Maharashtra

Nagpur

CC/627/2015

Satendra Dulichand Jain - Complainant(s)

Versus

Micromax Informatics Ltd - Opp.Party(s)

M. S. Wakil

21 Jun 2017

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/627/2015
 
1. Satendra Dulichand Jain
r/o 260 Abhyankar Nagar Nagpur
Nagpur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Micromax Informatics Ltd
21/4a Phase II Naraina Industrial Area Delhi 110028
Delhi
Delhi
2. City Collection
Sitabuldi Nagpur 440012
Nagpur
Maharashtra
3. Smart Care Service
Dhantoli Nagpur 440012.
Nagpur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. VIJAY C. PREMCHANDANI PRESIDENT
 HON'BLE MR. NITIN M. GHARDE MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 21 Jun 2017
Final Order / Judgement

(आदेश पारित व्दारा -श्री  नितीन माणिकराव घरडे,  मा.सदस्य  )

आदेश

  1. तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण अधिनियम 1986, च्या कलम 12 अन्वये प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे.
  2. तक्रारकर्त्याची थोडक्यात तक्रार अशी आहे की, तक्रारकर्त्याला स्वतःचे वापराकरिता एक भ्रमणध्‍वनी घ्‍यावयाचा होता.त्याकरिता तक्रारकर्ता हे विरुध्‍दपक्ष क्र.2 यांचे दुकानात भ्रमणध्‍वनी विकत घेण्‍याकरिता गेले असता विरुध्‍द पक्ष क्रं. 2 यांनी मॅकरोमॅक्स-ए111 हा चांगल्या असल्याबाबत तक्रारकर्त्याला सांगीतले व त्यांचे सांगण्‍यावरुन तक्रारकर्ता यांनी विरुध्‍द पक्ष क्रं.2 यांचे दुकानातुन भ्रमणध्‍वनी मॅकरोमॅक्स-ए111 हा दिनांक 14.9.2013 रोजी विकत घेतला त्याचा पावती क्रं.157550 असुन एकुण किंमत रुपये 10,150/-मधे सदर भ्रमणध्‍वनी तक्रारकर्त्याने खरेदी केला.
  3. तक्रारकर्ता पूढे असे नमुद करतो की सदर भ्रमणध्‍वनीचा वापर करीत असतांना त्यामधे वारंवार दोष दिसून येते होते जसे की, Internet connectivity, network signals and crashing of applications and lack of hearing, असे अनेक वेगवेगळे दोष भ्रमणध्‍वनी मधे येऊ लागले. त्याकरिता तक्रारकर्त्याने विरुध्‍द पक्ष क्रं.3 स्मार्ट केअर सर्व्हीस यांचेकडे सदर तक्रार भ्रमणध्‍वनीमधे येणा-या वेगवेगळया दोषाबाबत सदर भ्रमणध्‍वनी दुरुस्तीकरिता विरुध्‍द पक्ष क्रं.3 यांचेकडे दिला.परंतु त्यानंतर सुध्‍दा भ्रमणध्‍वनी मधे असणारे दोष दूर झाले नाही. त्यानंतर पुन्हा तक्रारकर्त्याने दिनांक 2.9.2014 रोजी सदर भ्रमणध्‍वनी विरुध्‍द पक्ष क्रं.3 यांचे कडे दुरुस्तीकरिता दिला कारण सदर भ्रमणध्‍वनीची 3 वर्षाची वॉरन्टी होती. विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्त्याकडुन भ्रमणध्‍वनी दुरुस्तीकरिता एकुण 100/- व 150/- प्रती दुरुस्ती असे एकुण 400/-आकारले. तरीसुध्‍दा भ्रमणध्‍वनी मधील दोष दूर झाले नाही. करिता सरतेशेवटी  तक्रारकर्त्याने दिनांक 3.1.2015 रोजी विरुध्‍द पक्ष यांना कायदेशीर नोटीस पाठविली. सदर नोटीसला विरुध्‍द पक्षाकडुन कोणताही प्रतिसाद मिळाला नाही करिता तक्रारकर्त्याने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल केलेली आहे.
