Maharashtra

Kolhapur

CC/212/2015

Sayman Manvel Disoja - Complainant(s)

Versus

Micromax Head Office - Opp.Party(s)

Sayman Disoja

16 May 2016

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, KOLHAPUR
Central Administrative Building, Second Floor,
South Side, Kasaba Bawada Road, Kolhapur.
Phone No. (0231) 2651327, Fax No. (0231) 2651327
.
 
Complaint Case No. CC/212/2015
 
1. Sayman Manvel Disoja
Kadgaon Tal.Bhudargad
Kolhapur
...........Complainant(s)
Versus
1. Micromax Head Office
Micromax House,697 Udyog Vihar,Feg 5 Gurgaon
Haryana
2. Siddhivinayk Mobile Services
Shop no.2 A,Shakuntala Complex,Rajarampuri 4th lane
Kolhapur
3. Micromax Branch Office
Pl no.26,Sector 19 E Vashi,Of To Palm Beach Road,Nr Adlab
Navi Mumbai
4. Costmer Care Office Micromax Informatics Ltd.
90 B, Sector 18 Gurgaon
Haryana
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Sharad D. Madake PRESIDENT
 HON'ABLE MR. Dinesh S. Gavali MEMBER
 HON'ABLE MRS. Rupali D. Ghatage MEMBER
 
For the Complainant:
In person
 
For the Opp. Party:
O.P.Nos.1, 2 & 4 -Ex-parte
O.P.No.3-Deleted.
O.P.No.5-Adv.P.B.Kadam/Adv.S.D.Maskar, Present
 
ORDER

निकालपत्र

दिनांक: (16.05.2016)  द्वाराः- मा. सदस्‍य – श्री दिनेश एस.गवळी.

1.           वि.प. नं. 1 ते 5 यांनी तक्रारदारांना द्यावयाचे सेवेत त्रुटी ठेवलेने, तक्रारदारांनी ग्राहक सरंक्षण कायदा कलम 1986, कलम-12 अन्‍वये प्रस्‍तुतची तक्रार मंचात दाखल केली आहे.

 

2.          प्रस्‍तुतची तक्रार स्विकृत करुन वि.प.क्र.1 ते 5 यांना नोटीसीचा आदेश झाला. वि.प.क्र.1, 2 व 4 यांना नोटीस मिळूनही हजर नसल्‍याने त्‍यांचे विरुध्‍द दि.27.01.2016 रोजी एकतर्फा सुनावणीचा आदेश पारीत करण्‍यात आला. वि.प.क्र.3 यांना मंचाचे दि.15.02.2016 चे आदेशानुसार वगळणेत आले. वि.प.क्र.5 यांनी लेखी म्‍हणणे दाखल केले. तक्रारदार व वि.प.क्र.5 तर्फे वकिलांचा तोंडी अंतिम युक्‍तीवाद ऐकला.

 

