Maharashtra

Chandrapur

MA/15/14

Sau Yashoda Chandrakanat Dethe At Jawaharnagar Rajura - Complainant(s)

Versus

Money Mantra financials Chandrapur through Gomati Manohar Pachbhai - Opp.Party(s)

N.R.Khobragade

07 Jun 2017

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTE REDRESSAL FORUM
CHANDRAPUR
 
Miscellaneous Application No. MA/15/14
In
Complaint Case No. CC/15/216
 
1. Sau Yashoda Chandrakanat Dethe At Jawaharnagar Rajura
Jawahar Nagar Rajura
Chandrapur
Maharashtra
...........Appellant(s)
Versus
1. Money Mantra financials Chandrapur through Gomati Manohar Pachbhai
Asifabad Raod Rajura
Chandrapur
Maharashtra
2. Money Mantra financials through Rakesh warptakar Rajura
At Rajura
Chandrapur
Maharashtra
...........Respondent(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. UMESH V.JAWALIKAR PRESIDENT
 HON'ABLE MRS. Kirti Gadgil (Vaidya) MEMBER
 HON'BLE MRS. Kalpana Jangade Kute MEMBER
 
For the Appellant:
For the Respondent:
Dated : 07 Jun 2017
Final Order / Judgement

अर्जदाराचे वकील खाब्रागडे हजर. गैरअर्जदार क्र.1 विरूध्‍द एकतर्फा. गैरअर्जदार क्र.2 गैरहजर.

अर्जदारांनी सदर अर्ज तक्रार दाखल करण्‍यास 90 दिवस झालेला विलंब शमापीत करून मंजुर करावा व मुळ तक्रार दाखल करून घेण्‍यात यावी अशी विनंती केली आहे.

      अर्जदारांनी गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी निर्माण केलेल्‍या लेआऊटमधील मौजा मोरवा, सर्व्‍हे नं.306/1 व 306/2 यामधील एक प्‍लॉट क्षेत्रफळ 571.42 स्‍क्‍वे.फुट, याची विक्री किंमत 2 लाख निश्चित करून दिनांक 18/10/2012 रोजी रक्‍कम रू.1 लाख गैरअर्जदार क्र.1 यांना दिले. त्‍यावेळी गैरअर्जदार क्र.2 उपस्‍थीत होते. लेआऊटची मंजूरी मिळाल्‍यानंतर उर्वरीत रक्‍कम रू.1 लाख अर्जदारांनी गैरअर्जदार क्र.1 यांना अदा करावयाची होती. परंतु गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी दिनांक 18/10/2012 नंतर एक वर्ष झाल्‍यानंतरदेखील प्‍लॉटची उर्वरीत रक्‍कम स्विकारून अर्जदारांस कायदेशीर ताबा देण्‍यांस टाळाटाळ केली. तसेच गैरअर्जदार क्र.1 यांनी घेतलेली रक्‍कम रू.1 लाख दिनांक 18/10/2012 पासून 12 टक्‍के व्‍याजासह अर्जदारांस परत दिली नाही व त्‍याबाबत विचारणा केली असता गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी कोणतेही उत्‍तर दिले नाही. अर्जदार हे ग्रामीण भागात रहात असल्‍याने व गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचे पत्‍ते न मिळून आल्‍याने प्रस्‍तूत प्रकरणी ग्राहक तक्रार दाखल करण्‍यांस 90 दिवसांचा विलंब झालेला आहे. सदर विलंब या अर्जाद्वारे शमापीत करून मंजुर करावा व मुळ तक्रार दाखल करून घेण्‍यात यावी अशी विनंती केली आहे.  

       गैरअर्जदार क्र.1 यांनी लेखी म्‍हणणे दाखल न केल्‍याने मंचाची नोटीस प्राप्‍त झाल्‍याबाबत कलम 28 अ ग्राहक संरक्षण अधिनियम अन्‍वये गृहितक मान्‍य करून एकतर्फा अर्जाची सुनावणी घ्‍यावी असा विनंतीअर्ज दिला. न्‍यायाच्‍या दृष्‍टीने अर्ज मंजूर करण्‍यांत आला. गैरअर्जदार क्र.2 यांनी अर्जदारांच्‍या विलंबमाफी अर्जातील वाद कथने नाकबूल करून विलंबमाफी अर्जासह मुळ तक्रार खारीज करावी असे म्‍हणणे मांडले.

      अर्जदारांनी अर्जात नमूद कलेली वाद कथने व गैरअर्जदार क्र.2 यांचे म्‍हणणे कागदोपत्री पुराव्‍यांवरून विचारात घेतले असता अर्जदारांनी गैरअर्जदार क्र.1 व 2 यांस प्रत्‍येकी रक्‍कम रू.1000/- या आदेश प्राप्‍ती दिनांकापासून 30 दिवसांत देण्‍यासापेक्ष अर्जदारांस तक्रार दाखल करण्‍यांस झालेला विलंब क्षमापीत करणे न्‍यायोचीत आहे.

      वरील निष्‍कर्षासह विलंब माफी अर्ज निकाली काढण्‍यात आला. 

 
 
[HON'BLE MR. UMESH V.JAWALIKAR]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. Kirti Gadgil (Vaidya)]
MEMBER
 
[HON'BLE MRS. Kalpana Jangade Kute]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.