जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ग्राहक तक्रार क्रमांक : 329/2010. तक्रार दाखल दिनांक : 07/06/2010. तक्रार आदेश दिनांक : 18/03/2011. 1. कु. प्रांजली दत्तात्रय खाटमोडे, अ.पा.क. सौ. जयश्री दत्तात्रय खाटमोडे, वय 34 वर्षे, व्यवसाय : घरकाम, रा. दत्त पेठ, ता. करमाळा, जि. सोलापूर. 2. कु. सोनाली दत्तात्रय खाटमोडे, अ.पा.क. सौ. जयश्री दत्तात्रय खाटमोडे, वय 34 वर्षे, व्यवसाय : घरकाम, रा. वरीलप्रमाणे. तक्रारदार विरुध्द 1. व्यवस्थापक, डॉ. मोहनलाल दोशी नागरी सह. पतसंस्था मर्या., करमाळा, श्री. तुषार रमणलाल कटारिया, वय 32 वर्षे, व्यवसाय : नोकरी, रा. मारवाड गल्ली, ता. करमाळा, जि. सोलापूर. 2. चेअरमन, डॉ. मोहनलाल दोशी नागरी सह. पतसंस्था मर्या., करमाळा, डॉ. श्री. राजेंद्र मोहनलाल दोशी, वय 48 वर्षे, रा. दत्त पेठ, ता. करमाळा, जि. सोलापूर. 3. संचालक, श्री. हनुमंत भागवत चौधरी, वय 45 वर्षे, व्यवसाय : शेती, रा. वांगी नं.2, करमाळा, जि. सोलापूर. 4. संचालक, सौ. सुवर्णा सोमनाथ क्षीरसागर, वय 30 वर्षे, व्यवसाय : घरकाम, रा. पांडे, करमाळा, जि. सोलापूर. 5. संचालक, श्री. नानासाहेब दत्तात्रय भानवसे, वय 40 वर्षे, व्यवसाय : शेती, रा. वांगी नं.2, करमाळा, जि. सोलापूर. 6. संचालक, डॉ. सौ. सुनिता राजेंद्र दोशी, वय 43 वर्षे, रा. दत्त पेठ, करमाळा, जि. सोलापूर. 7. संचालक, श्री. दुर्गादास दाजी जगताप, वय 45 वर्षे, व्यवसाय : शेती, रा. देवीचा माळ, करमाळा, जि. सोलापूर. 8. संचालक, सौ. स्वाती रामा मस्तुद, वय 28 वर्षे, व्यवसाय : घरकाम, रा. फिसरे, करमाळा, जि. सोलापूर. 9. संचालक, श्री. भास्कर भानुदास पाटील, वय 50 वर्षे, व्यवसाय : शेती, रा. पाडळी, करमाळा, जि. सोलापूर. विरुध्द पक्ष 10. संचालक, श्री. रामदास कुंडलिक इंदुरे, वय 58 वर्षे, व्यवसाय : सेवानिवृत्त, रा. भवानी पेठ, करमाळा, जि. सोलापूर. 11. संचालक, श्री. राजेंद्र पोपट दोशी, वय 38 वर्षे, व्यवसाय : व्यापार, रा. गुजर गल्ली, करमाळा, जि. सोलापूर. 12. संचालक, श्री. शंकर जगन्नाथ फलफले, वय 50 वर्षे, रा. देवीचा माळ, करमाळा, जि. सोलापूर. 13. संचालक, श्री. विठ्ठल सोपान कानगुडे, वय 50 वर्षे, व्यवसाय : शेती, रा. देवळाली, करमाळा, जि. सोलापूर. 14. संचालक, श्री. आबासाहेब तुकाराम भोगल, वय 52 वर्षे, रा. बोरगाव, करमाळा, जि. सोलापूर. 15. संचालक, श्री. विष्णू रंगनाथ शिंदे, वय 45 वर्षे, व्यवसाय : शेती, रा. बोरगाव, करमाळा, जि. सोलापूर. 16. संचालक, श्री. प्रितम संजय दोशी, वय 25 वर्षे, व्यवसाय : नोकरी, रा. दत्त पेठ, करमाळा, जि. सोलापूर. विरुध्द पक्ष गणपुर्ती :- सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार, सदस्य तक्रारदार यांचेतर्फे विधिज्ञ : एम्. ए. कुलकर्णी विरुध्द पक्ष क्र.2 यांचेतर्फे विधिज्ञ : पी.ए. कुलकर्णी विरुध्द पक्ष क्र.1, 4, 6 व 15 यांचेतर्फे विधिज्ञ : ए.एन्. राजपूत आदेश सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष यांचे द्वारा :- 1. