Maharashtra

Nagpur

CC/14/533

Dr. Rahul Udhao Ramteke - Complainant(s)

Versus

MIcromax Informatics Ltd - Opp.Party(s)

I. G. Meshram

21 Mar 2018

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/14/533
 
1. Dr. Rahul Udhao Ramteke
r/o c/o Shri Sakhare Plot No 47 Velekar Nagar Nagpur 440027
Nagpur
Maharastra
...........Complainant(s)
Versus
1. MIcromax Informatics Ltd
21/14A Pkase II Naraana Industrial Area New Delhi 110028
New Delhi
New Delhi
2. Customer Service Head Micromax House
Sector 18 Gudgaon 122015
Gudgaon
Gudgaon
3. Mobile Expert
Shop No 13 Honey Archan Complex Above Axis Bank Untkhana Road Medical SQuare Nagpur 440012
Nagpur
Maharastra
4. M/s Gurukrupa Mobiles
M.B. Patel Road Sakoli
Bhandara
Nagpur
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. VIJAY C. PREMCHANDANI PRESIDENT
 HON'BLE MR. NITIN M. GHARDE MEMBER
 
For the Complainant:I. G. Meshram , Advocate
For the Opp. Party:
Dated : 21 Mar 2018
Final Order / Judgement

 (आदेश पारित व्दारा -श्री विजय सी प्रेमचंदानी,  मा.अध्यक्ष )

आदेश

  1. तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण अधिनियम 1986, च्‍या कलम 12  अन्‍वये प्रस्‍तुत तक्रार दाखल केली आहे. तक्रारकर्त्याने तक्रारीत असे कथन केले आहे की, तक्रारकर्त्याने दिनांक 8.9.2013 रोजी विरुध्‍द पक्ष क्रं.1 कंपनीचे निर्मीत मायक्रोमॅक्स कॅन्व्हास- IV, मॉडेल क्रं.ए-210, विरुध्‍द पक्ष क्रं. 4 कडुन रुपये 18,500/- देऊन खरेदी केला. दिनांक 12.8.2014 रोजी सदर मोबाईलच्या आवाजामधे काही ऐकू येत नव्हते म्हणुन तक्रारकर्त्याने सदर मोबाईल दुरुस्तीकरिता विरुध्‍द पक्ष क्रं.3 कडे दिला. परंतु विरुध्‍द पक्ष क्रं.3 यांनी सदर मोबाईल दुरुस्त करुन दिला नाही. म्हणुन तक्रारकर्त्याने दिनांक 8.9.2014 रोजी विरुध्‍द पक्ष क्रं.2 ला त्यासंदर्भात तक्रार केली. त्यावर विरुध्‍द पक्षाने कोणतीही दखल घेतली नाही. दिनांक 29.9.2014 रोजी तक्रारकर्त्याने विरुध्‍द पक्ष क्रं. 2 यांना रजिस्टर्ड पोस्टामार्फत पत्र पाठवुन मोबाईल संदर्भात तक्रार केली. विरुध्‍द पक्षातर्फे त्यांवर कोणतीही दखल घेण्‍यात आलेली नाही. विरुध्‍दपक्षाने निर्मीती दोष असलेला तसेच दुरुस्ती करिता न्युनतम सेवा दिली असल्याने, तक्रारकर्त्याने दिनांक 14.10.2014 रोजी नवीन मोबाईल खरेदी करावा लागला. त्याकरिता तक्रारकर्त्याला रुपये 23,900/- खर्च आला. विरुध्‍द पक्षने तक्रारकर्त्याचा मोबाईल दुरुस्त करुन दिला नाही व तक्रारकर्त्याला सेवा पुरविलेली नाही म्हणुन सदर तक्रार मंचासमक्ष दाखल करण्‍यात आलेली आहे.
  2. तक्रारकर्त्याने  तक्रारीत अशी मागणी केलेली आहे की,विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्याला मोबाईलची किंमत रुपये 18,500/-परत करावे. तसेच तक्रारकर्त्यास झालेल्या शारिरिक, मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई मिळावी. अशी मागणी केलेली आहे.
  3. तक्रारकर्त्याची तक्रार स्वीकृत करुन, विरुध्‍द पक्षाला नोटीस काढण्‍याचा आदेश पारित करण्‍यात आला. विरुध्‍द पक्ष क्रं,2,3,4 यांना नोटीस प्राप्त होऊन सुध्‍दा तक्रारीत हजर झाले नाही म्हणुन नि.क्रं.1 वर त्यांचे विरुध्‍द तक्रार एकतर्फी चालविण्‍याचा आदेश पारित करण्‍यात आला. विरुध्‍द पक्ष कं. 1 ने तक्रारीत  हजर झाले व नि.क्रं.11 वर आपला लेखी जवाब दाखल केला. विरुध्‍द पक्ष क्रं.1 ने लेखी उत्तरात असे कथन केलेले आहे की, तक्रारकर्त्याने सदर तक्रार कोणतेही कारण नसतांना दाखल केलेली आहे व विरुध्‍द पक्षक्रं.1 यांनी तक्रारकर्त्याला कोणतीही न्युनतम सेवा दर्शविलेली नाही. विरुध्‍द पक्ष क्रं.1 ही मोबाईल बनविणारी कंपनी आहे ती नेहमी चांगले मोबाईल बनवुन बाजारामधे विकत असते. सबब सदर तक्रार विरुध्‍द पक्ष क्रं. 1 यांचे विरुध्‍द खारीज करण्‍यात यावी अशी विनंती करण्‍यात आली.
  4. तक्रारकर्त्याची तक्रार दस्तऐवज, शपथपत्र, विरुध्‍द पक्ष क्रं.1 चे लेखी उत्तर, तक्रारकर्त्याचे तोंडी युक्तीवादावरुन खालील मुद्दे मंचाचे विचारार्थ आले.

