Maharashtra

Thane

CC/08/243

Mr. Prakash Jadhav - Complainant(s)

Versus

Mr. Keshv Mahadeo Shinde - Opp.Party(s)

17 Apr 2010

ORDER


.
CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, THANE. Room No.214, 2nd Floor, Collector Office, Court Naka, Thane(W)
consumer case(CC) No. CC/08/243

Mr. Prakash Jadhav
Mr. Ashutosh Kumar Ghosh
...........Appellant(s)

Vs.

Mr. Keshv Mahadeo Shinde
...........Respondent(s)


BEFORE:


Complainant(s)/Appellant(s):


OppositeParty/Respondent(s):


OppositeParty/Respondent(s):


OppositeParty/Respondent(s):




ORDER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

ग्राहक तक्रार क्रमांकः-243/2008

तक्रार दाखल दिनांकः-09/05/2008

निकाल तारीखः-17/04/2010

कालावधीः-01 वर्ष11महिने08दिवस

समक्ष जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे

मेसर्स.कॉमेट,प्रोप्रायटर,

श्री.देवी सिंग जे.पुरोहित,

शॉप ऑफ आनंद दीप सोसायटी,

दाता मंगल कार्यालयासमोर,केळकर क्रॉस रोड,

डोंबिवली(पू)जि.ठाणे.421 203

तर्फे अधिकारपत्रधारक

श्री.अशुतोष कुमार घोष,

बिल्‍डींग एफ.2/104,रुतू पार्क,

व्रिदांवन बस स्‍टॉप,ठाणे.400 601() ...तक्रारकर्ता

विरुध्‍द

दी डिव्‍हीजनल मॅनेजर,

युनायटेड इंडिया इन्‍शुरन्‍स कंपनी लि.,

युनिट 121200,201,जैनसन प्‍लाझा,

मालाड शॉपींग सेंटर समोर,एस.व्‍ही.रोड,

मालाड(),मुंबई.400 064 ...वि..

उपस्थितीः-तक्रारकर्त्‍यातर्फे वकीलः-श्रीमती स्मिता देशपांडे.

विरुध्‍दपक्षातर्फे वकीलः-श्री..के.तिवारी.

गणपूर्तीः- 1.सौ.शशिकला श.पाटील, मा.अध्‍यक्षा

2.सौ.भावना पिसाळ , सदस्‍या

3 .श्री.पां.ना.शिरसाट, मा.सदस्‍य

-निकालपत्र -

(पारित दिनांक-17/04/2010)

सौ.भावना पिसाळ , मा.सदस्‍या यांचेद्वारे आदेशः-

1)सदरहू तक्रार मेसर्स कॉमेट तर्फे तक्रारदार यांनी युनायटेड इंडिया इन्‍शुरन्‍स कंपनी विरुध्‍द दाखल केली आहे. यामध्‍ये त्‍यांनी रु.3,71,813/- एवढया एकुण रकमेची मागणी केली आहे. त्‍यापैकी रु.2,21,813/- एवढया

2/-

रकमेच्‍या स्‍टॉकचे पावसाच्‍या पाण्‍याने नुकसान झाले. म्‍हणून त्‍यावर 12 टक्‍के व्‍याजाने नुकसान भरपाई मागितलेली आहे. तक्रारदार यांनी विरुध्‍दपक्षकाराकडून सदर शॉप किपर पॉलीसी नं.12/200/48/05/01560 घेतली. या पॉलीसीचा व्‍हॅलीड काळ 11/06/2005 ते 10/06/2006व त्‍याचा प्रिमियम ते नियमीत भरत होते. सदर पॉलीसी रु.5,00,000/- रकमेची असून त्‍यापैकी 1,50,000/- फर्निचरसाठी व फिक्‍चरसाठी व रु.3,50,000/- खाद्यपदार्थ व इले.क्‍लॉथ कास्‍मेटीकसाठी होती.

दिनांक26/07/2005 रोजी पडलेल्‍या मुसळधार पावसाने व धरणाचे पाणी मे.कॉमेट तळमजला आनंददीप बिल्‍डींग या कामाच्‍या जागेत भरले व त्‍यामध्‍ये ठेवलेल्‍या कच्‍चा माल,इलेक्‍ट्रॉनिक माल यामध्‍ये 5ते 7 फुट पाणी भरल्‍याने सर्व माल खराब व नादुरुस्‍त,नाशवंत झाला. फर्निचर खराब झाले. परिस्थितीजन्‍य पंचनामा तहसिलदार यांनी केलेला आहे. प्रत्‍यक्षात पावसामुळे नुकसान झालेल्‍या मालाची इलेक्‍ट्रॉनिकचे रुपये 72,692/- कटलरी व कॉस्‍मेटीक्‍सचे रुपये23,376/- तसेच चॉकलेट,ड्राय फ्रुट,खाद्य पदार्थ यांचे रु.36,750/- एवढया रकमेचे व कापडाच्‍या मालाचे रु.44.755/- असे एकंदर रु.1,77,813/- रकमचे नुकसान झाले. तसेच रु.44,000/- चे फर्निचरही खराब झाले होते असे तक्रारदार नमुद करतात.