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की, तक्रारदार क्र.1 व 2 अज्ञान असून त्यांची आई सौ. जयश्री दत्तात्रय खाटमोडे यांनी तक्रारदार यांचे नांवे विरुध्द पक्ष यांचे पतसंस्थेमध्ये मासिक ठेव योजनेमध्ये रक्कम गुंतवणूक केली असून त्याचा तपशील खालीलप्रमाणे नमूद आहे. ठेविदाराचे नांव | रक्कम | पावती क्रमांक | गुंतवणूक तारीख | मुदत संपण्याची तारीख | व्याज दर टक्के | कु. प्रांजली दत्तात्रय खाटमोडे | 50,000 | 417 | 18/11/08 | 18/12/09 | 13 | कु. सोनाली दत्तात्रय खाटमोडे | 50,000 | 418 | 18/11/08 | 18/12/09 | 13 |
2. विरुध्द पक्ष पतसंस्थेने त्यांना सदर ठेवीवर प्रतिमहा व्याज दिलेले नाही. तसेच मुदत पूर्ण झाल्यानंतर विरुध्द पक्ष यांनी त्यांना ठेवीची मूळ रक्कमही परत केलेली नाही. तसेच विरुध्द पक्ष यांनी रु.1,08,672/- चा धनादेश त्यांचे पतीचे नांवे दिला असून तो पुरेशी रक्कम नसल्याच्या कारणास्तव अनादरीत झाला. तक्रारदार यांनी वारंवार विनंती करुन व नोटीस पाठवूनही त्यांना ठेव रक्कम परत करण्यात आली नाही. त्यामुळे तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार दाखल करुन विरुध्द पक्ष यांच्याकडून ठेव रक्कम व्याजासह परत मिळावी आणि मानसिक त्रासापोटी रु.10,000/- व तक्रार खर्चापोटी रु.10,000/- मिळावेत, अशी विनंती केली आहे. 3. विरुध्द पक्ष क्र.2 यांनी रेकॉर्डवर म्हणणे दाखल केले असून तक्रार अमान्य केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदार त्यांच्या ग्राहक नाहीत. तक्रारदार यांनी ठेवीची मुदत पूर्ण झाल्यानंतर पतसंस्थेमध्ये समक्ष येऊन जरुर त्या कागदपत्रांची पुर्तता करणे आवश्यक आहे. परंतु तक्रारदार समक्ष पतसंस्थेमध्ये कधीही आल्या नाहीत आणि कागदपत्रांची पुर्तता केलेली नाही. तक्रारदार यांचे पती व विरुध्द पक्ष क्र.2 यांचे मैत्री संबंध बिघडल्यामुळे तक्रारदार यांनी तक्रार दाखल केलेली आहे. तक्रारदार यांचे पतीने ठेव रकमेपोटी तारण म्हणून दिलेल्या धनादेशाचा गैरवापर केलेला आहे. शेवटी तक्रारीतून त्यांना वगळण्याची विनंती केली आहे. 4. उर्वरीत विरुध्द पक्ष यांना मंचाच्या नोटीसची बजावणी होऊनही ते मंचासमोर हजर झाले नाहीत आणि म्हणणे दाखल केले नाही. त्यामुळे त्यांच्या विरुध्द एकतर्फा चौकशीचे आदेश व कैफियतीशिवाय तक्रार चालविण्याचे आदेश करण्यात आले. 5. तक्रारदार यांची तक्रार, विरुध्द पक्ष क्र.2 यांचे म्हणणे व दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता, तसेच युक्तिवाद ऐकल्यानंतर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे उत्तर 1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना त्रुटीयुक्त सेवा दिली आहे काय ? होय. 2. तक्रारदार ठेव रक्कम मिळविण्यास पात्र आहेत काय ? होय. 3. काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे. निष्कर्ष 6. मुद्दा क्र. 1 ते 3 :- तक्रारदार यांनी आपल्या तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे विरुध्द पक्ष क्र.1 पतसंस्थेमध्ये दि.18/11/2008 रोजी मुदत ठेव पावती क्र.417 व 418 अन्वये अनुक्रमे रु.50,000/- गुंतवणूक केले असून ठेवीवर द.