Maharashtra

Nagpur

CC/255/2015

Sanjay Madhukarrao Pathak - Complainant(s)

Versus

Micromax Informatics Ltd., & 2 others - Opp.Party(s)

Self

12 Jan 2016

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/255/2015
 
1. Sanjay Madhukarrao Pathak
Quarter No. C-21/1, Near Police Station, Government Employee Colony, Ravinagar, Nagpur
Nagpur
Maharastra
...........Complainant(s)
Versus
1. Micromax Informatics Ltd., & 2 others
21/14, Phase No. 2 Naraina Industrial Area, Delhi 110028
Delhi
Uttar Pradesh
2. Unique Solututions Pvt. Ltd., through Proprietor Rahul Ramakant Kumbhalkar
3rd Floor, Before Panchshil Cinema Wardha road, Dhantoli, Nagpur 10
Nagpur
Maharastra
3. Majic City Mobile,
Shop No. 9, Poonam Bazar, Before Netaji Market Sitabuldi Nagpur
Nagpur
Maharastra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. MANOHAR CHILBULE PRESIDENT
 HON'ABLE MR. PRADEEP PATIL MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

श्री. मनोहर चिलबुले, मा. अध्‍यक्ष यांचे आदेशांन्‍वये.

 

                          -  आ दे श  -

                 (पारित दिनांक – 12 जानेवारी, 2016)

1.                तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाविरुध्‍द ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्‍या कलम 12 अन्‍वये प्रस्‍तुत तक्रार दाखल केलेली आहे. वि.प.क्र. 1 हे  मोबाईल निर्माता असून वि.प.क्र. 2 मोबाईल कंपनी वि.प.क्र. 1 चे अधिकृत सेवा केंद्र आहे आणि वि.प.क्र. 3 हे मोबाईल विक्रेता आहे.

 

                  तक्रारकर्त्‍याच्‍या तक्रारीचा थोडक्‍यात आशय असा की, त्‍याने वि.प.क्र. 1 कडून दि.10 नोव्‍हेंबर, 2012 रोजी माईक्रोमॅक्‍स मॉडेल A57 हा ड्युएल सीम मोबाईल रु.4,670/- मध्‍ये खरेदी केला व वि.प.ने या मोबाईलची वारंटी दि.09 नोव्‍हेंबर, 2013 पर्यंत दिली होती.  परंतू तक्रारकर्त्‍याला विकण्‍यात आलेल्‍या मोबाईलमध्‍ये वापरावयास सुरुवात केल्‍यावर हँडसेट गरम होऊ लागला व समोरच्‍या व्‍यक्‍तीचा आवाज अजिबात ऐकू येत नव्‍हता. सदर मोबाईल हा वारंटी कालावधीत असल्‍याने वि.प.क्र. 2 कडे तो दुरुस्‍तीस टाकला असता त्‍यांनी मदरबोर्ड बदलविणे आवश्‍यक असल्‍याचे सांगून तो ठेवून घेतला, मात्र परत करतांना फक्‍त सॉफ्टवेअर रीलोड करुन मोबाईल हँडसेट तक्रारकर्त्‍याला परत केला. तक्रारकर्त्‍याने मोबाईल परत वापरावयास सुरुवात केली असता त्‍यातील दोष तसाच असल्‍याचे त्‍याला आढळून आल्‍याने त्‍याने परत तो वि.प.क्र. 2 कडे दुरुस्‍तीस टाकला. त्‍यांनी मोबाईल दुरुस्‍तीस एक महिन्‍याचा कालावधी लागेल असे सांगितले. वि.प.क्र.1 कडून तक्रारकर्त्‍याला त्‍याचा मोबाईल हा दुरुस्‍त झालेला आहे व तो घेऊन जाण्‍याबाबत माहिती देण्‍यात आली. परंतू प्रत्‍यक्षात त्‍याला वि.प.क्र. 2 ने अनेक कारणे सांगून परत पाठविले व शेवटी वि.प.क्र. 1 ने वि.प.क्र. 2 मार्फत तक्रारकर्त्‍यास दि.11.02.2014 रोजी दुसरा मोबाईल हँडसेट दिला. परंतू या मोबाईलची बॅटरी ही चार्ज होत नव्‍हती व चार्जर काढल्‍यावर डिस्‍प्‍ले येत नव्‍हता, म्‍हणून सदर हँडसेट 12.02.2014 रोजी वि.प.क्र. 2 ला परत केला. त्‍यानंतर वि.प.क्र. 2 ला अनेकदा भेटी देऊन व ई-मेलद्वारे तक्रारकर्त्‍याने तक्रारी केल्‍या असता त्‍याला वि.प.ने कुठलाही प्रतिसाद दिला नाही. शेवटी वि.प.क्र. 1 कडून तक्रारकर्त्‍याला माहिती देण्‍यात आली की, वि.प.क्र. 2 यांची सेवा समाप्‍त त्‍यांनी केलेली आहे. तक्रारकर्त्‍याने वि.प.क्र. 1 च्‍या कंझुमर केयर सेंटरला दूरध्‍वनीवरुन सदर बाब कळविली असता त्‍यांनी नंतर बोलणे करुन प्रश्‍न सोडवून देण्‍याचे आश्‍वासन दिले, मात्र त्‍यांनीही दखल न घेतल्‍याने शेवटी मंचासमोर तक्रारकर्त्‍याने तक्रार दाखल करुन वि.प.कडून मोबाईल हँडसेटची किंमत रु.4,670/- ही 12 टक्‍के व्‍याजासह परत मिळावी, मानसिक व शारिरीक त्रासाबाबत रु.5,000/- व तक्रारीचा खर्चादाखल रु.5,000/- द्यावे अशी मागणी केलेली आहे.

