Maharashtra

Satara

CC/11/23

Shri hemant Balkushn vanarse - Complainant(s)

Versus

Mhratha Sah Patsnstha Ldt - Opp.Party(s)

shethi

06 May 2011

ORDER


ReportsDistrict Consumer disputes redressal Forum Satara Near Cooperative Court Sadara Bazar Satara-415001
CONSUMER CASE NO. 11 of 23
1. Shri hemant Balkushn vanarse 140. Mlaharpeth satara ...........Appellant(s)

Vs.
1. Mhratha Sah Patsnstha Ldt Sadrbzar satara2. Chairman N.M. Patilsadrbzarsatara3. Sanchalk . A.B. Kalevynkthapura satarasatara4. Sanchalk. K. D. Shindeshukrwar peth satara5. Sanchalk. T.A. DhanwadeKaranje satarasatara6. Sanchalk. B.K. NibalkarChinchurni tal Phaltansatara7. Sanchalk. S.S.PawarBasappapeth satarasatara8. Sanchalk. S.S. PawarBudhawar Peth satara9. Sanchalk. R.B. JedheMangalwar peth satarasatara10. Sanchalk. J.D. PawarDhavadashi Tal Satarasatara11. Sanchalk.M. L. PatilViKas nagar satarasatara12. Sanchalk. R.H. KadamKadambag.satarasatara13. Sanchalk. C. LokhndeSangamnagr satara ...........Respondent(s)


For the Appellant :
For the Respondent :

Dated : 06 May 2011
ORDER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

                                                            नि.33
मे. जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर
                                          तक्रार क्र. 23/2011
                                          नोंदणी तारीख – 29/1/2011
                                          निकाल तारीख – 6/5/2011
                                          निकाल कालावधी – 97 दिवस
श्री विजयसिंह दि. देशमुख, अध्‍यक्ष
श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्‍या
श्री सुनिल कापसे, सदस्‍य
 
(श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्‍या यांनी न्‍यायनिर्णय पारीत केला)
------------------------------------------------------------------------------------
1. श्री हेमंत बाळकृष्‍ण वनारसे
2. श्रीमती पदमावती बाळकृष्‍ण वनारसे
    तर्फे मुखत्‍यार श्री हेमंत बाळकृष्‍ण वनारसे
    रा.140, मल्‍हार पेठ, सातारा                      ----- अर्जदार
                                         (अभियोक्‍ता श्री विजय शेट्टी)
      विरुध्‍द
1. मराठा सहकारी पतसंस्‍था लि.
   506/1, मराठा भवन, प्‍लॉट नं.87,
   सदर बझार, सातारा
2. मराठा सहकारी पतसंस्‍था लि.
   तर्फे चेअरमन, श्री नरेंद्र मोहनराव पाटील
   रा.27, मॅगझीन कॉलनी, सदर बझार,
   सातारा
3. संचालक,
   श्री अशोक बापूराव काळे
   रा. मोरे कॉलनी, व्‍यंकटपुरा पेठ,
   सातारा
4. संचालक श्री किशोर दत्‍तात्रय शिंदे
   रा.46, शुक्रवार पेठ, सातारा
5. संचालक, श्री तुकाराम आनंदा धनवडे
   मु.करंजे पो. मामुडी, ता.जावली,
   जि.सातारा
6. संचालक श्री बापूसाहेब केशवराव निंबाळकर
   रा.मु.पो. चिंचुर्णी, ता.फलटण
7. संचालक श्री सतिश सर्जेराव पवार
   रा.60/61, बसप्‍पा पेठ, सातारा
8. संचालक, श्री सिताराम साहेबराव पवार
   रा.98, बुधवार पेठ, सातारा
9. संचालक, श्री राजू भानू जेधे
   रा.513, मंगळवार पेठ, सातारा
10. संचालक श्री जगन्‍नाथ ज्ञानू पवार
   रा.मु.पो. धावडशी, ता.जि.सातारा
11. संचालक श्री मिलींद लक्ष्‍मणराव पाटील
   रा.विकास नगर, संगमनगर, सातारा
12. संचालक, श्री रविंद्र हिंदराज कदम
   रा.470, कदमबाग, कॅम्‍प, सातारा
13. संचालक, श्री चंद्रकांत लोखंडे
   रा.हॉटेल मीन, विकास नगर,
   संगमनगर, सातारा                                    ----- जाबदार
                                          (अभियोक्‍ता श्री डी.एस.घाडगे)
 
