::निकालपत्र::
(पारीत व्दारा- सौ.चंद्रिका किशोरसिंह बैस, मा.सदस्या )
(पारीत दिनांक–20 मार्च, 2018)
01. तक्रारकर्त्याने मंचा समक्ष ग्राहक संरक्षण कायदा-1986 चे कलम-12 खाली विरुध्दपक्ष बिल्डर विरुध्द करारा प्रमाणे भूखंडाचे विक्रीपत्र व ताबा न दिल्याचे कारणावरुन दाखल केली आहे.
02. तक्रारकर्त्याचे संक्षीप्त कथन खालील प्रमाणे-
विरुध्दपक्ष क्रं-1) मार्डन सिटी बिल्टकॉन ही एक नोंदणीकृत फर्म असून, विरुध्दपक्ष क्रं-2) व क्रं-3) हे त्या फर्मचे अनुक्रमे व्यवस्थापकीय संचालक व संचालक आहेत आणि फर्मचे नावे ते भूखंड विक्रीचा व्यवसाय करतात. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रं-1) मार्डन सिटी बिल्टकॉन फर्म सोबत मौजा सातनवरी, नागपूर ग्रामीण, जिल्हा नागपूर येथील पटवारी हलका क्रं-52, खसरा क्रं-121 मधील भूखंड क्रं-33, एकूण क्षेत्रफळ-2325 चौरसफूट (216 चौरसमीटर) प्रतीचौरसफूट दर रुपये-185/- प्रमाणे एकूण किम्मत रुपये-4,30,125/- मध्ये खरेदी करण्याचा करार दिनांक-11 जुलै, 2012 रोजी केला. करारा मध्ये तक्रारकर्त्या कडून दिनांक-12/04/2012 रोजी रुपये-5000/- तसेच दिनांक-19/05/2012 रोजी रुपये-20,000/- त्याच प्रमाणे दिनांक-08/07/2012 रोजी रुपये-25,000/- अशा रकमा प्राप्त झाल्याचे विरुध्दपक्ष फर्म तर्फे मान्य करण्यात आले असून उर्वरीत रक्कम रुपये-3,80,125/- प्रतीमाह मासिक समान हप्ता रुपये-7919/- प्रमाणे एकूण-48 मासिक किस्तीमध्ये दिनांक-10/08/2012 ते दिनांक-15/08/2016 पर्यंत देण्याचे ठरले. करारा मध्ये असेही नमुद आहे की, विरुध्दपक्ष हे करार दिनांका पासून दोन वर्षाच्या आत ले आऊट संदर्भात सर्व आवश्यक मंजू-या एन.ए./टी.पी.प्राप्त करतील आणि असे करण्यास विरुध्दपक्ष चुकल्यास भूखंडापोटी जमा केलेली रक्कमवार्षिक 9% दराने व्याजासह विरुध्दपक्ष परत करतील. सदर भूखंड विक्रीचा करार विरुध्दपक्ष फर्म तर्फे विरुध्दपक्ष क्रं-2) तिचा संचालक संतोष सारंगधर कान्हेरकर याने तक्रारकर्त्याचे नावे नोंदवून दिला.
तक्रारकर्त्याने पुढे असे नमुद केले की, करारातील मौजा सातनवरी, नागपूर ग्रामीण येथील भूखंड क्रं-33 पोटी त्याने दिनांक-12/04/2012 ते दिनांक-18/05/2012 पर्यंतचे कालावधीत विरुध्दपक्ष फर्म मध्ये रक्कम रुपये- 2,00,028/- जमा केली. त्यानंतर तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष फर्मचे कार्यालयात डिसेंबर-2013 मध्ये भेट देऊन करारनाम्या प्रमाणे उर्वरीत रक्कम स्विकारुन भूखंडाचे विक्रीपत्र नोंदवून देण्याची विनंती विरुध्दपक्षांकडे केली परंतु विरुध्दपक्षानीं त्यास प्रतिसाद दिला नाही व टाळाटाळ केली.
तक्रारकर्त्याने पुढे असे नमुद केले की, तो आणि त्याचे इतर नातेवाईक व मित्रमंडळी, ज्यांनी विरुध्दपक्ष फर्म सोबत, मौजा सातनवरी नागपूर ग्रामीण येथील भूखंड खरेदी संदर्भात विक्री करार केलेले होते, त्या सर्वांनी मिळून जानेवारी-2014 मध्ये विरुध्दपक्षाची भेट घेतली असता विरुध्दपक्षाने करारा प्रमाणे मौजा सातनवरी, नागपूर ग्रामीण येथील भूखंडाचे विक्रीपत्र नोंदवून देण्यास ते असमर्थ असल्या बाबत कळविले.