 

2.                वि.प.क्र. 1 ते 3 यांना सदर तक्रारीची नोटीस पाठविण्‍यात आली असता वि.प.क्र. 1 व 3 यांना नोटीस मिळूनही ते मंचासमोर हजर न झाल्‍याने त्‍यांचेविरुध्‍द एकतर्फी कारवाई चालविण्‍याचा आदेश पारित करण्‍यात आला.

 

3.          तक्रारकर्ता व विरुध्‍द पक्ष यांच्‍या परस्‍पर विरोधी विधानांवरुन खालिल मुद्दे मंचाच्‍या विचारार्थ घेण्‍यांत आले. त्‍यावरील मंचाचे निष्‍कर्ष व त्‍याबाबतची कारणमिमांसा पुढीलप्रमाणे.

 

            मुद्दे                                             निष्‍कर्ष

 

1.  विरुध्‍द पक्षाने सेवेत न्‍यूनतापूर्ण व्‍यवहार किंवा अनुचित व्‍यापार

 पध्‍दतीचा अवलंब केला आहे काय ?                           होय.       

          

2.  तक्रारकर्ता मागणीप्रमाणे दाद मिळण्‍यांस पात्र आहे काय ?          होय.

 

3.  आदेश काय ?                                         अंतिम आदेशाप्रमाणे      .

 

 

 

  •  कारणमिमांसा  -

 

