निकालपत्रः- श्री.वि.गं.जोशी, सदस्य ठिकाणः बांद्रा *-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*- :::::निकालपत्र ::::: तक्रारीचे संक्षिप्त स्वरुप खालीलप्रमाणे: तक्रारदारांनी सामनेवाला यांच्या विरार येथे नियोजित जे.पी. नगर या प्रकल्पात 450 चौ.फुटाची सदनिका राखून ठेवण्यासाठी सन-1986 ते जून 1997 पर्यंत रक्कम रु.72,951/- विविध हप्त्याने भरले आहेत. परंतु आजतागायत तक्रारदारांना सामनेवाला यांचेकडून सदनिकेचा ताबा व मालकी मिळालेली नाही. त्याचप्रमाणे, वेळोवेळी पत्रव्यवहार करुनही भरलेली रक्कमसुध्दा परत मिळालेली नाही. 2 तक्रारदारांनी तक्रार अर्जासोबत तक्रारीची पुरक अशी कागदपत्रे, पुरावा म्हणून दाखल केली आहेत तसेच पुराव्याचे शपथपत्रसुध्दा दाखल केले आहे. सामनेवाला हे नोटीस व तक्रारीची प्रत मिळूनसुध्दा ग्राहक मंचासमोर हजर राहिलेले नाहीत, त्यामुळे सामनेवाला यांचे विरुध्द प्रकरण कलम-13(2)(ii) व्दारे एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला. तक्रारदारांनी आपल्यांच्या प्रित्यर्थ दाव्याचे शपथपत्र दाखल केले आहे, त्यातील कथने तक्रारीशी सुसंगत आहेत. 1 तक्रारदाराने मूळ रक्कम रु.72,951/- वर 21% प्रमाणे सरळव्याजाची मागणी केली आहे. 2 नुकसान भरपाईची रक्कम रु.75,000/- व रक्कम रु.7,000/- अर्जाच्या खर्चाची मागणी केली आहे. 3 तक्रार अर्ज व त्यासोबत जोडण्यात आलेली अनुषांगिक कागदपत्रे, शपथपत्र, रक्कम भरल्याच्या पावत्या व नियोजित सदनिकेचा आराखडा याची पाहणी व अवलोकन करुन तसेच तक्रारदाराचा युक्तीवाद ऐकल्यानंतर निकालाकरिता खालील मुद्दे उपस्थित होतात. क्र. | मुद्दे | उत्तरे | 1 | तक्रार कायदयानुसार मुदतबाहय झाली आहे काय ? | नाही | 2 | सामनेवाला यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला आहे काय ? | होय | 3 | तक्रारदारांनी भरलेल्या मूळ रक्कमेवर व्याज मिळण्यास पात्र आहेत काय ? | होय, द.सा.द.शे.9% दराने | 4 | तक्रारदार हे सामनेवाला यांचेकडून नुकसान भरपाई व तक्रार अर्जाचा खर्च मिळण्यास पात्र आहेत का ? | होय, नुकसान भरपाईपोटी रक्कम रु.2,000/- व अर्जाचा खर्च रक्कम रु.1,000/- मिळण्यास पात्र आहेत. | 5 | आदेश ? | तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो. |
कारणमिमांसाः- 4 सामनेवाला यांनी महाराष्ट्र ओनरशिप ऑफ प्लॅटस् ऍक्टस्, 1963 या कायदयाचे उल्लंघन केले असल्यामुळे सदरची तक्रार मुदतबाहय ठरत नाही. 5 सामनेवाला यांनी तक्रारदारांकडून सदनिका मालकी हक्काने राखून ठेवण्यास बरीच रक्कम देऊनसुध्दा सदर सदनिकेचे बांधकाम केलेले नाही. यावरुन, येथे एक गोष्ट निर्विवाद स्पष्ट होते कि, सामनेवाला यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेला आहे. त्याचप्रमाणे, सामनेवाला यांनी नोटीस मिळूनसुध्दा मंचासमोर हजर राहून तक्रारदारांनी केलेले आरोप नाकारलेले नाही. 