Maharashtra

Nagpur

CC/272/2015

CHANDRABHAN SAUJI KALE, FOR HIMSELF AND HER MINOR DAUGHTER PRACHI CHANDRABHAN KALE - Complainant(s)

Versus

MR. MANGESH POTE - Opp.Party(s)

ADV. PANKAJ THAKRE

15 Feb 2023

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/272/2015
( Date of Filing : 15 Jun 2015 )
 
1. CHANDRABHAN SAUJI KALE, FOR HIMSELF AND HER MINOR DAUGHTER PRACHI CHANDRABHAN KALE
R/O. PLOT NO.164, SHRI MAHALAXMI NAGAR, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. MR. MANGESH POTE
R/O FLAT NO.301, SHIVANI APARTMENT, PRITHVIRAJ NAGAR, NEAR V.T. CONVENT, BELTARODI ROAD, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
2. MR. KRISHNA RAO AKULA
R/O MAROTI GRANDEUR APARTMENT GROUND FLOOR, NEAR MODEL HOUSE PANJAGUTTA, HYDERABAD 500082
Hydrabad
Andhra
3. TARGET PMT PVT. LTD. THROUGH ITS DIRECTOR (SHRI PRAKASH MADHAV BEDEKAR & SEEMA AJAY)
R/O A-1/169, MAIN NAJAFGARH ROAD, JANAKPURI, NEW DELHI 58
Delhi
Delhi
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. ATUL D. ALSI PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:ADV. PANKAJ THAKRE, Advocate for the Complainant 1
 ADV. PARAG R. WAGH, Advocate for the Opp. Party 1
 ADV. AMIT KHARE, Advocate for the Opp. Party 1
Dated : 15 Feb 2023
Final Order / Judgement

आदेश

 

मा. सदस्‍य, श्री. सुभाष रा. आजने यांच्‍या आदेशान्‍वये

 

  1.      तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याच्‍या कलम 35 अंतर्गत दाखल केली असून त्‍यात नमूद केले की, विरुध्‍द पक्ष 1 व 2 हे विरुध्‍द पक्ष 3 च्‍या नियंत्रणाखाली काम करतात. विरुध्‍द पक्ष 3 चे DD Target PMT Pvt Ltd. या नावाने रजिस्‍ट्रेशन झाले असून त्‍यांची जयपूर, जम्‍मू, रोहतक आणि नागपूर येथे शाखा आहे. विरुध्‍द पक्ष यांनी दि. 29.12.2013 ला बी.आर.ए.मुंडले प्‍लॅटिनम हॉल येथे आयोजित सेमिनार मध्‍ये दिलेल्‍या जाहिरातीनुसार तक्रारकर्त्‍याने त्‍याची मुलगी प्राची चंद्रभान काळे हिची विरुध्‍द पक्षाचे IPTY 2014-2016 या दोन वर्षाच्‍या Integrated Program Course Code IPTY 2014-2016 च्‍या अभ्‍यासक्रमाकरिता प्रवेश घेण्‍याचे ठरविले व त्‍याकरिता रुपये 1,12,000/- अदा करावयाचे होते. त्‍यापैकी 50 टक्‍के रक्‍कम प्रवेश घेते वेळी आणि उर्वरित रक्‍कम समान हप्‍त्‍यात 6 महिन्‍याच्‍या आत अदा करावयाची होती.

 

  1.      विरुध्‍द पक्षाने दिलेल्‍या आश्‍वासनावर विश्‍वास ठेवून तक्रारकर्त्‍याने त्‍याच्‍या मुलीची विरुध्‍द पक्षाच्‍या शिकवणी वर्गात प्रवेश करण्‍याचे निश्चित केले व त्‍याकरिता  तक्रारकर्त्‍याला विरुध्‍द पक्षाकडे  रजिस्‍ट्रेशन फी पोटी रुपये 44,800/- अदा करावयाचे होते व उर्वरित रक्‍कम रुपये 67,200/- एकूण 6 समान हप्‍त्‍यात प्रत्‍येक        महिन्‍याच्‍या 05 तारखेला रुपये 11,200/- प्रमाणे अदा करावयाची होती. त्‍यानुसार तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडे दि.20.01.2014 ला रुपये 5,000/- रजिस्‍ट्रेशन फी पोटी अदा केले व त्‍यानंतर दि. 20.04.2014 ते दि.12.08.2014 पर्यंत रुपये 63,100/- अदा केले होते. त्‍याप्रमाणे विरुध्‍द पक्ष  3 यांनी तक्रारकर्त्‍याच्‍या मुलीला स्‍टडी मटेरियल पुरविले.

