Maharashtra

Nagpur

CC/440/2016

Smt. Sunita Sanjay Topare - Complainant(s)

Versus

Micromax Inframatics Ltd., Through Managing Director/Marketing Manager - Opp.Party(s)

Adv. A.T. Sawal

29 Oct 2018

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/440/2016
( Date of Filing : 14 Jun 2016 )
 
1. Smt. Sunita Sanjay Topare
R/o. Ramdaspeth, Nagpur 440010
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. Micromax Inframatics Ltd., Through Managing Director/Marketing Manager
Office- Block A, Plot No. 21/1, Narayan Industrial Estate Area, New Delhi 110028
New Delhi
New Delhi
2. Mobile Den, Through Prop. /Authorised Singnatary
Office- 56, Shri Manyogi Apartment, Ground Floor, Near Exsting Mobile, Dharampeth, Nagpur 440010
NAGPUR
MAHARASHTRA
3. L. Raza Micromax, Through Authorised Service Centre
Office- HDFC Bank Galli, First Left, Inder-Anand Apartment, Dhantoli, Nagpur
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MR. NITIN M. GHARDE MEMBER
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 
For the Complainant:Adv. A.T. Sawal, Advocate
For the Opp. Party:
Dated : 29 Oct 2018
Final Order / Judgement

 

(मा. सदस्या श्रीमती चंद्रिका बैस  यांच्या आदेशान्वये)

आदेश

  1. तक्रारकर्तीने सदर तक्रार ग्राहक सरंक्षण कायदा 1986 चे कलम 12 अन्वये दाखल केली असुन तक्रारकर्तीची तक्रार खालीलप्रमाणे..
  2. तक्रारकर्ता हा वि.प.क्रं.1 चा ग्राहक आहे. वि.प.क्रं.1 हे वि.प.क्रं.2 मायक्रोमॅक्स कंपनीचे डिलर आहेत. वि.प. क्रं.3 हे अधिकृत सर्व्हिस सेंटर आहे. तक्रारकर्तीने दिनांक 24.10.2014 रोजी देयक क्रं. एमडी 22668 यानुसार एक मायक्रोमॅक्स हॅन्डसेट रुपये 4600/- वि.प. क्रं.1 कडुन खरेदी केला होता. ज्याचा रजिस्ट्रेशन क्रं.IMEI 9011362557142420 असा आहे. मोबाईल खरेदी केल्यानंतर वि.प. क्रं.2 ने आपल्या दुकानाची दोन वर्षाची वॉरन्टी असल्याचे सांगीतले होते. परंतु तक्रारकर्त्याचे म्हणण्‍याप्रमाणे तक्रारकर्तीने जेव्हा वि.प.क्रं.2 कडुन मोबाईल विकत घेतल्यानंतर 2 महिन्यात तो प्रॉब्लेम येत होता. परंतु काय प्राब्लेम काय आहे हे त्यांचे लक्षात येत नव्हते व वि.प.क्रं.3 ने त्यांचा मोबाईल सर्व्हीस सेंटर मधे द्यावा लागले सांगीतले. त्यांनतर वि.प.क्रं.3 कडे दिनांक 18.8.2015 रोजी सदर मोबाईल दुरुस्तीकरिता टाकला असता त्यांनी तक्रारकर्त्याला आश्‍वासीत केले की, आता कुठलीही समस्या येणार नाही. परंतु परत दिनांक 23.10.2015 रोजी तक्रारकर्तीचा मोबाईल वि.प.क्रं.3 कडे देणे भाग पडले. व त्यांनतर वि.प.क्रं.3 ने आजपर्यत तक्रारकर्तीचा मोबाइल दुरुस्त करुन दिला नाही. तक्रारकर्तीने वारंवार वि.प.कडे मोबाईलची मागणी केली असता वि.प.क्रं.3 ने तक्रारकर्तीस असे सांगीतले की, त्यांचा मोबाईल वॉरन्टी मधे असल्याने व काय समस्या आहे हे लक्षात येत नसल्याने कंपनीकडुन मोबाईल बदलवून देऊ. परंतु आजपर्यत तक्रारकर्तीचा मोबाईल बदलवून दिला नाही व नवीन मोबाईल ही दिला नाही. यावरुन तक्रारकर्तीस वि.प. ने बनावटी मोबाईल विकुन तक्रारकर्तीची फसवणुक केली व अनुचित व्यापार पध्‍दतीचा अवलंब केल्याचे दिसून येते. वि.प.क्रं.3 कडे तक्रारकर्तीने मोबाईल दुरुस्तीकरिता दिला होता परंतु विरुध्‍द पक्षाने मोबाईल दुरुस्त करुन दिला नाही यावरुन विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीचे सेवेत त्रुटी केल्याने दिसून येते. सबब तक्रारकर्तीने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल करुन खालीलप्रमाणे मागणी केली आहे.
  3. वि.पक्षाने मोबाईलची खरेदी किंमत रुपये 6,400/-, 24 टक्के व्याजासह परत करावी. किंवा वि.प.क्रं.1 ते 3 ला आदेशीत करावे की, तक्रारकर्तीला जून्या मोबाईल ऐवजी नवीन मोबाईल द्यावा. तसेच तक्रारकर्तीला झालेल्या शारिरिक व मानसिक त्रासापोटी रुपये 5,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 5,000/- मिळावी अशी मागणी केली आहे.
  4. तक्रारकर्तीची तक्रार स्वीकृत करुन विरुध्‍द पक्षाला नोटीस काढण्‍याचा आदेश पारित करण्‍यात आला. विरुध्‍द पक्ष क्रं.1 तक्रारीत हजर झाले परंतु संधी देऊनही  तक्रारीला उत्तर दाखल केले नाही म्हणुन तक्रार त्यांचे विरुध्‍द विनालेखी जवाब चालविण्‍याचा आदेश व विरुध्‍द पक्ष क्रं. 2 व 3 नोटीस मिळूनही  तक्रारीत हजर झाले नाही म्हणुन त्यांचे विरुध्‍द एकतर्फी चालविण्‍याचा आदेश दिनांक 15.06.2018 पारित करण्‍यात आला.
  5. तक्रारकर्तीने तक्रारीत दाखल दस्तऐवजांचे अवलोकन केले असता मंचाचे विचारार्थ खालील मुद्दे येतात व त्यांचा निष्‍कर्ष खालील प्रमाणे देण्‍यात येतात.

मुद्दे                                                    निष्‍कर्ष

  1. तक्रारकर्ती ही विरुध्‍द पक्षाची ग्राह‍क आहे काय ?           होय
  2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्याचे सेवेत त्रुटी केली आहे काय ?       होय
  3. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्याचे प्रती अनुचित व्यापार

पध्‍दतीचा अवलंब केला आहे काय                              होय

  1. आदेश                                                                   अंतीम  आदेशाप्रमाणे

-// -  कारणमिमांसा  -\\-

  1. तक्रारकर्तीने वि.प.कडुन रूपये 6,400/-, नि.क्रं.2 वर मोबाईल घेतल्याबाबतचे देयक दाखल केले आहे.त्याप्रमाणे नि.क्रं.3 वर वि.प. क्रं.3 कडे मोबाईल दुरुस्ती दिल्याबाबतच्या पावत्या दाखल केल्या आहेत. त्याचप्रमाणे नि.क्र.4 वर मोबाईल मधे असलेल्या दोषासंबंधीचे दस्तऐवज दाखल केले आहेत. तसेच नि.क्र.10,11,12 वर तक्रारकर्तीने वि.प.ला पाठविलेली नोटीसची प्रत दाखल केली आहे. सदर दस्तऐवज अवलोकन केले असता तक्रारकर्तीने वि.पक्रं.1 कडुन रुपये 6,400/- मोबाईल घेतला परंतु त्याचा उपभोग तक्रारकर्ती घेऊ शकली नाही वारंवार मोबाईल नादुरुस्त होत असल्याने तिला वि. प.क्रं.3 सर्व्हीस सेंटरला दुरुस्तीकरिता द्यावा लागात होता. दोन वेळा मोबाईल दुरुस्त करुनही परत त्यात दोष निर्माण झाल्याने परत मोबाईल वि.प.क्र.3 कडे दुरुस्ती करिता दिला असता वि.प.क्रं.3 ने तक्रारकर्तीला सांगीतले की तुम्हाला नवीन मोबाईल कंपनीकडुन बदलवुन देऊ परंतु आजपर्यत वि.प.क्रं.3 ने जुना मोबाईल दुरुस्त करुन दिला नाही अथवा नवीन मोबाईल कंपनीकडुन दिला नाही. यावरुन वि.प.1 ते 3 यांनी अनुचित व्यापार पध्‍दतीचा अवलंब करुन तक्रारकर्तीचे सेवेत त्रुटी केल्याचे सिध्‍द होते.सबब खालीलप्रमाणे आदेश पारित करण्‍यात येतो.

-//   अंतीम आदेश  // -

  1. तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.
  2. विरुध्‍द पक्ष क्रं. 1 ते 3 यांनी तक्रारकर्तीला त्याच मॉडेलचा व त्याच कंपनीचा नवीन मोबाईल द्यावा. अथवा ते शक्य नसल्यास मोबाईलची किंमत रुपये 6,400/- दिनांक 24.10.2014 पासुन द.सा.द.शे. 18 टक्के दराने, रक्कमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो देण्‍यात यावी.
  3. तक्रारकर्तीला  झालेल्या शारिरिक, मानसिक त्रासापोटी रुपये 3,000/- (रुपये तीन हजार फक्त) तसेच तक्रारीचे खर्चापोटी रुपये 2,000/-(रुपये दोन हजार फक्त) द्यावे.
  4. वरील आदेशाचे पालन विरुध्‍द पक्ष क्रं.1 ते 3 ने आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसाचे आत वैयक्तीक अथवा संयुक्तीरित्या करावे.
  5. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत नि:शुल्‍क द्यावी.
  6. तक्रारकर्त्‍याला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. NITIN M. GHARDE]
MEMBER
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.