Maharashtra

Nagpur

CC/194/2018

TULSIDAS MAHADEV MESHRAM - Complainant(s)

Versus

MICROMAX INFORMATICS & OTHERS, DIRECTOR/ CUSTOMER SERVICES OFFICER , MICROMAX CARE ALRAZA MOBILE SER - Opp.Party(s)

SELF

17 Jun 2019

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/194/2018
( Date of Filing : 06 Mar 2018 )
 
1. TULSIDAS MAHADEV MESHRAM
R/O. B-5/33, BINAKI HUDKO COLONY, NEAR RANIDURGAVATI NAGAR, NAGPUR-440017
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. MICROMAX INFORMATICS & OTHERS, DIRECTOR/ CUSTOMER SERVICES OFFICER , MICROMAX CARE ALRAZA MOBILE SERVICES CENTER
GROUND FLOOR BLOCK NO. G-22, 23& 24, RATAN PLAZA COMPLEX , OPP. RAILWAY STATION GATE, SANTRA MARKET ROAD, NAGPUR-440001
NAGPUR
MAHARASHTRA
2. DIRECTOR , M/S RAHUL MOBILE & TRAVELS PURI COMPLEX
PURI BAZAR, BHAJI MANDI ROAD, ITWARI, NAGPUR-440002
NAGPUR
MAHARASHTRA
3. CUSTOMER SERVICES OFFICER/ MANAGING DIRECTOR, MICROMAX INFORMATICS LTD.
90-B SECTOR-18, GURGAON HARIYANA-122015/ 21/14A PASE II, NARAYANA, INDUSTRIAL AREA DELHI-110028
GURGAON
HARYANA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
For the Complainant:SELF, Advocate
For the Opp. Party:
Dated : 17 Jun 2019
Final Order / Judgement

आदेश

 

मा.अध्‍यक्ष , श्री. संजय वा. पाटील यांच्‍या आदेशान्‍वये

  1.      तक्रारकर्त्‍याने ग्राहक संरक्षण कायद्याच्‍या कलम 12 अन्‍वये प्रस्‍तुत तक्रार दाखल केली असून त्‍यात असे नमूद केले आहे की, त्‍याने विरुध्‍द पक्ष क्रं. 2 यांच्‍याकडून मायक्रोमॅक्‍स कंपनीचा एस. 301 हा मोबाईल रुपये 2100/- ला खरेदी केला. सदरहू मोबाईल हा अॅंड्रोइड मोबाईल असून त्‍यामध्‍ये वायफाय मध्‍ये तांत्रिक बिघाड होता ही गोष्‍ट तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष 2 ला सांगितली असता विरुध्‍द पक्ष क्रं. 2 यांनी विरुध्‍द पक्ष क्रं. 1 मायक्रोमॅक्‍स कंपनीच्‍या सर्विस सेंटर मधून डी.आय.ओ. आणायला सांगितला आणि त्‍यानंतर मोबाईलची किंमत परत करण्‍याचे आश्‍वासन दिले. त्‍याप्रमाणे तक्रारकर्ता विरुध्‍द पक्ष 1 मायक्रोमॅक्‍स  कंपनीच्‍या सर्विस सेंटर मध्‍ये गेला आणि डी.आय.ओ. बनवून मागितला असता त्‍यांनी डी.आय.ओ. दिला नाही आणि मोबाईल बदलून मिळणार नाही, परंतु सदरहू मोबाईल मधील तांत्रिक बिघाड दुरुस्‍त करुन देऊ असे सांगितले आणि त्‍या प्रमाणे दिनांक 14.04.2017 रोजी जॉब शीट बार कोड नं. W030613-0417-28437518 दिला आणि मोबाईल स्‍वतःकडे ठेवून घेतला. त्‍यानंतर 3  महिन्‍या पर्यंत मोबाईल दुरुस्‍त करुन दिला नाही. त्‍यासाठी तक्रारकर्त्‍याला पत्र व्‍यवहार करावा लागला, रजि.नोटीस पाठविली, त्‍याप्रमाणे दिनांक 14.06.2017 रोजी मायक्रोमॅक्‍स कंपनीचा एसएमएस आला आणि सदरहू एसएमएस मध्‍ये  सांगितल्‍याप्रमाणे तक्रारकर्त्‍याने कंपनीला ई-मेल केला परंतु विरुध्‍द पक्ष यांनी त्‍याची  दखल घेतली नाही. विरुध्‍द पक्ष 2 यांनी सुध्‍दा सदरहू मोबाईल बदलवून दिला नाही. अनेक वेळा प्रयत्‍न करुन ही तक्रारकर्त्‍याला वादातीत मोबाईल दुरुस्‍त करुन मिळाला नाही व त्‍याऐवजी दुसरा नविन मोबाईल ही मिळाला नाही. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष 2 यांना रजि. पोस्‍टाने पत्र पाठविले आणि 1200/-रुपयाची मागणी केली परंतु त्‍यांनी रक्‍कम देण्‍यास टाळाटाळ केली. म्‍हणून वर्तमान तक्रार मंचात दाखल करुन विरुध्‍द पक्ष यांच्‍याकडून देयता फरक बाकी रुपये 900/-ची मागणी केलेली आहे आणि खर्चाची ही मागणी केलेली आहे.
  2.      विरुध्‍द पक्ष क्रं. 1 ते 3 यांना मंचाची नोटीस प्राप्‍त झाल्‍यावर ही ते मंचासमक्ष हजर न झाल्‍यामुळे त्‍यांच्‍या विरुध्‍द प्रकरण एकतर्फी चालविण्‍याचा आदेश पारित करण्‍यात आला.   

