Maharashtra

Nagpur

CC/482/2017

M/S. MAHAGUJARAT SEEDS PRIVATE LTD., THROUGH CHAIRMAN, SHRI. ASHOK N. JOSHI - Complainant(s)

Versus

MR. KURUVAPEDDAVEERANNA - Opp.Party(s)

ADV. SHRI. PRATIK J. MEHTA

11 May 2022

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/482/2017
( Date of Filing : 02 Nov 2017 )
 
1. M/S. MAHAGUJARAT SEEDS PRIVATE LTD., THROUGH CHAIRMAN, SHRI. ASHOK N. JOSHI
694, CHANDAK LAYOUT, NEAR GITANJALI PRESS, GHAT ROAD, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. MR. KURUVAPEDDAVEERANNA
1-29, SUDDI REDDI PALLI, KURNOOL (AP)
KURNOOL
ANDHRA PRADESH
2. MP HYDERABAD TRANSPORT, THROUGH PROPRIETOR, SHRI. MD. SAIFUDDIN S/O. LATE MD. BASHIR AHMED
LORRY SUPPLY OFFICE, DOOR NO. 76/118/B/2, NH-7, BANGALORE ROAD, NEAR BELLARI CHOWRASTA, KURNOOL-3 (AP)
KURNOOL
ANDHRA PRADESH
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 11 May 2022
Final Order / Judgement

आदेश पारीत व्‍दारा श्री. एस आर आजनेमासदस्‍य

  1. तक्रारदाराने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्‍या कलम 12  नुसार दाखल केलेली आहे.
  2. तक्रारदाराचा बियाणे निर्मीतीचा व्यवसाय असून त्यांचे भारतात एकूण 250 विक्रेते आहेत. वि.प.क्रं.1 हा ट्रॉलीचा मालक आहे व वि.प.क्रं.2 हा ट्रान्सपोर्टर असुन ग्राहकाकडुन मिळालेल्या ऑर्डर नुसार माल वाहतू‍कीचा व्यवसाय करतो. दिनांक 21.4.2017 रोजी तक्रारदाराने हॉयब्रीड मेज बादशहा 81.5 कीलो पॅकींग (लॉट नं.101 आणि‍ 201) 375 बॅंग्स एकुण वजन 16875  किलो एकुण कींमत रुपये 5,90,000/-, कुरनुल वरुन नागपूर येथे वाहून नेण्‍याचे डिलेव्हरी चालान क्रं.16 निर्गमित केले व त्यापोटी रुपये 30,900/- वाहतुक भाडे आकारण्‍यात आले. तक्रारदाराने दिलेल्या डिलेव्हरी चालान नूसार वि.प.क्रं.1 ने तक्रारदाराचे कुरुनुल येथील निर्मीती कारखान्यातुन माल नागपूर येथे आणण्‍याकरिता ट्रकमधे भरला व त्याबाबतची पावती वि.प.क्रं.2 ने दिनांक 21.4.2017 ला तक्रारदाराला दिली. कुरुनुल ते नागपूर ट्रक क्रमांक एपी-21-एक्स-7083 व्दारे माल वाहून नेत असतांना दिनांक 23.4.2017 ला ठिक 00.30 वाजता ट्रक वेलीमेला सिवार पंतनचेरु जि.सांगररेड्डी(तेलंगणा) येथुन जात असतांना ट्रकचा पूढील टायर फुटला आणि ट्रकमधुन आगीचे लोट दिसले. त्यावेळी विरन्ना कुर्वा वाहनचालक ट्रक चालवित होता. वि.प.क्रं.1 ने अग्नीशामक स्टेशनला माहिती दिली आणी फायरमनला बोलविण्‍यात आले आणि फायरमनने आग विझविली. आगीमूळे ट्रकचे नुकसान झाले आणि बियाणे आणि ट्रकचे दस्तावेज जळुन खाक झाले. सदर अपघाताची माहिती संबधीत पोलीस स्टेशनला दिनांक 25.4.2017 ठीक 11.00 वाजता देण्‍यात आली आणि क्रीमीनल तक्रार क्रं. 59/2017 अंतर्गत फायर अपघात नोंद घेण्‍यात आली आणि चौकशी करण्‍यात आली. आगीमूळे बियाणाचे नुकसान झाल्याची बातमी वि.प.क्रं.2 ने तक्रारदाराला दिली. वि.प.क्रं.1 ने ट्रकला चांगल्याप्रतीचे टायर न वापल्यामूळे व ट्रकची देखभाल व्यवस्थीत न केल्यामूळे तक्रारदाराचे एकुण रुपये 6,20,940/- (वाहन भाडयासमवेत) नुकसान झाले. वि.पक्रं.1 व 2 दोघेही तक्रारदाराचे झालेल्या नुकसानीकरिता संयुक्तपणे व वैयक्तीपणे जबाबदार आहेत.
  3. निर्मीता, व्यापारी दुकानदार यांचे कडुन संबंधीत विक्रेता किंवा ग्राहक यांना वाहतुकदार यांचेमार्फत पाठविण्‍यात येणारे मालाच्या गुड्स पावतीवर किंवा मालाचे नोटवर अॅट ओनर रिस्क हे वाक्य नमुद असते याचा अर्थ सदर माल पाठविण्‍यात आला नाही, उशिरा पाठविला किंवा खराब अवस्थेत पाठविला गेला तर वाहतूकदार, वाहतूक कंपनी यातुन स्वतःचे जबाबदारीमधुन पूर्णपणे दोषमुक्त होऊ शकत नाही. राष्‍ट्रीय ग्राहक आयोग, दिल्ली यांनी विजय गुड्स ट्रान्सपोर्ट कंपनी वि. रुंगटा बद्र्स या प्रकरणात मालाचे झालेल्या नुकसानीबाबत वाहतूकदाराला जबाबदार धरले आहे. वि.प.क्रं.1 व 2 चें वागणूकीमुळे तक्रारदाराने वि.प.ला दिनांक 15.6.2017 रोजी नोटीस पाठविली परंतु वि.प.ने सदर नोटीसची दखल घेतली नाही म्हणुन तक्रारदाराने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल करुन पूढील प्रमाणे मागणी केली आहे. वि.प.1व 2 ला निर्देश देण्‍यात यावे की, वि.प.चे निष्‍काळतीपणामूळे तकारदाराचे बियाणे आगीमूळे भस्म झाल्रयामूळे तक्रारदाराला नुकसान भरपाई 6,20,940/- वि.प.क्रं.1 व 2 यांनी वैयक्तीक व संयुक्तीकपणे द्यावी. तसेच मानसिक व शारिरिक त्रासापोटी, व नुकसान भरपाईपोटी रुपये 3,50,000/- व तक्रारीचे खर्च रुपये 25,000/- देण्‍यात यावे.
  4. वि.प.1 व 2 यांना मंचामार्फत नोटीस पाठविण्‍यात आली. वि.प.क्रं.1 नोटीस प्राप्त होऊन वि.प.क्रं.1 तक्रारीत हजर झाले नाही म्हणुन त्यांचे विरुध्‍द तक्रार 6.10.2018 रोजी एकतर्फी चालविण्‍याचा आदेश पारित करण्‍यात आला. वि.प.2 यांनी नोटीस घेण्‍यास नकार दिल्यामूळे त्यांचे विरुध्‍द तक्रार एकतर्फी चालविण्‍याचा आदेश दिनांक 3.10.2019 रोजी पारित करण्‍यात आला.
  5.  तक्रारदाराने अभिलेखावर दाखल केलेले दस्‍तावेजांचे अवलोकन केले असता व लेखी युक्तीवादाबाबतचे पुरसिस व दाखल न्याय‍निवाडे यांचे अवलांकन करता खालील मुद्दे विचारार्थ आले.

मुद्दे                                                                               उत्तरे

 

  1. तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ?                                  होय
  2. विरुध्‍द पक्षाने तक्रारदाराला त्रुटीपूर्ण सेवा दिली काय ?                   होय
  3. विरुध्‍दपक्षाने तक्रारदाराचे प्रती अनुचित व्यापारी
  4. पध्‍दतीचा  अवलंब केला आहे काय ?                                                   होय
  5. काय आदेश                                                                              अंतिम आदेशानुसार