विरुध्‍दपक्षकार यांनी त्‍यांची लेखी कैफीयत दिनांक26/08/2008 रोजी दाखल केली आहे. विरुध्‍दपक्षकार यांनी मे.सरान इंजिनियर्स अँन्‍ड कन्‍सलटंट या सर्व्‍हेअरची सदर परिस्थितीचा सर्व्‍हे करण्‍यास नियुक्‍ती केली होती व त्‍यांनी त्‍याच्‍या सर्व्‍हे रिपोर्ट प्रमाणे रुपये1,68,449/- इतकी रकमेची नुकसानीची नोंद केली आहे. परंतु विरुध्‍दपक्षकार यांनी तक्रारदाराचा सदर क्‍लेम दिनांक07/03/2007 रोजी 'नो क्‍लेम' म्‍हणून नाकारला. तक्रादार यांचा क्‍लेम नं.12/200/48/05/474 होता. तसेच एसव्‍हीजे इन्‍व्‍हेस्‍टीगेटरच्‍या इन्‍व्‍हेस्‍टीगेशन रिपोर्ट नुसार खरेदी बिले खोटी होती व सदर दुकाने प्रत्‍यक्षात जागेवर नव्‍हतीच. अकाऊंटटच्‍या सहया व्‍यापाराच्‍या स्‍टेटमेंटवर नसल्‍यामुळे परिस्थितीतील खरेपणा शाश्‍वत नाही.

मंचाने उभय पक्षकारांची शपथपत्रे,पुरावा,कागदपत्रे,लेखी कैफियत व लेखी युक्‍तीवाद पडताळून पाहीले. मंचापुढे पुढील एकमेव प्रश्‍न उपस्थित होतो.

विरुध्‍दपक्षकार यांनी तक्रारदार यांचा सदर क्‍लेम नाकारणे योग्‍य व कायदेशीर आहे का.?

वरील प्रश्‍नाचे उत्‍तर हे मंच नकारार्थी देत असून पुढील कारण मिमांसा

3/-

देत आहे.

कारण मिमांसा

तक्रारदार यांनी विरुध्‍दपक्षकार यांचेकडून 12200/48/05/01560 यानुसार इन्‍शुरन्‍स रुपये5,00,000/- रकमेची शॉपकिपर्स पॉलीसी घेतली होती. दिनांक26/07/2005 रोजीच्‍या पावसामुळे सदर गोडावूनमध्‍ये आजुबाजूच्‍या परिसराइतकेच पाणी तुंबले होते. यामध्‍ये उभय पक्षात वाद नाही. त्‍यामुळे गोडावूनमधील खाद्य पदार्थ, इलेक्‍ट्रॉनिक माल,कपडे,नाशवंत झाले.परंतु फर्निचर परत वापरण्‍यासारखे होते. नाशवंत नव्‍हते. असे मे.सरान अँन्‍ड इंजिनियर्सच्‍या सर्व्‍हेअर रिपोर्टनुसार आढळते. तसेच मालाचे एकंदर रुपये1,68,449/-एवढया रकमेचे नुकसान झाले असे दिसून येते. परंतु तक्रारदार यांनी त्‍याबद्दल रु.1,77,813/- व फर्निचर बाबत रु.44,000/- मागितले आहेत. तक्रारदार यांनी रुपये5,00,000/- एवढया रकमेचा अँश्‍युरन्‍स घेतला होता. यापैकी रु.1,50,000/- फर्निचरबाबत व रु.3,50,000/- खाद्य पदार्थ, इलेक्‍ट्रॉनिक, कपडे, कॉस्‍मेटीक याबाबतची पॉलीसी होती. याबा‍बत झालेले नुकसान तक्रारदार यांनी दिनांक15/08/2005 च्‍या स्‍टेटमेंटमधून मागणी केली आहे. परंतु मंचाने सर्व्‍हेअर रिपोर्टनुसार मान्‍य केलेली नुकसान भरपाई रु.1,68,449/- मान्‍य करीत आहोत.तक्रारदार यांनी सदर तक्रारीमध्‍ये चौकशीसाठी ठेवली असतानांही बरीच चुकीची आकडेमोड केलेली आहे. तरी परिस्थितीजन्‍य पुराव्‍यानुसार हे मंच तक्रारदाराच्‍या मागणीपैकी रु.1,68,449/-एवढी रक्‍कम मान्‍य करीत आहे. व पुढील अंतिम आदेश देत आहे.

-आदेश -

1)तक्रार क्रमांक 243/2008 ही अंशतः मंजूर करण्‍यात येत असून विरुध्‍दपक्षकार यांनी या तक्रारीचा खर्च रुपये 1,000/-(रु.एक हजार फक्‍त)तक्रारदार यांस द्यावा व स्‍वतःचा खर्च स्‍वतः सोसावा.

2)विरुध्‍दपक्षकार यांनी पावसामुळे झालेल्‍या गोडाऊनमधील नाशवंत मालाच्‍या नुकसानीपोटी रु.1,68,449/-(रु.एक लाख अडुसष्‍ट हजार चारशे एकोनपन्‍नास फक्‍त) एवढी रक्‍कम तक्रार दाखल तारखेपासून 6टक्‍के व्‍याजाने तक्रारदार यांस द्यावेत.

या आदेशाचे पालन या आदेशाची प्रत मिळाल्‍या पासून दोन महीन्‍याचे आत करावे अन्‍यथा वरील रकमेवर 3टक्‍के जादा दंडात्‍मक व्‍याज द्यावे लागेल.

3)विरुध्‍दपक्षकार यांनी मानसिक त्रासापोटी रु.3,000/-(रु.तीन हजार फक्‍त)तक्रारदार यास द्यावेत.

4/-

4)सदर आदेशाची प्रत उभय पक्षकारांना निःशुल्‍क देण्‍यात यावी.

दिनांकः-17/04/2010

ठिकाणः-ठाणे



 

(श्री.पां.ना.शिरसाट) (सौ.भावना पिसाळ) (सौ.शशिकला श.पाटील)

सदस्‍य सदस्‍या अध्‍यक्षा

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे