(पारित व्दारा- श्री नितीन माणिकराव घरडे, मा.सदस्य.)
(पारित दिनांक-23 नोव्हेंबर,2016)
01. तक्रारदारांनी विरुध्दपक्षां विरुध्द प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अन्वये मंचासमक्ष दाखल केली.
02. तक्रारदारांची थोडक्यात तक्रार खालील प्रमाणे-
तक्रारकर्ता श्री रमेशकुमार जानकीप्रसाद सोनी (आता मयत) वर नमुद पत्त्यावर राहतात. यातील विरुध्दपक्ष क्रं-(1) क्रं-(2) अनुक्रमे श्री भारतकुमार माधवप्रसाद नवेतिया आणि श्री रुद्रनारायण माधवप्रसाद नवेतिया आणि त्यांची आई श्रीमती संतोषवती माधवप्रसाद नवेतिया (आता मयत) हे मौजा बाभूळखेडा, खसरा क्रं-45/2 आणि क्रं-46, प्लॉट क्रं-6, बॅनर्जी ले-आऊट, नागपूर एकूण क्षेत्रफळ 517.39 चौरसमीटर या जमीनीचे मालक आहेत. तर विरुध्दपक्ष क्रं-(3) श्री प्रदिपकुमार आत्माराम फत्तेपुरीया (बिल्डर व सध्या मयत) यांचा जमीन विकसित करुन त्यावर सदनीका बांधकामाचा व्यवसाय असून ते सदरील व्यवसाय मेसर्स फतेपुरीया कंस्ट्रक्शन या नावाने करतात. विरुध्दपक्ष क्रं-(1) व (2) आणि त्यांची आई श्रीमती संतोषवती माधवप्रसाद नवेतिया (आता मयत) (हे जमीनीचे मालक) आणि विरुध्दपक्ष क्रं-(3) मे. फतेपुरीया कंस्ट्रक्शनचे श्री प्रदिप आत्माराम फतेपुरीया (बिल्डर) यांनी सदर भूखंड क्रं-6 वर बहुमजली निवासी सदनीकेचे बांधकाम करण्याचे ठरविले. तक्रारकर्ता श्री रमेशकुमार सोनी (आता मयत) यांना निवासासाठी सदनीकेची आवश्यकता असल्याने त्यांनी विरुध्दपक्षांशी संपर्क साधला आणि बॅनर्जी ले आऊट, नागपूर येथील भूखंड क्रं-6 ज्यामध्ये तक्रारकर्त्याचा अविभक्त हिस्सा 5.7268% आहे, त्यावर उभारण्यात येणा-या दुस-या मजल्यावरील एफ टाईप सदनीका विकत घेण्याचे ठरविले, तसा भूखंड खरेदीचा करार तक्रारकर्ता श्री रमेशकुमार जानकीप्रसाद सोनी (आता मयत) आणि विरुध्दपक्ष क्रं-(1) व क्रं-(2) आणि विरुध्दपक्ष क्रं-(1) व क्रं-(2) ची आई स्व.श्रीमती संतोषवती माधवप्रसाद नवेतिया (आता मयत) तर्फे पॉवर ऑफ अटर्नी होल्डर आणि बिल्डर श्री प्रदिप कुमार फत्तेपुरीया (सध्या मयत) यांचेमध्ये दिनांक-24 सप्टेंबर, 1988 रोजी करण्यात आला. करारा नुसार भूखंड क्रं-6 चे अविभक्त हिश्याचे मुल्य हे रुपये-10,925/- हे ठरविण्यात आले. तक्रारकर्ता श्री रमेशकुमार जानकीप्रसाद सोनी यांनी सदर भूखंड क्रं-6 वर बांधण्यात येणा-या बहुमजली ईमारत पुष्पम अपार्टमेंट मधील दुस-या मजल्या वरील एफ टाईप सदनीका ज्याचे एकूण क्षेत्रफळ सुपर बिल्टअप एरिया 580 चौरसफुट आहे, त्या सदनीके संबधाने स्वतंत्र करार श्री प्रदिप आत्माराम फतेपुरीया (बिल्डर) (आता मयत) यांचेशी केला, करारा नुसार सदनीकेचे मुल्य हे रुपये-79,075/- असे ठरविण्यात आले. तक्रारकर्ता श्री रमेशकुमार जानकीप्रसाद सोनी यांनी करारा नुसार भूखंड आणि त्यावर बांधण्यात येणा-या सदनीकेची संपूर्ण किंमत वेळोवेळी अदा केली आणि त्यासंबधाने विरुध्दपक्ष क्रं-(3) बिल्डर यांनी वेळोवेळी पावत्या दिल्यात. विरुध्दपक्ष क्रं-(3) यांनी सदरच्या रकमा विरुध्दपक्ष क्रं-(1) व क्रं-(2) तर्फे आममुखत्यार म्हणून स्विकारल्यात. सदर पुष्पम अपार्टमेंटचे बांधकाम हे पूर्ण करण्यात आल्या नंतर त्याचा ताबा तक्रारकर्ता श्री रमेशकुमार (आता मयत) यांना दिनांक-06 ऑक्टोंबर,1993 रोजी देण्यात आला.
