Complaint Case No. CC/400/2017 | ( Date of Filing : 21 Sep 2017 ) |
| | 1. INTEKHAB ALAM KHAN | R/O. FIRDOS COLONY, JAFAR NAGAR, BEHIND POLICE LINE TAKLI, NAGPUR-440030 | Nagpur | Maharashtra |
| ...........Complainant(s) | |
Versus | 1. MICROMAX INFORMATICS LTD., THROUGH MANAGING DIRECTOR | H. OFF. AT MICROMAX HOUSE, 90-A, SECTOR-18, GURGAON-122015 | Nagpur | Maharashtra | 2. MICROMAX CARE, AL-RAZA MOBILE | OPP. RAILWAY STATION GATE, SANTRA MARKET, RATAN PLAZA, NAGPUR | Nagpur | Maharashtra |
| ............Opp.Party(s) |
|
|
Final Order / Judgement | (मा. सदस्य, श्री. नितिन एम. घरडे, यांच्या आदेशान्वये) आदेश तक्रारकर्त्याने सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत दाखल केली असून तक्रारीचे थोडक्यात स्वरुप असे आहे की, तक्रारकर्ता याने विरुध्द पक्ष क्रं. 1 कडून मायक्रामॅक्स टू इन वन लॅपटॉप (एल.टी.666) हा दि. 29.10.2015 रोजी ऑनलाईन द्वारा रुपये 15,499/- ला विकत घेतला. सदर बाबतचे बिल तक्रारकर्त्याने तक्रारी सोबत परिशिष्ट क्रं. 1 वर दाखल केलेले आहे. सदरचे लॅपटॉप घेते वेळी विरुध्द पक्ष क्रं. 1 यांनी तक्रारकर्त्याला वॉरन्टी कार्ड सुध्दा दिलेले असून सदरच्या लॅपटॉपची वॉरन्टी ही 12 महिन्याकरिता होती. तक्रारकर्ता पुढे नमूद करतो की, ऑगस्ट 2016 च्या दरम्यान लॅपटॉप मध्ये स्टारटिंगचा प्रोब्लेम होण्यास सुरुवात झाली व लॅपटॉप हा मध्ये मध्ये हँग होऊ लागला. त्यामुळे कंपनीच्या सांगण्याप्रमाणे तक्रारकर्त्याने वि.प.क्रं. 2 सर्विसिंग सेंटर मायक्रोमॅक्स केअर अल राजा मोबाईल, रेल्वे स्टेशन गेटच्या विरुध्द बाजूला संत्रा मार्केट नागपूर येथे दुरुस्तीकरिता दिनांक 25.08.2016 रोजी दिले. सदरच्या लॅपटॉप मध्ये सुधारणा करण्यासाठी लॅपटॉप सोबत असणारे Keyboard व इत्र साहित्य सुध्दा वि.प.क्रं. 2 यांच्याकडे दिले व याबाबतचे जॉब कार्ड वि.प.ने त.क.ला दिले असून त्याचा क्रं. 808 असा आहे. सदरचे जॉब कार्ड सुध्दा त.क.ने परिशिष्ट 3 वर दाखल केलेले आहे. त्यानंतर त.क.ने सदरचे लॅपटॉप दुरुस्तीकरिता व परत घेण्याकरिता विचारपूस केली असता, वि.प. 2 यांनी त.क.ला सांगितले की, सदरचे लॅपटॉप हे वि.प. क्रं. 1 यांच्या दिल्ली येथील कार्यालयात दुरुस्तीकरिता पाठविलेले असून तेथून परत आल्यानंतर तुम्हाला लॅपटॉप देण्यात येईल, परंतु 15-20 दिवसाचा कालावधी होऊन सुध्दा तक्रारकर्त्याने जमा केलेला लॅपटॉप दुरुस्त होऊन न मिळाल्यामुळे त्यांनी दिनांक 25.11.2016, 19.07.2017 रोजी विरुध्द पक्ष क्रं. 1 यांनी त्याचा लॅपटॉप दुरुस्त करुन द्यावा किंवा तो दुरुस्त होत नसल्यास नविन लॅपटॉप द्यावा असा ई-मेल पाठविला. कारण तक्रारकर्त्याने विकत घेतलेला लॅपटॉप हा वॉरन्टी कालावधी असल्यामुळे नविन लॅपटॉप देण्यात यावे अशी विनंती केली होती. परंतु सतत विनंती करुन सुध्दा तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष क्रं. 2 यांच्या कडे दिलेला लॅपटॉप दुरुस्त करुन आजपर्यंत दिलेला नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याला अतिशय शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला. विरुध्द पक्षाची सदरची कृती ही सेवेतील त्रुटी असून अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब करणारी आहे. म्हणून तक्रारकर्त्याने सदरची तक्रार मंचासमक्ष दाखल केलेली आहे. तक्रारकर्त्याने तक्रारीत अशी मागणी केली आहे की, विरुध्द पक्ष क्रं. 1 व 2 यांच्याकडून तक्रारकर्त्याच्या लॅपटॉपची किंमत रुपये 15,499/- ही रक्कम दिनांक 29.10.2015 पासून 18 टक्के दराने व्याजसह परत मिळावी. तसेच विरुध्द पक्षा कडून नुकसान भरपाई पोटी रुपये 1,00,000/-, शारीरिक, मानसिक त्रासापोटी रुपये 50,000/- व तक्रारीचा खर्च म्हणून रुपये 20,000/- मिळावे अशी विनंती केलेली आहे. विरुध्द पक्ष 1 व 2 यांना मंचामार्फत नोटीस बजाविण्यात आली. विरुध्द पक्ष क्रं. 1 यांना पाठविलेली नोटीस ‘‘नोटीस घेण्यास नकार’’ या शे-यासह परत आल्यामुळे मंचाने नि.क्रं. 1 वर दि.17.04.2018 रोजी विरुध्द पक्ष क्रं. 1 यांच्या विरुध्द प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश पारित केला. तसेच विरुध्द पक्ष 2 यांनी सुध्दा नोटीस घेण्यास नकार दिला असल्याने दिनांक 21.07.2018 रोजी विरुध्द पक्ष क्रं. 2 यांच्या विरुध्द प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश पारित केला. तक्रारकर्त्याने सदरच्या तक्रारी बरोबर अ.क्रं. 1 ते 6 दस्तावेज दाखल केले असून त्यात प्रामुख्याने (Retail Invoice) लॅपटॉप विकत घेतल्याचे बिल, वॉरन्टी कार्ड, दिनांक 25.08.2016 चे जॉब कार्ड व विरुध्द पक्ष क्रं. 1 यांना पाठविलेल्या ई- मेलची प्रत इत्यादी दस्तावेज दाखल केले. तक्रारकर्त्याने दाखल केलेले दस्तावेज, लेखी युक्तिवाद व तोंडी युक्तिवाद ऐकून घेतला असता मंचाने खालील मुद्दे विचारार्थ घेतले व त्यावरील कारणमिमांसा खालीलप्रमाणे. मुद्दे उत्तर
1 तक्रारकर्ता विरुध्द पक्षाचा ग्राहक आहे काय ? होय 2 विरुध्द पक्ष यांनी सेवेत त्रुटी करुन अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केला काय? होय 3 आदेश काय? अंतिम आदेशाप्रमाणे कारणमिमांसा - मुद्दा क्रमांक 1 व 2 बाबत - तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाकडून घेतलेल्या लॅपटॉप मध्ये काही त्रुटी होत्या व त्या त्रुटी सुधारण्याकरिता विरुध्द पक्ष क्रं. 2 यांच्याकडे लॅपटॉप दुरुस्तीकरिता दिला व सदरचा लॅपटॉप हा वॉरन्टी कालावधी असतांना देखील विरुध्द पक्षाने लॅपटॉप हा दुरुस्त करुन आजपर्यंत दिलेला नाही किंवा नविन लॅपटॉप दिलेला नाही. नि.क्रं. 2 (1) वरील दाखल दस्तावेजावरुन ही बाब स्पष्ट दिसून येते की, तक्रारकर्त्याने दिनांक 29.10.2015 रोजीच्या RETAIL INVOICE प्रमाणे रुपये 15,499/- ला लॅपटॉप विरुध्द पक्ष क्रं. 1 कडून विकत घेतले होते, तसेच दस्त क्रं. 2 (2)वर लॅपटॉपचे वॉरन्टी कार्ड व दस्त क्रं. 2(3) वर दि.25.08.2016 रोजी लॅपटॉपच्या दुरुस्तीकरिता विरुध्द पक्ष क्रं. 2 अल राजा मोबाईल सेंटर नागपूर येथे दिल्याबाबतचे जॉब कार्ड क्रं.808 वर अभिलेखावर दाखल आहे व त्यामध्ये हँगिंग प्रोब्लेम असल्याबाबतचे नमूद आहे व लॅपटॉप बरोबर की बोर्ड सुध्दा दिनांक 21.10.2016 रोजी दिल्याबाबतचे नमूद आहे. तसेच विरुध्द पक्ष क्रं. 1 यांना वारंवांर ई-मेल करुन लॅपटॉप दुरुस्त करुन मिळण्याबाबत किंवा नविन लॅपटॉप देण्यात यावे याबाबत विनंती केल्याचे ई-मेलची प्रत अभिलेखावर दाखल आहे. यावरुन ही बाब स्पष्ट होते की, तक्रारकर्ता हा विरुध्द पक्ष क्रं. 1 व 2 चा ग्राहक आहे. त्यामुळे मंचाचे असे स्पष्ट मत आहे की, तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष क्रं. 1 कडून विकत घेतलेल्या लॅपटॉपची विरुध्द पक्ष क्रं. 2 ने दुरुस्ती करुन दिली नाही. तसेच सदर लॅपटॉप हा वॉरन्टी कालावधीत असतांना सुध्दा जुने लॅपटॉप बदलून नविन लॅपटॉप दिले नाही, ही विरुध्द पक्षाच्या सेवेतील त्रुटी असून अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केल्याचे दिसून येते. म्हणून तक्रारकर्ता लॅपटॉपची किंमत रुपये 15,499/- लॅपटॉप दुरुस्तीकरिता दिल्याच्या तारखेपासून व्याजासह मिळण्यास पात्र आहे.
सबब खालीलप्रमाणे आदेश पारित करण्यात येते. अंतिम आदेश तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. विरुध्द पक्ष क्रं. 1 व 2 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्तिकरित्या तक्रारकर्त्याला लॅपटॉपची किंमत रुपये 15,499/- दिनांक 25.08.2016 पासून तर प्रत्यक्ष रक्कम अदाएगीपर्यंत द.सा.द.शे. 14 टक्के दराने व्याजसह द्यावे. विरुध्द पक्ष क्रं. 1 व 2 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्तिकरित्या तक्रारकर्त्याला झालेल्या शारीरिक, मानसिक त्रासापोटी रुपये 20,000/- व तक्रारीचा खर्च म्हणून रुपये 5000/- द्यावे. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्क द्यावी. तक्रारीची ‘ब’ व ‘क’ प्रत तक्रारकर्त्याला परत करावी.
| |