Maharashtra

Satara

cc/14/209

Shri Ajay Yashwant Ingawale - Complainant(s)

Versus

Micromax Informatics Ltd - Opp.Party(s)

Bhosale

09 Oct 2015

ORDER

Consumer Disputes Redressal
Forum, Satara
 
Complaint Case No. cc/14/209
 
1. Shri Ajay Yashwant Ingawale
Malyachi Wadi, Kanher, District Satara
...........Complainant(s)
Versus
1. Micromax Informatics Ltd
21/14, A wing 2, Narina Industrail Area, Delhi 110028
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. SAVITA BHOSALE PRESIDENT
 HON'BLE MR. SHRIKANT KUMBHAR MEMBER
  HON'BLE MRS.SUREKHA HAJARE MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

सातारा जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच यांचेसमोर

उपस्थिती -  मा.सौ.सविता भोसले,अध्‍यक्षा

          मा.श्री.श्रीकांत कुंभार,सदस्‍य

           मा.सौ.सुरेखा हजारे, सदस्‍या.            

             

                तक्रार अर्ज क्र. 209/2014.

                      तक्रार दाखल दि.10-12-2014.

                            तक्रार निकाली दि.09-10-2015. 

 

श्री.अजय यशवंत इंगवले,

रा.माळयाची वाडी,पो.कण्‍हेर,ता.जि.सातारा.             ‍ ...  तक्रारदार.

  

         विरुध्‍द

 

1. मायक्रोमॅक्‍स इनफॉरमॅटीक लिमीटेड,

   तर्फे मॅनेजर,

   21/24 ए, फेज-2, नरीना इंडस्‍ट्रीअल एरीया,

   दिल्‍ली -110 028.

2. बालाजी मोबाईल्‍स,

   तर्फे मॅनेजर,

   रा. शॉप नं.17,18, शाहू स्‍टेडीयम,

   एस.टी.स्‍टँण्‍ड शेजारी, सातारा.

3. शिवकाल मोबाईल लिंक,

   तर्फे मॅनेजर,

   रा.शॉप नं.2/3, कपिला पार्क,

   कनिष्‍क मंगल कार्यालयाशेजारी,

   सदरबझार, सातारा 415 001.                    ....  जाबदार.

 

                             तक्रारदारातर्फे अँड.एन.व्‍ही. भोसले.

                             जाबदार क्र. 1 तर्फे अँड.एस.एम.क्षीरसागर.                            

                     जाबदार क्र. 2 व 3 तर्फे एकतर्फा.                  

 

न्‍यायनिर्णय

 

(सदर न्‍यायनिर्णय मा.सौ.सविता भोसले, अध्‍यक्षा यानी पारित केला)

                                                                                     

1.  तक्रारदाराने प्रस्‍तुत तक्रार अर्ज ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 नुसार दाखल केला आहे.  तक्रारअर्जातील थोडक्‍यात मजकूर पुढीलप्रमाणे-