तक्रारकर्त्याची मुख्य तक्रार अशी आहे की, त्यांना जरी सदनीकेचा ताबा मिळाला असला तरी सदनीकेचे नोंदणीकृत विक्रीपत्र नोंदवून देण्यात आलेले नाही, त्या संबधाने वेळोवेळी विनंती करण्यात आली. विरुध्दपक्ष क्रं-(1) (2) आणि विरुध्दपक्ष क्रं-(3) यांचेमध्ये आपसी वाद सुरु असल्याने विक्रीपत्र नोंदवून देण्यात आले नाही. विरुध्दपक्ष क्रं-(3) श्री प्रदिपकुमार फत्तेपुरीया यांनी विरुध्दपक्ष क्रं-(1) व क्रं-(2) चे आममुखत्यार या नात्याने सदनीकेचे विक्रीपत्र नोंदवून देण्याचे आश्वासन सन-2002 मध्ये तक्रारकर्ता श्री रमेशकुमार जानकीप्रसाद सोनी यांना दिले होते. परंतु विरुध्दपक्षांनी तक्रारकर्त्यास सदनीकेचे विक्रीपत्र नोंदवून दिले नाही. दिनांक-30 जुन, 2006 रोजी पॉवर ऑफ अटर्नी होल्डर आणि बिल्डर विरुध्दपक्ष क्रं-(3) श्री प्रदिप आत्माराम फतेपुरीया सुध्दा मृत्यू पावलेत, त्यांचे मृत्यू नंतर त्यांचे कायदेशीर वारसदारांचा शोध घेण्याचा तक्रारकर्ता श्री रमेशकुमार जानकीप्रसाद सोनी यांनी प्रयत्न केला. सन-2011 मध्ये विरुध्दपक्ष क्रं-(1) व क्रं-(2) यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी पॉवर ऑफ अटीर्नी होल्डर श्री प्रदिप आत्माराम फतेपुरीया (बिल्डर) यांचा मृत्यू झालेला असल्याने व ते सदर प्रकरणात आममुखत्यार असल्याने त्यांचे मृत्यू पःश्चात विक्रीपत्र करुन देण्यास असमर्थता दर्शवली. शेवटी तक्रारकर्ता श्री रमेशकुमार जानकीप्रसाद सोनी यांनी दिनांक-20/01/2012 रोजी विरुध्दपक्ष क्रं-(3) यांचे फर्म मध्ये संपर्क साधून विक्रीपत्र नोंदवून देण्यास विनंती केली असताना ते तयार झालेत परंतु त्यानंतर त्यांनी पुर्तता केली नाही. अशाप्रकारे तक्रारकर्ता श्री रमेशकुमार जानकीप्रसाद सोनी यांनी भूखंड आणि सदनीकेचे संपूर्ण मुल्य अदा केल्या नंतर व सदनीकेचा ताबा असूनही त्यांना सदनीकेचे विक्रीपत्र नोंदवून मिळाले नाही. अशाप्रकारे विरुध्दपक्षानीं अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला.