न्‍यायनिर्णय
 
1.     अर्जदार यांनी जाबदार पतसंस्‍थेत वेगवेगळया ठेवपावत्‍यांन्‍वये वेगवेगळया रकमा मुदत ठेव योजनेअंतर्गत ठेव म्‍हणून ठेवलेल्‍या आहेत. ठेवींची मुदत संपल्‍यानंतर अर्जदार यांनी ठेव रकमेची मागणी केली असता जाबदार यांनी रक्‍कम परत दिली नाही. सबब ठेव रक्‍कम व्‍याजासह मिळावी, तसेच मानसिक त्रास व तक्रारीचा खर्च मिळावा म्‍हणून अर्जदार यांनी या मंचासमोर दाद मागितली आहे.
2.    जाबदार क्र. 1 ते 5, 7, 8 व 10 ते 12 यांनी त्‍यांचे लेखी म्‍हणणे नि.24 कडे दाखल करुन अर्जदारची तक्रार नाकारली आहे. जाबदार हे संस्‍थेचे विद्यमान संचालक नाहीत. अर्जदार यांनी ठेवपावती तारणावर घेतलेली कर्ज रक्‍कम परतफेड केलेशिवाय व ठेवपावतीची मुदत संपल्‍याशिवाय सदरच्‍या रकमा मागणेचा अर्जदार यांना हक्‍क नाही. अर्जदार यांनी रकमांची कधीही मागणी केली नव्‍हती अगर जाबदार यांनी रक्‍कम देण्‍याचे अर्जदार यांना नाकारलेले नव्‍हते. ठेवपावतींचे नूतनीकरण करुन देणेस जाबदार आजही तयार आहेत. तक्रारअर्जापूर्वी अर्जदार यांनी कोणतीही नोटीस दिलेली नव्‍हती. जाबदार संस्‍था आर्थिक अडचणीत आहे. जाबदार संस्‍थेचया दि. 16/5/2010 रोजी झालेल्‍या विशेष सर्वसाधारण सभेतील ठरावाप्रमाणे संस्‍थेचे कामकाज चालू आहे. सबब तक्रारअर्ज रद्द करण्‍यात यावा असे जाबदार यांनी कथन केले आहे.
3.    जाबदार क्र.6 यांना प्रस्‍तुत तक्रारअर्जाचे नोटीसची बजावणी होऊनही ते नेमलेल्‍या तारखांना मंचासमोर हजर राहिले नाहीत. जाबदार क्र.9 व 13 यांनी प्रस्‍तुत तक्रारअर्जाची नोटीस स्‍वीकारली नाही. नोटीस न स्‍वीकारलेबाबतचे पोस्‍टाचे शेरे असलेले लखोटे प्रस्‍तुतकामी दाखल आहेत. जाबदार क्र.6, 9 व 13 हे नेमलेल्‍या तारखांना मंचासमोर हजर राहिले नाहीत. तसेच त्‍यांनी त्‍यांचे लेखी म्‍हणणे व शपथपत्र दाखल केले नाही. सबब, त्‍यांचेविरुध्‍द एकतर्फा आदेश करण्‍यात आला.
     
4.    जाबदार क्र. 1 ते 5, 7, 8 व 10 ते 12 यांनी नि.24 कडे म्‍हणणे तसेच शपथपत्र देवून अर्जदारची तक्रार नाकारली आहे व म्‍हणणेमध्‍ये अनेक मुद्दे उपस्थित केले आहेत. 
 
