Maharashtra

Nagpur

CC/14/433

Kailash Sambhaji Narwade - Complainant(s)

Versus

Micro Max Mobiles Through Its Chief Exe Officer Shri Deepak Mehrotra Micromax House 90b Sector 18 Gu - Opp.Party(s)

Swapnil S. Shingane

18 Mar 2017

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/14/433
 
1. Kailash Sambhaji Narwade
Ghatate Chambers Panchsheel SQuare Wardha Road Nagpur
Nagpur
Maharastra
...........Complainant(s)
Versus
1. Micro Max Mobiles Through Its Chief Exe Officer Shri Deepak Mehrotra Micromax House 90b Sector 18 Gurgaon
Mehrotra Micromax House 90b Sector 18 Gurgaon 122015
Gurgaon
Gurgaon
2. The Proprietor City Collection
Shop No 2 Neel Kamal Complex Mahajan Market Sitabuldi Nagpur 12
Nagpur
Maharastra
3. Micromax Care,Smart Care Services
Plot No 100 Dhatoli Garden Nagpur 440012
Nagpur
Maharastra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. VIJAY C. PREMCHANDANI PRESIDENT
 HON'BLE MR. PRADEEP PATIL MEMBER
 
For the Complainant:Swapnil S. Shingane , Advocate
For the Opp. Party:
Dated : 18 Mar 2017
Final Order / Judgement

 (मंचाचा निर्णय : श्री. विजय प्रेमचंदानी - मा. अध्‍यक्ष यांचे आदेशांन्‍वये)

1.     तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाविरुध्‍द ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्‍या कलम 12 अन्‍वये प्रस्‍तुत तक्रार दाखल केलेली असुन तक्रारकर्ताचे तक्रारीतील थोडक्‍यात कथन असे आहे की, तक्रारकर्त्‍याने दि.26.09.2013 रोजी विरुध्‍द पक्ष क्र.1 निर्मीत कंपनीचा भ्रमणध्‍वनी विरुध्‍द पक्ष क्र.3 कडून एकूण रक्‍कम रु.18,150/- ला विकत घेतला होता. सदर भ्रमणध्‍वनी घेतल्‍यानंतर त्‍यामध्‍ये वारंवार बिघाड होत असल्‍याने तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षांशी संपर्क साधला. दि.26.04.2014 रोजी तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षांच्‍या सर्व्‍हीस सेंटर येथे सदर भ्रमणध्‍वनी दुरुस्‍तीकरीता दिला, परंत त्‍यांनी कोणतीही दखल घेतली नाही व तो दुरुस्‍त करुन दिला नाही. तक्रारकर्त्‍याने वारंवार भ्रमणध्‍वनीच्‍या दुरुस्‍ती बाबत ई-मेलव्‍दारे चौकशी केली, परंतु त्‍याची कोणतीही दखल घेतली नाही. म्‍हणून तक्रारकर्त्‍याने सदरची तक्रार मंचासमक्ष दाखल केलेली आहे.

2.   तक्रारकर्त्‍याने तक्रारीत अशी मागणी केली आहे की, विरुध्‍द पक्ष क्र. 1 ते 3 यांनी तक्रारकर्त्‍यास न्‍युनतम सेवा दिल्‍याचे घोषीत करण्‍यांत यावे. तसेच विरुध्‍द पक्ष क्र. 1 ते 3 यांना तक्रारकर्त्‍याने खरेदी केलेल्‍या भ्रमणध्‍वनीची किंमत रु.18,150/- परत करण्‍याचा आदेश व्‍हावा. तक्रारकर्त्‍यास झालेल्‍या शारीरिक, मानसिक त्रासापोटी तसेच तक्रारीचा खर्च देण्‍यांचा आदेश व्‍हावा, अशी विनंती केली आहे.

3.   तक्रारकर्ताची तक्रार स्विकृत करुन विरुध्‍द पक्षांना नोटीस काढण्‍याचा आदेश पारित करण्‍यांत आला. विरुध्‍द पक्ष क्र.1 यांनी प्रकरणात हजर होऊनही त्‍यांनी आपले उत्‍तर दाखल केले नाही म्‍हणून त्‍यांचे विरुध्‍द दि.12.01.2016 रोजी प्रकरण विना लेखीजबाब पुढे चालविण्‍याचा आदेश पारित करण्‍यांत आला. तसेच विरुध्‍द पक्ष क्र. 2 व 3 यांना नोटीस प्राप्‍त होऊनही ते प्रकरणात हजर झाले नाही. म्‍हणून विरुध्‍द पक्ष क्र. 2 व 3 विरुध्‍द पदि.12.01.2016 व 03.10.2016 रोजी प्रकरण एकतर्फी चालविण्‍याचा आदेश पारित करण्‍यांत आला.