तक्रारकर्त्याने पुढे असे नमुद केले की, मौजा सातनवरी, नागपूर ग्रामीण, नागपूर येथील तक्रारकर्ता आणि त्याचे इतर नातेवाईक व मित्रमंडळी यांनी करार केलेल्या भूखंडाचां तपशिल पुढील प्रमाणे आहे-
(1) श्री सीताप्रसाद शुक्ला-भूखंड क्रं-36, क्षेत्रफळ-1615 चौरसफूट
(2) तक्रारकर्ता श्री तारकेश्वर शुक्ला- भूखंड क्रं-33, क्षेत्रफळ-2325
चौरसफूट.
(3) श्री संजय शर्मा- भूखंड क्रं-32, क्षेत्रफळ-2325 चौरसफूट.
(4) श्री अनिल शुक्ला- भूखंड क्रं-37, क्षेत्रफळ-1615 चौरसफूट.
(5) सौ.निलू उदय शुक्ला- भूखंड क्रं-38, क्षेत्रफळ-1615 चौरसफूट.
आणि
(6) श्री दिपनारायण मिश्रा- भूखंड क्रं-34,क्षेत्रफळ-2519 चौरसफूट.
उपरोक्त नमुद व्यक्तींनी करार केलेल्या भूखंडांचे एकूण क्षेत्रफळ-12014 चौरसफूट असून करार केलेल्या मौजा सातनवरी, नागपूर ग्रामीण येथील भूखंडांचे विक्रीपत्र त्यांचे नावे नोंदवून देणे विरुध्दपक्षानां शक्य नसल्याने विरुध्दपक्ष क्रं-(2) अभिजीत रमेशराव लापकाळे याने तक्रारकर्ता आणि त्याचे इतर नातेवाईक व मित्रमंडळी यांचे नावे मौजा शिरुळ, तहसिल हिंगणा, नागपूर, जिल्हा नागपूर येथील पटवारी हलका क्रं-71, खसरा क्रं-145/1 व 145/1-बी मधील भूखंड क्रं-74, एकूण क्षेत्रफळ-6128.97 चौरसफूट, प्रतीचौरसफूट दर रुपये-310/- प्रमाणे एकूण किम्मत रुपये-18,99,980/- मध्ये विकण्याचा करार दिनांक-25/01/2014 रोजी तक्रारकर्त्या सोबत (तक्रारकर्ता स्वतःसाठी व त्याचे नातेवाईक व मित्रमंडळी अन्य पाच जणांसाठी) दिनांक-25/01/2014 रोजी केला. सदर करारा मध्ये असे पण नमुद केलेले आहे की, तक्रारकर्ता आणि त्याचे नातेवाईक व मित्रमंडळी अन्य पाच यांचे कडून मौजा सातनवरी, नागपूर ग्रामीण येथील भूखंडा संबधाने एकूण रुपये-8,00,000/- एवढी रक्कम विरुध्दपक्षास प्राप्त झालेली असून उर्वरीत रक्कम भूखंडाचे विक्रीपत्राचे वेळी देण्याचे ठरले. सदर करारामध्ये असे सुध्दा नमुद केलेले आहे की, करार दिनांक-25/01/2014 पासून एक महिन्याचे आत रजिस्ट्री न केल्यास जमा रक्कम रुपये-8,00,000/- दिनांक-11 जुलै, 2012 पासून वार्षिक-9% दराने परत करण्याचे वचन विरुध्दपक्षाने दिलेले आहे. विरुध्दपक्ष फर्म तर्फे विरुध्दपक्ष क्रं-3) अभिजीत लापकाळे याने रुपये-9,50,000/- एवढया रकमेचा आय.सी.आय.सी.आय.बँकेचा धनादेश दिनांक-21/07/2014 रोजीचा दिलेला असून त्याचा क्रमांक-874955 असा आहे.