5.    जाबदारचे म्‍हणणेनुसार सर्वच जाबदार विद्यमान संचालक नाहीत परंतु तसा पुरावा दाखल केला नाही. तसेच ठेव पावत्‍यांची मुदत 2008, 2009 अशी आहे, सबब तक्रारअर्ज मुदतीत नाही असाही मुदृा उपस्थित केला आहे. निर्विवादीतपणे ठेवपावत्‍यांची मुदत 2008 व 2009 साली संपत आहे हे खरे आहे परंतु अर्जदार शपथपत्राने वेळोवेळी रक्‍कम मागणेस गेले असता जाबदार दाद देत नाहीत असे कथन करतात. सबब कायद्यानुसार रक्‍कम देणेस नकार दिलेपासून मुदतीत तक्रार दाखल आहे हे स्‍पष्‍ट आहे. सबब तक्रार चालणेस पात्र आहे असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे. तसेच मुदत संपलेशिवाय रकमा मागणेचा अर्जदारना हक्‍क व अधिकार नाही असेही जाबदार कथन करतात. याही जाबदारचे कथनात‍ तथ्‍य नाही. कारण ठेवीदार स्‍वतःची ठेव रक्‍कम केव्‍हाही मागणी करु शकतात व त्‍या वेळेस ती त्‍यांना देणे हे संस्‍थेवरती बंधनकारक आहे. कारण ठेवीदारांचे इच्‍छेविरुध्‍द संस्‍था ठेवीदाराची रक्‍कम अडवून ठेवू शकत नाही. तसेच अर्जदार यांनी ठेवपावत्‍या नूतनीकरण करुन कधीही मागणी केली नव्‍हती व त्‍यास जाबदार यांनी कधीही नकार दिला नव्‍हता. सबब अर्जदार यांची मागणी रद्द करावी असेही जाबदारचे कथन आहे.
6.    निर्विवादीतपणे ठेवपावत्‍यांची रक्‍कम मागणी करायची किंवा त्‍यांचे नूतनीकरण करुन घ्‍यायचे हा ठेवीदाराचे इच्‍छेचा प्रश्‍न आहे. अर्जदार वेळोवेळी जाबदारकडे रकमेची मागणी करत होते असे कथन करतात. सबब नूतनीकरण करणेचा प्रश्‍न येत नाही. अशा परिस्थितीत अर्जदार नूतनीकरण करुन घेणेस आले नाहीत व आम्‍ही त्‍यास नकारही दिलेला नाही, सबब तक्रारअर्ज रद्द करावा या जाबदारचे कथनास काहीही अर्थ नाही.
6.    अर्जदार ठेवपावती क्र. 13316 या वरती रक्‍कम रु.25,000/- चे कर्ज काढलेचे मान्‍य करतात. निर्विवादीतपणे नि.5/4 कडे कर्ज खातेचा उतारा दाखल आहे व दि.31/12/2010 पर्यंत एकूण रक्‍कम रु.28,456/- एवढे येणे आहे हे दिसते. अर्जदारचे तक्रारअर्जात माझी कर्ज रक्‍कम तारण पावती क्र.13316 मधून जमा करुन घ्‍यावी परंतु जाबदार तसे करणेस तयार नाहीत असे कथन आहे. निर्विवादीतपणे अर्जदारचे कथनात तथ्‍य दिसून येत आहे. कारण व्‍याजासह रक्‍कम वसुली करुन घ्‍यावी असे अर्जदार कथन करतात. खाते उता-यावरुन दि.17/4/2011 रोजी रु.43,217/- एवढी पावतीची रक्‍कम होत आहे. सबब व्‍याजासह कर्जाची रक्‍कम वसुल करुन उर्वरीत रक्‍कम अर्जदार मिळणेस पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे. तसेच खातेउता-यावर आर.डी.नं.1688 मध्‍ये रक्‍कम रु.3,300/- असे जाबदारने लिहिलेले दिसते. सबब तीही रक्‍कम अर्जदार जाबदारकडून मिळणेस पात्र आहे असे या मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे. सदर रक्‍कम जाबदारने कैफियतीमध्‍ये नाकारली नाही.
 