म्हणून शेवटी तक्रारकर्ता श्री रमेशकुमार जानकीप्रसाद सोनी (आता मयत) यांनी विनंती केली की, विरुध्दपक्ष क्रं-(1) ते (3) यांना करारा प्रमाणे तक्रारकर्त्याचे नावे सदनीकेचे ज्याचा ताबा तक्रारकर्त्या कडे आहे, विक्रीपत्र नोंदवून देण्याचे आदेशित व्हावे. तक्रारकर्त्यास झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-50,000/- आणि तक्रारखर्च म्हणून रुपये-50,000/- देण्याचे आदेशित व्हावे.
03. तक्रारकर्ता श्री रमेशकुमार जानकीप्रसाद सोनी यांनी तक्रारी सोबत दस्तऐवज अक्रं-(1) ते (13) दाखल केलेत , ज्यात प्रामुख्याने करारनाम्याची प्रत, बांधकाम करारनामा व विरुध्दपक्ष मे.फत्तेपुरीया कंस्ट्रक्शन फर्ममध्ये दिनांक-11/04/1988 ते दिनांक-01/02/1992 या कालावधीत रक्कमा जमा केल्या बाबतच्या पावत्या व विरुध्दपक्ष मे.फत्तेपुरीया कंस्ट्रक्शन यांनी दिनांक-06/10/1993 रोजी सदनीकेचे दिलेले ताबापत्र अशा दस्तऐवजाच्या प्रतींचा समावेश आहे.
04. तक्रारकर्ता श्री रमेशकुमार जानकीप्रसाद सोनी यांनी केलेल्या तक्रारीचे अनुषंगाने विरुध्दपक्ष क्रं- (1) ते (3) यांना मंचाचे मार्फतीने नोटीस जारी करण्यात आली. तसेच दिनांक-21/02/2016 रोजीचे दैनिक नवभारत या वृत्तपत्रात जाहिर नोटीस प्रकाशित करण्यात आली परंतु त्यानंतरही विरुध्दपक्ष क्रं-(1) ते (3) हे मंचा समक्ष हजर न झाल्याने त्यांचे विरुध्द मंचाने तक्रार एकतर्फी चालविण्याचा आदेश दिनांक-16/05/2016 रोजी पारीत केला.
05. तक्रारकर्त्याची प्रतिज्ञालेखावरील तक्रार, लेखी दस्तऐवजाच्या प्रती आणि तक्रारकर्त्याचे अधिवक्ता यांचा मौखीक युक्तीवाद यावरुन मंचाचा निष्कर्ष खालील प्रमाणे देण्यात येतो-
::निष्कर्ष::
06. तक्रारकर्ता श्री रमेशकुमार जानकीप्रसाद सोनी यांनी विरुध्दपक्षां विरुध्द ही तक्रार मंचा समक्ष दाखल केली होती, तक्रार मंचा समक्ष चालू असताना दरम्यानचे काळात तक्रारकर्ता श्री रमेशकुमार जानकीप्रसाद सोनी यांचा मृत्यू झालेला असल्याने त्यांचे तर्फे त्यांचे कायदेशीर वारसदार हे आता तक्रारीत समाविष्ठ झालेत. तसेच यातील विरुध्दपक्ष क्रं-(3) मे.फत्तेपुरीया कंस्ट्रक्शनचे मालक श्री प्रदिप आत्माराम फतेपुरीया (बिल्डर) यांचा सुध्दा दिनांक-30 जुन, 2006 रोजी मृत्यू झालेला आहे. मूळ जमीनीच्या मालका पैकी एक मालक श्रीमती संतोषवती माधवप्रसाद नवेतिया यांचा सुध्दा मृत्यू झालेला आहे, ही या प्रकरणातील सद्दस्थिती आहे.
