नि.41 मे.जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,रत्नागिरी यांचेसमोर तक्रार क्रमांक : 168/2009 तक्रार दाखल झाल्याचा दि.24/12/2009 तक्रार निकाली झाल्याचा दि.30/06/2010 श्री.अनिल गोडसे, अध्यक्ष श्रीमती स्मिता देसाई, सदस्या सौ.झोराबी हुमायू जमादार रा.फातिमा अपार्टमेंट, रुम नं.8, पहिला मजला, बाजारपेठ, मच्छिमार्केट जवळ, ता.जि.रत्नागिरी. ... तक्रारदार विरुध्द श्री.बशीर अमिन मुर्तुझा रा.अम्बॅसिडर प्लाझा, पहिला माळा, जुना माळनाका, साईकृपा हॉटेल समोर, ता.जि.रत्नागिरी. ... सामनेवाला तक्रारदारतर्फे : विधिज्ञ श्री.झाडगांवकर सामनेवालेतर्फे : विधिज्ञ श्री.आंबुलकर -: नि का ल प त्र :- प्रस्तुत प्रकरण आज रोजी तक्रारदार व सामनेवाला यांचे दरम्यान तडजोडीसाठी लोकअदालतमध्ये ठेवण्यात आले होते. सदर लोकअदालतीमध्ये तक्रारदार व त्यांचे विधिज्ञ उपस्थित होते तसेच सामनेवाला व त्यांचे विधिज्ञ उपस्थित होते. तक्रारदार व सामनेवाला यांनी त्यांच्यात झालेल्या तडजोडीची पुरशीस लोकअदालत समिती सदस्यांपुढे दाखल केली आहे. ती नि.39 वर दाखल आहे. सदस्यांचा निर्णय नि.40 वर दाखल आहे. सदर तडजोड पुरशीसमध्ये पुढील बाबी अंतर्भूत करणेत आल्या आहेत. 1. प्रस्तुत तक्रारदार व सामनेवाला यांची याकामी तडजोड झाली आहे. 2. दि.20/2/2006 चे करार पत्राप्रमाणे सर्व कामे करुन सामनेवाला याने तक्रारदार यांना आज रोजी सदनिकेचा ताबा दिला आहे. तक्रारदार याने तो आज रोजी स्विकारला आहे. 3. तक्रारदार याने भाडयाची रक्कम मागणीचा आपला तक्रारीतील हक्क सोडून दिला आहे. 4. तक्रारदाराने मागणी केलेल्या व्याज रकमेबाबत तक्रारदार व सामनेवाला यांचेत सन्माननीय तडजोड झाली असून त्या तडजोडीपोटी रक्कम रु.46,000/- सामनेवाला यांनी तक्रारदार यांना आजपासून 15 दिवसात देणेचे निश्चित झाले आहे. 5. भाडयाची रक्कम व व्याजाची रक्कम यावरील पुढील व्याजाची मागणी तक्रारदार यांनी सोडून दिली आहे. 6. तक्रारीचे कलम “इ” ची मागणी तक्रारदाराने सोडून दिली आहे. 7. तक्रारदार यांनी सामनेवाला यांना मोबदल्याची रक्कम रु.1,02,900/- अद्यापी देणे बाकी आहे ती रक्कम तक्रारदार याने सामनेवाला यांना 15 दिवसांत दिल्यानंतर पुढील 15 दिवसांत सामनेवाला याने तक्रारदार यांना आर्किटेक्टचे दाखल्यासह खरेदी खत करुन देणेचे आहे. खरेदी खताचा सर्व खर्च तक्रारदार याने करावयाचा आहे. 8. सदर इमारतीकरीता रत्नागिरी नगर-परिषदेकडून रहिवाशी वापर दाखला मिळाल्यानंतर सामनेवाला यांनी तक्रारदार यांचे नावे लाईट मीटर कनेक्शन जोडून देणेची कार्यवाही करावयाची आहे. त्याकामीची रक्कम रु.12,000/- तक्रारदारकडून सामनेवाला यांना दि.18/8/2006 रोजी अलाहिदा पोहोच झालेली आहे. 9. दि.20/9/2006 चे तक्रारदार व सामनेवाला यांचेमधील खरेदीचे कराराप्रमाणे जमीनीखालील व वरील पाण्याच्या टाक्यांची सोय होईपर्यंत तक्रारदार यांना सदनिकेचा वापर करताना पाणी पुरवठयाची दरम्यानची सोय करणेचे सामनेवाला यांनी कबूल केले आहे. पाणी पुरवठयाचा भागशः खर्च तक्रारदार यांनी येणा-या प्रत्येक बिलातून सामनेवाला यांना द्यावयाचा आहे. याप्रमाणे तक्रारदार व सामनेवाला यांची संयुक्त पुरशीस आहे. त्याप्रमाणे तक्रार निकाली व्हावी. सदर पुरशीसच्या अनुषंगाने प्रस्तुत प्रकरण निकाली करणेत येत आहे व खालीलप्रमाणे आदेश पारीत करणेत येतो. आदेश सदर नि.39 वरील तडजोड पुरशीसमध्ये नमूद केल्याप्रमाणे प्रस्तुतचा तक्रार अर्ज निकाली करणेत येत आहे. रत्नागिरी दिनांक : 30/06/2010. (अनिल गोडसे) अध्यक्ष, ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, रत्नागिरी जिल्हा. (स्मिता देसाई) सदस्या, ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, रत्नागिरी जिल्हा. प्रत : तक्रारदार यांना हातपोच/रजि.पोस्टाने प्रत : सामनेवाले यांना हातपोच/रजि.पोस्टाने |