जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे यांचे समोर दरखास्त क्र. 03/2011(12/2008)
न्यु त्रिमुर्ती को.ऑप.हौसिंग सोसायटी लि., तर्फे सेक्रेटरी,सोपारा,उमराले रोड, नालासोपारा(प)ता.वसई जि.ठाणे. ...तक्रारकर्ता /अजदार विरुध्द 1)पार्टनर श्री.मोहम्मद अमिन आलमगिर डायर मेसर्स.चावरे असोसिएट.डॉ.दत्तराम समेळ मार्ग, नालासोपारा,ता.वसई जि.ठाणे.401 203 (मयत) तर्फे वारसदार (अ)श्रीमती बेबीझरा ए.डायर (ब)श्री.अन्ना ए.डायर (क)श्री.अलमगिर ए डायर (ड)श्री.मूचू ए.डायर सर्व राहणार-शकर मोहल्ला, डॉ.दत्ताराम समेळ मार्ग, नालासोपारा.ता.वसई, जि.ठाणे.401 203 2)पार्टनर श्री.गुफरान शिकंदर चावरे मेसर्स.डॉ.दत्ताराम समेळ मार्ग, नाला सोपारा.ता.वसई जि.ठाणे.401 203 ...विरुध्दपक्ष /गैरअर्जदार
समक्ष - श्री.एम.जी.रहाटगावकर - मा. अध्यक्ष श्रीमती. ज्योती अय्यर - मा. सदस्या उपस्थिती - अर्जदार हजर आदेश (दिः 22/02/2011 ) द्वारा श्री.एम.जी.रहाटगावकर - मा.अध्यक्ष 1. तक्रार क्र.12/2008 यात मंचाने दि.20/06/2009 रोजी पारित केलेल्या आदेशासंदर्भात सदर प्रकरण दाखल करण्यात आले. दि.07/02/2011 रोजी अर्जदारांनी पुरसीस दाखल केली व नमुद केले की, त्यांना गैरअर्जदारांकडुन वसुल करावयाची रक्कम 02/01/2011 रोजी मिळालेली आहे. त्यामुळे त्यांना कलम 25 खाली दाखल केलेले सदर प्रकरण मागे घेण्याची परवानगी द्यावी मात्र विरुध्द पक्षानी आदेशाच्या इतर भागाचे पालन अद्यापही केले नसल्याने कलम 27 अन्वये अर्ज दाखल करण्याची परवानगी देण्यात यावी. .... 2 .... (दरखास्त क्र. 03/2011(12/2008)) 2. सबब अंतीम आदेश पारित करण्यात येते की- आदेश 1.आदेशान्वीत रक्कम गैरअर्जदारांकडुन अर्जदाराला प्राप्त झाल्याने सदर अर्जाचे कोणतेही प्रयोजन नसल्याने सदर अर्ज मागे घेण्याची परवानगी अर्जदारांना देण्यात येते. 2.आदेशाच्या राहिलेल्या इतर भागासंदर्भात अर्जदार कलम 27अन्वये स्वतंत्र अर्ज दाखल करण्यास पात्र राहिल. 3.न्यायिक खर्चाचे वहन उभयपक्षांनी स्वतः करावे.
दिनांक – 22/02/2011 ठिकाण - ठाणे
(ज्योती अय्यर) (एम.जी.रहाटगावकर ) सदस्या अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे
| [HONABLE MRS. Jyoti Iyyer] MEMBER[HONABLE MR. M.G. RAHATGAONKAR] PRESIDENT | |