    तक्रारदार हे मौजे माळयाची वाडी, ता.जि.सातारा येथील कायमचे रहिवाशी असून जाबदार क्र.1 ही मोबाईल कंपनी आहे.  तर जाबदार क्र.2 हे जाबदार क्र. 1 कंपनीचे अधिकृत मोबाईल विक्रेते आहेत व जाबदार क्र. 3 हे जाबदार क्र. 1 कंपनीचे अधिकृत सर्व्‍हीस सेंटर आहे.  तक्रारदाराने जाबदार क्र. 1 कंपनीचा मोबाईल जाबदार क्र. 2 यांचेकडून दि. 8/12/2014 रोजी मायक्रोमॅक्‍स कंपनीचा MICROMAX A250,IMEI/ESN No.911334750050362/911334750254360 निळया रंगाचा मोबाईल रक्‍कम रु.19,500/- (रुपये एकोणीसहजार पाचशे मात्र) ला खरेदी केला.  प्रस्‍तुत तक्रारदार हे बांधकाम व्‍यवसायात व्‍यवस्‍थापक म्‍हणून काम करीत असल्‍याने त्‍याना बांधकामाचे आर्किटेक्‍चर प्‍लॅन पाहणे, वेगवेगळया इंटरनेटवरुन ड्राईंग काढणे, नेट बँकींग, ई-मेल करण्‍यासाठी संवादासाठी मोबाईल अत्‍यावश्‍यक असल्‍याने सदरचा मोबाईल तक्रारदाराने खरेदी केला होता.  परंतू खरेदीनंतर लगेचच दोन महिन्‍यात सदर मोबाईलचे टचपॅडमध्‍ये दोष दिसून आला.  सदर मोबाईलचे कीनॅडवरील शब्‍द A to I  यापैकी कोणत्‍याही शब्‍दाचे बटण दाबल्‍यास  खालील अक्षरे स्‍क्रीनवर दिसत होती.  सदर मोबाईलचे स्‍क्रीनवर ज्‍या अक्षराचे बटन दाबले ती अक्षरे न येता वेगळीच अक्षरे येत होती.  सदर दोषांमुळे बांधकाम व्‍यवसायाबाबत संपर्क साधू शकले नाही. व सदर मोबाईलवरुन इतरांना संपर्क करणे शक्‍य झाले नाही.  तसेच मोबाईलव्‍दारे होणारी वर नमूद सर्व कामे करता आली नाहीत.  प्रस्‍तुत मोबाईलमधील सदर दोषांमुळे तक्रारदार यांना नाहक त्रास सहन करावा लागला.  सदर मोबाईलला एक वर्षाची वॉरंटी असलेने तक्रारदार यांनी प्रस्‍तुत मोबाईल दुरुस्‍तीकरीता जाबदार क्र. 3 यांचेकडे दिला असता जाबदार क्र. 3 ने मोबाईल दुरुस्‍तीस जाणूनबुजून वेळ लावला व सदर मोबाईलमधील टच पॅडमधील दोष पूर्णपणे काढून दिला नाही. व वारंवार तक्रारदाराला हेलपाटे मारणेस सांगून अपमानास्‍पद वागणुक दिली तसेच सदर मोबाईलमधील टच पॅड मधील दोष निघाला नसलेने तक्रारदाराने जाबदार क्र. 1 कंपनीचे नवे टच पॅड जाबदार क्र. 3 चे सर्व्‍हीस सेंटरमध्‍ये दि.28/5/2014 रोजी खरेदी करुन सदर मोबाईलला बसवले.  प्रस्‍तुत नवीन टचपॅड खरेदी करणेस तक्रारदार यांना रक्‍कम रु.7,565/- (रुपये सात हजार पाचशे पासष्‍ट मात्र) एवढा खर्च आला.  वास्‍तविक सदरचा मोबाईल हा वॉरंटी कालावाधीत असल्‍याने जाबदाराने स्‍वखर्चाने दुरुस्‍त करुन देणे गरजेचे होते.  परंतू तो दिला नाही.  तसेच त्‍यानंतरदेखील सदर मोबाईलमध्‍ये वेगवेगळया तक्रारी व दोष दिसत होते. वारंवार बॅटरी डाऊन होऊन सदर मोबईलला चार्जिंग होत नव्‍हते.  तसेच सदर मोबाईल चालू अगर बंद असताना  हँग होत होता.  तसेच मोबाईलचे स्पिकर चालु बंद करीत असताना हँग होत होता.  तसेच मोबाईलचे स्‍पीकर दोषमुक्‍त होते त्‍यामुळे पुन्‍हा दि.9/9/2014 रोजी सदर मोबाईल तक्रारदाराला मिळाला परंतू तरीही प्रस्‍तुत मोबाईलमध्‍ये दोष असलेचे दिसून आले व प्रस्‍तुत मोबाईल हा पूर्णपणे दोषयुक्‍त असा असलेने उत्‍पादन दोष Manufacturing Defect  असलेने तो दुरुस्‍त होण्‍यासारखा नव्‍हता व नाही व जाबदाराने अद्यापपर्यंत सदरचे दोष दुरुस्‍त करुन दिलेले नाहीत.  प्रस्‍तुत मोबाईल वारंवार जाबदारांकडे दुरुस्‍तीस देऊनही मोबाईल पूर्णपणे दोषमुक्‍त करुन दिला नाही व जाबदाराने तक्रारदाराना दोषपूर्ण मोबाईल विक्री केला व सेवेत कमतरता केली.  तक्रारदाराने दि.27/10/2014 रोजी जाबदाराकडे तक्रार केली.  परंतू जाबदार यांनी त्‍याची कोणतीही दखल घेतली नाही अगर उत्‍तर दिले नाही.  तदनंतर तक्रारदाराने जाबदार यांना वकीलांमार्फत दि. 17/11/2014 रोजी जाबदार क्र. 1 ते 3 यांना नोटीस पाठवली व नुकसानभरपाईची मागणी केली.  परंतू नोटीस जाबदारांना मिळूनही त्‍यास तक्रारदाराने उत्‍तर दिलेले नाही किंवा नवीन मोबाईल बदलून मिळण्‍यासाठी तक्रारदाराने प्रस्‍तुत तक्रार अर्ज मे. मंचात दाखल केला आहे.