3.         तक्रारदार यांची थोडक्‍यात तक्रार अशी की, :-

            तक्रारदारांनी आशिष इलेक्‍ट्रॉ‍निक्‍स, कोल्‍हापूर येथून दि.03.09.2014 रोजी मायक्रोमॅक्‍स मॉडेल कॅनवास एक्‍स एल 2ए 109 चा मोबाईल खरेदी केला. त्‍यानंतर पंधरा दिवसांतच मोबाईल सिम कार्ड इनसर्ट ही तक्रार चालू झाली. पाठोपाठ चार्जिंग, बॅटरी बॅकअप, बॅटरी इम्‍पटी आणि डिस्‍प्‍ले बॅड पिक्‍सल या तक्रारी चालू झाल्‍या. मोबार्इल फोनला एक वर्षाची वॉरंटी असून जवळ जवळ आठ महिने मोबार्इल दुरस्‍तीसाठी सर्व्हिस सेंटरमध्‍ये ठेवण्‍यात आला.  मोबाईल सेंटरकडून दखल घेतली गेली नाही.  याबाबत असे तोंडी सांगण्‍यात आले की, पुन्‍हा एकवेळ मोबाईल दुरुस्‍त करुन पाहुया, दुरुस्‍त न झाल्‍यास मायक्रोमॅक्‍स कंपनीकडे बदलून मिळण्‍यासाठी विनंती करुया. या गोष्‍टीसाठी सर्व्हिस सेंटरकडून पाच महिन्‍यांचा कालावधी घेऊन सुध्‍दा असे सांगण्‍यात आले की, मोबाईल दुरुस्‍त करुन मिळेल पण बदलून दिला जाणार नाही. तक्रारदारांनी ग्राहक तक्रार निवारण मंच यांचा टोल फ्री नं.1800114000 वरती संपर्क साधून माहिती मिळवली. त्‍यानुसार, वि.प.यांना दि.18.06.2015 रोजी लेखी पत्राव्‍दारे असा खुलासा केला की, सदर मोबाईल फोनची दुरुस्‍ती न करता बदलून मिळावा. तसेच याबाबतचा निर्णय मायक्रोमॅक्‍स कंपनीने 10 ते 15 दिवसांत द्यावा. तथापि सदरहू प्रकारची दखल घेतली गेली नाही. तसेच कोणतेही उत्‍तर अदयाप आलेले नाही.  मायक्रोमॅक्‍स कंपनी व सर्व्हिसच्‍या त्रासाला कंटाळून जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच यांचेकडे तक्रार दाखल करणेचे ठरविले आहे.  त्‍यासाठी पुन्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच यांचा टोल फ्री नं.1800114000 वरती संपर्क साधला असता जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, कोल्‍हापूर यांचेकडे मायक्रोमॅक्‍स कंपनीची तक्रार दाखल करा असे सांगण्‍यात आले. सदर मोबाईल मॉडेल कॅनवास एक्‍स एल 2ए 109 हा नगास नग बदलून तसेच वॉरंटीसह मिळावा. जर या मॉडेलमध्‍ये मुळातच तक्रारी किंवा दोष असतील तर मोबाईलची रक्‍कम व्‍याजासह परत मिळावी.  तक्रारदारांना सदर मोबाईलसाठी झालेल्‍या शारिरीक व मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.25,000/- व कोर्टकामाकरीता रक्‍कम रु.5,000/- नुकसानभरपाईची रक्‍कम मिळावी अशी सदरहू मंचास विनंती केलेली आहे.              

 

4.          तक्रारदारांनी तक्रार अर्जासोबत एकूण 14 कागदपत्रे दाखल केलेली आहेत. अ.क्र.1 ला मोबाईल बदलून मिळणेबाबत पाठविलेले विनंती पत्र, अ.क्र.2 ला मोबाईल खरेदीचे बिल, अ.क्र.3, 5, 6, 8, 9 व 10 ला सर्व्हिस सेंटरची मोबाईल कार्यपत्रिका, अ.क्र.4 व 7 ला सर्व्हिस सेंटरची मोबाईल कार्यपत्रिका पुनरावृत्‍ती, अ.क्र.11 ला स्पिडपोस्‍ट व रजिस्‍टर पावती, अ.क्र.12  ला मायक्रोमॅक्‍स प्रधान कार्यालयाची टपाल पोच, अ.क्र.13 ला मायक्रोमॅक्‍स कस्‍टमर केअरची टपाल पोहच व अ.क्र.14 ला धनादेश व शुल्‍क आकारणी बॅंक पावती व दि.19.08.2015 रोजीचे तक्रारदारांचे शपथपत्र, इत्‍यादीं कागदपत्रे जोडलेली आहेत.

 

