नि. ५६
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – अनिल य.गोडसे
मा.सदस्या - श्रीमती गीता घाटगे
ग्राहक तक्रार अर्ज क्र.९४८/२००७
-------------------------------------------
तक्रार नोंद तारीख : २३/१०/२००७
तक्रार दाखल तारीख : ०५/११/२००७
निकाल तारीख : ०४/०२/२०१२
-------------------------------------------
१. श्री शंभू शिवलींग स्वामी
व.व. – ६०, धंदा – मजूरी
२. श्री गणेश शंभू स्वामी
व.व. – ३०, धंदा – मजूरी
३. ज्योती शंभू स्वामी
व.व. – २५, धंदा – घरकाम
सर्व रा.कुपवाड, ता.मिरज जि.सांगली ..... तक्रारदारú
विरुध्द
१. मोहनराव शिंदे नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित
अहिल्यानगर, कुपवाड ता.मिरज जि.सांगली
२. श्री नानासो शामराव लवटे (चेअरमन)
व.व. – ४८, धंदा – व्यापार
मोहनराव शिंदे नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित
अहिल्यानगर, कुपवाड ता.मिरज जि.सांगली
३. शंकर गणपती पवार
व.व. – सज्ञान, धंदा – व्यापार
४. श्रीकांत श्रीपती व्हनकळस
व.व. – सज्ञान, धंदा – व्यापार
५. अशोक शंकरराव पाटील
व.व. – सज्ञान, धंदा – व्यापार
६. आप्पासो मल्लिशा खोत
व.व. – सज्ञान, धंदा – व्यापार
७. प्रमोद रामराव शिंदे
व.व. – सज्ञान, धंदा – व्यापार
८. दिलीप पांडुरंग तोडकर
व.व. – सज्ञान, धंदा – व्यापार
९. दिलीप महादेव तांबडे
व.व. – सज्ञान, धंदा – व्यापार
१०. शंकर धोंडीराम हाक्के
व.व. – सज्ञान, धंदा – व्यापार
सर्व रा. मोहनराव शिंदे नागरी सहकारी
पतसंस्था मर्यादित अहिल्यानगर, कुपवाड
ता.मिरज जि.सांगली .....जाबदार
तक्रारदारú तर्फेò : +ìb÷.एस.बी.ओलेकर
जाबदार क्र.१, २, ३, ४, ६, ८ तर्फे : +ìb÷. एच.एम.झांबरे
जाबदार क्र.५, ९, १०: एकतर्फा
नि का ल प त्र
द्वारा- मा.अध्यक्ष- श्री.अनिल य.गोडसे
१. प्रस्तुत प्रकरणातील जाबदार पतसंस्थेने मुदत ठेवी अन्वये गुंतविलेल्या रकमा परत दिल्या नाहीत म्हणून तक्रारदारांनी सदरहू तक्रार अर्ज दाखल केला आहे. याबाबत थोडक्यात हकीकत अशी की, तक्रारदार यांनी जाबदार मोहनराव शिंदे नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित अहिल्यानगर, कुपवाड (ज्यांचा उल्लेख यापुढे ‘पतसंस्था’ असा केला जाईल) यांचेकडे मुदतठेवी अंतर्गत रकमा गुंतविल्या होत्या. ठेवींच्या मुदती पूर्ण झालेनंतर तक्रारदार यांनी ठेव रकमेची मागणी करुनही जाबदार यांनी रक्कम अदा केली नाही. सबब, आपल्याला रकमा देवविण्यात याव्यात अशी तक्रारदारांनी विनंती केली आहे. तक्रारदारांनी तक्रार अर्जाचे पुष्टयर्थ नि.३ अन्वये प्रतिज्ञापत्र व नि.५ अन्वये एकूण ५ कागदपत्रे मंचापुढे दाखल केली आहेत.
२. जाबदार क्र.१ व २ यांनी नि.१४ वर आपले म्हणणे दाखल केले आहे. जाबदार यांनी आपल्या म्हणण्यामध्येतक्रारदार यांचे तक्रारअर्जातील बहुतांश मजकूर नाकारला आहे. जाबदार यांनी आपल्या म्हणण्यामध्ये तक्रारदार यांनी सर्व संचालक मंडळाला आवश्यक पक्षकार म्हणून प्रस्तुत तक्रारअर्जात सामील केलेले नाही. तक्रारदार यांनीजाबदार पतसंस्थेत ठेव ठेवल्याचा मजकूर जाबदार यांनी मान्य केला आहे. तक्रारदार क्र.२ व ३ यांच्या ठेवपावतीवर त्यांच्या सहया नाहीत. जाबदार संस्थेने रक्कम रु.३९,२०,११८/- लॉर्ड बालाजी बॅंक शाखा माधवनगर या बॅंकेत जमा केली आहे. त्यामुळे या बॅंकेस प्रस्तुत कामी आवश्यक पक्षकार म्हणून सामील करणे आवश्यक आहे. सदरचे बॅंकेने रक्कम न दिल्यामुळे पतसंस्थेची आर्थिक परिस्थिती ढासळली आहे. सदरचे बॅंकेने जाबदार संस्थेची रक्कम दिल्यास जाबदार हे तक्रारदार यांना रक्कम देणेस तयार आहेत. जाबदार क्र.१ व २ यांनी नि.१६ चे यादीने १ कागद दाखल केला आहे. जाबदार क्र.३, ४, ६ व ८ यांनी नि.५३ ला जाबदार क्र.१ व २ यांनी दिलेले म्हणणे हेच जाबदार क्र.३, ४, ६ व ८ यांचे म्हणणे समजण्यात यावे अशी पुरशिस दिली आहे.
३. प्रस्तुत प्रकरणी जाबदार क्र.७ यांना नोटीसची बजावणी झालेनंतर ते याकामी हजर झाले परंतु त्यांनी आपले लेखी म्हणणे व शपथपत्र दाखल केले नाही. सबब त्यांचेविरुध्द नो से चा आदेश नि.१ वर करण्यात आला.
४. प्रस्तुत प्रकरणी जाबदार क्र.५, ९ व १० यांना नोटीसची बजावणी होवूनही ते याकामी हजर झाले नाही तसेच त्यांनी आपले लेखी म्हणणे व शपथपत्र दाखल केले नाही. सबब त्यांचेविरुध्द एकतर्फा आदेश नि.१ वर करण्यात आला.
५. तक्रारदारांनी त्यांची रक्कम जाबदार पतसंस्थेमध्ये गुंतविल्याबाबतच्या ठेवपावत्यांच्या सत्यप्रती नि.५५ चे यादीने दाखल केल्या आहेत. तक्रारदार यांनी नि.५४ ला दाखल केलेल्या व्याजनिवेदनामध्येही त्यांना सदरचे ठेवपावत्यांवर काहीही व्याज मिळाले नसल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे सदरचे ठेवपावत्यांवरील ठेव रक्कम ठेव ठेवल्याचे तारखेपासून ठेवपावतीमध्ये नमूद केलेल्या व्याजदराने मंजूर करण्यात येत आहेत.
६. तक्रार अर्जात तक्रारदार यांनी सर्व संचालकाविरुध्द आदेश करावा अशी केलेली मागणी याचा विचार करता तक्रारदार यांची रक्कम देण्यास जाबदार पतसंस्थेबरोबरच सर्व संचालक वैयक्तिक व संयुक्तिक जबाबदार राहतील किंवा कसे हा मुददा उपस्थित होतो. या मुद्याच्या अनुषंगाने सन्मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने रिट पिटीशन नं. ५२२३/०९ सौ.वर्षा इसाई विरुध्द राजश्री चौधरी या कामी दिनांक २२ डिसेंबर २०१० रोजी जो निर्णय दिला आहे. त्याचे अवलोकन करता त्यामध्ये पुढील प्रमाणे निष्कर्ष काढल्याचे दिसून येते. However, So far as members of the managing committee/directors are concerned, they stand on different footing and unless the procedure prescribed under the special enactment i.e. Maharashtra co. op. societies act 1960 is followed and unless the liability is fixed against them they cannot be held responsible in respect of payment of any dues recoverable from the society.
