Maharashtra

Nagpur

CC/164/2016

PRITI RAMESH DIGRASE - Complainant(s)

Versus

Micromax Ltd. - Opp.Party(s)

28 Nov 2016

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/164/2016
 
1. PRITI RAMESH DIGRASE
R/O. PLOT NO. 150, BANRJI LAYOUT, BHAGWAN NAGAR, NAGPUR-27
Nagpur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Micromax Ltd.
PASCOSE BUILDING, 90-B, SECTORE-18, GURGAO, DILHI-15
Nagpur
Maharashtra
2. MANAGER, BHUTDA MOBILE GALLERY
WARDHA-01
Wardha
Maharashtra
3. M/S MOBILE EXPERT
SHOP NO. 13, HONEY ARCHANA COMPLEX, UNTKHANA ROAD, NAGPUR-12
Nagpur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. VIJAY C. PREMCHANDANI PRESIDENT
 HON'BLE MR. PRADEEP PATIL MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 28 Nov 2016
Final Order / Judgement

(मंचाचा निर्णय : श्री. विजय प्रेमचंदानी - मा. अध्‍यक्ष यांचे आदेशांन्‍वये) 

1.         तक्रारकर्त्‍यानी विरुध्‍द पक्षाविरुध्‍द ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्‍या कलम 12 अन्‍वये प्रस्‍तुत तक्रार दाखल केलेली असुन तक्रारकर्त्‍याचे तक्रारीतील कथन असे आहे की, तक्रारकर्त्‍याने दि.06.11.2014 रोजी विरुध्‍द पक्ष क्र.1 कंपनीचा विरुध्‍द पक्ष क्र.2 यांचे दुकानातून मोबाईल विकत घेतला. सदर मोबाईलमध्‍ये बिघाड असल्‍याने विरुध्‍द पक्ष क्र.3 यांचेकडे दुरुस्‍तीकरीता दिला. त्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने दि.04.11.2015 ला विरुध्‍द पक्ष क्र. 3 चे सेवा केंद्रामध्‍ये परत मोबाईलमधे आलेली त्रुटी सांगितली, तेव्‍हा सेवा केंद्राने मोबाईल कंपनीस पाठवावा लागेल असे सांगून तो आपल्‍याकडे ठेवुन घेतला आणि 8-10 दिवसांनी मोबाईल एकदम नवीन झाला असुन तक्रारकर्त्‍यास आता काही त्रास होणार नाही असे सांगून मोबाईल परत केला व परत दोन दिवसांनंतर मोबाईलमध्‍ये पुन्‍हा समस्‍या निर्माण झाली. म्‍हणून तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाशी संपर्क साधला, परंतु त्‍यांनी त्‍यावर कोणतेही लक्ष दिले नाही म्‍हणून दि.17.12.2015 रोजी तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष क्र. 1 व 2 ला वकीलामार्फत नोटीस पाठविली. विरुध्‍द पक्षांनी नोटीस मिळूनही विरुध्‍द पक्षांनी कोणतीही दखल घेतली नाही, म्‍हणून सदर तक्रार मंचासमक्ष दाखल करण्‍यांत आली.

2.         तक्रारकर्त्‍याने तक्रारीत अशी प्रार्थना केली की, विरुध्‍द पक्षातर्फे मोबाईल उपलब्‍ध करुन द्यावा किंवा मोबाईलची किंमत व्‍याजासह परत करण्‍याचा आदेश व्‍हावा. तसेच तक्रारकर्त्‍यास झालेल्‍या शारीरिक मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई मिळावी आणि तक्रारीचा खर्च मिळावा असा आदेश व्‍हावा.

3.         तक्रारकर्त्‍याची तक्रार स्विकृत करुन विरुध्‍द पक्षांना नोटीस काढण्‍यांत आला, विरुध्‍द पक्षास नोटीसची बजावणी होऊन सुध्‍दा प्रकरणात हजर झाले नाही. म्‍हणून सदर प्रकरण विरुध्‍द पक्षाविरुध्‍द एकतर्फी चालविण्‍याचा आदेश पारित करण्‍यांत आला.  

4.         तक्रारकर्त्‍यातर्फे दाखल तक्रार, दस्‍तावेज तसेच तोंडी युक्तिवाद ऐकण्‍यांत आला असता मंचासमक्ष खालिल मुद्दे विचारार्थ घेण्‍यांत आले.

           मुद्दे                                      निष्‍कर्ष

  1. तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षांचा ग्राहक आहेत काय ? होय.

  2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याप्रती अनुचित व्‍यापार

    प्रथेचा अवलंब केला आहे काय ?                   नाही. 

         3. अंतिम आदेश काय ?                    अंतिम आदेशा प्रमाणे.

    5.         मुद्दा क्र.1 बाबतः- तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष क्र.1 कंपनी निर्मीत झालेला मोबाईल विरुध्‍द पक्ष क्र.2 यांचे दुकानातून विकत घेतला ही बाब तक्रारकर्त्‍याने तक्रारीसोबत निशाणी क्र.2 वर दस्‍त क्र.4 वरील देयकावरुन सिध्‍द होते. सदर वादातील मोबाईलमध्‍ये बिघाड असल्‍यामुळे विरुध्‍द पक्ष क्र.3 यांचेकडे दुरुस्‍तीकरीता दिला होता ही बाब तक्रारकर्त्‍यातर्फे दाखल निशाणी क्र.2 वरील दस्‍त क्र.5 जॉबशिट दि.18.09.2015  वरुन सिध्‍द होते. म्‍हणून तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षांचा ग्राहक आहे हे सिध्‍द होत असल्‍यामुळे तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षांचा ‘ग्राहक’ आहे हे सिध्द होते. सबब मुद्दा क्र. 1 चे उत्‍तर होकारार्थी नोंदविले आहे.

    6.         मुद्दा क्र.2 बाबतः- विरुध्‍द पक्षांना नोटीस काढून सुध्‍दा ते मंचासमक्ष हजर झाले नाही. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षांना मोबाईल दुरुस्‍त करुन देण्‍याबाबत  नोटीस दिला होता. तसेच तक्रारकर्त्‍याचे मोबाईलमध्‍ये वारंवार तांत्रिक बिघाड होत असतांना सुध्‍दा विरुध्‍द पक्षांनी त्‍याबाबत कोणतीही दखल घेतली नाही. तसेच तक्रारकर्त्‍याने तक्रारीत विरुध्‍द पक्षाविरुध्‍द मागणी केलेले कथन त्‍याने दाखल केलेल्‍या सत्‍यापनावरुन सिध्‍द होत आहे. म्‍हणून विरुध्‍द पक्षांनी तक्रारकर्त्‍यास सेवेत त्रुटी व अनुचित व्‍यापार प्रथेचा अवलंब केल्‍याचे सिध्‍द होते. सबब मुद्दा क्र. 2 चे उत्‍तर होकारार्थी नोंदविण्‍यांत आले.

    7.         मुद्दा क्र.3 बाबतः- मुद्दा क्र. 1 व 2 चे विवेचनावरुन मंच खालिलप्रमाणे अंतिम आदेश पारित करीत आहे.

                                - // अंतिम आदेश // - 

    1.    तक्रारकर्त्‍याची ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 12 अंतर्गत दाखल तक्रार अंशतः मंजूर करण्‍यांत येते.

    2.    विरुध्‍द पक्ष क्र. 1 ते 3 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्‍तरित्‍या तक्रारकर्त्‍यास मोबाईलची किंमत रु.8,100/- परत करावी.

    3.    विरुध्‍द पक्ष क्र. 1 ते 3 यांनी तक्रारकर्त्‍यास झालेल्‍या शारीरिक, मानसिक त्रासापोटी रु.5,000/- व तक्रारीचा खर्च रु.2,500/- अदा करावा.

    4.  विरुध्‍द पक्ष क्र. 1 ते 3 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्‍तरित्‍या वरील आदेशाची अंमलबजावणी आदेशाची प्रत मिळाल्‍याचे दिनांकापासुन 30 दिवसांचे आंत करावी.

    5.  उभय पक्षास सदर आदेशाची प्रथम प्रत निशुल्‍क द्यावी.

    6.    तक्रारकर्त्‍याला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.

 
 
[HON'BLE MR. VIJAY C. PREMCHANDANI]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. PRADEEP PATIL]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.