जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 271/2015.
तक्रार दाखल दिनांक : 30/06/2015.
तक्रार आदेश दिनांक : 16/02/2016. निकाल कालावधी: 00 वर्षे 07 महिने 17 दिवस
दावल पांडुरंग शिंदे, वय 42 वर्षे, व्यवसाय : नोकरी,
रा. 225, कित्तूर चिन्नमा नगर, विजापूर रोड, सोलापूर-413 004. तक्रारदार
विरुध्द
(1) मायक्रोमॅक्स इन्फॉर्मेटीक्स् लि., 21/14अ, फेज 2, नारायण
इंडस्ट्रीयल एरिया, दिल्ली – 110 028.
(2) हुमा गिफ्टस्, प्रोप्रा. हाशम शेख, रा. 104, दक्षीण सदर बझार,
हुमा मेडीकलच्या समोर, सोलापूर – 413 003.
(3) मे. वुई केअर, शॉप नं.11, वॉटरफ्रंट, सात रस्त्याजवळ,
कंबर तलाव, सोलापूर – 413 001. विरुध्द पक्ष
गणपुर्ती :- श्री. मिलिंद बी. पवार (हिरुगडे), अध्यक्ष
श्री. ओंकारसिंह जी. पाटील, सदस्य
सौ. बबिता एम. महंत (गाजरे), सदस्य
तक्रारदार यांचेतर्फे विधिज्ञ : आर.एफ. सोनिमिंडे
विरुध्द पक्ष यांचेतर्फे विधिज्ञ : व्ही.पी. सुरवसे
आदेश
श्री. मिलिंद बी. पवार (हिरुगडे), अध्यक्ष यांचे द्वारा :-
1. प्रस्तुत प्रकरण आज दि.16/2/016 रोजी सुनावणीसाठी मंचापुढे आले असता तक्रारदार यांनी अभिलेखावर पुरसीस दाखल केली आणि उभय पक्षांमध्ये तडजोड झाल्याचे नमूद केले. त्यांच्या पुरसीसप्रमाणे उभयतांमध्ये रु.15,000/- रकमेमध्ये तडजोड झालेली आहे आणि विरुध्द पक्ष यांनी दिलेला धनादेश क्र.714243 तक्रारदार यांनी स्वीकारला आहे. तसेच पुरसीसप्रमाणे तक्रारदार यांनी मुळ बील, मोबाईल हँडसेट व त्यासोबतचे इतर साहित्य विरुध्द पक्ष यांचे विधिज्ञांना परत केले. तक्रारदार यांच्या वादाचे निराकरण झाल्यामुळे तक्रारदार यांनी तक्रारदार काढून घेत असल्याचे नमूद केलेले आहे. अशाप्रकारे तक्रारदार यांच्या पुरसीसप्रमाणे तक्रार निकाली काढण्यात येते.
(श्री. ओंकारसिंह जी. पाटील) (सौ. बबिता एम. महंत-गाजरे) (श्री. मिलिंद बी. पवार÷-हिरुगडे)
सदस्य सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.
-00-
(संविक/स्व/16216)