तक्रारदार : त्यांचे प्रतिनीधी वकील श्री. महेंद्र खान्देशी मार्फत हजर.
सामनेवाले : एकतर्फा.
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
निकालपत्रः- श्रीमती दिपा बिदनुरकर, सदस्या, ठिकाणः बांद्रा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
न्यायनिर्णय
तक्रारीचे संक्षिप्त स्वरुप खालील प्रमाणे आहे.
1. तक्रारदार सा.वाले क्र. 2 यांच्या गृहसंस्थेचे सदस्य आहेत. सदर गृहसंस्थेच्या इमारतीचे पुर्नविकसीत (रिडेव्हलपमेंट) केलेली आहे. सा.वाले क्र 1 हे इमारतीचे विकासक आहेत. तक्रारदारांची अशी तक्रार आहे की, सा.वाले क्र 1 यांनी तक्रारदारांना 360 चौ.फुट चटई क्षेत्रफळाचा सदनिका नवीन इमारतीमध्ये देण्याचे आश्वासन दिलेले होते. शहर दिवाणी न्यायालयामध्ये दाखल केलेल्या दाव्यात तडजोड पत्र दाखल करतांना तक्रारदारांच्या वकीलांच्या चेथावणीमूळे तक्रारदारांनी 240 चौ.फुट क्षेत्रफळाऐवजी सदनिका देण्याचे तडजोडपत्रात नमूद केले आहे. परंतु प्रत्यक्षात तक्रारदारांना 220 चौ.फुट क्षेत्रफळाची नवीन इमारतीतील सदनिका ताब्यात दिली. सदर सदनिकेला खिडकी नाही तसेच तक्रारदारांची जुनी सदनिका ही पुढील बाजुस होती. परंतू तक्रारदारांनी नवीन इमारतीतील सदनिका पाठी मागील बाजुस दिलेली आहे. तक्रारदारांच्या म्हणण्यानूसार सा.वाले यांनी खालीलप्रमाणे सेवासुविधा पुरविण्यास कसुर केली आहे.
1. तक्रारदारांनी 360 चौ.फुट क्षेत्रफळाची सदनिकेचे आश्वासन
देवूनही 220 चौ.फुट क्षेत्रफळाची सदनिका दिली.
2. आवश्यक त्या सेवासुविधा पुरविल्या नाही.
3 इतर गृहसंस्थेच्या सदस्यांना ज्या सुविधा पुरविण्यात आल्या त्याप्रमाणे तक्रारदारांना पुरविलेल्या नाही.
4 मुख्य दरवाजे लाकुड हे दुय्यम प्रतीचे असल्याने ते कुजलेल्या अवस्थेत
आहेत.
5. सिंक हे हलक्या प्रतीचे आहेत.
6. वरील मजल्यावरून गळती आहे.
7. प्रत्येकास सज्जा मोबदला न घेता दिला आहे. जास्तीचे दिले आहे. परंतू तक्रारदारांच्या सदनिकेमध्ये सज्जेचा भाग समाविष्ट केलेला आहे.
8. नवीन इमारतीतील पाठी मागील भागात सदनिका दिलेली आहे.
2. वरील प्रमाणे सा.वाले यांनी सेवा सुविधा पुरविण्यास कसुर केल्यामूळे तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रार अर्ज दाखल करून रू.16,86,000/-,रक्कम सामनेवाले त्यांनी नुकसान भरपाई म्हणून द्यावी. व तसेच सदनिकेतील दोष काढावे. अशी मागणी केली आहे. मंचाकडुन सा.वाले यांनी हजर राहून तक्रार अर्जास उत्त्ार दाखल करावे अशी नोटीस पाठविण्यात आली होती. सा.वाले 1 व 2 यांना नोटीस मिळाल्याची पोचपावती अभिलेखात दाखल आहे. तक्रारदारांनी सा.वाले क्र. 1 व 2 यांना नोटीस पाठविल्याचे शपथपत्र दाखल केले. नोटीस मिळवूनही सा.वाले क्र. 1 व 2 हजर राहिले नाही व कैफियत दाखल केली नाही. म्हणून सा.वाले 1 व 2 यांच्या विरूध्द तक्रार अर्ज एकतर्फा निकाली काढण्यात यावा असा आदेश देण्यात आला.
3. तक्रार अर्ज, शपथपत्र व अनुषंगीक कागदपत्रांसह दाखल केली आहे.
4. तक्रार अर्ज व अनुषंगीक कागदपत्रे यांची पडताळणी केली. करून पाहिली असता निकालासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
क्र.. | मुद्दे | उत्तर |
1 | सा.वाले यांनी तक्रारदार यांना सेवासुविधा पुरविण्यात कसूर केली हे तक्रारदार सिध्द करतात काय? | नाही. |
2 | तक्रार अर्जात केलेल्या मागणीस तक्रारदार पात्र आहेत काय? | नाही. |
3. | अंतीम आदेश | तक्रार अर्ज रद्द करण्यात येते. |
कारण मिमांसा
5. तक्रारदारांची तक्रार अशी आहे की, सा.वाले यांनी आश्वासन दिलेल्या क्षेत्रफळापेक्षा कमी क्षेत्रफळाची सेवा दिली व इतर सेवासुविधा पुरविण्यास कसुर केली याबाबत आहे.
6. तक्रारदारांच्या म्हणण्यानूसार तक्रारदार हे सा.वाले क्र. 2 चे सदस्य आहेत. सा.वाले क्र.2 यांनी गृहसंस्थेच्या इमारतीचे पुर्नविकसीत केले.(Redeveloped) पुर्नविकसीत करतांना सा.वाले क्र. 1 यांनी सा.वाले क्र. 2 व इतर यांचे विरूध्द शहर दिवाणी न्यायालय मध्ये दावा दाखल केला होता. त्यामध्ये उभयपक्षकारांनी तडजोडपत्र दाखल केले. व तडजोडपत्रांनूसार कोर्टाचा आदेश झाला.
7. तक्रारदारांची अशी तक्रार आहे की, शहर दिवाणी न्यायालयातील दाव्यामध्ये तडजोडपत्र दाखल करतांना तक्रारदारांचे वकीलांच्या चिथावनीमूळे (अबेटमेंट) नूसार तडजोडपत्रावर 360 चौ.फुट क्षेत्रफळाच्या ऐवजी 240 अशी लिहीली गेली आहे. प्रत्यक्षात तक्रारदारांना सदर सदनिकेचा ताबा देतेवेळी 220 चौ.फुट क्षेत्रफळाची सदनिका दिली.
8. तडजोडपत्रांनूसार तक्रारदाराला प्रताप को.ऑप.हौ.सोसायटी, छत्रपती शिवाजी महाराज रोड, वाकोला ब्रिज सांताक्रृझ (पूर्व), येथील सदनिका क्र 5 देण्याचे ठरले होते. अभिलेखात दाखल केलेल्या कागदपत्रांची पाहणी करीता हे स्प्ष्ट होते की, सदर सदनिका ही तक्रारदार श्रीमती. लिलावती सोनी व श्रीमती. देवयानी गौरी शंकर यादव या दोघींच्या सयुक्त नावे आहे. त्यामूळे श्रीमती. लिलावती सोनी व श्रीमती. देवयानी गौरी शंकर यादव या दोघींनी मिळून तक्रार अर्ज दाखल करणे आवश्यक होते. परंतु तक्रार अर्ज फक्त श्रीमती. लिलावती सोनी यांनी एकटयानीच दाखल केलेली आहे.
9. तक्रारदारांच्या म्हणण्यानूसार तक्रारदार हे सा.वाले क्र. 2 चे सदस्य आहेत. सा.वाले क्र.2 यांनी गृहसंस्थेच्या इमारतीचे पुर्नविकसीत केले.(Redeveloped) पुर्नविकसीत करतांना सा.वाले क्र. 1 यांनी सा.वाले क्र. 2 व इतर यांचे विरूध्द शहर दिवाणी न्यायालय मध्ये दावा दाखल केला होता. त्यामध्ये उभयपक्षकारांनी तडजोडपत्र दाखल केले. व तडजोडपत्रांनूसार कोर्टाचा आदेश झाला.
10. तक्रारदारांची अशी तक्रार आहे की, शहर दिवाणी न्यायालयातील दाव्यामध्ये तडजोडपत्र दाखल करतांना तक्रारदारांचे वकीलांच्या चिथावनीमूळे (अबेटमेंट) नूसार तडजोडपत्रावर 360 चौ.फुट क्षेत्रफळाच्या ऐवजी 240 अशी लिहीली गेली आहे. प्रत्यक्षात तक्रारदारांना सदर सदनिकेचा ताबा देतेवेळी 220 चौ.फुट क्षेत्रफळाची सदनिका दिली.
11. कागदपत्रांची पडताळणी करून पाहली असता असे आढळून आले की, शहर दिवाणी न्यायालयात दाखल केलेल्या तडजोडपत्रांवर तक्रारदारांची सही आहे. तसेच सा.वाले क्र 1 व तक्रारदार आणि श्रीमती. देवयानी गौरी शंकर यादव यांच्यात सदर सदनिकेबाबत खरेदी खताचा करारनामा दि.28.12.2007 रोजी झालेला आहे. त्यावरही सा.वाले क्र. 1 व तक्रारदार श्रीमती. लिलावती सोनी आणि श्रीमती. देवयानी गौरी शंकर यादव यांच्या सहया आहेत. शहर दिवाणी न्यायालयात दाखल केलेले तडजोडपत्र व दि.28.12.2007 चे करारपत्र अभिलेखात दाखल आहे. तडजोडपत्रांच्या परिच्छेद क्र. 9 प्रमाणे सा.वाले हे तक्रारदार यांना बी-विंग मधील पहिल्या मजल्यावरील 200 चौ.फुट चटई क्षेत्रफळाचे म्हणजेच हिशोबाने 240 चौ.फुट बांधीव क्षेत्रफळाची सदनिका क्र. 5 तक्रारदार व देवयानी गौरी शंकर यादव यांच्या संयुक्त नावे देणार होते. तसेच सा.वाले क्र. 1 हे सदर सदनिकेस 20 चौ.फुट क्षेत्रफळाचे सज्जा (elevation features) सज्जा देणार होते.
12. तसेच तडजोडपत्राच्या परिच्छेद क्र. 10 नूसार सा.वाले क्र. 1 तक्रारदारांना अशाप्रकारे पूर्वी असलेल्या सदनिकेच्या क्षेत्रफळापेक्षा जास्त क्षेत्रफळाची सदनिका मालकी तत्वावर तक्रारदार व श्रीमती. देवयानी गौरी शंकर यादव यांचे संयुक्त नावे देण्याचे कबूल केले. तसेच अभिलेखात दाखल असलेल्या दि.27.12.2007 च्या करारपत्रांच्या परीच्छेद क्र.3 नूसार सा.वाले क्र. 1 यांनी तक्रारदारांना 240 चौ.फुट बांधीव क्षेत्रफळाचे म्हणजेच हिशोबाने 200 चौ.फुट चटई क्षेत्रफळाची बी-विंग मधील पहिल्या मजल्यावरील सदनिका क्र. 5 तक्रारदारांना देण्याचे कबुल केले होते. तसचे सदर सदनिका तक्रारदार श्रीमती. लिलावती सोनी व श्रीमती. देवयानी शंकर यादव यांच्या संयुक्त मालकीने देण्याचे ठरले होते.
