::: नि का ल प ञ:::
मंचाचे निर्णयान्वये, किर्ती गाडगीळ (वैदय) मा.सदस्या
१. सामनेवाले यांनी तक्रारदारांस ग्राहक सरक्षंण अधिनियम अन्वये तरतुदीनुसार सेवासुविधा पुरविण्यात कसूर केल्याने प्रस्तूत तक्रार दाखल केली आहे.
२. अर्जदार हा चंद्रपूर येथील रहिवासी असून अर्जदाराने गैरअर्जदार यांच्याकडून मौजा चांदा रैयतवारी सर्वे नंबर १९९/१ व १०५/२ मधील प्रस्तावित प्लॉट क्रमांक ६५ आराजी १२४.८६ चौ.मि. या प्लॉटची खरेदी करण्याचा विसारपत्र दिनांक २२.०२.२०१३ रोजी अर्जदाराने गैरअर्जदाराशी केला आहे. सुंदर प्लॉटची किंमत प्रति चौ.फुट १८०/- रुपये अशी ठरली होती. एकुण किंमत रुपये २,४०,२७८/- मध्ये गैरअर्जदाराने अर्जदारांना विक्री करण्याचे ठरविले होते. अर्जदाराने करारनाम्याच्या तारखेला रक्कम रुपये १,००,०००/-विसारा दाखल नगदी रूपाने गैरअर्जदाराला दिली. उरलेली रक्कम व कब्जा पावतीच्या दिवशी दिनांक २२.१०.२०१३ रोजी देण्याचे ठरले. त्याप्रमाणे दिनांक २२.१०.२०१३रोजी अर्जदाराने गैरअर्जदार यांना प्लॉट विक्री करारनामा करुन देण्याची मागणी केली. त्यानुसार गैरअर्जदाराला दिनांक २२.१०.२०१३ रोजी कोर्टात येण्यास सांगितले. त्यादिवशी अर्जदार दिवसभर कोर्टात थांबुन राहीला व गैरअर्जदार हे विक्रीच्या दिवशी आलेच नाही. अर्जदाराने वेळोवेळी प्लॉटची विक्री करून मागितली परंतु गैरअर्जदार टाळाटाळ करीत होते. त्याबद्दल दिनांक ०२.०२.२०१५ रोजी अर्जदाराने वकिलामार्फत नोटीस पाठवुन विक्रीची मागणी केली. परंतु गैरअर्जदाराने कोणतेही उत्तर अर्जदारास दिले नाही. गैरअर्जदाराने अर्जदाराला प्लॉटची विक्री करून न दिल्यामुळे फार नुकसान झालेले असल्यामुळे तक्रार मंचात दाखल केलेली आहे. अर्जदाराची मागणी अशी आहे की, अर्जदाराने प्लॉट करारनाम्याच्या वेळी घेतलेली रक्कम रु. १,००,०००/- दिनांक २२.०२.२०१३ पासून १२ टक्के व्याजासह देण्याचे आदेश व्हावेत तसेच अर्जदाराला झालेल्या शारीरिक, मानसिक त्रासापोटी रक्कम रु. ९०,०००/- व तक्रार खर्च रक्कम रु. ५,०००/- अर्जदाराला मिळण्याचे आदेश करण्यात यावे.
३. अर्जदाराची तक्रार स्विकृत करुन गैरअर्जदार विरुध्द नोटीस काढण्यात आली. दिनांक ०७.०५.२०१५ रोजी गैरअर्जदारांनी वकीलामार्फत प्रकरणात उपस्थित झालेपरंतु त्यांनी प्रकरणात मुदतीत त्यांचे लेखी उत्तर दाखल न कंल्यामुळे मंचाने दिनांक ११.०६.२०१५ रोजी प्रकरण त्यांचे लेखी उत्तरा शिवाय पुढे चालविण्याचा आदेश केलेलाआहे. गैरअर्जदाराने प्रकरणातत्यांचे शपथपत्र दाखल केले असुन शपथपत्रात गैरअर्जदाराने असे कथन केले आहे कि, जो भुखंड अस्तीत्वात नाही. तो भुखंड विक्रीपत्र करुन द्यावा असा आदेश कोणतेहीन्यायालय पारीत करुन शकत नाही. प्रकरणात दाखल प्लॉट हे रहीवासी प्लॉट नसुन शेतजमीन आहे. अर्जदाराने प्रकरणात दाखल केलेले विसारपत्र हे दिनांक २२.०३.२०१३ रोजी खरेदी केलेल्या गैरन्यायीक मुद्रांकावर आहे. परंतु गैरन्यायीक मुद्रांक पेपर कोषागार कार्यालयातुन दिनांक १८/०२/२०१३ रोजी जारी करण्यात आलेला आहे. यावरुन दिनांक ०८.०२.२०१३ रोजी सदर गैरन्यायीक मुद्रांक पेपर अस्तीत्वात नसल्यामुळे सदर विसारपत्र हे खोटे व बनावटी आहे. गैरअर्जदाराने अर्जदाराला दिनांक ०८.०२.२०१३ रोजी किंवा त्यापुर्वी कोणतेही विसारपत्र करुन दिले नाही. सबब अर्जदाराची तक्रार ही खोटी असुन तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी.