5.                  वि.प.क्र.5 यांनी तक्रारदारांचे तक्रारीस लेखी म्‍हणणे दाखल केले असून त्‍यांनी तक्रारदारांची तक्रार परिच्‍छेदनिहाय नाकारलेली आहे. तक्रारदारांचे तक्रार अर्जातील कथने पूर्णपणे, खोटी, चुकीची, काल्‍पनिक व संदिग्‍ध असून तक्रार प्रथमदर्शनीच चालणेस पात्र नाही. वि.प.क्र.5 यांनी तक्रारदारांना दयावयाचे सेवेत कोणतीही त्रुटी ठेवलेली नाही, त्‍यामुळे सदरहू अर्ज चालणेस पात्र नाही. वि.प.क्र.5 यांचे आशिष इलेक्‍ट्रॉनिक्‍स या नावाने वेगवेगळया कंपन्‍याचे मोबाईल हॅण्‍डसेट अधिकृतरित्‍या विक्री करणेचा व्‍यवसाय करतात.  वि.प.क्र.5 यांनी तक्रारदारांना सर्व मोबाईल हॅण्‍डसेटची योग्‍य ती माहिती व किंमत समजावून सांगितली. तक्रारदारांनी सर्व माहिती घेऊन मायक्रोमॅक्‍स कंपनीचा कॅनव्‍हास एक्‍सएल 2ए 109 या मॉडेलचा आय.ई.एम.आय.   नं.91137574374979 हा मोबाईल पसंत करुन दि.03.09.2014 रोजी कंपनी रक्‍कम रु.9,350/- च्‍या किंमतीस खरेदी केलेला आहे. सदरचा मोबाईल हॅण्‍डसेट खरेदीपूर्वी वि.प.क्र.5 यांनी सदर मोबाईल कंपनीचे विक्री पश्‍चात दुरुस्‍तीचे सेवा केंद्राबाबतची संपूर्ण माहिती दिली होती व आहे.  तसेच विक्री पश्‍चात मोबार्इल हॅण्‍डसेट दुरुस्‍ती अथवा बदलीबाबत कंपनीची एक वर्षाची वॉरंटी असलेचे सांगून मोबाईल्‍ दुरुस्‍ती अथवा बदली करणे, इत्‍यादी बाबीं वि.प.क्र.5 यांचे आखत्‍यारित येत नसलेचे देखील सांगितले होते. तसेच सदरचे मोबार्इल हॅण्‍डसेटची कोणतीही हमी ही वि.प.क्र.5 हे देत नाहीत तसेच कोणतीही वॉरंटी देखील देत नाहीत अशी आशयाची नमुद पावती वि.प.क्र.5 यांनी मोबाईल खरेदी करेतेवेळी तक्रारदारांना दिलेली होती. तिच बिलपावती तक्रारदारांनी सदर कामी दाखल केलेली आहे. मायक्रोमॅक्‍स कंपनी तर्फे तक्रारदारांना दिलेले कागद असून वि.प.क्र.5 यांना त्‍याबाबतची कोणतीही माहिती नाही. तसेच सदरच्‍या मोबाईल हॅण्‍डसेट नादुरुस्‍ती बाबत वि.प.क्र.5 यांना जबाबदार धरता येणार नाही. मोबाईल विक्री पश्‍चात सेवा ते देत नसलेने वि.प.क्र.5 यांनी विक्री पश्‍चात सेवा देण्‍याची कोणत्‍याही प्रकारची संयुक्तिकरित्‍या वॉरंटी तक्रारदारास दिलेली नाही. तक्रारदार हे निव्वळ कायदयातील तरतुदींचा गैरवापर करुन मे.कोर्टाची दिशाभूल करुन सहानु‍भुती मिळवण्‍याचा व बेकायदेशी‍ररित्‍या नुकसानभरपाई मिळवण्‍याचा प्रयत्‍न करीत आहेत. तक्रारदारांनी वि.प.क्र.5 यांचेशी विक्री पश्‍चात संपर्क केलेला नाही तसेच मोबाईल दुरुस्‍तीबाबत लेखी किंवा तोंडी तक्रार केलेली नाही. त्‍यामुळे वि.प.क्र.5 यांना जबाबदार धरता येणार नाही. तथापि तक्रारदारांचा तक्रार अर्ज हा पूर्णपणे खोटया व काल्‍पनिक कथनावर अवलंबून असून तक्रारदारांना वि.प.यांचे विरुध्‍द तक्रार करुन मे.कोर्टाची दिशाभूल केलेली आहे. सबब, तक्रारदारांचा तक्रार अर्ज फेटाळण्‍यात यावा.