 

  1.     तक्रारकर्त्‍यानी दाखल केलेली तक्रार, त्‍यासोबत दाखल केलेले दस्‍तावेज  व तक्रारकर्त्‍याच्‍या वकिलाचा तोंडी युक्तिवाद ऐकून घेतल्‍यावर मंचाने खालील मुद्दे विचारार्थ घेऊन त्‍यावरील कारणमिमांसा खालीलप्रमाणे नमूद करीत आहे.

अ.क्रं.       मुद्दे                                            उत्‍तर

1.  तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ॽ               होय

2.  विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा देऊन आणि

    अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब केला काय                  होय

3.  काय आदेश ॽ                                      अंतिम आदेशाप्रमाणे  

                                                           कारणमिमांसा   

  1. मुद्दा क्रमांक 1, 2 व 3 बाबत -  तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष 2  कडून दिनांक 01.04.2017 ला रुपये 2100/- ला खरेदी केली असल्‍याची पावती नि.क्रं. 2 (1)  दाखल आहे. तसेच तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष 1 यांच्‍याकडे मोबाईल दुरुस्‍तीकरिता दिली असल्‍याची जॉबशीट कार्ड नि.क्रं. 2(2) वर दाखल केली आहे. तसेच तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष यांच्‍याशी केलेल्‍या पत्र व्‍यवहार,  विरुध्‍द पक्ष यांना पाठविलेल्‍या ई-मेलची प्रत, विरुध्‍द पक्ष 1 यांनी तक्रारकर्त्‍याला पाठविलेल्‍या दि. 18.06.2017 च्‍या पत्राची प्रत, ई-मेल उत्‍तराची प्रत इत्‍यादी दस्‍तावेज अभिलेखावर दाखल केली आहे. बार कोडसाठी डी.आय.ओ. मागतिलेल्‍या पत्राची प्रत अभिलेखावर दाखल आहे. यावरुन असे दिसून येते की, विरुध्‍द पक्ष 2 यांनी तक्रारकर्त्‍याला उत्‍पादित दोष असलेला मोबाईल हॅन्‍डसेट विकलेला होता आणि त्‍यामध्‍ये वायफाय बाबतची तांत्रिक त्रुटी होती. सदरचा मोबाईल दुरुस्‍तीकरिता देऊन ही मोबाईल दुरुस्‍त करुन दिला नाही. तसेच विरुध्‍द पक्ष 2 यांनी तक्रारकर्त्‍याला डी.आय.ओ. ही दिला नाही व वादातीत मोबाईल ऐवजी दुसरा नविन मोबाईल ही दिला नाही. तक्रारकर्त्‍याला  सदरहू मोबाईल हॅन्‍डसेट बदलून मिळण्‍याकरिता विरुध्‍द पक्षाकडे वारंवांर जावे लागले तसेच पत्र व्‍यवहार ही करावा लागला. अशा प्रकारे विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा देऊन अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब केले असल्‍याचे दिसून येते.
  2.      विरुध्‍द पक्ष यांना मंचाची नोटीस प्राप्‍त झाल्‍यावर ही ते मंचासमक्ष हजर झाले नाही अथवा आपले म्‍हणणे सादर केले नाही. यावरुन तक्रारकर्त्‍याने तक्रारीत विरुध्‍द पक्ष यांच्‍यावर लावलेले आरोप विरुध्‍द पक्ष यांना मान्‍य असल्‍याचे स्‍पष्‍ट होते. म्‍हणून तक्रारकर्ता विरुध्‍द पक्ष यांच्‍याकडून शारीरिक,मानसिक त्रासाकरिता नुकसानभरपाई म्‍हणून रुपये 2000/- व तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये 1000/- मिळण्‍यास पात्र आहे असे आमचे मत आहे. म्‍हणून वरील मुद्दयांचे उत्‍तर होकारार्थी नोंदविण्‍यात येते.

                सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करण्‍यात येते.  

               अंतिम आदेश

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार मंजूर करण्‍यात येते.
  2. विरुध्‍द पक्ष 1 ते 3 यांनी वैयक्तिकरित्‍या अथवा संयुक्‍तरित्‍या तक्रारकर्त्‍याला वादातीत मोबाईलची किंमत रक्‍कम रुपये 2100/- त्‍वरित द्यावी व सदरहू रक्‍कमेवर आदेश पारित दिनांकापासून द.सा.द.शे. 10 टक्‍के दराने व्‍याज प्रत्‍यक्ष रक्‍कम अदायगी पर्यंत द्यावे.
  3. विरुध्‍द पक्ष 1 ते 3 यांनी वैयक्तिकरित्‍या अथवा संयुक्‍तरित्‍या तक्रारकर्त्‍याला शारीरिक मानसिक त्रासाबाबत  रुपये 2,000/- व  तक्रारीचा खर्च रुपये 1,000/- द्यावेत.
  4. वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून एक   महिन्‍याच्‍या आत विरुध्‍द पक्ष 1 ते 3 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्तिकरित्‍या करावी.
  5. उभय पक्षानां आदेशाची प्रत निःशुल्क देण्‍यात यावी.
  6. तक्रारकर्त्याला  प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.