07. तक्रारीतील थोडक्यात महत्वाची बाब अशी आहे की, तक्रारकर्ता श्री रमेशकुमार जानकीप्रसाद सोनी (आता मयत) यांनी निवासा सदनीकेसाठी विरुध्दपक्षांशी संपर्क साधला आणि बॅनर्जी ले आऊट, नागपूर येथील भूखंड क्रं-6 ज्यामध्ये तक्रारकर्त्याचा अविभक्त हिस्सा 5.7268% आहे, त्यावर उभारण्यात येणा-या दुस-या मजल्यावरील एफ टाईप सदनीका विकत घेण्याचे ठरविले, तसा भूखंड खरेदीचा करार तक्रारकर्ता श्री रमेशकुमार जानकीप्रसाद सोनी (आता मयत) आणि विरुध्दपक्ष क्रं-(1) व क्रं-(2) जमीनीचे मालक अनुक्रमे श्री भारतकुमार माधवप्रसाद नवेतिया आणि श्री रुद्रनारायण माधवप्रसाद नवेतिया आणि विरुध्दपक्ष क्रं-(1) आणि विरुध्दपक्ष क्रं-(2) यांची आई स्व.श्रीमती संतोषवती माधवप्रसाद नवेतिया (आता मयत) या जमीन मालकां तर्फे पॉवर ऑफ अटर्नी होल्डर श्री प्रदिपकुमार आत्माराम फत्तेपुरीया (बिल्डर) (आता मयत) यांचेमध्ये दिनांक-24 सप्टेंबर, 1988 रोजी करण्यात आला. करारा नुसार भूखंड क्रं-6 चे अविभक्त हिश्याचे मुल्य हे रुपये-10,925/- हे ठरविण्यात आले.
08. पुढे तक्रारकर्ता श्री रमेशकुमार जानकीप्रसाद सोनी यांनी सदर भूखंड क्रं-6 वर बांधण्यात येणा-या बहुमजली ईमारत पुष्पम अपार्टमेंट मधील दुस-या मजल्या वरील एफ टाईप सदनीका ज्याचे एकूण क्षेत्रफळ सुपर बिल्टअप एरिया 580 चौरसफुट आहे, त्या सदनीका बांधकाम संबधाने श्री प्रदिप आत्माराम फतेपुरीया (बिल्डर) (आता मयत) यांचेशी दिनांक-24 सप्टेंबर, 1988 रोजी करार केला, करारा नुसार सदनीकेचे मुल्य हे रुपये-79,075/- असे ठरविण्यात आले.
09. तक्रारकर्ता श्री रमेशकुमार जानकीप्रसाद सोनी यांचे म्हणण्या प्रमाणे त्यांनी भूखंड विक्री करारा नुसार भूखंड आणि त्यावर बांधण्यात येणा-या सदनीकेची संपूर्ण किंमत वेळोवेळी विरुध्दपक्ष क्रं-(3) बिल्डर आणि पॉवर ऑफ अटर्नी होल्डर श्री प्रदिपकुमार आत्माराम फत्तेपुरीया (आता मयत) यांना अदा केली आणि त्यासंबधाने विरुध्दपक्ष क्रं-(3) बिल्डर यांनी वेळोवेळी पावत्या दिल्यात. विरुध्दपक्ष क्रं-(3) यांनी सदरच्या रकमा विरुध्दपक्ष क्रं-(1) व क्रं-(2) अनुक्रमे श्री भारतकुमार माधवप्रसाद नवेतिया आणि श्री रुद्रनारायण माधवप्रसाद नवेतिया आणि विरुध्दपक्ष क्रं-(1) आणि विरुध्दपक्ष क्रं-(2) यांची आई स्व.श्रीमती संतोषवती माधवप्रसाद नवेतिया (आता मयत) यांचे तर्फे आममुखत्यार म्हणून स्विकारल्यात. सदर पुष्पम अपार्टमेंटचे बांधकाम हे पूर्ण करण्यात आल्या नंतर त्याचा ताबा तक्रारकर्ता श्री रमेशकुमार जानकीप्रसाद सोनी (आता मयत) यांना दिनांक-06 ऑक्टोंबर,1993 रोजी देण्यात आला.
10. महत्वाची बाब अशी आहे की, यातील भूखंड खरेदीचा दिनांक-24 सप्टेंबर, 1988 चा करार तक्रारकर्ता श्री रमेशकुमार जानकीप्रसाद सोनी यांनी विरुध्दपक्ष क्रं-(1) व क्रं-(2) अनुक्रमे श्री भारतकुमार माधवप्रसाद नवेतिया आणि श्री रुद्रनारायण माधवप्रसाद नवेतिया आणि विरुध्दपक्ष क्रं-(1) आणि विरुध्दपक्ष क्रं-(2) यांची आई स्व.श्रीमती संतोषवती माधवप्रसाद नवेतिया (आता मयत) यांचे तर्फे आममुखत्यार म्हणून विरुध्दपक्ष क्रं-3) श्री प्रदिपकुमार आत्माराम फत्तेपुरीया यांचेशी सह दुय्यम निबंधक, नागपूर शहर-2 यांचे समोर नोंदणीकृत केला.