मुद्दे                                                                            उत्तर

     1. तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ?                        होय

     2.विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्याला न्युनतम सेवा दिलेली आहे काय?           होय

     3. आदेश काय                                                               अंतीम आदेशाप्रमाणे

 

कारणमिमांसा

  1. मुद्दा क्र.1 बाबत ः–  तक्रारकर्त्याने विरुध्‍द पक्ष क्रं. चे निर्मीत कंपनीचा मोबाईल दिनांक 8.9.2013 रोजी विरुध्‍द पक्ष क्रं. 4 कडुन खरेदी केला. ही बाब नि.क्रं.2 वर दाखल दस्त क्रं. 1 वरुन सिध्‍द होते. विरुध्‍द पक्ष क्रं. 3 हे विरुध्‍द पक्ष क्रं. 1 चे सर्व्हीस सेंटर आहे तसेच विरुध्‍द पक्ष क्रं.2 हे विरुध्‍द पक्ष क्रं.1 चे कस्टमर सर्व्हीस हेड असुन तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे ही बाब सिध्‍द होते. सबब मुद्दा क्रं.1 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्‍यात येते.
  2. मुद्दा क्र.2 बाबत ः–  तक्रारकर्त्याने नि.क्रं.2 वर दाखल दस्त क्रं. 2 ते 4 वरुन असे सिध्‍द होते की, तक्रारकर्त्याचा मोबाईल विरुध्‍द पक्ष क्रं. 3 ला दुरुस्तीकरिता देण्‍यात आलेला होता. त्यानंतर त्यांची दुरुस्ती योग्य प्रकारे झाली नाही म्हणुन तक्रारकर्त्याने विरुध्‍द पक्ष क्रं. 2 ला दिनांक 8.9.2014 रोजी पत्राव्दारे कळविले होते त्यानंतरही दिनांक 24.9.2014 रोजी परत पत्र लिहून त्याबाबत तक्रार केली. विरुध्‍द पक्ष क्रं. 2 व 3 ने त्यावर कोणतीही दखल घेतली नाही म्हणुन तक्रारकर्त्याने दिनांक 14.10.2014 रोजी नवीन मोबाईल खरेदी केलेला आहे ही बाब नि.क्रं.2 वर दस्त क्रं. 5 वरुन सिध्‍द होते. विरुध्‍द पक्ष क्रं. 1 ही मोबाईलची निर्मीती करणारी कंपनी असुन त्यांनी विरुध्‍द पक्ष क्रं. 2 व 3 यांनी मोबाईल मधे असलेल्या त्रुटी सुधारण्‍याकरिता व ग्राहकांना सेवा देण्‍याकरिता नियुक्त केले होते म्हणुन विरुध्‍द पक्ष क्रं.1 न्युनतम सेवेबाबत आपली जबाबदारी टाळू शकत नाही असे मंचाचे मत ठरले आहे. विरुध्‍द पक्ष क्रं. 4 यांनी निर्मीती दोष असलेला मोबाईल तक्रारकर्त्याला विकला म्हणुन विरुध्‍द पक्ष क्रं. 1 ते 4 यांनी तक्रारकर्त्याला न्युनतम सेवा दिलेली आहे असे सिध्‍द होते. सबब मुद्दा क्रं.2 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्‍यात येते.
  3. मुद्दा क्र.3 बाबतः-  मुद्दा क्र. 1 ते 2 चे विवेचनावरुन खालीलप्रमाणे आदेश पारित करण्‍यात येतो.

-  दे   -

1.      तक्रारकर्त्याची तक्रार मंजूर करण्‍यात येते. 

2.      विरुध्‍द पक्ष क्रं.1 ते 4 यांनी तक्रारकर्त्याकडुन जुना मोबाईल परत घेऊन त्याची रक्कम 18,500/- (रुपये अठरा हजार पाचशे) परत करावे.

3.      विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्यास मानसिक व शारिरिक त्रासापोटी रुपये 5,000/-( रुपये पाच हजार फक्त)व तक्रारीच्‍या   खर्चापोटी रु.2,500/-( रुपये दोन हजार पाचशे फक्त) द्यावेत.

4.      वरील आदेशाची पुर्तता विरुध्‍द पक्ष क्रं.1 ते 4 यांनी वैयक्तीक अथवा संयुक्तीकरित्या आदेशाची प्रत मिळाल्‍यापासून 30 दिवसांचे आंत  करावी.

5.       उभय पक्षकारांना आदेशाची प्रथम प्रत नि:शुल्‍क द्यावी.

6.      तक्रारकर्त्याला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.

 
 
[HON'BLE MR. VIJAY C. PREMCHANDANI]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. NITIN M. GHARDE]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.