तक्रार क्रमांक – 559/2007 तक्रार दाखल दिनांक – 28/11 /2007 निकालपञ दिनांक – 30/08/2008 कालावधी - 00 वर्ष 09 महिने 02 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे सौ. अर्चना मनोज कोळी बी/5, 604, ग्रीन एकर, फेज 2, विजयनगरी समोर, जी.बी.रोड, वाघबीळ , जिल्हा - ठाणे.(प) 400 607 .. तक्रारदार
विरूध्द
1. मोटारोला इंडिया प्रा. लि., रजि. ऑफिस, मोटारोला , एक्सलन्स सेंटर, 415/2, मेहरोली गुडगाव रोड, गुडगांव 122001 2. पिलव कन्सलटंट , इंडिया प्रा. लि 06, चौबळ हाऊस वीर सावरकर रोड, टेभीनाका , ठाणे (प) 400 601. .. सामनेवाला समक्ष - सौ. शशिकला श. पाटील - अध्यक्षा श्री. पी. एन. शिरसाट - सदस्य उपस्थितीः- त.क स्वतः वि.प एकतर्फा आदेश (पारित दिः 30/08/2008) मा. श्री. पी. एन. शिरसाट – सदस्य यांचे आदेशानुसार 1. ग्राहक वाद संक्षिप्त स्वरूपात खालीलप्रमाणेः- तक्रारदार सौ. अर्चाना म. कोळी यांनी तक्रार विरूध्द पक्षाविरूध्द दाखल केली असुन त्यांचे तक्रारीचे स्वरूप नमुद केले आहे ते येणेप्रमाणे. तक्रारदाराने मोटोरोला एल सेव्हन कंपनीचा मोबाईल विरूध्द पक्षकार नं. 2 यांचेकडून दिनांक 21/12/2006 नकद रक्कम रु. 7,100/- देऊन खरेदी केला. मोबाईलचा मॉडेल क्रमांक मोटोरोला एल सेव्हन .. 2 .. IMEI/SR No. 359195009521563 & MSN No. 19W G Q 5V64. मोबाईल खरेदी केल्यानंतर 6 महिन्यात त्यांच्या स्पीकरमध्ये बिघाड झाला. तक्रार नोंदविली. दिनांक 06/07/2007 Key pad उपलब्ध नाही म्हणुन 3 दिवसांनी बोलाविले. तेव्हाही मोबाईल दुरूस्त केला नाही. तक्रारदाराच्या पतिने विरूध्दपक्षकाराला दमदाटी केल्यामुळे जुन्या फोनचा कि पॅड लावून दिला. परंतु 15 दिवसांनी मोबाईल बिघडला त्यामुळे दिनांक 25/08/2007 रोजी दुरुस्त करण्यासाठी त्यांचे कडे जमा केला. दिनांक 03/09/2007 दुसराच कुठलातरी कि पॅड घालून दिला. परंतु परत पूर्ण हँडसेट गरम व्हायला लागला व बॅटरी 20 मिनिटात डिसचार्ज होऊ लागली. अशा प्रकारे त्यांच्या कार्यालर्यातील कर्मचा-याकडे व अधिका-याकडे तक्रार करुनही त्यांच्या मोबाईल चांगल्या स्थितीमध्ये दुरूस्त न केल्यामुळे विरूध्द पक्षकारांनी सेवेमध्ये हलगर्जीपणा केला व त्यामुळे तक्रारदाराचे आर्थिक, शारिरीक व मानसिक नुकसान झाले सबब तक्रारदाराने सदरहु तक्रार या मंचात दाखल केली असुन नुकसान भरपाई मिळावी म्हणुन खालील प्रमाणे प्रार्थना केली आहे. ती येणे प्रमाणे 1. मोबाईलची मुळ रक्कम रु.7,100/- परत मिळावी व त्यावर 12% दराने व्याज रुपये 639/- द्यावे. 2. मानसिक नुकसानीपोटी रु. 3,00,000/- द्यावे. 3. तक्रारीचा खर्च रु. 1,000/- मिळावा.
2. वरील तक्रारीसंबंधी विरूध्द पक्षकाराने निशाणी 6 वर त्यांचा लेखी जबाब सादर केला. त्यांनी त्यामध्ये कबुल केले की दि. 06/07/2008 रोजी तक्रारदाराचे मोबाईलचे upper key not working या कारणासाठी त्यांचे कडे आणले असुन ग्राहक तक्रार क्र. TN/MO/07/03375 नुसार त्याच दिवशी दुरूस्त करून दिले. तसेच दि. 25/08/2007 रोजी पुन्हा Handset Dead (not powering on) या कारणासाठी .. 3 .. आम्हाला तेव्हाही विरुध्द पक्षकाराने ग्राहक तक्रार क्र. TN/MO/07/03375नुसार दुरूस्त करुन दिला. पुन्हा हँडसेट मध्ये Heating Problem निर्माण झाला दिनांक 05/09/2007 तेव्हाही विरूध्द पक्षकाराने मोबाईलमधील दोष दुरूस्त करून दिला. सरतेशेवटी मोटोरोला एल सेव्हन बदलुन देण्यासाठी तक्रारदाराचे पती श्री. मनोज कोळी यांना दिनांक 05/10/2007 संपर्क साधला असता तक्रारदार त्यांचे घरी उपलब्ध होऊ शकले नाही. दिनांक 08/10/2007 रोजी विरूध्द पक्षकारांने श्री. मनोज कोळी वैयक्तीक संपर्क साधला असता त्यांनी विरूध्द पक्ष्काराची Handset Replacement ची विनंती स्विकारली नाही.