 

  1.      तक्रारकर्त्‍याने पुढे नमूद केले की, त्‍यानंतर विरुध्‍द पक्ष यांचे टयूशन क्‍लासेस  6 महिने पर्यंत व्‍यवस्थितीत सुरु होते. सदर कालावधीत विरुध्‍द पक्षाने शिकविणा-या प्राध्‍याकांमध्‍ये बदल सुध्‍दा केले. त्‍यानंतर शिकवणी वर्गात अनियमितता सुरु झाली. माहे फेब्रुवारी 2015 मध्‍ये कधी कधी शिकवणी वर्गात शिकविल्‍या जात नव्‍हते तर कधी कधी शिकवणी वर्ग ज्‍या ठिकाणी घेतल्‍या जात होते त्‍या ठिकाणी कुलूप लागले आढळले व तिथे कोणताही जबाबदार व्‍यक्‍ती सांगण्‍याकरिता उपलब्‍ध नव्‍हता. तसेच  सदरचे शिकवणी वर्ग का बंद करण्‍यात आले आणि ते केव्‍हा सुरु होणार याबाबत पालकांना माहिती देण्‍यात करिता कोणताही जबाबदार व्‍यक्‍ती त्‍या ठिकाणी उपस्थितीत नव्‍हता. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष  1 व 2 यांना दूरध्‍वनी वरुन संपर्क साधण्‍याचा प्रयत्‍न केला असता तो बंद आढळला. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष 3 यांच्‍याशी संपर्क साधला असता सुरुवातीला त्‍यांनी तक्रारकर्त्‍याचे  म्‍हणणे ऐकले व त्‍यानंतर टाळाटाळीचे उत्‍तर दिले.

 

  1.      विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याकडून त्‍याच्‍या मुलीच्‍या टयूशन पोटी  6 महिन्‍यात कबुलीप्रमाणे फी स्‍वीकारली व त्‍यानंतर मोनटरी लॉस होण्‍याच्‍या उद्देशने टयूशन क्‍लास बंद केले. 11 व 12 वीच्‍या परीक्षेनंतर वैद्यकीय प्रवाशाकरिता विद्यार्थ्‍यांमध्‍ये प्रचंड स्‍पर्धा असते. विरुध्‍द पक्षाने नियोजित शिकवणी वर्ग बंद केल्‍यामुळे शहरातील इतर शिकवण वर्ग सुरु झालेले असल्‍याने त्‍यामध्‍ये जागा उपलब्‍ध नसल्‍याने तक्रारकर्त्‍याच्‍या मुलीला इतर शिकवणी वर्गात प्रवेश मिळणे अशक्‍य होते,  त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याच्‍या मुलीचे अतोनात नुकसान झाल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार आयोगा समक्ष दाखल करुन मागणी केली की, विरुध्‍द  पक्ष यांनी वैयक्तिक अथवा संयुक्‍तरित्‍या तक्रारकर्त्‍याला रुपये 71,400/- द.सा.द.शे.15 टक्‍के दराने व्‍याजासह देण्‍याचा आदेश द्यावा. तसेच शारीरिक, मानसिक त्रासाकरिता नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च देण्‍याचा आदेश द्यावा.

 

  1.      विरुध्‍द पक्ष 1 ने आपल्‍या विशेष कथनात नमूद केले की,  वि.प. 2 व 3 यांनी विरुध्‍द पक्ष 1 याची सन 2013 ला नेमणूक केली होती व तो देत असलेल्‍या सेवेकरिता विरुध्‍द पक्ष 2 व 3 यांच्‍याकडून पगार मिळत होता. विरुध्‍द पक्ष 1 हा नागपूर येथील रहिवासी असल्‍याने त्‍याला जाणूनबुजून पक्षकार केलेले आहे.

 

  1.       विरुध्‍द पक्ष 1 यांनी विरुध्‍द पक्ष 2 व 3 यांनाच सेवा दिली नसून तक्रारकर्ता व इतर पालकांना सुध्‍दा सेवा दिली आहे. तक्रारकर्त्‍याने शिकवणी वर्गाकरिता जमा केलेली फी ही विरुध्‍द पक्ष 2 व 3 कडे वळती करण्‍यात आलेली आहे. विरुध्‍द पक्ष 1 यांनी विरुध्‍द पक्ष 2 व 3 कडे इतर कर्मचा-यांच्‍या पगाराकरिता, देखभाल खर्च व किराया इत्‍यादीकरिता वारंवांर मागणी करुन ही वेळेत रक्‍कम मिळत नसल्‍यामुळे विरुध्‍द पक्ष 1 ने   वि.प.  2 व 3 यांच्‍याकडे दि. 25.11.2014 ला ई-मले द्वारे नोकरीचा राजीनामा पाठविला व सदरचा राजीनामा विरुध्‍द पक्षाने दि. 26.11.2014 ला स्‍वीकारलेला असल्‍यामुळे विरुध्‍द पक्ष 1 चा विरुध्‍द पक्ष 2 व 3 यांच्‍या सोबत काहीही संबंध नाही. त्‍यामुळे विरुध्‍द पक्ष 1 यांच्‍या विरुध्‍द दाखल केलेली तक्रार खारीज करण्‍यात यावी अशी विनंती केलेली आहे.

