामनेवाले यांनी झालेल्या नुकसानी पोटी रक्कम रुपये 2,18,000/-  ही 18% व्याजासह  दिनांक 30/7/2014 पासून तक्रारदारास अदा करावी.

     2. सामनेवाले यांनी मानसिक त्रासापोटी रक्कम रुपये 50,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रुपये 50,000/- तक्रारदारास अदा करावी.

३) तक्रारदाराने तक्रारी सोबत सदनिका खरेदी विक्री करारनामा, सामनेवाले यांना वादातील सदनिकेच्या व्यवहारापोटी धनादेशाने व रोखीने रक्कम अदा केल्याच्या पावत्या, वकिलांमार्फत पाठवण्यात आलेली नोटीस इ. कागदपत्रे दाखल करून त्यावर विश्वास ठेवला आहे.

     सदरची तक्रार दाखल करून घेताना खालील मुद्दे उपस्थित होतात:

     1.सदरची तक्रार मुदतबाह्य आहे का?     होय

     2.काय आदेश?   अंतिम आदेशाप्रमाणे

कारणमीमांसा

मुद्दा क्र. 1 2

४) तक्रारदाराने वादातीत सदनिका दिनांक 26/11/2013 च्या विक्री करारांवर विकत घेतली सदर सदनिकेचा दिनांक 30/07/2014 रोजी प्रत्यक्ष ताबा घेतल्याचे स्पष्ट होते. सदर ताबा घेतल्यापासून वादातील सदनिकेच्या किचन व बाथरूम तसेच संपूर्ण सदनिकेत गळती व त्यामुळे भिंती व पंखे खराब, काचा तुटलेल्या खिडक्या, नळ व पाणी जोडणी करीता रक्कम रुपये 18000/- सामनेवाले यांनी घेऊनही जोडणी करून दिलेली नाही इत्यादी तक्रारी उपस्थित केले आहेत.

५) तक्रारदाराच्या कथनावरून सदर तक्रारीस प्रथम कारण जेव्हा 2014 मध्ये ताबा घेतला, त्यावेळेस घडले. जर तक्रारदार जुलै 2014 पासून म्हणजेच ताबा घेतल्यापासून वर नमूद  कारणांमुळे  त्रस्त होते तर त्यांनी सदरचा ताबा घेतल्यापासून दोन वर्षात म्हणजेच जुलै 2016 पावेतो तक्रार दाखल करणे आवश्यक होते. तसेच 2014 पासून ते तक्रार दाखल होईपावेतो  तक्रारदार कोणत्या कारणास्तव शांत राहिले, याबाबत कुठेही स्पष्ट कथन अगर पुरावा नाही तक्रारदाराने सदरची तक्रार प्रथमच  2023 मध्ये उपस्थित करून तक्रार दाखल केली आहे. सबब सदरची तक्रार जवळपास  सात वर्षानंतर तक्रारदाराने दाखल केलेली असल्याने निश्चितच सदर तक्रारिस मुदतीचा बाध असल्याचे स्पष्ट होते.

६) वर नमूद तक्रारींकरिता तक्रारदाराने सामनेवाले यांना दिनांक 15 /11/2022 रोजी नोटीस पाठवली परंतु सामनेवाले यांनी कोणतेही उत्तर दिलेले नाही तक्रारदराने वारंवार सामनेवाले यांना वर नमूद करणाकरिता 2014 पासून तक्रार वजा विनंती करत असल्याचे कथन केले आहे; परंतु त्याबाबत कुठलाही प्रथमदर्शनी पुरावा दाखल केलेला नाही सबब सामनेवाले यांना दिनांक 15/11/2022  रोजी ची नोटीस पाठवून तक्रार मुदतीत आणण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट होते वास्तविक वकीलामार्फत नोटीस पाठवून तक्रारीस कारण घडत नाही हे न्यायाचे तत्व मा. सर्वोच्च न्यायालयाच्या बऱ्याच न्यायनिवाडयातून स्पष्ट केलेले आहे सबब वर नमूद विवेचनावरून सदरची तक्रार ही मुदतबाह्य असल्याने दाखल करून न घेता खारीज करण्यात येते.

अंतिम आदेश

 

ग्राहक तक्रार क्रमांक १५१/२०२३ ते १५८/२०२३ विना खर्च खारीज करण्यात येत आहेत.

 
 
[HON'BLE MR. R.P.Nagre]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MS. Gauri M. Kapse]
MEMBER
 
 
[HON'BLE MRS. Sheetal A.Petkar]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.