का र ण मि मां सा

  1. 10. तक्रारदाराने दिनांक 21.4.2017 रोजी हॉयब्रीड मेज बादशहा 81.5 केजीपॅकींग (लॉट नं.101 आणि‍ 201) 375 बॅंग्स एकुण वजन 16875 किलो एकुण कींमत रुपये 5,90,000/-, कुरनुल वरुन नागपूर येथे वाहून नेण्‍याचे डिलेव्हरी चालान क्रं.16 निर्गमित केले व सदरचे बियाणे नागपूर येथे वाहुन नेण्‍याकरिता वि.प.क्रं.2 चे ट्रकमधे भरले व त्यापोटी वि.प.ने तक्रारदाराला रुपये 30,900/- वाहतुक भाडे आकारल्याचे नि.कं.2(1,2) वर दाखल वर दाखल दस्तऐवजांवरुन स्पष्‍ट होते यावरुन तक्रारकर्ता हा वि.प.क्रं.1 व 2 चा ग्राहक आहे हे सिध्‍द होते. वि.प.क्रं.1 ने तक्रारदाराचे मालाची कुरुनुल वरुन नागपूर येथे वि.प.क्रं.2 चे ट्रक क्रं. एपी-21-एक्स-7083 ने वाहतुक करतांना दिनांक 23.4.2017 ला ठिक 00.30 वाजता वि.प.क्रं.2 यांचे मालकीचा ट्कचे डाव्याबाजुचा टायर फुटला व ट्रक मधुन आगीचे लोट निघाले व ट्रकमधील बियाणे व पावत्या व इतर दस्तावेज जळून खाक झाल्याचे नि.क्रं.2(6) वर दाखल प्रथम खबरी अहवालावरुन स्पष्‍ट होते. वि.प.क्रं.2 त्यांचे निष्‍काळजीपणामूळे वाहनाचे देखभाल करण्‍यात अपयशी ठरला. वि.प.क्रं.1 व 2  निष्‍काळजीपणामूळे  तक्रारदाराचे नुकसान झाले असे आयोगाचे स्पष्‍ट मत आहे. तक्रारदाराने सदर दाव्याकरिता इतर कुठल्याही न्यायालयात तक्रार दाखल न केल्याचे तक्रारीत नमुद केले आहे. त्यामूळे तकारकर्ता वि.प.कडुन नुकसानभरपाई मिळण्‍यास पात्र आहे. तक्रारदाराने अभिलेखावर पटेल रोडवेज लि. वि. बिरला यामाहा लि. या प्रकरणात दिलेल्या न्यायनिवाडयाचा आधार घेतला आहे व त्यामधे मा. सर्वोच्च न्यायालय यांनी नमुद केले की,

“ Liability is absolute, like that of insurer and is subject to the only exception of the loss or damage having been caused due to act of God  -In view of S.9 of Carriers Act, negligence on the part of the carrier need not be established by complainant –owner of the goods –This is so notwithstanding any special contract to the contrary between the parties-  Consignment containing generator sets booked by respondent with appellant for transportation-Consignment destroyed by fire in godown of appellant- Held, appellant liable for the loss- Accidental fire is not an act of God which can be traced to natural cause”

वरील सर्वोच्च न्यायालयाचे निवाडयाप्रमाणे वि.प.यांची जबाबदारी असतांना वि.प.ने तकारदाराला नुकसान भरपाई दिली नाही ही वि.प.ची त्रुटीपूर्ण सेवा आहे.

सबब खालीलप्रमाणे आदेश पारित करण्‍यात येतो.

अंतिम आदेश

  1. तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.
  2. वि.प.1 व 2 ने तक्रारदाराला त्याच्या मालाचे झालेल्या नुकसानीपोटी व वाहतुक खर्चापोटी झालेल्या नुकसानीपोटी रुपये 6,20,940/- द्यावे व सदर रक्कमेवर दिनांक 21.4.2017 पासुन द.सा.द.शे.9 टक्के दराने मिळुन येणारी रक्कम अदा करावी.
  3. वि.प.ने 1 व 2 तक्रारदारास झालेल्या मानसिक व शारिरिक त्रासापोटी व  नुकसान भरपाईपोटी रुपये 20,000/- व तक्रारीचे खर्चापोटी रुपये 10,000/- अदा करावे.
  4. विरुध्‍द पक्ष क्रं.1 व 2 ने वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून ४५  दिवसाचे आत संयुक्तीरित्या अथवा वैयक्तीकरित्या करावी.
  5. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्‍क द्यावी.
  6. तक्रारकर्त्‍याला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.