 

  1.      विरुध्‍द पक्ष 2 यांनी आपल्‍या प्राथमिक आक्षेपात नमूद केले की, तक्रारकर्ता व त्‍याच्‍या मध्‍ये ग्राहक व सेवा दिल्‍याबाबत कुठलाही संबंध नाही. तसेच तक्रारकर्त्‍याने  फी अदा केली नाही अथवा त्‍याच्‍या नांवाने कोणतीही पावती नाही. तक्रारकर्त्‍याने सदरची तक्रार मुलीच्‍या मार्फत दाखल केलेली आहे असे कुठेही नमूद केलेले नाही. तसेच तक्रारीतील प्रतिज्ञापत्र व  सत्‍यापनात सदरची तक्रार मुलीच्‍या वतीने किंवा पालक म्‍हणून दाखल करीत असल्‍याचे नमूद केलेले नाही. त्‍याचप्रमाणे ओळखपत्र दाखल केलेले नाही किंवा मुलगी अज्ञान असल्‍याचे दस्‍तावेज दाखल केले नाही. त्‍यामुळे सदरची तक्रार दाखल होण्‍यास पात्र नाही.

 

  1.      विरुध्‍द पक्षाने पुढे नमूद केले की, तक्रारकर्त्‍याने संपूर्ण फी अदा केली नाही अथवा त्‍यांनी तक्रारकर्त्‍याला शिक्षण देण्‍यास नकार दिलेला नाही. तसेच तक्रारकर्त्‍याने दाखल केलेल्‍या पावत्‍या हया ख-या नसल्‍यामुळे मंचाने मुळ पावती तपासणीकरिता सादर करण्‍याचे निर्देश द्यावे. शिकवणी वर्ग 6 महिन्‍यापर्यंत व्‍यवस्थितीत सुरु होते व त्‍यामध्‍ये कुठेही  अनियमितता नव्‍हती. फेब्रुवारी 2015 नंतर विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दि. 04.03.2015 ला ई-मेल द्वारे पत्र पाठवून विद्यार्थ्‍यांना दुस-या शिकवणी वर्गाला जॉईन करण्‍याचा अथवा शिकवणी वर्गाचे नियमाप्रमाणे रक्‍कम परत घेण्‍याबाबतचे असे 2 पर्याय पाठविले होते, त्‍यापैकी तक्रारकर्त्‍याने कुठलाही पर्याय निवडला नाही अथवा नाकारला नाही, याकरिता विरुध्‍द पक्षाला जबाबदार ठरविण्‍यात येऊ नये. शिकवणी वर्ग बंद करण्‍यात आले ही बाब चुकिची आहे. पालकांनी विरुध्‍द पक्षा विरुध्‍द क्रिमीनल तक्रार देऊन त्रास दिला आहे. विद्यार्थी शिकवणी वर्गाला प्रवेश घेते वेळी स्‍वीकारलेल्‍या पॉलिसीप्रमाणे रक्‍कम घेण्‍यास तयार नव्‍हते. सदरचे दस्‍तावेज जबाबासोबत सादर करण्‍यात येत आहे.  विद्यार्थी अॅडमिशन पॉलिसीप्रमाणे विहित मार्गाने रक्‍कम परत मिळण्‍याकरिता अर्ज करीत नाही तो पर्यंत रक्‍कम परत मिळण्‍यास पात्र नाही. विद्यार्थ्‍याने 6 महिने करिता शिकवणी वर्गाद्वारे शिक्षण घेतले असल्‍यामुळे अॅडमिशन पॉलिसीप्रमाणे शिक्षण घेतलेल्‍या 6 महिन्‍याची रक्‍कम मागू शकत नाही. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडून रक्‍कम मिळण्‍याकरिता संपर्क साधला तर विरुध्‍द पक्ष निश्‍चतपणे पॉलिसीप्रमाणे जी रक्‍कम देय असेल ती देईल.

 

  1.  विरुध्‍द पक्ष 3 ला आयोगा मार्फत पाठविलेली नोटीस प्राप्‍त होऊन ही ते आयोगा समक्ष हजर न झाल्‍यामुळे त्‍यांच्‍या विरुध्‍द प्रकरण एकतर्फी चालविण्‍याचा आदेश दि. 15.01.2016  रोजी पारित करण्‍यात आला.

