ग्राहक तक्रार क्रमांकः-544/2008 तक्रार दाखल दिनांकः-04/12/2008 निकाल तारीखः-31/05/2010 कालावधीः-01वर्ष05महिने27दिवस समक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे श्रीमती.मनोरमा देविदास बासुतकर बी/107,प्रविण पॅलेस को.ऑ.हौ.सो.लि., नवघर फाटक रोड,गोडदेव,अश्विनी हॉस्पीटलसमोर, भाईंदर(पू)जि.ठाणे.401 105 ...तक्रारकर्ता विरुध्द श्री.अनंतराव शंकर जाधव. आम्रपाली एन्टंरप्रायझेस-बिल्डर्स अँन्ड डेव्हलपर्स, जय साई कॉम्प्लेक्स I, नर्मदा कृपा को.ऑ.सो., साईबाबा मंदीर मागे, गोडदेव गांव, भाईंदर(पू)जि.ठाणे. 401 105 ...वि.प.
उपस्थितीः-तक्रारकर्त्यातर्फे वकीलः-श्री.जी.एफ.शिर्के विरुध्दपक्षातर्फे वकीलः-श्रीमती पूनम व्ही.माखीजानी. गणपूर्तीः- 1.सौ.शशिकला श.पाटील, मा.अध्यक्षा 2.श्री.पां.ना.शिरसाट, मा.सदस्य -निकालपत्र - (पारित दिनांक-31/05/2010) सौ.शशिकला श.पाटील, मा.अध्यक्षा यांचेद्वारे आदेशः- 1)तक्रारकर्ता यांनी सदर तक्रार विरुध्दपक्ष यांचे विरुध्द दिनांक 04/12/2008 रोजी नि.1 प्रमाणे दाखल केली आहे.त्याचे थोडक्यात कथन पुढील प्रमाणेः- तक्रारदार यांच्या उदर्निवाहाकरिता छोटा व्यवसाय सुरु करणेकरीता दुकान गाळयाची आवश्यकता होती. म्हणून विरुध्दपक्षकार यांचेकडे दुकान गाळा घेण्याचे तोंडी ठरवून दिनांक 24/03/2007 रोजी 5001/- रुपये 2)दिनांक04/04/2007 रोजी रु.45,000/- 3)दि.25/05/2007 रोजी रु.25,000/- चेकव्दारे 1351506/- 4)दि.25/05/2007 रोजी चेक 351507 रु.25,000/- असे 1,00,000/- दिले. गाळा तयार व रिकामा होता. तरीही 2/- विरुध्दपक्षकार यांनी ताबा देण्याचे नाकारले. अनेक वेळा विनंती मागणी केली. पण दखल न घेतलेने अखेर वकील श्री.पी.व्ही.हिंगोराणी यांचे मार्फत दि.08/09/2007 रोजी कायदेशीर नोटीस पाठविली. त्यांचे उत्तर 18/10/2007 रोजी दिले. पण त्याप्रमाणे पुर्तता केलेली नाही. म्हणून पुन्हा दिनांक15/12/2007 रोजी विरुध्दपक्षकार यांचे वकीलांना पत्र पाठविले. 26/12/2007 रोजी नोटीस पोहचलेली पोहच पावती दाखल पुराव्याकरींता केली आहे. पण दुकानगाळा ताबा कायदेशीररित्या दिला नाही. त्यामुळे तक्रारदार यांना अपरिमित असे कधीही भरुन न येण्यासारखे नुकसान झालेले आहे. विरुध्दपक्षकार यांनी मोठी रक्कम मिळवण्याचे उद्देशाने दुकान गाळा ताबा दिलेला नाही ही सेवेत त्रुटी, निष्काळजीपणा व हलगर्जीपणा आहे. म्हणून तक्रारदार यांनी सदर तक्रार अर्ज दाखल केलेला आहे व विनंती केली आहे की,1)विरुध्दपक्षकार यांनी सेवेत त्रुटी, निष्काळजीपणा केलेला आहे हे घोषित करावे.2)विरुध्दपक्षकार यांनी स्विकारलेली दुकान गाळयाची रक्कम रुपये 1,00,000/- 18टक्के व्याज दराने व्याजासह रक्कम स्विकारलेपासून रक्कम दयावी.3)1,00,000/-रुपये नुकसान भरपाई दयावी.4)अर्जाचा खर्च व इतर अनुशंगीक दाद मिळावी अशी मागणी केली आहे. 