7.    जाबदारचे कथनानुसार दि.16/5/2010 रोजी विशेष सर्वसाधारण सभा होवून त्‍यामधील ठरावानुसार जाबदार रक्‍कम देणेस तयार आहेत असे कथन आहे. निर्विवादीतपणे दि.16 मे 2010 रोजीचे ठराव नं.1 चे लागूपुरता उता-याची प्रत नि.27 कडे दाखल आहे. त्‍याचे अवलोकन करता त्‍यामध्‍ये अनेक बाबी असून पैकी मुदतपूर्व ठेवी मोडता येणार नाहीत परंतु संचालक मंडळाचे मान्‍यतेने आजारपण, शैक्षणिक खर्च, लग्‍न वगैरे साठी 25 टक्‍के ते 50 टक्‍के रक्‍कम देणेत येईल. तसेच मुदत पूर्ण झालेल्‍या ठेवींसठी मागणी केलेनंतर 30 टक्‍के रक्‍कम देणेत येईल व उर्वरीत सेव्हिंग्‍ज खातेवरती वर्ग करणेत येईल व ती रक्‍कम 5 लाख पासून पुढे असेल तर दरमहा रु.10 हजार, रु.3 लाख ते 5 लाख असेल तर रु.5 हजार, रु.2 लाख ते 3 लाख असेल तर दरमहा रु.3 हजार वगैरे प्रमाणे वाटप करणेत येईल, अशा अनेक बाबी नमूद आहेत. निर्विवादीतपणे सदर ठरावास जिल्‍हा उपनिबंधक यांची मंजूरी संस्‍थेने घेणेस पाहिजे. त्‍यानंतर संस्‍थेच्‍या रजिस्‍टर्ड पोटनियमामध्‍ये मुदतपूर्व ठेवी व मुदत पूर्ण झालेल्‍या ठेवी याबाबत जे नियम अस्तित्‍वात आहेत, त्‍यामध्‍ये दुरुस्‍ती केली पाहिजे, ती दुरुस्‍ती पुन्‍हा मंजूर करुन घेतली पाहिजे अशा कोणत्‍याही कायदेशीर बाबी पूर्ण केलेला पुरावा संस्‍थेने दाखल केला नाही. केवळ कोणताही ठराव जो ठेवीदारांचे हिताचे विरुध्‍द आहे असा ठराव करायचा व तो ठेवीदारांवरती बंधनकारक आहे असे म्‍हणायचे व कैफियतीमध्‍ये कथन करायचे अशा कथनात काहीही तथ्‍य नाही. कोणतेही बेकायदेशीर ठराव ठेवीदारांवरती बंधनकारक नाहीत असे या मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.
8.    निर्विवादीतपणे अर्जदारने शपथपत्राने जाबदारकडे वेळोवेळी रकमेची मागणी केली आहे व जाबदारने देणेस टाळाटाळ केली आहे असे कथन केले आहे. सबब अर्जदारने वेळोवेळी रकमची मागणी करुनही जाबदारने रक्‍कम देणेस टाळाटाळ करुन अर्जदारास सदोष सेवा दिली आहे या निर्णयाप्रत हा मंच आला आहे.
9.    अर्जदार यांनी नि.1 सोबत नि.2 कडे शपथपत्र दाखल केले असून नि.5   सोबत नि. 31 सोबत ठेव पावत्‍यांच्‍या मूळ प्रती व धनसंचय ठेव पासबुक दाखल केले आहेत. प्रस्‍तुत ठेव पावतींचे अवलोकन केले असता अर्जदार यांनी जाबदार संस्‍थेत ठेव ठेवलेचे स्‍पष्‍ट होते. तसेच त्‍यांची मुदतही संपलेचे दिसून येत आहे. तसेच धनसंचय ठेव खात्‍याचे पासबुकाचे अवलोकन केले असता त्‍या खात्‍यामध्‍येही रक्‍कम शिल्‍लक असल्‍याचे दिसत आहे. सबब, नि. 2 कडील अर्जदार यांची शपथपत्र पाहिले असता अर्जदार यांनी ठेव रकमेची व धनसंचय ठेव खात्‍यातील रकमेची वेळोवेळी मागणी केली आहे हे स्‍पष्‍ट दिसते. सबब अर्जदारने वेळोवेळी मागणी करुनही जाबदार यांनी रक्‍कम न देवून सेवेत त्रुटी केली आहे हे शाबीत होत‍ आहे. सबब जाबदारने अर्जदारच्‍या प्रस्‍तुत तक्रारीतील फेरिस्‍त नि. 31 सोबतच्‍या ठेवींची रक्‍कम व धनसंचय ठेव खात्‍यातील रक्‍कम व्‍याजासह द्यावी या निर्णयाप्रत हा मंच आला आहे.
10.  अशा प्रकारे जाबदार क्र.1 ते 13 यांना स्‍वतंत्र व संयुक्‍तरित्‍या अर्जदारच्‍या रकमा परत करणेस जबाबदार धरणेत येत आहे या निर्णयाप्रत हा मंच आला आहे.
 