४. तक्रारदाराची तक्रार कागदपत्रे, पुरावा शपथपत्र, लेखी युक्तीवाद, गैरअर्जदार यांचे कागदपत्रे, पुरावा शपथपत्र यांचे अवलोकन केले असता तक्रार निकाली कामी खालील मुद्दे कायम करण्यात येत आहे.
मुद्दे निष्कर्ष
१. गैरअर्जदार यांनी अर्जदारास प्लॉट विक्री
कराराप्रमाणे सेवासुविधा पुरविण्यात कसूर केल्याची
बाब अर्जदार सिद्ध करतात काय ? होय
२. गैरअर्जदार अर्जदारास नुकसानभरपाई
अदा करण्यास पात्र आहे काय ? होय
३. आदेश ? अंशत: मान्य
कारण मिमांसा
मुद्दा क्र. १ व २ :
५. अर्जदाराने तक्रारीत नमुद केले कि, अर्जदाराने गैरअर्जदार यांच्याकडून मौजा चांदा रैयतवारी सर्वे नंबर १९९/१ व १०५/२ मधील प्रस्तावित प्लॉट क्रमांक ६५ आराजी १२४.८६ चौ.मि. या प्लॉटची खरेदी करण्याचा विसारपत्र दिनांक २२.०२.२०१३ रोजी अर्जदाराने गैरअर्जदाराशी केला आहे. अर्जदाराने करारनाम्याच्या तारखेला रक्कम रुपये १,००,०००/-विसारा दाखल नगदी रूपाने गैरअर्जदाराला दिली. त्याप्रमाणे दिनांक २२.१०.२०१३ रोजी अर्जदाराने गैरअर्जदार यांना प्लॉट विक्री करारनामा करुन देण्याची मागणी केली. त्यानुसार गैरअर्जदाराला दिनांक २२.१०.२०१३ रोजी कोर्टात येण्यास सांगितले. परंतु अर्जदार दिवसभर कोर्टात थांबुन राहीला व गैरअर्जदार हे विक्रीच्या दिवशी आलेच नाही. अर्जदाराने तक्रारीसोबत नोंदणीकृत करारनामा दाखल केला नसुन अर्जदाराने तक्रारीत नोटरी विसारपत्रपत्र दाखल केलेले आहे. त्यावर गैरअर्जदार यांची व साक्षदार यांची स्वाक्षरी आहे. गैरअर्जदाराने तक्रारीत दाखल केलेला आरोप नामंजूर केलेले आहे. गैरअर्जदाराने शपथपत्रात विसारपत्र करुन दिले नाही असे कथन केले परंतु गैरअर्जदाराने करारनाम्यावरील स्वाक्षरी गैरअर्जदार यांची नाही हे सिद्ध करण्याकरिता कोणताही पुरावा दाखल केला नाही. सबब गैरअर्जदाराने अर्जदाराशी केलेला करारनामा सिद्ध होत असल्याने गैरअर्जदाराने अर्जदाराकडून रक्कम रु. १,००,०००/- घेतले ही बाब सिद्ध होत असल्यामुळे अर्जदार गैरअर्जदाराचा ग्राहक आहे. गैरअर्जदाराने नमूद प्लॉट क्रमांकची विक्री करार नामाप्रमाणे करून दिली नाही. प्रकरणात दाखल केलेल्या दस्तावेज अवलोकन केले असता असे दिसून येत आहे की, अर्जदाराने गैरअर्जदार सोबत दिनांक २२.०२.२०१३ रोजी सदर करारनामा केला व सदर करारनामा प्रमाणे रक्क्म रु. १,००,०००/- अर्जदाराकडून घेतले. दिनांक ०२.०९.