2)विरुध्दपक्षकार यांना मंचामार्फत नोटीस मिळाल्याने मंचात उपस्थित राहून दिनांक14/12/2009 रोजी लेखी जबाब दाखल केला आहे त्याचे थोडक्यात कथन पुढील प्रमाणे. तक्रारदार यांची तक्रार खोटी, चुकीची व दिशाभुल करणारी असल्याने विरुध्दपक्षकार यांना मान्य व कबुल नसल्याने याच मुद्दयावर नामंजूर करणेत यावी. याशिवाय प्राथमिक मुद्दा उपस्थित करुन म्हणणे स्पष्ट केलेले आहे की, तक्रार मुद्दाम त्रास देणेचे उद्देशाने दाखल केलेली आहे. प्रतिज्ञालेखावरच तक्रारीचे निर्णय केले जातात, तक्रारदार यांनी अनेक बाबी मंचापासून लपवून ठेवलेल्या आहेत. ग्राहक ठरत नसल्याने मंचात तक्रार अर्ज चालविण्याचा अधिकार नाही असे प्राथमिक मुद्दयावर आक्षेप घेतलेले आहेत, मुदत बाहय तक्रार आहे. विरुध्दपक्षकार यांचा जागा विकसित करणे व त्यावर रहाण्यास व व्यवसायाकरींता बांधकाम करुन देण्याची योजना हाती घेतात. तक्रारदार यांनी दुकान गाळा नं.4,तळमजला यासाठी 1,00,000/- रुपये रक्कम दिली आहे. परंतु ती रक्कम दिल्यानंतर त्यावेळेपासून आजतागायत उभयतांत अंतिम करारपत्र ठरवण्यासाठी, पंजीकृत करण्यासाठी आलेलेच नाहीत. त्यामुळे करारपत्र व रक्कम ठरवण्यात आलेली नाहीत. तक्रारदार यांनी कोणताही पुरावा मंचापुढे सादर केलेला नाही. तक्रारदार यांनीच रक्कम न दिल्याने थकबाकीदार 3/- आहेत. बांधकाम अंतिम टप्प्यावर असतांना म्युनसिपल कोर्पोरेशन यांनी वाद निर्माण झालेने बांधकाम वेळेत दुकानगाळे पाडल्याने तक्रारदार यांना शांततामयरित्या ताबा देता आलेला नाही. म्हणून तक्रारदार यांनी विरुध्दपक्षकार यांचेकडे मोठया रकमेची मागणी केली. म्हणून तडजोड नाही. म्हणून सदर तक्रार अर्ज खोटा, चुकीचा असल्याने कलम 26नुसार कारवाई व्हावी असे नमुद केलेले आहे. 3)तक्रारदार यांनी दाखल केलेला अर्ज, विरुध्दपक्षकार यांचा लेखी जबाब, उभयतांची कागदपत्रे,प्रतिज्ञालेख,रिजॉईंडर, लेखी युक्तीवाद यांची सुक्ष्मरित्या पडताळणी व अवलोकन केलेअसता पुढील मुद्दे उपस्थित झाले व कारण मिमांसा देऊन आदेश पारीत करणेत आले. 3.1)सदर तक्रार अर्जातील तक्रारदार यांचे नमुद कथन, मजकुराप्रमाणे दखल घेतली असता उभय पक्षकार यांचेमध्ये दुकानगाळा घेणेबाबत व्यवहार झालेला होता हे उभय पक्षकार यांना मान्य व कबुल आहे. तथापी नेमक्या दुकान गाळा नं.4 साठी किती रक्कम मोबदला देवून करार अथवा व्यवहार पुर्ण करणेचा होता हे मंचासमोर उभय पक्षकारांनी मंचासमोर सिध्द केलेले नाही.उभयतांत तोंडी व्यवहार झालयाचे स्पष्ट होते व त्यावरुन नेमका कोणत्या रकमेला दुकानगाळा घेण्याचा व देण्याचे ठरलेले होते हे मंचापुढे सबळ कागदोपत्री पुराव्यावरुन सिध्द झालेले नाही. म्हणून मंचानेही उभयतांवर पुर्णपणे विसंबुन रहाता येणार नाही.लेखी करार नसल्याने कराराचा भंग तक्रारदार यांनी केला आहे हे मान्य व गृहीत धरता येणार नाही म्हणून गृहीत धरणेत आलेले नाही. 