  4. तक्रारकर्त्याने तक्रारीत अशी मागणी केलेली आहे की, विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला दोषपूर्ण भ्रमणध्‍वनी विक्री करुन सेवेत त्रुटी दिलेली आहे व अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेला आहे असे घोषित करावे. तसेच विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्त्याकडुन भ्रमणध्‍वनीचे विक्रीपोटी घेतलेले रुपये 10,150/-,18टक्के व्याजासह दिनांक 14.9.2013 पासुन परत करावे. तसेच तक्रारकर्त्याला झालेल्या मानसिक व शारिरिक त्रासापोटी व तक्रारीच्या खर्चापोटी नुकसान भरपाई मिळावी अशी विनंती केलेली आहे.
  5. तक्रारकर्त्याची तक्रार स्वीकृत करुन वि.प. ला नोटीस बजावण्‍यात आली.विरुध्‍द पक्ष क्रं.3 हे नोटीस प्राप्त होऊन सुध्दा मंचासमक्ष हजर झाले  नाही म्हणुन नि.कं.1 वर दिनांक 6.5.2016 रोजी त्यांचे विरुध्‍द तक्रार एकतर्फी चालविण्‍याचा आदेश पारित करण्यात आला. विरुध्‍द पक्ष क्रं. 1 व 2 यांचे विरुध्‍द दिनांक 13.7.2017 रोजी तत्कालीन अध्‍यक्षांनी तक्रारीत अनवधनाने तक्रार एकतर्फी चालविण्‍याचा आदेश पारित केला होता. सदर आदेश हा विरुध्‍द पक्ष क्रं.1 विरुध्‍द समजण्‍यात यावा. विरुध्‍द पक्ष क्रं. 2 यांनी आपले लेखी उत्तर नि.क्रं.9 वर दाखल केले. विरुध्‍द पक्ष आपले लेखी उत्तरात असे नमुद करतात की, तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्ष क्रं.2 यांचे दुकानात भ्रमणध्‍वनी खरेदी करण्‍याकरिता आला होता.परंतु त्याला मॅकरोमॅक्स-ए 111, घेण्‍याची कोणत्याही प्रकारची जबरदस्ती करण्‍यात आलेली नव्हती. तक्रारकर्त्याने तक्रारीत लावलेले आरोप व प्रत्यारोप खोडुन काढले. विरुध्‍द पक्ष क्रं.2 यांनी आपले विषेश कथनात असे नमुद केले की, त्यांचे सिताबर्डी येथे सिटी कलेक्शन मोदी नं.2 महाजन मार्केट येथे भ्रमणध्‍वनी विकण्‍याचे दुकान असुन त्यांचे कडे निरनिराळया कंपनीचे भ्रमणध्‍वनी त्यांचे ग्राहकांना विकत असुन विकत घेतलेल्या भ्रमणध्‍वनी ग्राहकांना देण्‍यापूर्वी भ्रमणध्‍वनी व्यवस्थीत सुरु आहे म्हणुन त्याचे सर्व Function ची तपासणी करुन देतो व भ्रमणध्‍वनी हा चालु सुध्‍दा करुन ते ग्राहकांना देतो. विकलेल्या कंपनीच्या भ्रमणध्‍वनीमधे काही कारणास्तव येणा-या दोषाकरिता त्यांचे सर्व्हीस सेंटर मधे जाऊन भ्रमणध्‍वनी दुरुस्ती करुन घ्‍यावा लागाते. त्यामुळे विरुध्‍द पक्ष क्रं. 2 यांनी तक्रारकर्त्याचे प्रती कोणतीही सेवेत त्रुटी दिलेली नाही अथवा अनुचित प्रथेचा अवलंब केलेला नाही म्हणुन तक्रारकर्त्याची तक्रार खारीज होण्‍यास पात्र आहे कारण तांत्रिक कारणाकरिता विक्री करणारा जबाबदार नाही.
  6. तक्रारकर्त्याने सदर तक्रारीसोबत  नि.क्रं. 1 ते 5 दस्तऐवज दाखल केले यामधे भ्रमणध्‍वनी खरेदी केल्याची पावती, तसेच विरुध्‍द पक्ष यांना पाठविलेल्या नोटीसची प्रत, पोचपावती, इत्यादी दस्तऐवज दाखल केले.
  7. तक्रारकर्त्याची तक्रार, दस्तऐवज, विरुध्‍द पक्ष क्रं. 2 चे लेखी उत्तर, तोडी युक्तीवादावरुन मंचाचे विचारार्थ  खालील  मुद्दे  आले.

मुद्दे                                                                          निष्कर्ष

1.   तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय  ?                          होय

2.  विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्याचे प्रती अनुचित व्यापारी

प्रथेचा अवलंब केलेला आहे काय ?                                           होय

3.    आदेश                                                                     अंतिम आदेशाप्रमाणे.