2.  तक्रारदाराने प्रस्‍तुत कामी जाबदार यांचेकडून तक्रारदार यांना मायक्रोमॅक्‍स कंपनीचा MICROMAX A250, हा नवीन मोबाईल मिळावा किंवा जाबदार यांचेकडून तक्रारदार यांना प्रस्‍तुत मोबाईलची किंमत परत मिळावी, जाबदार यांचेकडून नुकसानभरपाइपोटी एकूण रक्‍कम रु.69,065/- तक्रारदाराला मिळावेत, तक्रार अर्जाचा खर्च रक्‍कम रु.10,000/- जाबदारांकडून वसूल होऊन मिळावा अशी विनंती केली आहे.

3.  तक्रारदाराने याकामी नि. 2 कडे अँफीडेव्‍हीट, नि. 5 चे कागदयादीसोबत नि. 5/1 ते 5/9 कडे अनुक्रमे जाबदार क्र.2 यांचेकडील मोबाईल बीलाची व्‍हेरीफाईड प्रत, मोबाईल वॉरंटी स्‍टेटमेंटची व्‍हेरीफाईड प्रत, जाबदार क्र.3 कडून नवीन मोबाईल  टचपॅड खरेदी केलेची पावती, तक्रारदाराने जाबदार क्र. 1 ला पाठवले तक्रार अर्जाची प्रत, तक्रारदाराने जाबदारांना वकीलामार्फत पाठवलेली नोटीसची स्‍थळप्रत, पोष्‍टाच्‍या पावत्‍या, पोहोचपावत्‍या, जाबदारांचे जॉबशीटची व्‍हेरीफाईड प्रत, नि. 18 कडे पुराव्‍याचे शपथपत्र, नि. 21 चे कागदयादीसोबत  नि.21 चे कागदयादीसोबत नि. 21/1 ते 21/8 कडे अनुक्रमे जाबदार क्र. 2 कडील मोबाईल बीलाची मूळप्रत, मोबाईलचे वॉरंटी कार्डची मूळप्रत, जाबदार क्र. 3 कडून मोबाईलचे टचपॅड खरेदी केलेचे बील, तक्रारदाराने जाबदार क्र. 2 कडे पाठविलेला अर्ज, पोष्‍टाची पावत्‍या, पोहोचपावत्‍या, जाबदार क्र. 3 चे जॉबशीटची मूळ प्रत, नि. 22 कडे पुरावा संपलेची पुरसिस, नि.25 सोबत मे. वरिष्‍ठ न्‍यायालयांचे न्‍यायनिवाडे, नि. 26 कडे लेखी युक्‍तीवाद वगैरे कागदपत्रे तक्रारदाराने याकामी दाखल केले आहे.

 4.  प्रस्‍तुत कामी जाबदार क्र. 1 यांनी नि. 14 कडे त्‍यांचे म्‍हणणे/कैफीयत, नि.14/1 कडे म्‍हणण्‍याचे अँफीडेव्‍हीट, नि. 16 सोबत अधिकारपत्र, नि. 17 कडे पुराव्‍याचे शपथपत्र, नि.23/1 ते नि.23/6 कडे तक्रारदाराचा मोबाईलच्‍या जॉबशीटस् वगैरे कागदपत्रे जाबदार क्र. 1 ने याकामी दाखल केली आहे.  तर जाबदार क्र. 2 व 3 यांना नोटीस लागू होऊनही ते मे. मंचात गैरहजर राहीले असलेने त्‍यांचेविरुध्‍द एकतर्फा आदेश पारीत झाला आहे.  जाबदार क्र. 1 ने तक्रारदाराचे तक्रार अर्जातील सर्व कथने फेटाळलेली आहेत.  त्‍यांनी पुढीलप्रमाणे आक्षेप नोंदवलेले आहेत.  तक्रारदाराचे अर्जातील मजकूर मान्‍य व कबूल नाही, तक्रारदाराने मोबाईल खरेदी केलेपासून जवळजवळ 10 महिने फोनचा वापर केलेला आहे.  तसेच तक्रारदाराने सदरचा मोबाईल हा नाजूक व व्‍यवस्‍थीतपणे हाताळलेला नाही.  टचपॅडवर दाब देऊन व एकाचवेळी अनेक बटणे दाबलेने त्‍याचप्रमाणे योग्‍य दर्जाचा चार्जर वापरला नसलेने व योग्‍य होल्‍टेजमध्‍ये मोबाईल चार्जींगला लावला नसल्‍याने व प्रस्‍तुत मोबाईलचा पाण्‍याशी संपर्क आलेने व तक्रारदाराचे निष्‍काळजीपणाने व हलगर्जीपणामुळे सदरचा मोबाईलमध्‍ये दोष निर्माण झाला आहे.  यामध्‍ये जाबदाराने तक्रारदाराला कोणतीही सेवात्रुटी दिलेली नसून जाबदार हे नुकसानभरपाई देणेस जबाबदार नाहीत असे म्‍हणणे जाबदार क्र.1 ने दिलेले आहे.  