सा.द.शे. 13 टक्के दराने व्याज देय असल्याचे निदर्शनास येते. ठेवीची मुदत दि.18/12/2009 रोजी पूर्ण झालेली असून त्यानंतर ठेव व व्याज रकमेची मागणी केली असता टाळाटाळ करण्यात येत आहे, अशी तक्रारदार यांची प्रमुख तक्रार आहे. 7. विरुध्द पक्ष क्र.2 यांनी त्यांच्या विरुध्दची फौजदारी केस काढल्यास व कागदपत्रांची पूर्तता केल्यास ते रु.1,00,000/- देण्यास तयार असल्याचे नमूद केले आहे. उर्वरीत विरुध्द पक्ष यांनी प्रस्तुत तक्रारीला उत्तर दिलेले नसल्यामुळे आणि मंचासमोर उपस्थित राहून वस्तुस्थिती स्पष्ट करत नसल्यामुळे त्यांना तक्रारदार यांची तक्रार मान्य असल्याचे अनुमानास आम्ही येत आहोत. विरुध्द पक्ष क्र.2 यांनी तक्रारदार यांच्याकडून कागदपत्रांची पूर्तता झाली नसल्याचे नमूद केले असले तरी तक्रारदार यांनी ठेव रक्कम मिळविण्यासाठी वारंवार प्रयत्न केले असल्याचे निदर्शनास येते. त्यावेळी विरुध्द पक्ष क्र.2 यांनी कागदपत्रांची पूर्तता करण्याबाबत तक्रारदार यांना सूचित केल्याचे निदर्शनास येत नाही. त्यामुळे विरुध्द पक्ष क्र.2 यांचे कथन मान्य करता येणार नाही. 8. तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडे मुदत ठेव पावतीद्वारे रक्कम गुंतवणूक करुन वित्तीय सेवा घेतलेली आहे. तक्रारदार यांनी ठेवीची मुदत संपल्यानंतर रकमेची वेळोवेळी मागणी करुनही त्यांना ठेव रक्कम देण्यात आलेली नाही. ठेव रक्कम मुदत पूर्ण झाल्यानंतर परत करणे, ही विरुध्द पक्ष यांची करारात्मक जबाबदारी व कर्तव्य आहे. असे असताना, तक्रारदार यांना विरुध्द पक्ष यांनी ठेव रक्कम व त्यावरील व्याज परत न करुन सेवेमध्ये त्रुटी केल्याचे स्पष्टपणे दिसून येते. त्यामुळे विरुध्द पक्ष हे तक्रारदार यांची ठेव रक्कम परत करण्यास वैयक्तिक व संयुक्तिक जबाबदार ठरतात. 9. शेवटी आम्ही खालील आदेश देत आहोत. आदेश 1. विरुध्द पक्ष क्र.1 ते 16 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना मुदत ठेव पावती क्र.417 व 418 ची अनुक्रमे ठेव रक्कम रु.50,000/- (एकूण रु.1,00,000/-) दि.18/11/2008 पासून द.सा.द.शे. 13 टक्के व्याज दराने या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावी. 2. विरुध्द पक्ष क्र.1 ते 16 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना तक्रार खर्चापोटी रु.1,000/- या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावेत. (सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार) (सौ. संगिता एस. धायगुडे÷) सदस्य अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ----00---- (संविक/स्व/15311)
| [HONABLE MRS. Pratibha P. Jahagirdar] MEMBER[HONABLE MRS. Sangeeta S. Dhaygude] PRESIDENT | |