11. तसेच तक्रारकर्ता श्री रमेशकुमार जानकीप्रसाद सोनी यांनी सदर भूखंड क्रं-6 वर बांधण्यात येणा-या बहुमजली ईमारत पुष्पम अपार्टमेंट मधील दुस-या मजल्या वरील एफ टाईप सदनीका ज्याचे एकूण क्षेत्रफळ सुपर बिल्टअप एरिया 580 चौरसफुट आहे, त्या सदनीका बांधकाम संबधाने श्री प्रदिप आत्माराम फतेपुरीया (बिल्डर) (आता मयत) यांचेशी दिनांक-24 सप्टेंबर, 1988 रोजी जो करार केला तो सुध्दा सह दुय्यम निबंधक, नागपूर शहर-1 यांचे समोर नोंदविण्यात आला. तसेच मे. फतेपुरीया कंस्ट्रक्शनचे मालक श्री प्रदिपकुमार आत्माराम फत्तेपुरीया यांनी तक्रारकर्त्यास प्लॉट क्रं-6, बॅनर्जी ले आऊट वरील पुष्पम अपार्टमेंट मधील दुस-या मजल्या वरील एफ टाईप या सदनीकेचे ताबापत्र दिनांक-06 ऑक्टोंबर, 1993 रोजीचे दिलेले आहे.
12. प्रकरणातील उपलब्ध पावत्यांच्या प्रतीं वरुन तक्रारकर्ता श्री रमेशकुमार जानकीप्रसाद सोनी यांनी भूखंड आणि त्यावरील सदनीका बांधकाम या संबधाने करारा नुसार संपूर्ण रकमा या फत्तेपुरीया कंस्ट्रक्शन यांचेकडे (जे मूळ जमीन मालक नवेतिया यांचे पॉवर ऑफ अटर्नी होल्डर आहेत आणि बिल्डर सुध्दा आहेत) जमा केल्याचे दिसून येते. आता मूळ जमीन मालकां पैकी श्रीमती संतोषवती माधवप्रसाद नवेतिया यांचा मृत्यू झालेला आहे तसेच बिल्डर श्री प्रदिपकुमार आत्माराम फत्तेपुरीया (तत्कालीन पॉवर ऑफ अटर्नी होल्डर ) यांचा सुध्दा मृत्यू झालेला आहे. अशी स्थिती असली तरी विरुध्दपक्ष क्रं-(1) व क्रं- (2) अनुक्रमे श्री भारतकुमार माधवप्रसाद नवेतिया आणि श्री रुद्रनारायण माधवप्रसाद नवेतिया हे सक्षम न्यायालयात जाऊन आणि तेथे पॉवर ऑफ अटर्नी होल्डर व बिल्डर श्री प्रदिपकुमार आत्माराम फत्तेपुरीया यांचा मृत्यू झाल्याचे तसेच त्यांची आई श्रीमती संतोषवती माधवप्रसाद नवेतिया हिचा सुध्दा मृत्यू झाल्याचे न्यायालयात घोषीत करुन सदनीकेचे विक्रीपत्र तक्रारकर्ता श्री रमेशकुमार जानकीप्रसाद सोनी यांचे नावे करु शकले असते परंतु विक्रीपत्र नोंदवून न दिल्याने तक्रारकर्ता श्री रमेशकुमार यांनी सदरची तक्रार ग्राहक न्यायमंचात दाखल केली परंतु मंचात तक्रार दाखल असताना आता तक्रारकर्ता श्री रमेशकुमार जानकीप्रसाद सोनी यांचा सुध्दा मृत्यू झालेला असल्याने त्यांचे वारसदार यांची नावे तक्रारीमध्ये समाविष्ठ करण्यात आली.
13. महत्वाची बाब म्हणजे मूळ जमीनीचे मालक विरुध्दपक्ष क्रं-(1) व क्रं- (2) अनुक्रमे श्री भारतकुमार माधवप्रसाद नवेतिया आणि श्री रुद्रनारायण माधवप्रसाद नवेतिया हे मंचाची नोटीस प्राप्त झाल्यानंतर मंचा समक्ष उपस्थित झालेले नाहीत व त्यांनी कोणतीही बाजू मंचा समक्ष मांडलेली नाही. तसेच तत्कालीन बिल्डर आणि विरुध्दपक्ष क्रं-(1) व क्रं-(2) यांचे तर्फे पॉवर ऑफ अटर्नी होल्डर श्री प्रदिपकुमार फत्तेपुरीया यांचा मृत्यू झालेला असल्याने त्यांचे मृत्यू पःश्चात पॉवर ऑफ अटर्नी लेख आपोआपच संपुष्ठात आलेला आहे.
14. मयत तक्रारकर्ता स्व.श्री रमेशकुमार जानकीप्रसाद सोनी यांचे वारसदार यांचे जवळ जमीन खरेदी आणि त्यावर सदनीका बांधकाम या संबधाने नोंदणीकृत करार असल्याने व तसेही प्लॉट क्रं-6, बॅनर्जी ले आऊट वरील पुष्पम अपार्टमेंट मधील दुस-या मजल्या वरील एफ टाईप या सदनीकेचे ताबापत्र दिनांक-06 ऑक्टोंबर, 1993 रोजीचे दिलेले असल्यामुळे मृतक श्री रमेशकुमार जानकीप्रसाद सोनी तर्फे त्यांचे कायदेशीर वारसदार हेच त्या मालमत्तेचे मालक आहेत, त्यामुळे त्यांनी योग्य त्या सक्षम न्यायालया समोर जाऊन तेथून कायदेशीररित्या वारसान प्रमाणपत्र मिळवून तसेच नोंदणीकृत भूखंडाचा करार आणि नोंदणीकृत सदनीका बांधकाम कराराच्या प्रती दाखल करुन व योग्य ती वस्तुस्थिती सक्षम न्यायालया समोर जाऊन मालक म्हणून घोषीत करावे व सक्षम न्यायालयातूनच सद्दस्थितीत हयात असलेले मूळ जमीनीचे मालक विरुध्दपक्ष क्रं-(1) व क्रं- (2) अनुक्रमे श्री भारतकुमार माधवप्रसाद नवेतिया आणि श्री रुद्रनारायण माधवप्रसाद नवेतिया यांचे कडून सदनीकेचे नोंदणीकृत विक्रीपत्र करुन मिळावे अशी मागणी सक्षम न्यायालयात जाऊन करावी.
15. या प्रकरणात तक्रारकर्ता श्री रमेशकुमार जानकीप्रसाद सोनी (आता मयत) यांनी भूखंड विक्री नोंदणीकृत करार मूळ जमीनीचे मालक विरुध्दपक्ष क्रं-(1) व क्रं-(2) अनुक्रमे श्री भारतकुमार माधवप्रसाद नवेतिया आणि श्री रुद्रनारायण माधवप्रसाद नवेतिया आणि विरुध्दपक्ष क्रं-(1) आणि विरुध्दपक्ष क्रं-(2) यांची आई स्व.श्रीमती संतोषवती माधवप्रसाद नवेतिया (आता मयत) तर्फे पॉवर ऑफ अटर्नी धारक व बिल्डर श्री प्रदिपकुमार आत्माराम फत्तेपुरीया (सध्या मयत) यांचेशी केलेला आहे आणि भूखंडावर सदनीका बांधकामा बाबतचा स्वतंत्र करार बिल्डर श्री प्रदिपकुमार आत्माराम फत्तेपुरीया (सध्या मयत) यांचेशी केलेला आहे आणि मूळ जमीनीच्या मालकां पैकी एक मालक श्रीमती संतोषवती माधवप्रसाद नवेतिया हिचा सुध्दा मृत्यू झालेला आहे. थोडक्यात भूखंड करार आणि त्यावरील सदनीका करार या करारातील करार करुन देणारे काही पक्षकार हे मयत झालेले असल्याने, तसेच करार करुन घेणारे तक्रारदार श्री रमेशकुमार जानकीप्रसाद सोनी यांचा सुध्दा मृत्यू झालेला असल्याने करार करुन देणा-या उर्वरीत करारधारकां कडून तसेच करार करुन घेणारे तक्रारदार श्री रमेशकुमार सोनी (मयत) यांचे कायदेशीर