5.  प्रस्‍तुत कामी वर नमूद तक्रारदार व जाबदार यांनी दाखल केले सर्व कागदपत्रांवरुन तसेच पुराव्‍याची शपथपत्रे, लेखी युक्‍तीवाद यांचा ऊहापोह करुन प्रस्‍तुत तक्रार अर्जाच्‍या निराकरणार्थ मे. मंचाने पुढील मुद्दयांचा विचार केला.

अ.क्र.               मुद्दा                           उत्‍तर

 1.  तक्रारदार हे जाबदारांचे  ग्राहक आहेत काय?                  होय.                                        

 2.  जाबदार यांनी तक्रारदार यांना सदोष सेवा

     पुरविली आहे काय?                                      होय.

 3.  तक्रारदार जाबदारकडून नुकसानभरपाई

     मिळणेस पात्र आहेत काय?                                 होय.   

4.   अंतिम आदेश काय?                                   खाली नमूद

                                                       आदेशाप्रमाणे.

विवेचन-

6.    वर नमूद मुद्दा क्र.1,2 व 3 चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देत आहोत. कारण-तक्रारदार यांनी जाबदार क्र.1 कंपनीचा MICROMAX A250, हा मोबाईल जाबदार क्र. 2 कडून दि.8/12/2014 रक्‍कम रु.19,500/- (रुपये एकोणीसहजार पाचशे मात्र) ला खरेदी केला ही बाब जाबदार यांनी मान्‍य केली आहे.  त्‍याचे खरेदीचे मूळ बील तक्रारदाराने नि.21/1 कडे दाखल केले आहे.  तसेच प्रस्‍तुत कामातील जाबदार क्र. 2 हे जाबदार क्र. 1 चे अधिकृत विक्रेते असून जाबदार क्र. 3 हे जाबदार क्र. 1 व 2 चे अधिकृत सर्व्‍हीसींग सेंटर असून तक्रारदाराने त्‍याचा मोबाईल जाबदार क्र. 3 चे सर्व्‍हीसींग सेंटर मध्‍ये दुरुस्‍तीसाठी ब-याच वेळा दिलेला होता हे नि. 23/1 ते 23/6 कडील जॉबशीटवरुन स्‍पष्‍ट होते.  म्‍हणजेच तक्रारदार व जाबदार क्र. 1 ते 3 यांचेदरम्‍यान ग्राहक व सेवापुरवठादार असे नाते अस्‍तीत्‍वात आहे.  प्रस्‍तुत तक्रारदार यांनी सदर नमूद मोबाईल जाबदारकडून खरेदी केलेनंतर तो वॉरंटी कालावधीतच ब-याच वेळा नादुरुस्‍त झाला. त्‍याचे टचपॅड खराब झाले, स्‍पीकर नादुरुस्‍त होते, तसेच सदर मोबाईलला चार्जींग होत नव्‍हते असे वेगवेगळे दोष प्रस्‍तुत मोबाईलमध्‍ये असलेने तक्रारदाराने जाबदार क्र. 3 कडे मोबाईल दुरुस्‍तीसाठी ब-याचवेळा देऊनही प्रस्‍तुत मोबाईल हा दोषमुक्‍त झालेला नाही तर त्‍यातील दोष पूर्णपणे निघालेले नाहीत म्‍हणजेच तो निर्मीती दरम्‍यानचा दोष Manufacturing defect  असावा असे तक्रारदाराला वाटते.  तक्रारदाराने मोबाईल वारंवार जाबदार क्र.3 कडे दुरुस्‍तीस दिलेचे जाबदाराने नि. 23/1 ते नि.23/6 कडे दाखल केले जॉबशीटवरुन स्‍पष्‍ट होते व दोष पूर्णपणे न निघालेने व मोबाईल दुरुस्‍त न झालेने, तक्रारदाराने जाबदाराना तक्रार अर्ज दिला.  तसेच वकीलांमार्फत नोटीस पाठवली.  प्रस्‍तुत मोबाईलला खरेदी तारखेपासून 1 वर्षे वॉरंटी होती हे वॉरंटी कार्ड नि. 21/2 वरुन स्‍पष्‍ट होते.  तक्रारदाराचे मोबाईल हा वॉरंटी कालावधीतच नादुरुस्‍त झाला व तो ब-याच वेळा जाबदार क्र. 3 कडे दुरुस्‍तीस देऊन ही दुरुस्‍त झाला नाही म्‍हणून प्रस्‍तुत मोबाईलमध्‍ये निर्मीती दोष आहे हे स्‍पष्‍ट दिसून येते.  यासर्व बाबी तक्रारदाराने कागदपत्रानिशी सिध्‍द केल्‍या आहेत.  त्‍यामुळे जाबदार क्र. 1 ते 3 यांनी तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे हे स्‍पष्‍ट दिसून येते.  या सर्व बाबी तक्रारदाराने कागदपत्रानिशी सिध्‍द केल्‍या आहेत.  त्‍यामुळे जाबदार क्र. 1 ते 3 यांनी तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे हे स्‍पष्‍ट होते.  कारण जाबदार क्र. 2 ने जाबदार क्र. 1 कंपनीचा मोबाईल तक्रारदाराला विक्री केला तसेच मोबाईल नादुरुस्‍त झालेनंतर जाबदार क्र. 1,2 चे अधिकृत सर्व्‍हीसींग सेंटर जाबदार क्र.3 यांचेकडे तो वारंवार दुरुस्‍तीस दिला असता तो पूर्णपणे दुरुस्‍त होत नव्‍हता व झाला नाही.  सदर मोबाईलमध्‍ये निर्मीती दोष असलेचे स्‍पष्‍ट होते.  त्‍यामुळे जाबदार यांनी तक्रारदार यास सदोष मोबाईलची विक्री करुन अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब केला असून तक्रारदार यांनी मोबाईल वारंवार दुरुस्‍त करणेसाठी देऊनही तो व्‍यवस्‍थीत दुरुस्‍त करुन दिला नाही हे वेगवेगळया तारखांच्‍या शॉबशीटवरुन स्‍पष्‍ट होते.  तक्रारदाराने मोबाईल दुरुस्‍त होत नसलेने त्‍याचा टचपॅड देखील जाबदार क्र. 2 कडून खरेदी करुन ते मोबाईलला बसवले परंतू तरीही मोबाईल दुरुस्‍त झाला नाही.  त्‍याचे खर्चाचे बील तक्रारदाराने याकामी दाखल केले आहे.  जाबदाराने त्‍यांचे म्‍हणण्‍यामध्‍ये घेतलेले आक्षेप पुराव्‍यानिशी सिध्‍द केलेले नाहीत. सबब तक्रारदार यांना जाबदार यांनी सदोष सेवा दिली असलेचे स्‍पष्‍ट होते.  त्‍यामुळे तक्रारदार हे जाबदार क्र. 1 ते 3 यांचेकडून वैयक्‍तीक व संयुक्‍तीकपणे नुकसानभरपाई मिळणेस पात्र आहेत असे या मे. मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.  प्रस्‍तुत कामी आम्‍ही तक्रारदाराने नि. 25 सोबत नि. 25/1 कडे दाखल केले खालील न्‍यायनिर्णयांचा व त्‍यातील दंडकांचा आधार घेतला आहे.

1. मे.राज्‍य आयोग, त्रिपुरा यांचेकडील फर्स्‍ट अपील नं.32/2011

   Shri Anupam paul V/s. Sri Bhaskar Saha

    Head Note- Therefore it is ordered that the respondents shall jointly and severally pay to the complainant-appellant-Rs.3900/- as the cost of faulty mobile set, a compensation of Rs.30,000/- for the professional loss suffered by appellant, and Rs. 20,000/- as compensation for the harassment and mental agony inflicted upon the appellant by them along with  a litigation cost of Rs.