तक्रारकर्त्याने पुढे असे नमुद केले की, विरुध्दपक्षाने सुधारीत करारा नुसार मौजा शिरुळ, तहसिल हिंगणा, जिल्हा नागपूर येथील भूखंड क्रं-74 विक्रीपत्र नोंदवून दिले नसल्याने तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रं-3) याने दिलेला सदरील धनादेश त्याचे बँक ऑफ इंडीया, गांधीबाग शाखा नागपूर येथे वटविण्यासाठी टाकला असता तो धनादेश अपर्याप्त निधी या कारणा वरुन न वटविता परत आला. सदर परत आलेल्या धनादेशाची आणि रिर्टन मेमोची प्रत पुराव्यार्थ दाखल केली. अशाप्रकारे विरुध्दपक्षांनी तक्रारकर्त्याची फसवणूक केली आणि अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षांना दिनांक-18/10/2014 रोजी कायदेशीर नोटीस पाठविली परंतु प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून शेवटी तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार ग्राहक मंचा समक्ष दाखल करुन पुढील मागण्या केल्यात-
(1) विरुध्दपक्ष क्रं-(1) ते (3) यांनी दिनांक-25/01/2014 रोजीच्या करारा प्रमाणे मौजा शिरुळ, तहसिल हिंगणा, जिल्हा नागपूर येथील पटवारी हलका क्रं-71, खसरा क्रं-145/1 व 145/1-बी मधील भूखंड क्रं-74, एकूण क्षेत्रफळ-6128.97 चौरसफूटाचे नोंदणीकृत विक्रीपत्र नोंदवून द्दावे.
(2) परंतु करारा प्रमाणे भूखंडाचे विक्रीपत्र नोंदवून देणे विरुध्दपक्षानां शक्य नसल्यास तक्रारकर्त्याने करारातील भूखंडापोटी विरुध्दपक्ष फर्म मध्ये जमा केलेली आंशिक रक्कम रुपये-2,00,028/- दिनांक-25/02/2014 पासून वार्षिक 18% व्याजासह परत करण्याचे विरुध्दपक्षानां आदेशित व्हावे.
(3) तक्रारकर्त्याला झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-2,00,000/- वार्षिक- 18% व्याजासह परत करण्याचे विरुध्दपक्षानां आदेशित व्हावे.
03. विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) यांचे नावे जाहिर नोटीस दैनिक नवभारत दिनांक-17/09/2016 रोजीच्या अंकातून प्रकाशित करण्यात आली, जाहिर नोटीसचे वृत्तपत्रीय कात्रण अभिलेखावर दाखल आहे. तसेच विरुध्दपक्ष क्रं-3) याला रजिस्टर पोस्टाची नोटीस प्राप्त झाल्या बाबत रजिस्टर पोस्टाची पोच अभिलेखावर दाखल आहे परंतु विरुध्दपक्ष क्रं-(1) ते (3) तर्फे कोणीही ग्राहक मंचा समक्ष हजर झाले नाही वा त्यांनी आपले लेखी निवेदनही सादर केले नाही म्हणून विरुध्दपक्ष क्रं-(1) ते (3) यांचे विरुध्द तक्रार एकतर्फी चालविण्याचा आदेश अतिरिक्त ग्राहक मंचाने दिनांक-15/11/2016 रोजी पारीत केला.
04. तक्रारकर्त्याने निशाणी क्रं 3 वरील यादी नुसार दस्तऐवजाच्या प्रती दाखल केल्यात ज्यामध्ये प्रामुख्याने विरुध्दपक्ष फर्म तर्फे करुन देण्यात आलेला भूखंड विक्रीचा करारनामा, विरुध्दपक्ष क्रं-3) याने विरुध्दपक्ष् क्रं-1) व क्रं-2) यांचे वतीने करुन दिलेला करारनामा, विरुध्दपक्ष क्रं-1) फर्मचे नोंदणीकृत प्रमाणपत्र, तक्रारकर्त्याने भूखंडापोटी मासिक किस्ती भरल्या बाबत विरुध्दपक्ष फर्म तर्फे निर्गमित नोंदीचा दस्तऐवज तसेच विरुध्दपक्ष फर्म तर्फे निर्गमित पावत्यांच्या प्रती, ले-आऊट प्लॅन, विरुध्दपक्ष क्रं-3) याने तक्रारकर्त्याला दिलेल्या धनादेशाची प्रत, सदर परत आलेल्या धनादेशाची आणि रिर्टन मेमोची प्रत, तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाला पाठविलेली कायदेशीर नोटीसची प्रत व रजिस्टर पावती, पोस्टाची पोच अशा दस्तऐवजाच्या प्रती दाखल केल्यात.
05. तक्रारकर्त्या तर्फे वकील श्री दुबे यांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला.