11.  सबब आदेश.
 
आदेश
 
 
1. अर्जदार यांचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येत आहे.
2. जाबदार क्र. 1 ते 13 यांनी स्‍वतंत्र व संयु‍क्‍तरित्‍या अर्जदार यांना त्‍यांची ठेव
    पावती क्र.6042, 067, 068 कडील रकमा ठेवपावतीमध्‍ये नमूद
    केल्‍याप्रमाणे व्‍याजासह द्याव्‍यात व ठेवीची मुदत संपलेनंतरचे तारखेपासून संपूर्ण
    रक्‍कम पदरी पडेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्‍केप्रमाणे देय होणा-या व्‍याजासह द्याव्‍यात.
3. धनसंचय ठेव खाते क्र.3/176 कडील शिल्‍लक रक्‍कम सदरचे खात्‍याचे
    नियमाप्रमाणे देय होणा-या व्‍याजासह द्यावी.        
4. आर.डी.खाते क्र.1688 मधील रक्‍कम रु.3,300/- नियमानुसार द्यावी.
5. अर्जदारची ठेव पावती क्र.13316 मधून नियमानुसार व्‍याजासह कर्जरक्‍कम वसुल
    करावी व उर्वरीत रक्‍कम अर्जदारास द्यावी.
6. जाबदार यांनी मानसिक त्रासापोटी व तक्रारअर्जाचे खर्चापोटी अर्जदार यांना रक्‍कम
    रु. 10,000/- (दहा हजार) द्यावी.
7. जाबदार यांनी वरील आदेशाचे अनुपालन त्‍यांना या न्‍यायनिर्णयाची सत्‍यप्रत
    मिळाल्‍यापासून 30 दिवसात करावे.
8. सदरचा न्‍यायनिर्णय खुल्‍या न्‍यायमंचात जाहीर करणेत आला.
सातारा
दि.6/5/2011
 
 
 
 
(सुनिल कापसे)           (सुचेता मलवाडे)           (विजयसिंह दि. देशमुख)
   सदस्‍य                   सदस्‍या                     अध्‍यक्ष
 
 

Smt. S. A. Malwade, MEMBERHONABLE MR. Vijaysinh D. Deshmukh, PRESIDENT Mr. Sunil K Kapse, MEMBER