सन्मा. उच्च न्यायालयाने वर दिलेल्या या निष्कर्षाचा विचार करता तक्रारदारांनी महाराष्ट्र सहकार कायदयातील कलम ८८ अन्वये चौकशी होऊन सर्व संचालकांना जबाबदार धरुन त्यांचे दायित्व निश्चित केल्याबाबत कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. ही बाब प्रस्तुत प्रकरणी लक्षात घेणे अत्यंत महत्वाचे असल्याचे मंचास वाटते आणि म्हणून जाबदार क्र. २ ते १० यांना पुराव्या अभावी तक्रारदाराची रक्कम देण्यास संयुक्तिक अथवा वैयक्तिकरित्या जबाबदार धरता येणार नाही असा मंचाचा निष्कर्ष निघतो. रकमेची मागणी करुनही ती न देवून पतसंस्थेने तक्रारदारांना दूषित सेवा दिल्याने ज्या पतसंस्थेमध्ये ठेव गुंतविलेली आहे, ती पतसंस्थाच तक्रारदाराच्या ठेवीसाठी सर्वस्वी जबाबदार ठरते असाही मंचाचा निष्कर्ष निघतो.
७. तक्रारदार यांनी शारिरिक, मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाईची व तक्रारअर्जाचे खर्चाची मागणी केली आहे. तक्रारदार यांना आपली रक्कम मिळण्यासाठी या न्यायमंचात धाव घ्यावी लागणे ही बाब निश्चितच तक्रारदारांना शारिरिक मानसिक त्रास देणारी आहे. त्यामुळे सदरची मागणी अंशत: मान्य करण्यात येत आहे.
सबब, मंचाचा आदेश की,
आदेश
१. जाबदार क्र.१ पतसंस्था व पतसंस्थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना मुदत ठेव पावती क्र.१९१० वरील रक्कम रु.२०,०००/-(रुपये वीस हजार फक्त) व या रकमेवर दि.२३/८/२००४ पासून द.सा.द.शे. १२.५% दराने व्याज अदा करावे असा जाबदार यांना आदेश करण्यात येतो.
२. जाबदार क्र.१ पतसंस्था व पतसंस्थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना मुदत ठेव पावती क्र.१९११ वरील रक्कम रु.११,०००/- (रुपये अकरा हजार फक्त) व या रकमेवर दि.२३/८/२००४ पासून द.सा.द.शे. १२.५% दराने व्याज अदा करावे असा जाबदार यांना आदेश करण्यात येतो.
३. जाबदार क्र.१ पतसंस्था व पतसंस्थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना मुदत ठेव पावती क्र.१९१४ वरील रक्कम रु.१७,४४०/- (रुपये सतरा हजार चारशे चाळीस फक्त) व या रकमेवर दि.३/९/२००४ पासून द.सा.द.शे. १२% दराने व्याज अदा करावे असा जाबदार यांना आदेश करण्यात येतो.
४. जाबदार क्र.१ पतसंस्था व पतसंस्थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना मुदत ठेव पावती क्र.१९१५ वरील रक्कम रु.१७,५००/- (रुपये सतरा हजार पाचशे फक्त) व या रकमेवर दि.३/९/२००४ पासून द.सा.द.शे. १२.५% दराने व्याज अदा करावे असा जाबदार यांना आदेश करण्यात येतो.
५. यातील जाबदार क्र.१ पतसंस्था व पतसंस्थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना शारिरिक, मानसिक त्रासापोटी व तक्रारअर्जाचे खर्चापोटी म्हणून रक्कम रु.२,०००/- अदा करावेत असा जाबदार यांना आदेश करण्यात येतो.
६. वर नमूद आदेशांची अंमलबजावणी जाबदार पतसंस्थेने दि.१९/३/२०१२ पर्यंत न केल्यास तक्रारदार त्यांचेविरुध्द ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदी अंतर्गत प्रकरण दाखल करु शकतील.
सांगली
दिनांकò: ०४/०२/२०१२
(गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली जिल्हा मंच, सांगली.