06. तक्रारकर्त्याची प्रतिज्ञालेखा वरील तक्रार तसेच प्रकरणातील उपलब्ध दस्तऐवजांच्या प्रती इत्यादींचे काळजीपूर्वक अवलोकन करण्यात आले तसेच तक्रारकर्त्याचे वकीलांचा मौखीक युक्तीवाद यावरुन न्यायमंचाचा निष्कर्ष खालील प्रमाणे आहे-
::निष्कर्ष::
07. तक्रारकर्त्याने (“विरुध्दपक्ष” म्हणजे मे. मार्डन सिटी बिल्टकॉन प्रायव्हेट लिमिटेड, नागपूर या नोंदणीकृत फर्म तर्फे व्यवस्थापकीय संचालक- संतोष सारंगधर कान्हेरकर आणि संचालक, अभिजीत रमेशराव लापकाले असे समजण्यात यावे) विरुध्दपक्ष क्रं-(1) मे.मॉर्डन सिटी बिल्टकॉन या कंपनी कायद्दा अंतर्गत नोंदणीकृत फर्म सोबत ( फर्मचे पंजीकरण प्रमाणपत्र प्रकरणात दाखल आहे) (जिचे विरुध्दपक्ष क्रं-(2) संतोष सारंगधर कान्हेरकर हा व्यवस्थापकीय संचालक आहे तर विरुध्दपक्ष क्रं-(3) अभिजीत रमेशराव लापकाले हा संचालक आहे) प्रस्तावित मौजा सातनवरी, नागपूर ग्रामीण, जिल्हा नागपूर येथील पटवारी हलका क्रं-52, खसरा क्रं-121 मधील भूखंड क्रं-33, एकूण क्षेत्रफळ-2325 चौरसफूट (216 चौरसमीटर) प्रतीचौरसफूट दर रुपये-185/- प्रमाणे एकूण किम्मत रुपये-4,30,125/- मध्ये खरेदी करण्याचा करार दिनांक-11 जुलै, 2012 रोजी केला. करारा मध्ये तक्रारकर्त्या कडून दिनांक-12/04/2012 रोजी रुपये-5000/- तसेच दिनांक-19/05/2012 रोजी रुपये-20,000/- त्याच प्रमाणे दिनांक-08/07/2012 रोजी रुपये-25,000/- अशा रकमा प्राप्त झाल्याचे विरुध्दपक्ष फर्म तर्फे मान्य करण्यात आले असून उर्वरीत रक्कम रुपये-3,80,125/- प्रतीमाह मासिक समान हप्ता रुपये-7919/- प्रमाणे एकूण-48 मासिक किस्तीमध्ये दिनांक-10/08/2012 ते दिनांक-15/08/2016 पर्यंत देण्याचे ठरले करारा प्रमाणे विरुध्दपक्ष हे करार दिनांका पासून दोन वर्षाच्या आत ले आऊट संदर्भात सर्व आवश्यक मंजू-या एन.ए./टी.पी.प्राप्त करतील आणि असे करण्यास चुकल्यास जमा रक्कम वार्षिक 9% दराने व्याजासह विरुध्दपक्ष परत करतील. सदर भूखंड विक्रीचा करार विरुध्दपक्ष फर्म तर्फे विरुध्दपक्ष क्रं-2) तिचा संचालक संतोष सारंगधर कान्हेरकर याने तक्रारकर्त्याचे नावे नोंदवून दिला. तक्रारकर्त्याने आपल्या या म्हणण्याचे पुराव्यार्थ कराराची प्रत दाखल केलेली आहे, यावरुन त्याचे कथनास पुष्टी मिळते.
08. पुढे जानेवारी-2014 मध्ये तक्रारकर्ता आणि अन्य भूखंडाचे करार केलेले त्याचे नातेवाईक आणि मित्रमंडळीनीं विरुध्दपक्षाची भेट घेतली असता विरुध्दपक्षाने करारा प्रमाणे मौजा सातनवरी, नागपूर ग्रामीण येथील भूखंडाचे विक्रीपत्र नोंदवून देण्यास ते असमर्थ असल्या बाबत कळविले.
09. मौजा सातनवरी, नागपूर ग्रामीण येथील भूखंडांचे विक्रीपत्र नोंदवून देणे शक्य नसल्याने विरुध्दपक्ष क्रं-(3) अभिजीत रमेशराव लापकाळे याने तक्रारकर्ता आणि त्याचे इतर नातेवाईक व मित्रमंडळी यांचे नावे मौजा शिरुळ, तहसिल हिंगणा, नागपूर, जिल्हा नागपूर येथील पटवारी हलका क्रं-71, खसरा क्रं-145/1 व 145/1-बी मधील भूखंड क्रं-74, एकूण क्षेत्रफळ-6128.97 चौरसफूट, प्रतीचौरसफूट दर रुपये-310/- प्रमाणे एकूण किम्मत रुपये-18,99,980/- मध्ये विकण्याचा करार दिनांक-25/01/2014 रोजी तक्रारकर्त्या सोबत (तक्रारकर्ता स्वतःसाठी व त्याचे नातेवाईक व मित्रमंडळी अन्य पाच जणांसाठी म्हणजे (1) तक्रारकर्ता श्री तारकेश्वर शुक्ला (2) श्री सीताप्रसाद शुक्ला (3) श्री संजय शर्मा (4) श्री अनिल शुक्ला (5) सौ.निलू उदय शुक्ला (6) श्री दिपनारायण मिश्रा यांचे साठी) दिनांक-25/01/2014 रोजी केला. सदर करारा मध्ये असे पण नमुद केलेले आहे की, तक्रारकर्ता आणि त्याचे नातेवाईक व मित्रमंडळी अन्य पाच यांचे कडून मौजा सातनवरी, नागपूर ग्रामीण येथील भूखंडा संबधाने एकूण रुपये-8,00,000/- एवढी रक्कम विरुध्दपक्षास प्राप्त झालेली असून उर्वरीत रक्कम भूखंडाचे विक्रीपत्राचे वेळी देण्याचे ठरले. सदर कराराची प्रत सुध्दा अभिलेखावर दाखल करण्यात आली.
10. तक्रारकर्त्याची तक्रार प्रतिज्ञालेखावर दाखल आहे. विरुध्दपक्षांना नोटीसची सुचना मिळूनही ते ग्राहक मंचा समक्ष उपस्थित झाले नाहीत वा त्यांनी आपली बाजू मांडलेली नाही किंवा तक्रारकर्त्याचे तक्रारीतील विधाने खोडून काढलेली नाहीत.
11. या ठिकाणी स्पष्ट करण्यात येते की, मौजा सातनवरी, नागपूर ग्रामीण येथील भूखंडाचा करार हा विरुध्दपक्ष क्रं-1) मॉर्डन सिटी बिल्टकॉन प्रायव्हेट लिमिटेड फर्म तर्फे तिचे संचालक विरुध्दपक्ष क्रं-2) संतोष सारंगधर कान्हेरकर याने तक्रारकर्त्याचे नावे स्वतंत्ररित्या नोंदवून दिलेला आहे परंतु मौजा सातनवरी, नागपूर ग्रामीण येथील भूखंडाचे विक्रीपत्र नोंदवून देणे शक्य नसल्याने विरुध्दपक्ष क्रं-3) अभिजीत रमेशराव लापकाळे, संचालक याने तक्रारकर्ता श्री तारकेश्वर शुक्ला याचे सोबत तक्रारकर्ता आणि त्याचे इतर नातेवाईक व मित्रमंडळीं करीता म्हणजे (1) श्री सीताप्रसाद शुक्ला (2) श्री संजय शर्मा (3) श्री अनिल शुक्ला (4) सौ.निलू उदय शुक्ला (5) श्री दिपनारायण मिश्रा यांचे साठी मौजा शिरुळ, तहसिल हिंगणा, नागपूर, जिल्हा नागपूर येथील पटवारी हलका क्रं-71, खसरा क्रं-145/1 व 145/1-बी मधील भूखंड क्रं-74, एकूण क्षेत्रफळ-6128.97 चौरसफूट, प्रतीचौरसफूट दर रुपये-310/- प्रमाणे एकूण किम्मत रुपये-18,99,980/- मध्ये विकण्याचा करार दिनांक-25/01/2014 रोजी नोंदवून दिला, सदर कराराची प्रत सुध्दा पुराव्यार्थ दाखल आहे.
12. तक्रारकर्त्याने मौजा शिरुळ, तहसिल हिंगणा, नागपूर, जिल्हा नागपूर येथील पटवारी हलका क्रं-71, खसरा क्रं-145/1 व 145/1-बी मधील भूखंड क्रं-74, एकूण क्षेत्रफळ-6128.97 चौरसफूटाचे नोंदणीकृत विक्रीपत्र करुन देण्याची मागणी केलेली आहे परंतु मौजा शिरुळ येथील भूखंड विक्रीचा करार हा तक्रारकर्ता आणि अन्य पाच यांचे नावे एकत्रित मिळून आहे, अशा परिस्थितीत एक तर तक्रारकर्त्याने अन्य पाच लोकांना सुध्दा या तक्रारीत पक्षकार म्हणून बनवायचे होते किंवा त्यांचे अधिकारपत्र तक्रारीत दाखल करावयाचे होते परंतु तसे या प्रकरणात झालेले नाही. मौजा शिरुळ येथील भूखंड क्रं-74, एकूण क्षेत्रफळ-6128.97 चौरसफूट यामध्ये तक्रारकर्त्याचे नावाचा किती क्षेत्रफळाचा नेमका भूखंड आहे हे सुध्दा त्या करारात नमुद नाही, सर्व लोकांचे मिळून भूखंडाचे एकूण क्षेत्रफळ करारात दर्शविलेले आहे, या सर्व खुलासेवार बाबींचे अभावामुळे योग्य वस्तुस्थिती मंचा समोर न आल्याने तक्रारकर्त्याचे नावे भूखंडाचे विक्रीपत्र नोंदवून देण्याचे आदेशित करता येणार नाही.
13. मात्र तक्रारकर्त्याने भूखंडापोटी विरुध्दपक्ष फर्म मध्ये जमा केलेली एकूण रक्कम-2,00,028/- शेवटच्या मासिक हप्त्याची रक्कम जमा केल्याचा दिनांक-26/07/2013 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.-18% दराने व्याजासह मिळून येणारी रक्कम परत मिळण्यास तो पात्र आहे. विरुध्दपक्ष फर्म तर्फे भूखंडाचे पैसे तक्रारकर्त्या कडून गोळा करुन त्यास विक्रीपत्र विहित मुदतीत नोंदवून दिले नसल्याने फसवणूक तर केलीच तसेच अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब सुध्दा केलेला आहे, परिणामी तक्रारकर्त्याला शारिरीक व मानसिक त्रास सहन करावा लागल्याने तो शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-10,000/- आणि तक्रारखर्च म्हणून रुपये-5000/-विरुध्दपक्षां कडून मिळण्यास पात्र आहे.
14. उपरोक्त नमुद सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन मंच प्रस्तुत तक्रारी मध्ये खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे-
::आदेश::
1) तक्रारकर्ता श्री तारकेश्वर बृजमोहन शुक्ला यांची, विरुध्दपक्ष क्रं-(1) मार्डन सिटी बिल्टकॉन, नागपूर ही नोंदणीकृत कंपनी तर्फे तिचे संचालक विरुध्दपक्ष क्रं-(2) संतोष सारंगधर कान्हेरकर आणि विरुध्दपक्ष क्रं-(3) अभिजीत रमेशराव लापकाले यांचे विरुध्दची तक्रार वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या अंशतः मंजूर करण्यात येते.
2) उपरोक्त नमुद विरुध्दपक्ष क्रं-(1) ते (3) यांना आदेशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारकर्त्या कडून मौजा सातनवरी, नागपूर ग्रामीण येथील भूखंड क्रं-33 पोटी स्विकारलेली एकूण रक्कम-2,00,028/- (अक्षरी रुपये दोन लक्ष अठ्ठाविस फक्त) शेवटच्या रकमेचा हप्ता अदा केल्याचा दिनांक-26/07/2013 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.-18% दराने व्याजासह येणारी रक्कम तक्रारकर्त्याला परत करावी.
3) तक्रारकर्त्यास झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्त) आणि तक्रारखर्च म्हणून रुपये-5000/-(अक्षरी रुपये पाच हजार फक्त) उपरोक्त नमुद विरुध्दपक्षानीं तक्रारकर्त्यास द्दावेत.
4) सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष क्रं-(1) मार्डन सिटी बिल्टकॉन, नागपूर या नोंदणीकृत कंपनी तर्फे तिचे संचालक विरुध्दपक्ष क्रं- (2) संतोष सारंगधर कान्हेरकर आणि विरुध्दपक्ष क्रं-(3) अभिजीत रमेशराव लापकाले यांनी वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्त झाल्या पासून 30 दिवसांचे आत करावे.
5) निकालपत्राच्या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारांना निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.