3. सदरहु तक्रारीसंबंधी एकमेव मुद्दा उपस्थीत होतो तो असा कीः तक्रारादार म्हणतात त्याप्रमाणे विरूध्द पक्षकाराने सेवेमध्ये त्रृटी किंवा बेजबाबदारपणा दाखविला आहे काय? उत्तर - होय
4. वरील प्रश्नाचे स्पष्टीकरण खालीलप्रमाणेः- तक्रारदाराने विरूध्दपक्षकार कडुन रू. 7100/- देऊन मोटोरोला एल सेव्हन IMEI/SR No. 359195009521563 & MSN No. 19W G Q 5V64. त्या वस्तुमध्ये Warranty Period ची मर्यादा सुरू असतांना अनेक वेळा बिघाड झाला व तो बिघाड विरूध्द पक्षकाराने वेळोवेळी दुरुस्तही करून दिला. परंतु अनेक वेळा दुरुस्ती करुनही वस्तु मध्ये दोष अद्यापही शिल्लक आहे व तो दोष पुर्णतः दुरूस्त करणे हे विरुध्द पक्षकाराचे कर्तव्य आहे. कारण 'ग्राहक हा राजा' हि संकल्पना प्रस्तुत कायद्याने ग्राहय मानली आहे. तसेच विरुध्द पक्षकाराने आपले लेखी जबाबाचे प्रतिज्ञापत्रही सादर केले नाही त्यामुळे त्यांनी केलेले कथन किंवा पुरावा ग्राहय मानता येणार नाही. मोबाईमधील दोषांची तक्रारदाराने .. 4 .. लेखी आणि तोंडी तक्रारी दाखल केल्या त्यांचे संपूर्ण निरसन अथवा पुर्तता विरूध्द पक्षकाराने केली नाही. मोबाईलच्या उत्पादनातील दोष होते किंवा आहेत असे मंचास ठरविता येईल काय ? उत्तर – नकारार्थीच सदर तक्रारीमध्ये तक्रारदाराने त्यांचे प्रत्युत्तर निशाणी 7 वर दाखल केले तसेच पुरावा व प्रतिज्ञापत्र निशाणी 8 वर सादर केले प्रतिज्ञापत्रावर सक्षम अधिका-याची सही नसल्यामुळे तो पुरावा म्हणुन ग्राहय धरता येणार नाही. तसेच विरूध्द पक्षकाराने आपले लेखी जबाब हाच लेखी युक्तीवाद म्हणुन समजावा असे प्रतिपादन केले. विरूध्द पक्षानेही प्रतिज्ञापत्रे सादर केली नाहीत वास्तविकरित्या तक्रारकर्ता हे जेव्हा मोबाईलमध्ये दोष आहे व नविन वस्तुची जेव्हा मागणी करतात तेव्हा प्राथमीकरित्या त्या बाबत सबळ पुरावा तज्ञाच्या अहवालासह दाखल करणे न्यायोचीत, विधीयुक्त व संयुक्तीक होते. परंतु उभय पक्षकारानी तशी तसदी घेतलेली दिसुन येत नाही. तसेच तक्रारकर्तांनी खरेदी केल्यापासून मोबाईल सतत 6 महिने वापरलेला असल्याने मोबाईलमध्ये प्रथमपासून उत्पादनातील दोष होते हे सिध्द होत नाही. म्हणु मानसिक, शारिरीक त्रास व आर्थिक नुकसानी बाबत व खरेदी रक्कम परत व्याजासह कोणतेही आदेश करणेत आले नाहीत. तथापी तक्रारदाराने दाखल केलेल्या लेखी व तोंडी तक्रारीची दखल विरूध्द पक्षकाराने घेऊनही वस्तुमधील दोष समुळ नष्ट झाला नाही या एकाच मुद्दावर दोषी ठरतात म्हणुन विरूध्द पक्षकाराची मोबाईल मधील दोष समाधानकारकरित्या काढून देण्याची जबाबदारी Warranty Period मध्ये विरूध्द पक्षकाराची होती व आहे पण ती त्यांनी योग्यरित्या पार पाडली नाही म्हणुन हे मंच खालील आदेश्ा पारित करित आहे. अंतीम आदेश तक्रार क्रमांक 559/2007 हि अंशतः मंजूर करण्यात येते.
.. 5 .. विरुध्द पक्ष न. 1 व 2 यांनी तक्रारकर्त्यांची मोबाईल चांगल्या स्थितीत दुरूस्त करुन द्यावा. अशा दुरूस्तीचा खर्च हा विरूध्द पक्ष न. 1 व 2 यांनी वैयक्तीकरित्या अथवा संयुक्तीकरित्या कराव्याचा आहे. उभयपक्षकारांनी आपआपला खर्च सोसावा. वरील हुकुमाची तामिली 30 दिवसाचे आत परस्पररित्या करावी. अन्यथा तशी दरखास्त दाखल झाल्यास त्यामध्ये दंड व कारवाई बाबतचे अन्य आदेश्ा परिस्थितीनुरूप पारित करण्यात येतील व त्यास विरूध्द पक्षकार हे जबाबदार राहतील. तक्रारकर्तायांनी मा. सदस्य यांचे करिता दाखल केले 2 सेट त्वरित परत घेवून जावेत उभय पक्षकारांना या निकालपत्राची सांक्षाकित प्रत निःशुल्क द्यावी..
दिनांक – 30/08/2008 ठिकाण – ठाणे
(सौ. शशिकला श. पाटील ) ( श्री. पी. एन. शिरसाट )
अध्यक्षा सदस्य
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे |