ग्राहक तक्रार क्र. 31/2014
अर्ज दाखल तारीख : 30/01/2014
अर्ज निकाल तारीख: 15/10/2015
कालावधी: 01 वर्षे 08 महिने 15 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1) महम्मद हनीफ उस्मान डांगे,
वय - 38 वर्ष, धंदा – शेती,
रा. शिराढोण, ता.कळंब, जि. उस्मानाबाद. ....तक्रारदार
वि रु ध्द
1) मा. व्यवस्थापक,
मोनसॅन्टो इंडिया लि., पाचवा मजला,
अहुरा सेंटर 96, महाकाली कॅव्हस रोड,
अंधेरी (पुर्व), मुंबई.400093.
2) मे. महावीर कृषि सेवा केंद्र,
शिराढोण ता. कळंब, जि. उस्मानाबाद. ..विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2) मा.श्रीमती विद्युलता जे.दलभंजन. सदस्य.
3) मा.श्री.मुकुंद बी.सस्ते, सदस्य.
तक्रारदारातर्फे विधीज्ञ : श्री.आर.जी.अंधारे.
विरुध्द पक्षकारा क्र.1 तर्फे विधीज्ञ : श्री.गूंड ए.एच.
विरुध्द पक्षकारा क्र.2 तर्फे : श्री. आर.एस. कोचेटा.
न्यायनिर्णय
मा. सदस्या श्रीमती विद्युलता जे.दलभंजन यांचे व्दारा :
अ) तक्रारदाराच्या तक्रारी अर्जातील थोडक्यात कथन पुढीलप्रमाणे :
1) अर्जदार महम्मद हनीफ उस्मान डांगे हे मौजे शिराढोण ता.कळंब जि. उस्मानाबाद येथील रहीवाशी आहेत. त्यांनी विप क्र.1 व 2 यांचे विरुध्द नुकसान भरपाईची तक्रार दाखल केलेली आहे.
2) अर्जदार याला शिराढोण ता. कळंब येथे जमीन गट क्र.268 क्षेत्र 13 हे.98 आर. एवढी जमीन आहे व सदर जमीन बागायत काळी भुसभुशीत सुपीक विहीरीवरुन बागायत जमीन आहे व सदर जमिनीत ऊस, मका, सोयाबीन, कापूस, सुर्यफुल, भुईमुग इ. बागायती पिके घेतात.
3) अर्जदाराने विप क्र. 2 कडून विप क्र. 1 यांनी उत्पादित केलेले डिकाल्ब् पिनकेल हे मका बियाणे दि.26/06/2013 रोजी 3 बॅग किंमत प्रत्येकी रु.950/- असे एकूण रक्कम रु.2850/- ज्याचा लॉट क्र.4CFIO71316 खरेदी केले.
4) अर्जदाराने जमीनीत रासायनिक खत घालून तसेच योग्य प्रकारे मशागत इ. बाबी केल्यानंतर पेरणी केली. मात्र सदरचे मका पीक हे जोमाने उगवुन जवळपास 7 फुट उंचीपर्यत वाढले व त्यास प्रत्येकी 1 अथवा 2 कणसे लागली तथापि सदरच्या पिकाला मक्याचे दाणे न भरल्याने अर्जदाराने अर्जदारास सदर भेसळ बियाणांमूळे नुकसान झाले. म्हणून जिल्हा बियाणे तक्रार निवारण समिती तालूका तक्रार निवारण समिती यांनी सर्व तालूका कृषि अधिकारी, महाबीज अकोला यांचे प्रतिनिधी, कृषि अधिकारी पंचायत समिती यांना सुचित करुन पंचनामा केला असता त्यांना 76 टक्के नुकसान झाल्याचे लक्षात आले. यावरुन सदर मक्याचे बियाणे सदोष व निकृष्ट असल्याचे स्पष्ट होते तसा अहवाल दिलेला आहे. सदर बाबत विप यांना प्रत्यक्ष भेटले असता प्रत्यक्ष भेटून नुकसान भरपाईची माहिती दिली असता त्यांनी याकडे दुर्लक्ष केले.
5) अर्जदाराचे पुढे असे म्हणणे आहे की, तीन बँग पासून अर्जदारास 35 क्विंटल मक्याचे उत्पादन झाले असते व सदर मक्याला प्रति क्विंटल रु.1,300/- भाव मिळाला असता. अर्जदाराला रु.1,36,500/- चे नुकसान झाले. त्याचप्रमाणे आंतरमशागत नांगरणी बियाणे खते इ. चा खर्च रु.30,000/-, शारीरिक मानसिक त्रासापोटी रु.10,000/- असा देण्याचा आदेश व्हावा अशी विनंती केली आहे.
ब) 1) विप क्र.1 यांना मंचा मार्फत नोटीस काढल्यात आली असता त्यांनी आपले म्हणणे दि.07/10/2014 रोजी अभिलेखावर दाखल केलेले आहेत. त्यांचे म्हणणे नुसार अर्जदार ग्राहक या संज्ञेत मोडत नाही. तक्रारदाराची तक्रार चुकीची आहे. अधिकचे निवेदनात असे म्हंटले आहे की विप क्र.1 कंपनीने बियाणा संदर्भाने जारी केलेल्या सुचना व निर्देश यांचे तंतोतंत पालन शेतक-याने केलेल्या सुचना व निर्देश यांचे तंतोतंत पालन शेतक-याने केले तर शेतक-याला भरघोस पीक येते.
2) अर्जदाराने विप क्र.1 यांचे निर्देश व सुचना जारी केलेले आहेत ते तंतोतंत पालन केलेले दिसत नाही. अशा परीस्थितीत ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 13 (सी) प्रमाणे तपासणी शिवाय निष्कर्ष काढण्याची एकमेव प्रक्रिया आहे.
3) अर्जदाराने 82 आर. क्षेत्रफळामध्ये मका वाणाची पेरणी केल्याचे दिसुन येते. पाहणी करतांना विप क्र.1 हे हजर नव्हते. कंपनीने उत्पादित केलेल्या वाणाची पेरणी केली किंवा नाही व अर्जदार यांनी पेरलेले बियाणे होते हे शंकेपलीकडे सिध्द केलेले नाही. तसा कोणताही सक्षम पुरावा दिसुन येत नाही.
4) सदर बियाणे कशा परीस्थितीत ठेवले अथवा जतन केले ही बाब अर्जदारास ज्ञात असणार. उष्ण हवामानातून दुर व्यवस्थित जतन करुन ते ओले होण्यापासून सुरक्षीत काळजी घेण्याचे काम अर्जदाराचे होते मात्र अर्जदार याने त्याबाबत योग्य ती काळजी घेतली नसावी. सुचनांचे तंतोतंत पालन केले असते तर भरपुर पीक आले असते. त्यामुळे विप क्र.1 यांना जबाबदार धरता येणार नाही.
5) पुढे विप क्र.1 यांचे असे म्हणणे आहे की, न्यायमंचापासून वस्तुस्थिती लपवून ठेवली आहे. मका पिकापासून किती उत्पन्न झाले हे स्पष्ट केलेले नाही. किती नुकसान झाले हे अर्जदार सिध्द करु शकला नाही. अर्जदार यांने ग्राहक संरक्षण कायद्याच्या 13 (i) सी प्रमाणे प्रयोगशाळेत चाचणी केल्याशिवाय वस्तुमध्ये दोष आहे हे सिध्द होऊ शकत नाही. विप क्र.1 यांचे पुढे असे म्हणणे आहे की, नुकसान भरपाई ही वास्तविक झाली असेल तरच देण्यास पात्र आहेत जर अशी कोणत्याही स्वरुपाची नुकसान कशामुळे झाली याचा विचार करणेचे आहे. अर्जदाराच्या स्वत:चे निष्काळजीपणाने झाली आहे त्यास विप क्र.1 हे जबाबदार नाहीत त्यासाठी योग्य तो पुरावा सादर करावा अर्जदार याने दाखल केलेली तक्रार, प्रतिज्ञापत्र, दस्तऐवज हे नाकबूल आहेत. सदर बियाणे 700 ग्रॅम वापरावयाचे पाहिजे अर्जदार यांचे अर्जामध्ये नमुद क्षेत्रफळाचा विचार करता असे दिसून येते की तक यांनी घेतलेले बियाणे व क्षेत्रफळ यामध्ये विसंगती आहे. त्यामुळे विप क्र.1 विरुध्दची तक्रार खर्चासह खारीज करावी अशी विनंती विप क्र.1 यांनी केलेली आहे.
ब) 1) विप क्र.2 यांना मंचा मार्फत नोटीस काढल्यात आली असता त्यांनी आपले म्हणणे दि.12/05/2014 रोजी अभिलेखावर दाखल केलेले आहेत.
त्यांचे म्हणण्यानूसार तक यांची तक्रार खोटी असून अमान्य आहे. विप यांनी तक यांना सदर बियाणे पाकीट सिलबंद विक्री केलेले आहे व ही बाब अर्जदाराने मान्य केली आहे तदपश्चात अर्जदाराने त्यास विक्री केलेली बियाणेच पेरलेले आहे हे त्यांनी सबळ पुराव्याने सिध्द करावे. अर्जदाराने अवाजवी दाखविलेले नुकसान पुराव्या अभावी नाकारण्यात येते
ड) अर्जदाराने तक्रारीसोबत सातबारा, बियाणे खरेदीची पावती, क्र.441, 26 कृषी अधिकारी यांना दिलेले पत्र, दि.14/10/13 चे पंचायत समीती कळंब यांना दिलेले पत्र, तालूका तक्रार निवारण समितीचा क्षेत्रीय भेटीचा अहवाल व पंचनामा, इ. कागदपत्राचे सुक्ष्म अवलोकन केले, दोन्ही विधज्ञांचा लेखी युक्तिवाद वाचला व तोंडी युक्तिवाद ऐकला असता सदर प्रकरणात खालीप्रमाणे मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे उत्तर
1) अर्जदाराला देण्यात येणा-या सेवेत
विप क्र.1 यांनी त्रूटी केली का ? होय.
2) अर्जदार नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे का ? होय.
3) काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे.
कारणमिमांसा
मुद्दा क्र. 1 व 2 :
ई) 1) अर्जदाराने मकाचे बियाणे पेरले व तो उगवून आले नाही ही प्रमूख तक्रार आहे. कृषी अधिकारी यांचा अहवाल आहे की, पुरेपूर पेरणी योग्य स्थिती असतांना व योग्य खोलीवर बियाणे परेणी केलेली असतांना देखील फक्त 24 टक्के बियाणाची उगवण झालेली आहे यावरुन सदर बियाणे हे निकृष्ट असल्याचे दिसते.
2) अर्जदाराने सातबारा दाखल केला परंतू त्यात मका पीक घेतल्याची नोंद नाही. बियाणांच्या उत्पादित कंपनीने मका बियाणाची 100 टक्के उगवण झाली असा दिलेला आहे. परंतु फक्त 24 टक्के फलधारणा झाली असा अहवाल आहे व बियाणे सदोष असल्याने उगवण कमी झाली असे म्हंटलेले आहे. विप क्र.1 यांनी त्यांचे से मध्ये बियाणे 13 (सी) (i) प्रमाणे अर्जदाराने चाचणी करीता पाठवले पाहीजे होते असे म्हंटले आहे. परंतु उलटपक्षी बियाणे सदोष नाही हे सिध्द करणे उत्पादित कंपनी म्हणजेच विप क्र.1 यांची जबाबदारी आहे. परंतु विप क्र.1 यांनी तसे काही केलेले निदर्शनास येत नाही.
3) अर्जदाराने 80 आर. एवढया क्षेत्रात मका बियाणांची पेरणी 2 एकर क्षेत्रात पेरले होते. एका एकरमध्ये 10 क्विंटल उत्पन्न निघते म्हणून रु.1,300/- प्रती क्विंटल भावाप्रमाणे 105 क्विंटल मक्याचे उत्पादन होऊन रु.1,36,500/- च उत्पन्न आले असते असे म्हंटले आहे.
4) आमच्या मते 1 एकराला मक्याचे बियाणांचे उत्पन्न जवळपास 15 पोती इतके होते त्याप्रमाणे 2 एकरचे 30 पोती होईल रु.1,000/- प्रति क्विंटल प्रमाणे रु.30,000/- 66 टक्के नुकसान झाले म्हणजे रु.19,800/- हे धरणे योग्य होईल असे मंचाचे स्पष्ट मत आहे.
5) अर्जदाराने घेतलेले बियाणे हे विक्रेत्यांकडून जरी घेतलेले असले तरी ते उत्पादित कंपनीचे आहे. म्हणजे उत्पादित कंपनीने त्यावर उत्पादन क्षमताही लिहीलेली असते. परंतु सदर प्रकरणत 90 टक्के उत्पादन क्षमता लिहीलेली असतांना अर्जदाराचे 24 टक्केच उगवण झाली म्हणजेच 66 टक्के नुकसान झाले विप यांनी काही निवाडयाचा आधार घेतलेला आहे. त्या निवाडयात असे तत्व विषद केले आहे की. No evidence regarding sub standard or adultreted quality of seed alleged fertilizer not such for laboratory test. Defect in seeds has to be proved by specialist opinion वरील प्रकारचे विषद केलेले तत्व पाहता तज्ञांचा अहवाल अभिलेखावर दाखल नसल्याचे अपिलकर्त्याचे अपिल मंजूर केलेले आहेत. परंतु सदर प्रकरणात ते लागू होत नाहीत कारण कंपनीने बियाणांचे सॅम्पल देणे गरजेचे आहे. कारण शेतकरी सर्व बियाणे जमीनीत पेरतो यासाठी कि त्याला परीपुर्ण उत्पन्न मिळेल या आशेने पेरतो सॅम्पल ठेवत नाही. सॅम्पल हे उत्पादित कंपनीने चाचणीसाठी पाठवले पाहीजे परंतु सदर प्रकरणात बियाणांचे सॅम्पल हे दोघांनी दिलेले नाही. परंतु जेथे 20 टक्के उगवण झालेली आहे तेथे नुकसान भरपाई देणे गरजेचे ठरते. म्हणून अर्जदारास 66 टक्के नुकसान भरपाई मिळणे आवश्यक आहे. त्याप्रमाणे अर्जदाराचे जवळपास 66 टक्के नुकसान झालेले आहे हे स्पष्ट होते.
6) वरील सर्व विवेंचना वरुन आम्ही या निष्कर्षापर्यंत पोहचलो आहोत की अर्जदार नुकसाभरपाई मिळण्यास अंशत: पात्र आहे. त्यामुळे मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर होकारार्थी देऊन खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
तक ची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
1) विप क्र.1 यांनी अर्जदारास नुकसान भरपाईपोटी रु.19,800/-(रुपये एकोणीस हजार आठशे फक्त) दि.30/01/2014 पासून 9 टक्के व्याज दराने आदेश दिल्या तारखेच्या 30 दिवसात द्यावेत.
2) विप क्र. 1 यांनी अर्जदारास तक्रार खर्चापोटी रक्कम रु.3,000/- (रुपये तीन हजार फक्त ) आदेश दिल्या तारखेपासून 30 दिवसात द्यावेत.
3) उपरोक्त आदेशाची अंमलबजावणी विरुध्द पक्ष यांनी आदेश दिल्या तारखेपासुन तीस
दिवसात करुन विप यांनी तसा अहवाल 45 दिवसात मा.मंचासमोर सादर करावा,
सदरकामी उभय पक्षकारांनी मंचात हजर रहावे. सदर आदेशाची पुर्तता विप यांनी न
केल्यास तक्रारदाराने तसा अर्ज द्यावा
4) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
अध्यक्ष
(श्री.मुकूंद.बी.सस्ते) (सौ.विद्युलता जे.दलभंजन)
सदस्य सदस्या
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.