वारसदारानां करार करुन देणा-या कडून कराराची पुर्तता करण्यासाठीचे अधिकार हे सक्षम न्यायालयालाच आहेत, ते अधिकार ग्राहक मंचास नाहीत, त्यामुळे तक्रारदारांच्या तक्रारीत जरी तथ्य दिसून येत असले तरी जर तक्रारदारांना सदनीकेचे कायदेशीर विक्रीपत्र नोंदवून पाहिजे असेल तर त्यांना सक्षम न्यायालयात जाऊन तेथूनच योग्य कायदेशीर वारसदारांचे प्रमाणपत्र मिळवून व सक्षम न्यायालयातून योग्य ते आदेश प्राप्त करता येऊ शकतील. तक्रारदारांचे हे प्रकरण “Specific performance Act” अंतर्गत येत असून योग्य त्या सक्षम न्यायालयात जाऊन तेथे नोंदणीकृत विक्रीपत्राव्दारे तक्रारदार हे सदनीकेचे नोंदणीकृत विक्रीपत्र नोंदवून घेऊ शकतील, त्या संबधीचे अधिकारक्षेत्र ग्राहक न्यायमंचास येत नाही. तसेही तक्रारदार हे मृतक श्री रमेशकुमार जानकीप्रसाद सोनी यांचे कायदेशीर वारसदार असल्याने व करार हे मृतक श्री रमेशकुमार यांचे बाजूने असल्याने व सदनीकेचा ताबा सुध्दा मृतक श्री रमेशकुमार यांना मिळालेला असल्याने मृतक तक्रारकर्ता श्री रमेशकुमार यांचे वारसदार हेच अविभक्त हिश्श्याने भूखंड आणि त्यावरील सदनीकेचे मालक ठरतात.
16. उपरोक्त नमुद सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन आम्ही तक्रारीत खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत-
::आदेश::
(1) तक्रारकर्ता श्री रमेशकुमार जानकीप्रसाद सोनी (आता मृतक) तर्फे कायदेशीर वारसदार श्रीमती कुसूमलता रमेशकुमार सोनी , सौ.शालिनी अशोक बाबकर आणि कु. संगिता रमेशकुमार सोनी यांची विरुध्दपक्ष क्रं-(1) भारतकुमार माधवप्रसाद नवेतिया आणि विरुध्दपक्ष क्रं-(2) श्री रुद्रनारायण माधवप्रसाद नवेतिया तसेच विरुध्दपक्ष क्रं-(3) मे.फत्तेपुरीया कंस्ट्रक्शन तर्फे कार्यकारी भागीदार यांचे विरुध्दची तक्रार करार करुन देणार आणि करार करुन घेणार यातील काही पक्षकारांचा मृत्यू झालेला असल्याने योग्य ते कायदेशीर वारसदार अभिलेखावर आणून कायदेशीर विक्रीपत्र नोंदवून देण्याचे आदेश देण्याचे अधिकारक्षेत्र ग्राहक मंचास येत नसल्याचे कारणा वरुन तक्रार खारीज करण्यात येते.
(02) तक्रारकर्ता श्री रमेशकुमार जानकीप्रसाद सोनी यांचा मृत्यू झालेला असल्याने तसेच ज्यांचेशी त्यांनी भूखंड खरेदी आणि त्यावरील बांधकाम करार केलेला आहे त्या पॉवर ऑफ अटर्नीधारक आणि बिल्डर श्री प्रदिपकुमार फत्तेपुरीया यांचाही मृत्यू झालेला असल्याने नोंदविलेल्या कराराची पुर्तता होण्यासाठी तक्रारकर्ता श्री रमेशकुमार जानकीप्रसाद सोनी यांचे कायदेशीर वारसदार हे सक्षम न्यायालयात जाऊन तेथून वारसान प्रमाणपत्र प्राप्त करुन भूखंड आणि त्यावरील सदनीकेचे कायदेशीर नोंदणीकृत विक्रीपत्रा संबधाने योग्य तो आदेश प्राप्त करु शकतील.
(03) खर्चा बद्दल कोणतेही आदेश नाहीत.
(4) निकालपत्राच्या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारानां निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.