6 तक्रारदारांनी सदनिकेचे पैसे भरल्यानंतर ब-याच कालावधी लोटला आहे. त्यामुळे तक्रारदारांना बराच मानसिक त्रास झाला असावा, असे म्हणता येईल, म्हणून तक्रारदारांची नुकसान भरपाईची विनंती ग्राहय धरली असून त्यांना रक्कम रु.2,000/- नुकसान भरपाईपोटी मिळावे आणि त्याच बरोबर, या तक्रार अर्जाचा खर्च रक्कम रु.1,000/- मंजूर करीत आहोत. 7 तक्रारदारांनी तक्रार सिध्द करण्याच्या कामी आपले शपथपत्र दाखल केलेले आहे, त्या शपथपत्रांसोबत तक्रारदारांनी सामनेवाला यांना दिलेल्या रक्कमेच्या पावत्या जोडलेल्या आहेत तसेच शपथपत्रांसोबत जोडलेले विवरणपत्र हे प्रस्तुत आदेशाचा भाग समजण्यात यावा. व्याजाची आकारणी द.सा.द.शे.9% दराने तक्रारदारांनी सामनेवाला यांना दिलेली रक्कम ही विविध हप्त्यात दिली असली तरी त्यावर व्याज आकारणीसाठी दि.01.01.1990 हि तारीख आधारभूत मानण्यात येऊन त्यावर द.सा.द.शे.9% दर आकारण्यात यावा. तक्रारदारांनी प्रतिज्ञापत्रांसहित केलेली तक्रार खरी आहे आणि सिध्द झाली आहे असे गृहीत धरुन तक्रारदारांच्या मागण्या मान्य करण्यात येत आहेत. उक्त विवेचन लक्षात घेता, या प्रकरणी खालीलप्रमाणे आदेश देण्यात येत आहेत. आदेश 1 तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो. 2 सामनेवाला यांनी तक्रारदारांना सदनिकेपोटी भरलेली पूर्ण रक्कम रु.72,951/- परत करावी. 3 तक्रारदारांनी तक्रार सिध्द करण्याच्या कामी आपले शपथपत्र दाखल केलेले आहे, त्या शपथपत्रांसह सामनेवाला यांना दिलेल्या रक्कमा व या रक्कमेच्या पावत्याही सोबत जोडलेल्या आहेत तसेच दाव्याचे शपथपत्र जोडलेले आहे, हे प्रस्तुत आदेशाचा भाग समजण्यात यावा. व्याजाची आकारणी द.सा.द.शे.9% दराने तक्रारदारांनी सामनेवाला यांना दिलेल्या रक्कमेवरच्या व्याजासाठी दि.01.01.1990 हि तारीख आधारभूत मानण्यात येऊन एकूण रक्कमेवर द.सा.द.शे.9% दराने व्याज आकारण्यात यावे व व्याजाची आकारणी संपूर्ण रक्कम परत केलेल्या दिवसांपर्यंत आकारली जावी. 4 सामनेवाला यांनी तक्रारदारांना मानसिक त्रास व कुंचंबना त्याबद्दल नुकसान भरपाईपोटी रक्कम रु.2,000/- व अर्जाचा खर्च रक्कम रु.1,000/- दयावी. 5 वरील रक्कम सामनेवाला यांनी हा आदेश मिळाल्यापासून आठ आठवडयाच्या आत तक्रारदारांना द्यावी. 6 आदेशाच्या प्रमाणिंत प्रतीं दोन्हीं पक्षकारांना विनामुल्य देण्यात याव्यात.
| [HONABLE MRS. Mrs.DEEPA BIDNURKAR] Member[HONABLE MR. Mr. J. L. Deshpande] PRESIDENT[HONABLE MR. MR.V.G.JOSHI] Member | |