13. तसेच करारासोबत सा.वाले क्र. 1 यांनी तक्रारदारांना दिलेले वाटपपत्र दाखल केलेले आहेत. त्यामध्येही पहिल्या मजल्यावरील सदर सदनिका क्र. 5 चे बांधीव क्षेत्रफळ 240 तर चटई क्षेत्रफळ 200 चौ.फुट असे दर्शविते. करार अर्जासोत सा.वाले क्र. 2 संस्थेने नाहरकत प्रमाणपत्र दिलेले आहे. त्यामध्ये नवीन वाटप केलेल्या सदनिकेचे बांधीव क्षेत्रफळ 240 चौ.फुट असे दर्शविले आहे. या सर्व कागदपत्रांवरून तक्रारदार यांना नवीन वाटप केलेली सदनिका क्र 5 या जागेचे बांधीव क्षेत्रफळ 240 चौ.फुट हिशोबाने 200 चौ.फुट चटई क्षेत्रफळाचे होते असे दर्शविते/स्प्ष्ट होते.
14. तक्रारदारांनी अभिलेखात वास्तुविशारद तज्ञ श्री.चारूदत्त पंडीत यांचे शपथपत्र दाखल केले आहेत. परंतू त्यांचे शपथपत्र वाचून पाहिले असता असे निदर्शनास आले की, वास्तुविशारद तज्ञ श्री. चारूदत्त पंडीत यांनी बी-विंग मधील पहिल्या मजल्यावरील सदनिका क्र. 5 ची पाहणी न करता सदनिका क्र. 23 ची पाहणी करून अहवाल सादर केलेला आहे व शपथपत्र दखल केलेले आहे. त्यामूळे वास्तुविशारद तज्ञ श्री. चारूदत्त पंडीत यांचे शपथपत्र ग्राहय धरता येणार नाही.
15. परंतू तक्रारदारांनी करारनाम्याचे परिशिष्ट क्र 2 यामधील तरतुदीवर भर दिला. दुस-या शेडयुल्डमध्ये नमूद केलेले 360 चौ.फुट क्षेत्रफळाचे बांधकामामध्ये तक्रारदारांकडे असलेले जुन्या जागेचे क्षेत्रफळ व नवीन वाटप केलेली सदनिकचे बांधीव क्षेत्रफळ सम्मीलीत आहे. त्यामूळे दुस-या शेडयुल्डमधील तपशीलानूसार न जाता कराराच्या परिच्छेद क्र 3 प्रमाणे करार झाला होता हे स्पष्ट होते.
16. तक्रारदारांनी सा.वाले क्र. 1 यांचे विरूध्द न्यायनिर्णयाच्या परिच्छेद क्र. 1 मध्ये नमूद केल्याप्रमाणे अनेक सेवासुविधा पुरविण्यात कसुर केली अशी तक्रार केली आहे. तक्रार अर्ज जरी एकतर्फा निकाली काढण्यात आलेला असला तरीही तक्रारदारांना त्यांचे म्हणणे सिध्द करणे आवश्यक आहे. तक्रारदारांनी म्हटल्यानूसार सा.वाले यांनी सेवासुविधा पुरविण्यास कसूर केली याबाबत तक्रारदार यांनी कोणत्याही बाबी पुरावे दाखल करून सिध्द केल्या नाही. तक्रारदारांनी कोणत्या आवश्यक सेवासुविधा पुरविल्या नाही किंवा इतर सदस्यां पेक्षा तक्रारदारांना कमी सेवासुविधा पुरविल्या. तसेच मुख्य दरवाजाचे लाकुड हलक्या प्रतिचे, सिंक हलक्या प्रतिचे आहे. तसेच वरच्या मजल्यावरून तक्रारदारांच्या सदनिकेस गळती आहे. प्रत्येकास सज्जा हा मोबदला न घेता जास्तीचे दिले गेलेले आहेत परंतू तक्रारदारांच्या सदनिकेमध्ये सज्जाचे क्षेत्रफळ हे सदनिकेच्या क्षेत्रफळामध्ये समीलीत केलेले आहेत. या कोणत्याही बाबी पुराव्यानिशी तक्रारदार सिध्द करू शकले नाही.
17. वरील विवेचनावरून तक्रार अर्ज रद्द करण्यात येतो
आदेश
1. तक्रार क्रमांक 111/2010रद्द करण्यातयेते.
2. खर्चाबद्दल आदेश नाही.
3. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य
पाठविण्यात याव्यात.