 

6.         वि.प.क्र.1, 2, 4 यांना नोटीस मिळूनसुध्‍दा ते या कामी हजर नाही, म्‍हणून त्‍यांचेविरुध्‍द एकतर्फा आदेश पारीत करणेत आला.  वि.प.क्र.3 यांना मंचाचे दि.15.02.2006 चे आदेशानुसार वगळणेत आले. वि.प.क्र.5 यांनी म्‍हणणे दाखल केले. तक्रारदार व वि.प.क्र.5 यांचे वकीलांचा अंतिम युक्‍तीवाद ऐकला.

 

क्र.

मुद्दे

उत्‍तर

1

वि.प. यांनी तक्रारदार यांना दोषयुक्‍त मोबाईल हॅन्‍डसेट देऊन सेवेत त्रुटी ठेवली आहे काय ?

होय

2

आदेश काय ?

तक्रार अंशत: मंजूर.

     

कारणमिमांसाः-

मुद्दा क्र.1:- प्रस्‍तुत प्रकरणात यातील तक्रारदारांनी वि.प.क्र.5 आशिष इलेक्‍ट्रॉनिक्‍स, कोल्‍हापूर यांचेकडून दि.03.09.2014 रोजी मायक्रोमॅक्‍स मोबाईल मॉडेल कॅनवास एक्‍स एल 2ए 109 चा खरेदी केला. त्‍या अनुषंगाने, तक्रारदारांनी कागद यादीसोबत अ.क्र.2 कडे बिल दाखल केलेले आहे.  सदर बिलावरती आशिष इलेक्‍ट्रॉनिक्‍स, कोल्‍हापूर या नावाने दुकानाचे बिल आहे. त्‍याचप्रमाणे अ.क्र.3 ते 10 कडे तक्रारदाराने वि.प.क्र.2 कडे त्‍यांचा मोबाईल हॅन्‍डसेट दुरुस्‍तीकरीता दिलेचे सर्व्‍हीस सेंटरचे जॉबशीट दाखल केले असून त्‍यामध्‍ये मोबाईल हॅन्‍डसेटमध्‍ये SIM Insert SIM card व charging battery Back up empty असे problem असलेचे नमुद केले आहे. सदरचे सर्व्‍हीस रेकॉर्डवरुन तक्रारदाराने खरेदी केलेल्‍या मोबाईलमध्‍ये सुरुवातीपासून वर नमुद केलेप्रमाणे तक्रारी असलेचे दिसून येते. सदरचे तक्रारी या मोबार्इलचे वॉरंटीच्‍या कालावधीमध्‍ये आहेत.  तक्रारदाराने सदरचे आपले तक्रारीच्‍या पृष्‍ठर्थ या मंचात पुराव्‍याचे शपथपत्र दाखल केलेले आहे. वरील सर्व बाबींवरुन तक्रारदारांना देण्‍यात आलेला मो‍बाईल हॅन्‍डसेट दोषयुक्‍त होता ही बाब स्‍पष्‍ट होते.

 

            प्रस्‍तुत कामातील वि.प.क्र.5 आशिष इलेक्‍ट्रॉनिक्‍स हे या मंचासमोर हजर होऊन म्‍हणणे दाखल केले.  त्‍यांनी त्‍यामध्‍ये तक्रारदारांनी दि.03.09.2014 रोजी त्‍यांचेकडून मोबाईल खरेदी केला आहे ही बाब मान्‍य केली आहे. तथापि सदर मोबाईल कंपनीचे विक्री पश्‍चात दुरुस्‍त सेवा केंद्राबाबतची संपूर्ण माहिती तक्रारदारांना दिली होती व आहे. वि.प.क्र.5 हे फक्‍त मोबाईल हॅन्‍डसेट विक्री करण्‍याचे कार्य करीत असून विक्री पश्‍चात सेवा देत नसल्‍याने तसेच तक्रारदाराने मोबाईल हॅन्‍डसेट बिघाड झालेबाबत व त्‍याचे दुरुस्‍तीबाबत कधीही वि.प.क्र.5 कडे संपर्क करुन तक्रार केली नाही.  त्‍यामुळे त्‍यांना जबाबदार धरता येणार नाही. याबाबत हे मंच या ठिकाणी असे नमुद करते की, माल विक्री कायदयाप्रमाणे विक्रेत्‍याने ग्राहकांना विक्री करणारी वस्‍तु ही चांगल्‍या दर्जाची व चांगल्‍या प्रतीची देणे आवश्‍यक आहे. परंतु प्रस्‍तुत कामी तक्रारदारांना दिलेला मोबाईल हॅन्डसेट हा दोषयुक्‍त वि.प.यांचेकडून विक्री केलेला आहे. त्‍यामुळे वि.प.क्र.5 यांनी तक्रारदारांना दयावयाचे सेवेत त्रुटी ठेवली आहे असे मंचाचे मत आहे. वरील सर्व विवेचनाचा विचार करीता, वि.प.क्र.1, 2, 4 व 5 यांनी तक्रारदारांना दयायवयाचे सेवेत त्रुटी ठेवली आहे या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्‍तर हे मंच होकारार्थी देत आहे.                   