3.2)उभय पक्षकार यांनी नेमका किती रकमेचा दुकान गाळा नं.4 हा होता हे मंचापुढे सिध्द करीत नसल्याने तक्रारकर्ता यांनी विरुध्दपक्षकार यांना रुपये1,00,000/- दिलेली रक्कम ही दुकानगाळयाची पुर्ण रक्कम म्हणून दिलेली होती व विरुध्दपक्षकार यांनी ती स्विकारली होती व आहे हे मंच मान्य व गृहीत धरु शकत नाही. 3.3)तथापी तक्रारदार यांचेकरीता विरुध्दपक्षकार यांनी दुकान गाळा नं.4 हा खरेदी देण्यासाठी रक्कम रुपये 1,00,000/- दि.23/03/2007ते 25/05/2007 रोजी पर्यंत वेळोवेळी स्विकारलेली होती व स्विकारलेली रकमेच्या पावत्याही दिलेल्या आहेत. त्या पावतीवरही Full Amount or Part Payment यातील कोणतांच मजकुर मान्य केलेला नसल्याने तक्रारदार यांनी दिलेले 1,00,000/- रुपये ही गाळयाची पुर्ण रक्कम दिली होती व आहे हे मान्य व गृहीत धरता येणार नाही. तथापी उभयतांना झाला व्यवहार व रक्कम 4/- मान्य केलेली असल्याने पुढील आदेश पारित करणेत आलेले आहेत. विरुध्दपक्षकार यांचे कार्पोरेशन बरोबर वाद निर्माण झाल्याने दुकान गाळेच पाडण्यात आलेले आहेत हे विरुध्दपक्षकार यांनी प्रतिज्ञालेखावर मान्य व कबुल केलेले असल्याने दुकानगाळा नं.4 यांचा ताबा मिळू शकत नाही हे सिध्द झालेने विरुध्दपक्षकार यांनी तक्रारदार यांना ठरल्या वेळेत दुकानगाळा देवू शकत नाहीत व पुढेही देवू शकत नाहीत हे सिध्द होते.विरुध्दपक्षकार यांनी खरेदी करार करुन देण्याची प्राथमिक जबाबदारी व कर्तव्य होते पण ते जाणून बुजून दिलेले नाही हे ही पुराव्यानिशी सिध्द होते, अपुर्ण व्यवहार ठेवणे ही सुध्दा सेवेत त्रुटी,निष्काळजीपणा व हलगर्जीपणा आहे. म्हणून सदर तक्रारदार यांचा अर्ज हा पुर्णपणे खोटा, चुकीचा व दिशाभुल करणारा होता व आहे हे सिध्द झालेले नाही. म्हणून उभय पक्षकार यांनी आदेशांचे पालन करणे न्यायोचित, विधीयुक्त व संयुक्तीक आहे. म्हणून आदेश. -आदेश - 1)तक्रारदार यांचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात आला आहे. 2)विरुध्दपक्षकार यांनी तक्रारदार यांचेकडून स्विकारलेली रक्कम रुपये 1,00,000/-(रु.एक लाख फक्त) त्वरीत परत करावी. 3)अशामुळे व्यवसाचे नुकसान झालेले होते व आहे हे मान्य व गृहीत धरणे न्यायोचित, विधीयुक्त व संयुक्तीक आहे. म्हणुन विरुध्दपक्षकार यांनी 1,00,000/-(रुपये एक लाख फक्त) रुपये द.सा.द.शे.9टक्के व्याज दरांने आकारणी करुन रक्कम फिटेपर्यंत दयावी. 4)मानसिक, शारिरीक त्रासाकरीता रुपये 20,000/-(रु.वीस हजार फक्त)दयावे. 5)सदर अर्जाचा खर्च रुपये5,000/-(रु.पाच हजार फक्त)दयावे. 6)सदर आदेशाची प्रत उभय पक्षकारांना निःशुल्क देण्यात यावी. 6)तक्रारदार यांनी मा.सदस्यांकरीता तक्रार दाखल केलेल्या दोन प्रती (फाईल)त्वरीत परत घेऊन जाव्यात. अन्यथा मंच जबाबदार राहणार नाही. म्हणून केले आदेश. दिनांकः-31/05/2010 ठिकाणः-ठाणे (श्री.पां.ना.शिरसाट) (सौ.शशिकला श.पाटील) सदस्य अध्यक्षा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे |