अंतिम आदेश (दिः 23/03/2011) द्वारा श्री.एम.जी.रहाटगावकर - मा.अध्यक्ष 1. ग्राहक तक्रार प्रकरण क्र.121/2004 मध्ये दि.11/09/2006 रोजी मंचाने पारित केलेल्या आदेशाच्या पुर्ततेसंदर्भात सदर दरखास्त प्रकरण दाखल करण्यात आले. मंचाच्या आदेशाविरुध्द मा.राज्य आयोगासमोर दाखल करण्यात आलेले अपील क्र.2393/2006 दि.18/12/2008 रोजी खारीज झाले. मंचाने गैरअर्जदाराचे विरुध्द कलम 27 अन्वये अज्ञापत्र जारी केले व त्यानंतर त्यांचे हजेरीसाठी वॉरंट जारी करणे भाग पडले. उभयपक्षांना त्यांच्या विनंतीनुसार आपआपसात चर्चा करुन समझोता करण्यासाठी संधी देण्यात आली. उभयपक्षाच्या वकीलांनी या कामी सहकार्य केले.
2. आज रोजी सदर प्रकरण सुनावणीस आले असता उभयपक्ष मंचासमोर हजर होते. त्यांच्या स्वरक्षरीसह संयुक्त समझोतापत्र दाखल करण्यात आले. उभयपक्षात झालेल्या तडजोडीनुसार गैरअर्जदारांनी अर्जदाराला आजरोजी मंचासमक्ष रु.1,00,000/- (रु. एक लाख फक्त) दिलेत. एकुण रु.50,00,000/- गैरअर्जदारानी अर्जदारांना तडजोडीप्रमाणे देण्याचे मान्य केले. दि.23/05/2011 रोजी रु.10,00,000/- 23/07/2010 रोजी रक्कम रु.10,00,000/- व दि.30/09/2011 रोजी रु.29,00,000/-, याप्रमाणे रक्कम धनादेशाद्वारे देण्यात येईल असा उल्लेख .. 2 .. दरखास्त क्र क्र.106/2006(121/2004) समक्षोतापत्रात केलेला आहे. मंचासमक्ष यापुढील तारखांचे धनादेश विरुध्द पक्षानी तक्रारकर्त्याला दिले. तसेच हे धनादेश वटण्यासाठी आवश्यक रक्कम खात्यात त्या तारखांना ठेवण्यात येईल असे विरुध्द पक्षांनी कबुल केले. याप्रमाणे रक्कम न मिळाल्यास रु.50,00,000/- ऐवजी रु.55,00,000/-(रु. पंचावन लाख फक्त) एवढी रक्कम वसुल करण्यास तक्रारकर्ता पात्र राहिल असाही उल्लेख सझोपत्रात आहे.
3. उभय पक्षात तडजोड झालेली असल्याने तसेच सदर दरखास्त प्रकरण निकाली काढयात यावे अशी त्यांनी मागणी केली असल्याने दरखास्त क्र.106/2006 निकाली काढण्यात येते. खर्चाचे वहन उभयपक्षांनी स्वतः करावे. दिनांक – 22/03/2011 ठिकाण – ठाणे
(ज्योती अय्यर) (एम.जी.रहाटगावकर ) सदस्या अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे
| [HONABLE MRS. Jyoti Iyyer] MEMBER[HONABLE MR. M.G. RAHATGAONKAR] PRESIDENT | |