तक्रार क्रमांक – 420/2009 तक्रार दाखल दिनांक – 18/06/2009 निकालपञ दिनांक – 22/12/2009 कालावधी - 00 वर्ष 06 महिना 04 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे यांचे समोर शबाना शेख ए-7, महालक्ष्मी वैभव अर्पाटमेंट काटेमानिवली, विठ्ठलवाडी(पु), कल्याण 400 306. .. तक्रारदार विरूध्द दि प्रोपराईटर मिलींद इलेक्ट्रॉनिक्स, शॉप नं. 7, साई कुंज, साई पाथ, गुरूदेव हॉटेलच्या समोर कल्याण(पश्चिम) 421 301. .. विरुध्दपक्ष
समक्ष - सौ. भावना पिसाळ - प्र. अध्यक्षा श्री. पी. एन. शिरसाट - सदस्य उपस्थितीः- त.क तर्फे वकिल आर.एन.तेलगी वि.प एकतर्फा आदेश (पारित दिः 22/12/2009) मा. सदस्य सौ. भावना पिसाळ, यांचे आदेशानुसार 1. सदरहु तक्रार शबाना शेख यांनी मिलींद इलेक्ट्रॉनिक्स यांचे विरुध्द दाखल केली आहे. यामध्ये त्यांनी विरुध्द पक्षकार यांचे कडे त्यांच्या दोषयुक्त इनर्व्हटरचे रु.12,000/- व्याजासकट मागितले आहेत.
2. तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्षकार यांच्या दुकानातून Su-Kam 600 A इनर्व्हटर लिब्रा बॅटरीसकट दि.24/04/2007 रोजी त्याची किंमत रु.12,000/- भरुन 2 वर्षाच्या वॉरंटीसकट घेतला. तदनंतर अवघ्या 3 महिन्यातच इनर्व्हटरमधुन दर दहा मिनटाला 'बीप बीप' आवाल येऊन पावर कट होऊन बंद पडायचा विरुध्द पक्षकार यांच्या कडे तक्रार नोंदवली असता त्यांनी टेक्नीशीयन पाठवला होता व त्यांने दुरूस्तीकरुन वॉरंटीच्या काळात असतानाही रु.1,000/- मजुरी घेतली व सांगितले परत काही दोष दुरूस्त झाला नाही तर पुर्ण इनर्व्हटर बदलून देऊ. तदनंतर सातत्याने इनर्व्हटर मध्ये दोष निर्माण झाले. म्हणुन विरुध्द पक्षकार यांनी सदर .. 2 .. इनर्व्हटर दि.25/10/2008 रोजी ताब्यात घेताना त्याबद्दलचा कोणताही पुरावा किंवा तत्सम पावती देण्याचे त्यांनी नाकारले. दुरूस्तीसाठी नेलेला. इनर्व्हटर ताब्यात घेताना कोणताही पुरावा तत्सम पावती देण्याचे त्यांनी नाकारले. दुरूस्तीसाठी नेलेला इनर्व्हटर विरुध्द पक्षकार यांनी दुरूस्ती करुन परत दिलेलाच नाही. उलट तो विकुन टाकला असे सांगितले. याचा अर्थ सदर इनर्व्हटर व त्याची तक्रारकर्ता यांनी भरलेली किंमत दोन्ही गोष्टी विरुध्द पक्षकार यांच्याच ताब्यात आहेत.
3. विरुध्द पक्षकार यांना मंचाने नोटीस बजावणी करुनही विरुध्द पक्षकार गैरहजर राहिले व सदर प्रकरणात त्यांनी लेखी कैफीयत दाखल केली नाही म्हणुन विरुध्द पक्षकारा विरुध्द मंचाने दि.04/11/2009 रोजी नो डब्ल्यु एस आदेश पारीत केला व एकतर्फा सुनावणी करुन हे मंच पुढील अंतीम आदेश देत आहे. अंतीम आदेश
1. तक्रार क्र. 420/2009 हि अंशतः मंजुर करण्यात येत आहे. विरुध्द पक्षकार यांनी तक्रारकर्तायांस या तक्रारीचा खर्च रु. 1,000/- (रु. एक हजार फक्त) द्यावा. 2.विरुध्द पक्षकार यांच्या ताब्यात सदर इनर्व्हटर आहे त्याची तक्रारकर्ता यांनी भरलेली किंमत रु.12,000/- (रु. बारा हजार फक्त) विरुध्द पक्षकार यांनी तक्रारकर्ता यांस दि.24/07/2007 पासून 9% व्याजाने परत करावी. सदर आदेशाचे पालन या आदेशाची प्रत मिळाल्यापासून 2 महिन्याच्या आत करावे अन्यथा तदनंतर वरील रकमेवर 3% जादा दंडात्मक व्याज द्यावे लागेल. 3.उभयपक्षकारांना या आदेशाची सही शिक्याची प्रत निःशुल्क देण्यात यावी.
4.तक्रारकर्ता-यांनी मा.सदस्यां करिता दाखल केलेले सेट (2 प्रती) त्वरित परत घ्याव्यात, मुदती नंतर मंचाची जबाबदारी नाही.
दिनांक – 22/12/2009 ठिकान - ठाणे (सौ.भावना पिसाळ) (श्री.पी.एन.शिरसाट)
प्र.अध्यक्षा सदस्य जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे भासुटो:\D:\judg.aft.02-06-08
|