कारणमिमांसा

  1. तक्रारकर्त्याने विरुध्‍द पक्ष क्रं. 2 कडुन दिनांक 14.9.2014 रोजी रुपये 10,150/- ला भ्रमणध्‍वनी खरेदी केला. सदर भ्रमणध्‍वनी मधे खरेदी केल्यापासुन वेगवेगळे दोष दिसून आले म्हणुन तक्रारकर्त्याने हा विरुध्‍द पक्ष क्रं. 3 यांचेकडे दुरुस्त केला त्याकरिता विरुध्‍द पक्ष क्रं.3 यांनी दुरुस्तीकरिता लागणारा खर्च वॉरन्टी मधे असुन सुध्‍दा तक्रारकर्त्याकडुन घेतला परंतु तक्रारकर्त्याचा भ्रमणध्‍वनी दुरुस्त करुन दिला नाही. विरुध्‍द पक्ष क्रं.2 यांनी तक्रारकर्त्याचा भ्रमणध्‍वनी दुरुस्त करुन त्यात असे नमुद केले की ते फक्त वेगवेगळे भ्रमणध्‍वनी आपल्या दुकानातुन ग्राहकांचे मागणीनुसार विकतात व ग्राहक भ्रमणध्‍वनी विकत घेतात व विकत घेतलेला भ्रमणध्‍वनी ग्राहकांना सुरु करुन दाखलविल्यानंतर व ग्राहकांचे समाधान झाल्यावर ते विकत घेतात. त्यांचे भ्रमणध्‍वनी येणा-या दोषाकरिता भ्रमणध्‍वनी त्यां त्यां कंपनीच्या दुरुस्ती सेंटर मधे त्यामधील दोष दूर करण्‍याकरिता कंपनीने स्थापीत केलेले आहे. त्यामुळे तक्रारकर्त्याचे मागणी विरुध्‍दपक्ष क्रं.2 विरुध्‍द योग्य नाही व विरुध्‍द पक्ष क्रं. 2 यांनी तक्रारकर्त्याला कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नाही व अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेला नाही.
  1. सदर प्रकरणात तक्रार व तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दस्तऐवजांचे अवलोकन केले असता ही बाब स्पष्‍ट होते की, तक्रारकर्त्याने भ्रमणध्‍वनी विरुध्‍दपक्ष क्रं. 2 कडुन विकत घेतला होता त्यामधे वारंवार दोष येत असल्याचे लक्षात आले व त्याकरिता त्यांनी विरुध्‍द पक्ष क्रं. 3 सर्व्हीस सेंटर यांचे कडे दुरुस्तीकरिता भ्रमणध्‍वनी दिला. सर्व्हीस सेंटर मधुन भ्रमणध्‍वनी दुरुस्त करुनसुध्‍दा त्यांतील दोष दूर झाले नाही व त्यानी सदर प्रकरण विरुध्‍द पक्ष क्रं. 3 दुरुस्तीकेद्र यांनी सदर प्रकरणात आपले लेखी उत्तर दाखल केले नाही. यावरुन ही बाब स्पष्‍ट होते की, विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्त्याला दोषपूर्ण सेवा दिली. तक्रारकर्त्याने भ्रमणध्‍वनी, मॅकरोमॅक्स-ए111 विकत घेतल्याबाबत चे देयक तक्रारीत दाखल केलेले आहे. त्यामुळे तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक या व्याख्‍येत येते व तक्रारकर्त्याचा भ्रमणध्‍व वारंवार नादुरुस्त होत असल्याने सदर भ्रमणध्‍वनी दुरुस्त करुन मिळण्‍यास कींवा भ्रमणध्‍वनीची किंमत तक्रारकर्ता पात्र आहे असे मंचाचे मत आहे.सबब आदेश खालीलप्रमाणे.

अंतीम   दे   -

            1.      तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. 

2.      विरुध्‍द पक्ष क्रं. 1 ते 3 यांनी तक्रारकर्त्याकडुन  भ्रमणध्‍वनीचे विक्रीपोटी

घेतलेली रक्कम रुपये 10,150/- तक्रारकर्त्याला दिनांक 14.9.2013 पासुन द.सा.द.शे. 9 टक्के व्याजासह परत करावे.

3.     विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास शारिरीक व मानसिक त्रासाबाबत   नुकसान भरपाई

दाखल  रु.5,000/- (रुपये पाच हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चापोटी रु.5,000/-   ( रुपये पाच हजार फक्त) द्यावेत.

4.      वरील आदेशाची पुर्तता विरुध्द पक्षाने आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30   दिवसांचे

आंत वैयक्तीक अथवा संयुक्तीकरित्या करावी.

5.      उभय पक्षकारांना आदेशाची प्रथम प्रत नि:शुल्क देण्‍यात यावी.

      6.      तक्रारकर्त्याला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.

[HON'BLE MR. VIJAY C. PREMCHANDANI]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. NITIN M. GHARDE]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.