5000/- .  Thus Opponents shall-jointly and severally make payment of a total of Rs.58,900/- only to the appellant with in 30 days from today alongwith interest @ 6 % thereon from the date of filing the complaint-in the District Forum i.e. w.e.f. 21-11-2010 failing which the whole amount shall carry interest @ 12 %  p.a. from the date of presentation of complaint in the District forum in addition to the consequences of non-compliance as provided under the Consumer Protection Act.

   सबब प्रस्‍तुत तक्रारदार हे जाबदार क्र. 1 ते 3 यांचेकडून नुकसानभरपाई मोबाईल हॅण्‍डसेटची किंमतीसह किंवा त्‍याच मॉडेलचा नवीन मोबाईल हॅण्‍डसेट इतर सर्व नुकसानभरपाईसह  मिळणेस पात्र आहेत असे या मे. मंचास वाटते. 

8.   सबब प्रस्‍तुत कामी आम्‍ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करत आहोत.   

आदेश

1. तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करण्‍यात येतो.

2. जाबदार क्र. 1 ते 3 यांनी तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली असलेने त्‍यांनी

   वैयक्तिक व संयुक्तिकरित्‍या तक्रारदाराला MICROMAX  -A205 या मॉडेलचा

   नवीन मोबाईल हॅण्‍डसेट अदा करावा व जाबदार क्र. 3 चे ताबेत असलेला

   तक्रारदाराचा दुरुस्‍तीकरीता दिलेला मोबाईल जाबदारांनी स्‍वतःकडेच ठेवावा.

3. जर जाबदार यांना वर नं. 1 मध्‍ये नमूद केलेप्रमाणे नवीन मोबाईल हॅण्‍डसेट

   तक्रारदाराला देणे अशक्‍य असलेस जाबदार क्र. 1 ते 3 यांनी वैयक्तिक व

   संयुक्‍तीकरित्‍या तक्रारदाराला प्रस्‍तुत वादातीत मोबाईल हॅण्‍डसेटची किंमत

   रक्‍कम रु. 19,500/- (रुपये एकोणीस हजार पाचशे मात्र) अदा करावेत.

 

4. मोबाईल नादुरुस्‍तीमुळे तक्रारदाराचे झालेल्‍या व्‍यावसायिक व इतर नुकसानीपोटी

   जाबदार क्र. 1 ते 3 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकपणे तक्रारदार यांना रक्‍कम

   रु.20.000/- अदा करावेत.

5. तक्रारदाराने नवीन टचपॅड खरेदी केलेली रक्‍कम रु.7,565/- जाबदार क्र. 1 ते

   3 ने वैयक्तिक व संयुक्तिकपणे तक्रारदाराला अदा करावी.

6. तक्रारदाराला झाले मानसिक त्रास व  व तक्रार अर्जाचे खर्चापोटी रक्‍कम

   रु.5,000/- (रुपये पाच हजार फक्‍त) जाबदार क्र. 1 ते 3 यांनी वैयक्तिक व

   संयुक्तिकपणे  तक्रारदाराला अदा करावेत.

7. वर नमूद कलम 2 ते 5 मधील रकमांवर अर्ज दाखल तारखेपासून रक्‍कम

   प्रत्‍यक्ष हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्‍के व्‍याजाची रक्‍कम जाबदार क्र. 1 ते

   3 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्‍या तक्रारदाराला अदा करावी.

8. वरील सर्व आदेशांची पूर्तता जाबदार यांनी आदेश पारीत तारखेपासून 45

   दिवसात करावी.

9.  विहीत मुदतीत आदेशाचे पालन न केल्‍यास तक्रारदार यांना ग्राहक संरक्षण

    कायदा कलम 25 व 27 नुसार जाबदारांविरुध्‍द कारवाई करणेची मुभा राहील.

10. सदर न्‍यायनिर्णयाच्‍या सत्‍यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्‍य पाठवणेत याव्‍यात.

11. सदर न्‍यायनिर्णय खुल्‍या मंचात जाहीर करणेत आला.

ठिकाण- सातारा.

दि. 09-10-2015.

           (सौ.सुरेखा हजारे)  (श्री.श्रीकांत कुंभार)   (सौ.सविता भोसले)

             सदस्‍या          सदस्‍य           अध्‍यक्षा

               जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा.

 
 
[HON'BLE MRS. SAVITA BHOSALE]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. SHRIKANT KUMBHAR]
MEMBER
 
[ HON'BLE MRS.SUREKHA HAJARE]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.