Maharashtra

Nagpur

CC/375/2016

DEEPAK BHAIYAJI ATKAR - Complainant(s)

Versus

MICROMAX INFORMATICS LTD. - Opp.Party(s)

ASHISH M. KADUKAR

03 Apr 2018

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/375/2016
 
1. DEEPAK BHAIYAJI ATKAR
R/O. 7/10, GANESH GENTS PARLOR, WHITE HOUSE BUILDING, UJJWAL NAGAR, WARDHA ROAD, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. MICROMAX INFORMATICS LTD.
21,14-A, PHASE-II, NARAINA INDUSTRIAL AREA, DELHI-110028
DELHI
DELHI
2. AL-RAZA MICROMAX, AUTHO SERVICE CENTER
BEHIND KARACHI GENERAL STORE, GOLACHA BUILDING, SADAR, NAGPUR-440006
NAGPUR
MAHARASHTRA
3. THE MANAGER, VEDOM'S CO.
LAXMI BHAVAN SQR., WEST HIGH COURT ROAD, DHARAMPETH, NAGPUR-440010
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. VIJAY C. PREMCHANDANI PRESIDENT
 HON'BLE MR. NITIN M. GHARDE MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 03 Apr 2018
Final Order / Judgement

(आदेश पारित व्दारा -श्री विजय सी प्रेमचंदानी,  मा.अध्यक्ष )

आदेश

  1. तक्रारकर्त्‍याने ग्राहक संरक्षण अधिनियम 1986, च्‍या कलम 12  अन्‍वये प्रस्‍तुत तक्रार दाखल केली आहे.
  2. तक्रारकर्त्याची थोडक्यात तक्रार अशी आहे की, तक्रारकर्त्याने विरुध्‍द पक्ष क्रं.1 निर्मीत मोबाईल दिनांक  25.7.2014 रोजी विरुध्‍द पक्ष क्रं.3 कडुन 9500/- मधे विकत घेतला. दिनांक 24.6.2015 रोजी अचानक वादातील मोबाईल बंद पडला व त्या मोबाईलमधे चार्ज करुन सुध्‍दा चालू झाला नाही म्हणुन तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष क्रं1 ने नेमलेले विरुध्‍द पक्ष क्रं.2 ला सदर मोबाईल दुरुस्तीकरिता दिला. विरुध्‍द पक्ष क्रं.2 यांनी दिनांक 25.6.2015 रोजी जॉब शिट तयार करुन दिली. तक्रारकर्त्याने विरुध्‍द पक्ष क्रं. 2 कडे दिनांक 30.6.2015, 6.7.2015, 9.6.2015, 28.6.2015, 13.8.2015 आणि 30.9.2015 ला वारंवार संपर्क साधला परंतु विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्याचा मोबाईल दुरुस्त करुन दिला नाही व असे सांगीतले की तक्रारकर्त्याला मोबाईल दिल्ली येथे पाठविण्‍यात आलेला आहे. त्यामूळे तक्रारकर्त्याला जूलै 2015 मधे रुपये 16500/- चा नवीन मोबाईल खरेदी करावा लागला. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्याचा मोबाईल दुरुस्त करुन दिला नाही व अनुचित व्यवहार पध्‍दतीचा अवलंब केला व सेवेत त्रुटी दिली म्हणून तक्रारकर्त्याने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल केली आहे.
  3. तक्रारकर्त्याने तक्रारीत अशी मागणी केलेली आहे की, विरुध्‍द पक्षाने  मोबाईलची किंमत तक्रारकर्त्याला परत करावी व तक्रारकर्त्यास आलेला नवीन मोबाईलाचा खर्च द्यावे. तसेच तक्रारकर्त्यास झालेल्या मानसिक व शारिरिक त्रासापोटी व तक्रारीच्या खर्चापोटी नुकसान भरपाई मिळावी विनंती केलेली आहे.
  4. तक्रारकर्त्याची तक्रार स्वीकृत करुन विरुध्‍द पक्षाला नोटीस पाठविण्‍यात आली. विरुध्‍द पक्ष क्रं.1 व 3 यांना नोटीस प्राप्‍त झाली व विरुध्‍द पक्ष क्रं. 2 यांना नोटीस घेण्‍यास नकार दिला म्हणुन दिनांक 19.5.2017 रोजी नि.क्रं.1 वर तक्रार एकतर्फी चालविण्‍याचा आदेश मंचाने पारित केला.
  5. तक्रारकर्त्‍याची दाखल तक्रार,  दस्तऐवज, तसेच तक्रारकर्त्याचे लेखी व तोंडी युक्‍तीवादावरुन मंच खालील निष्‍कर्षाप्रत आले.

निष्‍कर्ष

  1. तक्रारकर्त्याने  विरुध्‍द पक्ष क्रं. 3 कडुन विरुध्‍द पक्ष क्रं.1 निर्मीत मोबाईल दिनांक 25.7.2014 रोजी खरेदी केला व विरुध्‍द पक्ष क्रं. 2 ला दिनांक 25.6.2015 रोजी दुरुस्तीकरिता दिला ही बाब तक्रारकर्त्याने नि.क्रं.3 वर दाखल दस्त क्रं.1 व 2 वरुन सिध्‍द होते. म्हणुन तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्ष क्रं. 1 ते 3 चा ग्राहक आहे असे सिध्‍द होते. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्याचा मोबाईल दुरुस्त करुन दिला नाही व त्याकरिता तक्रारकर्त्याला वारंवार विरुध्‍द पक्ष क्रं. 2 कडे सपर्क साधावा लागला. त्यानंतरही तक्रारकर्त्याने विरुध्‍द पक्ष क्रं. 1 ते 3 याना मोबाईल दुरुस्तीकरिता नोटीस पाठविली त्या नोटीसची ही विरुध्‍दपक्ष क्रं. 1 ते 3 ने दखल घेतली नाही. ही बाब तक्रारकर्त्याने दाखल नि.क्र.3 वर दस्त क्रं. 3 ते 6 वरुन सिध्‍द होते. विरुध्‍द पक्ष क्रं..1 व 3 याना नोटीसची प्राप्त होऊनही प्रकरणात हजर झाले नाही आणि विरुध्‍द पक्ष क्रं. 2 यांनी नोटीस घेण्‍यास नाकारले. विरुध्‍द पक्ष क्रं. 1 ते 3 प्रकरणात गैरहजर राहून त्यांचे बचावात कोणतीही बाजू मांडली नाही म्हणुन तक्रारकर्त्याने विरुध्‍द पक्ष क्रं. 1ते 3 यांचे विरुध्‍द लावलेले आरोपी सिध्‍द होतात. विरुध्‍द पक्ष क्रं. 1 ते 3 यांनी तक्रारकर्त्याला मोबाईल दुरुस्त करुन दिला नाही व निर्मीती दोष असलेला मोबाईल विरुध्‍द पक्ष क्र. 3 ने तक्रारकर्त्याला विकला म्हणुन विरुध्‍द पक्ष क्रं. 1 ते 3 यांनी तक्रारकर्त्याचे प्रती न्युनतम सेवा दर्शविलेली आहे व अनुचित व्यवहार पध्‍दतीचा अवलंब केलेला आहे असे सिध्‍द होते. सबब खालीलप्रमाणे अंतीम आदेश पारित करण्‍यात येतो.

आदेश

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.
  2. विरुध्‍द पक्ष क्रं. 1 ते 3 यांना आदेशीत करण्‍यात येते की, त्यांनी तक्रारकर्त्‍याला  मोबाईलची किंमत रु.9,500/-ही  रक्‍कम द.सा.द.शे.12 टक्‍के व्‍याजासह, दिनांक  25.06.2015 पासून तर प्रत्‍यक्ष  रक्‍कमेच्या   अदायगीपावेतो  देण्‍यात   यावी.
  3. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्याला मानसिक व शारिरिक त्रासापोटी 5,000/-(रुपये पाच हजार फक्त)  व तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 2,500/- (रुपये दोन हजार पाचशे फक्त) द्यावे
  4. सदर आदेशाचे पालन विरुध्‍द पक्ष यांनी आदेशाची प्रत मिळाल्‍यापासून 30 दिवसाचे आत करावे.           
  5. उभय पक्षकारांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्क देण्‍यात यावी.
  6. तक्रारकर्त्याला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.

 

 
 
[HON'BLE MR. VIJAY C. PREMCHANDANI]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. NITIN M. GHARDE]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.