 

मुद्दा क्र.2:- वर नमुद मुद्दा क्र.1 मध्‍ये नमुदप्रमाणे वि.प.क्र.1, 2, 4 व 5 यांनी तक्रारदारांना दयावयाचे सेवेत त्रुटी ठेवल्‍याने वि.प. क्र.1, 2, 4 व 5 यांनी तक्रारदारांना तक्रार अर्जात नमुद मायक्रोमॅक्‍स मोबाईल मॉडेल कॅनवास एक्‍स एल 2ए109 मोबाईल हॅन्‍डसेट परत घेऊन त्‍यानंतर त्‍याच मॉडेलचा नवा हॅन्‍डसेट दयावा अथवा सदरचा मोबाईल परत होऊन सदर मोबाईलची हॅन्‍डसेटची किंमत रक्‍कम रु.9,350/- (अक्षरी रक्‍कम रुपये नऊ हजार तीनशे पन्‍नास फक्‍त) इतकी तक्रारदारांना दयावी व मानसिक त्रासापोटी रक्कम रु.3,000/- (अक्षरी रक्‍कम रुपये तीन हजार फक्‍त)  व तक्रार अर्जाच्‍या खर्चापोटी रक्‍कम रु.2,000/- (अक्षरी रक्‍कम रुपये दोन हजार फक्‍त) अदा करावेत, या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब, आदेश.

 

 

आदेश

 

1.     तक्रार अंशत: मंजूर करण्‍यात येते.

2.    वि.प.क्र.1, 2, 4 व वि.प.क्र.5-आशिष इलेक्‍ट्रॉनिक्‍स, कोल्‍हापूर यांनी तक्रार अर्जात नमुद मायक्रोमॅक्‍स कंपनीचा मॉडेल कॅनवास एक्‍स एल 2ए 109 चा हॅन्‍डसेट परत घेऊन तक्रारदारांना त्‍याच मॉडेलचा नवा मोबाईल हॅन्‍डसेट दयावा अथवा सदरचा मोबाईल हॅन्डसेट परत घेऊन सदर मोबाईलची किंमत रु.9,350/- (अक्षरी रक्‍कम रुपये नऊ हजार तीनशे पन्‍नास फक्‍त) इतकी रक्‍कम तक्रारदारांना अदा करावी.

3     वि.प. क्र.1, 2, 4 व वि.प.क्र.5-आशिष इलेक्‍ट्रॉनिक्‍स, कोल्‍हापूर यांनी तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.3,000/- (अक्षरी रक्‍कम रुपये तीन हजार फक्‍त) व तक्रारीच्‍या खर्चापोटी रक्‍कम रु.2,000/- (अक्षरी रक्‍कम रुपये दोन हजार फक्‍त) अदा करावेत.

4     आदेशाच्‍या प्रमाणित प्रतीं उभय पक्षकारांना विनामुल्‍य पाठविण्‍यात याव्‍यात.

 

 

 
 
[HON'BLE MR. Sharad D. Madake]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. Dinesh S. Gavali]
MEMBER
 
[HON'ABLE MRS. Rupali D. Ghatage]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.