२०१३ रोजी सदरची विक्री ठरलेली होती. परंतु, गैरअर्जदारानी अर्जदारला विक्री करून दिली नाही हे सिद्ध करण्याकरीता अर्जदाराने इतर काही व्यक्तींचे शपथपत्र प्रकरणात दाखल केले आहे. अर्जदाराने गैरअर्जदाराकडुन विक्रीपत्र करून घेण्यास वकिलामार्फत नोटीस पाठवूनही अर्जदाराच्या नोटीसची दखल घेतली नाही. गैरअर्जदाराने बचाव पक्षात उपरोक्त बाब सिद्ध करण्याकरिता गैरर्जदाराने दस्तावेज दाखल केलेले नाही. तसेच गैर अर्जदाराने त्यांचे शपथपत्रात असे नमूद गेले की, उपरोक्त सर्वे नंबर मौजा चांदा रैयतवारी येथील शेतजमीन असून तो रहिवासी प्लॉट प्रकारात मोडत नाही तसेच त्यांनी पुढे कथन केले की, गैरअर्जदाराने अर्जदारांना ज्या स्टॅम्प पेपरवर करारनामा करुन दिला आहे त्याची दिनांक २२.०२.२०१३ असून सदर शपथपत्र हे खोटे व बनावट आहे. परंतु ही बाब सिद्ध करण्याकरता गैरअर्जदाराने कोणतेही कागदपत्रे दाखल केले नाहीत. सबब गैरअर्जदाराने कराराप्रमाणे रककम रु. १,००,०००/- घेतले असून तक्रारीत नमूद प्लॉटची कागदपत्र अर्जदारच्या नावाने करून दिले नाही, ही बाब कागदोपत्री पुराव्यावरून सिद्ध होत असल्यामुळे गैरअर्जदार यांनी अर्जदारास प्लॉट विक्री कराराप्रमाणे सेवासुविधा पुरविण्यात कसूर केल्याची बाब अर्जदार सिद्ध करतात. तसेच गैरअर्जदार अर्जदारास नुकसानभरपाई अदा करण्यास पात्र आहेत असे मंचाचे मत आहे. सबब मुद्दा क्रमांक १ व २ चे उत्तर होकारार्थी नमूद करण्यात येत आहे
मुद्दा क्र. ३ :
६. मुद्दा क्रं. १ व २ वरील विवेचनावरुन खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येतो.
आदेश
१. ग्राहक तक्रार क्र. २२/२०१५ अंशतः मान्य करण्यात येते.
२. गैरअर्जदार यांनी अर्जदारास प्लॉट विक्री कराराप्रमाणे, ग्राहक
संरक्षण अधिनियम अन्वये तरतुदीनुसार, सेवासुविधा पुरविण्यात कसुर
केल्याची बाब जाहीर करण्यात येते.
३. गैरअर्जदार यांनी अर्जदाराकडून मौजा चांदा रैयतवारी सर्वे नंबर १९९/१ व १०५/२ मधील प्रस्तावित प्लॉट क्रमांक ६५ आराजी १२४.८६ चौ. मि. या प्लॉट विक्री कराराप्रमाणे घेतलेली रक्कम रु. १,००,०००/- अर्जदाराला दिनांक २२.०२.२०१३ पासून अदा करेपर्यंत १० टक्के व्याजासह अदा करावी.
४. गैरअर्जदार यांनी अर्जदारास मानसिक, शारीरिक, आर्थिक त्रासापोटी व तक्रार खर्चापोटी एकत्रित रक्कम रु. १०,०००/- या आदेशप्राप्ती दिनांकापासून ३०
दिवसात अर्जदार यांना अदा करावे.
५. उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्काळ पाठविण्यात यावी.
श्रीमती. कल्पना जांगडे श्रीमती. किर्ती गाडगीळ श्री.उमेश वि. जावळीकर
(सदस्या) (सदस्या) (अध्यक्ष)