4.                मुद्दा क्र.1 बाबत -  सदरच्‍या प्रकरणांत तक्रारकर्त्‍याने वि.प.क्र. 3 मॅजिक सिटी मोबाईल्‍स यांचेकडून 10.11.2012 रोजी रु.5,490/- देऊन माईक्रोमॅक्‍स मॉडेल A57 खरेदी केल्‍याबाबतचे बिल दस्‍तऐवज क्र. 1 वर दाखल केले आहे. सदर मोबाईल नादुरुस्‍त झाल्‍याने दि.05.07.2013 रोजी तो वि.प.क्र.1 च्‍या अधिकृत सेवा केंद्र असलेल्‍या वि.प.क्र. 2 कडे दुरुस्‍तीसाठी नेला होता, त्‍याबाबत जॉबशिटची प्रत दस्‍तऐवज क्र. 3 वर दाखल केलेली आहे. त्‍यात हँडसेट गरम होत असल्‍याचे सर्विस सेंटर मधील तंत्रज्ञाने नमूद केले आहे. तक्रारकर्त्‍याचे म्‍हणणे असे की, तो वि.प.क्र. 2 कडे दुरुस्‍तीसाठी  दुस-यांदा नेल्‍यानंतर दि.31.08.2013 रोजी वि.प.क्र. 1 कंपनीकडून एसएमएस प्राप्‍त झाला व मोबाईल परत घेऊन जाण्‍याबाबत सुचित केले. परंतू प्रत्‍यक्षात वि.प.क्र. 2 कडे चौकशी केली असता त्‍याने तो एम एम एस आधीच्‍या जॉबशीटचा असल्‍याचे सांगितले आणि तक्रारकर्त्‍याकडून दुरुस्‍तीसाठी स्विकारलेला मोबाईल हँडसेट आजपर्यंत परत केला नाही. मोबाईल हँडसेट वारंटी कालावधीत असतांनाही वि.प.क्र. 1 व 2 यांनी तो दुरुस्‍त करुन न देणे ही निश्चितच सेवेतील न्‍यूनता आणि अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब आहे. म्‍हणून मुद्दा क्र. 1 वरील निष्‍कर्ष होकारार्थी नोंदविला आहे.

 

5.          मुद्दा क्र. 2 व 3 बाबत – मुद्दा क्र. 1 वरील निष्‍कर्षाप्रमाणे वि.प.क्र. 1 ने मोबाईल ग्राहक असलेल्‍या तक्रारकर्त्‍यास सदोष मोबाईल विकून आणि त्‍याची वारंटी काळात दुरुस्‍ती करुन न देता सेवेत न्‍यूनतापूर्ण व्‍यवहार आणि अनुचित व्‍यापार प्रथेचा अवलंब केला आहे. म्‍हणून तक्रारकर्ता तक्रारीत मागणी केल्‍याप्रमाणे वि.प.क्र. 3 ने तक्रारकर्त्‍याकडून घेतलेली मोबाईल हँडसेटची किंमत रु.5,490/- तक्रार दाखल दिनांक 14.05.2015 पासून रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदाएगीपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्‍के व्‍याजासह वि.प.क्र. 1 या मोबाईल निर्माता कंपनीकडून  मिळण्‍यास पात्र आहे. याशिवाय, तक्रार खर्चाबाबत रु.3,000/- मिळण्‍यास तक्रारकर्ता पात्र आहे. म्‍हणून मुद्दा क्र. 2 व 3 वरील निष्‍कर्ष त्‍याप्रमाणे नोंदविले आहेत.

 

                  वरील निष्‍कर्षास अनुसरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.

 

- आ दे श -

 

तक्रारकर्त्‍याची ग्राहक संरक्षण अधिनियमाचे कलम 12 खालील तक्रार वि.प.क्र. 1 विरुध्‍द खालीलप्रमाणे अंशतः मंजूर करण्‍यात येत आहे.    

1)    वि.प.क्र. 1 ने तक्रारकर्त्‍याकडून घेतलेली मोबाईल हँडसेटची किंमत रु.4,670/- तक्रार    दाखल दिनांक 14.05.2015 पासून रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदाएगीपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्‍के व्‍याजासह परत करावी.

2)    वि.प.क्र. 1 ने तक्रारकर्त्‍यास तक्रार खर्चाबाबत रु.3,000/- द्यावे.

3)    वि.प.क्र. 1 ने आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍यापासून एक महिन्‍याचे आत   करावी.

4)    वि.प.क्र. 2 व 3 विरुध्‍दची तक्रार खारिज करण्‍यात येत आहे.

5)    सदर आदेशाची  प्रमाणित प्रत उभय पक्षांना  विनामुल्‍य द्यावी.

6)    प्रकरणाची फाईल तक्रारकर्त्‍यास परत करावी.

 

 

 
 
[HON'ABLE MR. MANOHAR CHILBULE]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. PRADEEP PATIL]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.