    विरुध्‍द पक्ष क्र.1 ने निशाणी क्र.11 वर त्‍यांचे लेखीउत्‍तर प्रस्‍तुत केले, परंतु निशाणी क्र. 1 वर दि.12.01.2016 रोजी पारित झालेल्‍या विना लेखीजबाबाशिवाय प्रकरण चालविण्‍याचा आदेश रद्द करण्‍याबाबत कोणताही अर्ज दाखल केला नसल्‍यामुळे त्‍यांचे लेखीउत्‍तर फक्‍त दाखल करुन घेण्‍यांत आले.

4.     तक्रारकर्तातर्फे दाखल तक्रार, दस्‍तावेज तसेच लेखी व तोंडी युक्तिवाद ऐकण्‍यांत आला असता खालील मुद्दे मंचाच्‍या विचारार्थ घेण्‍यात आले. त्‍यावरील निष्‍कर्ष आणि त्‍याबाबतची कारण मिमांसा पुढील प्रमाणे. 

                    मुद्दे                                                                                निष्‍कर्ष 

1) तक्रारकर्ता ही विरुध्‍द पक्षांची ग्राहक आहे काय ?                        होय.                 

2) विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्ताप्रती अनुचित व्‍यवहार प्रथेचा

   अवलंब केला आहे काय ?                                                            होय.

3) अंतिम आदेश काय ?                                                               आदेशाप्रमाणे. 

                                             - // कारण मिमांसा // -

5.       मुद्दा क्र. 1 बाबत- तक्रारकर्त्‍याने दि.26.09.2013 रोजी विरुध्‍द पक्ष क्र.1 कंपनीव्‍दारे निर्मीत भ्रमणध्‍वनी मॉडेल नं. A -210 विरुध्‍द पक्ष क्र. 2 चे दुकानातून रु.18,150/- मध्‍ये विकत घेतला होता, यात कोणताही वाद नाही. तसेच तक्रारकर्त्‍याने त्‍याबाबत प्रकरणात देयक दाखल केले असुन तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षांचा ‘ग्राहक’, आहे हे सिध्‍द होते. सबब मुद्दा क्र. 1 चे उत्‍तर होकारार्थी नोंदविण्‍यांत येते.

6.      मुद्दा क्र. 2 बाबतः-  तक्रारकर्त्‍याने भ्रमणध्‍वनीमध्‍ये बिघाड झाला व त्‍याबाबत विरुध्‍द पक्ष क्र.2 कडे दुरुस्‍त किंवा भ्रमणध्‍वनी बदलवुन देण्‍याबाबत संपर्क साधला तर त्‍या भ्रमणध्‍वनीमधील बिघाड दुरुस्‍त झाला नाही व विरुध्‍द पक्ष क्र. 1 ते 3 यांनी तक्रारकर्त्‍यास त्‍याचा भ्रमणध्‍वनीमध्‍ये असलेल्‍या तक्रारीचे निवारण केले नाही. तसेच सदर प्रकरणात त्‍यांची बाजू मांडली  नाही यावरुन असे निदर्शनास येते की, विरुध्‍द पक्ष क्र. 1 ते 3 यांनी तक्रारकर्त्‍यास दिलेल्‍या सेवेत अनुचित व्‍यवहार प्रथेचा  अवलंब केला आहे. सबब मुद्दा क्र. 3 चे उत्‍तर होकारार्थी नोंदविण्‍यांत आलेले आहे.

8.   मुद्दा क्र. 3 बाबतः-  मुद्दा क्र.1 ते 3 चे विवेचनावरुन खालिलप्रमाणे अंतिम आदेश पारित करण्‍यांत येत आहे.

 

 - // अंति आदेश // -

1. तक्रारकर्ताची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यांत येत आहे. 

2. विरुध्‍द पक्ष क्र. 1 ते 3 यांनी तक्रारकर्त्‍याला भ्रमणध्‍वनीकरीता घेतलेली रक्‍कम रु.18,150/- परत करावी.  

3. विरुध्‍द पक्ष क्र. 1 ते 3 यांनी तक्रारकर्तास झालेल्‍या शारीरिक, मानसिक त्रासापोटी रु.5,000/- व तक्रारीचा खर्च रु.2,500/- अदा करावी. 

4. विरुध्‍द पक्ष क्र. 1 ते 3 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्‍या वरील आदेशाची अंमलबजावणी आदेशाची प्रत मिळाल्‍यापासुन 30 दिवसांचे आंत करावी. 

5. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत विनामुल्‍य द्यावी. 

6. तक्रारकर्तास प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.

 

 
 
[HON'BLE MR. VIJAY C. PREMCHANDANI]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. PRADEEP PATIL]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.