 

  1.      उभय पक्षाने  दाखल केलेले दस्‍तावेजाचे अवलोकन केले असता  व त्‍यांचा तोंडी युक्तिवाद ऐकून घेतल्‍यावर निकाली कामी खालील मुद्दे विचारार्थ घेतले.

         

  1. तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा  ग्राहक आहे काय ?                  होय

 

  1. विरुध्‍द पक्ष 1 ने दोषपूर्ण सेवा दिली काय ?                    नाही

 

  1. विरुध्‍द पक्ष 2 व 3 ने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा दिली काय?     होय

 

  1. काय आदेश ?                                  अंतिम आदेशानुसार

 

निष्‍कर्ष

 

  1. मुद्दा क्रमांक 1 ते 4 बाबत –. तक्रारकर्त्‍याने त्‍याची मुलगी प्राची चंद्रभान काळे हिची विरुध्‍द पक्षाचे IPTY 2014-2016 या दोन वर्षाच्‍या Integrated Program Course Code IPTY 2014-2016 च्‍या अभ्‍यासक्रमाकरिता दि. 20.01.2014 ते दि. 12.08.2014 पर्यंत रुपये 63,100/- इतकी रक्‍कम अदा केलेली आहे हे नि.क्रं. 2 वर दाखल दस्‍तावेजावरुन दिसून येते. यावरुन तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक असल्‍याचे सिध्‍द होते. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडे IPTY 2014-2016 या शैक्षणिक अभ्‍यासक्रमांकरिता रुपये 1,12,000/- अदा करावयाचे होते त्‍यापैकी तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडे माहे ऑगस्‍ट पर्यंत रुपये 63,100/- अदा केली असल्‍याचे दाखल पावत्‍यांवरुन दिसून येते.  तसेच विरुध्‍द पक्षाचे शिकवण वर्ग माहे फेब्रुवारी 2015 पासून बंद झाले हे उभय पक्षाना मान्‍य आहे, त्‍यामुळे तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाकडून (63,100 28,000) रुपये 35,100/- टयूशन फी पोटी असलेली रक्‍कम परत मिळण्‍यास पात्र आहे असे आयोगाचे मत आहे.

 

  1.      विरुध्‍द पक्ष 1 हा विरुध्‍द पक्ष 2 व 3 यांच्‍याकडे नौकरी करीत होता व विरुध्‍द पक्ष 1 यांनी दि. 25.11.2014 ला ई-मेल द्वारे विरुध्‍द पक्ष 2 व 3 कडे राजीनामा पाठविला असून विरुध्‍द पक्ष 2 व 3 यांनी विरुध्‍द पक्ष 1 चा राजीनामा दि. 26.11.2014 ला ई-मेल द्वारे स्‍वीकारला असल्‍याचे दाखल दस्‍तावेजावरुन दिसून येते. त्‍यामुळे विरुध्‍द पक्ष 1 यांनी तक्रारकर्त्‍याला कोणतीही दोषपूर्ण सेवा दिली नसल्‍याने त्‍यांच्‍या विरुध्‍द कोणताही आदेश नाही. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याच्‍या मुलीचे शिक्षण मध्‍यतंरी सत्रात बंद केल्‍याने तिचे कधीही भरुन न येणारे शैक्षणिक नुकसान झाले आहे. त्‍यामुळे तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाकडून शारीरिक, मानसिक त्रासाकरिता नुकसान भरपाई व आर्थिक नुकसान मिळण्‍यास पात्र आहे असे आयोगाचे स्‍पष्‍ट मत आहे.

 

सबब खालील प्रमाणे अंतिम आदेश पारित.

अंतिम आदेश

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर.

 

  1. विरुध्‍द पक्ष क्रं. 1 विरुध्‍द कोणताही आदेश नाही.

 

  1. विरुध्‍द पक्ष 2 व 3 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्‍तरित्‍या तक्रारकर्त्‍याला टयुशन फी पोटी स्‍वीकारलेली रक्‍कम रुपये 35,100/- परत करावी व सदर रक्‍कमेवर तक्रार दाखल दि. 06.07.2015 पासून ते प्रत्‍यक्ष रककम अदायगीपर्यंत द.सा.द.शे. 7% दराने व्‍याजासह रक्‍कम तक्रारकर्त्‍याला द्यावी.  

 

  1. विरुध्‍द पक्ष 2 व 3 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्‍तरित्‍या तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या शारीरिक, मानसिक त्रासाकरिता रुपये 20,000/- व तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये 10,000/- द्यावे.

 

  1. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्‍क द्यावी.

 

  1. तक्रारकर्त्‍याला तक्रारीची ब  व  क फाईल परत करावी. 
 
 
[HON'BLE MR. ATUL D. ALSI]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.