Maharashtra

Beed

CC/10/106

Tirthlal Kondiba Pawar. - Complainant(s)

Versus

Mharashtra Rajya Vidyut Vitaran Company Ltd. Marfat :- Kanistha Abhiyanta,Raymoha - Opp.Party(s)

R.B.Dhande

07 Feb 2011

ORDER

 
Complaint Case No. CC/10/106
 
1. Tirthlal Kondiba Pawar.
R/o.Raymoha,Tq.Shirrur (Kasar),Dist.Beed
Beed
Maharashtra.
...........Complainant(s)
Versus
1. Mharashtra Rajya Vidyut Vitaran Company Ltd. Marfat :- Kanistha Abhiyanta,Raymoha
33 K.V.Up-Kendra Raymoha,Tq.Shirur(Kasar),Dist.Beed
Beed
Maharashtra.
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
  P. B. Bhat PRESIDENT
  A P Bhosrekar MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

तक्रारदारातर्फे – वकील – बी.ई.येळे,
                            सामनेवालेतर्फे – वकील – यु.डी.चपळगांवकर,
                          
                              ।। निकालपत्र ।।
                ( निकाल घोषितद्वारा सौ.एम.एस.विश्‍वरुपे – सदस्‍या ) 
 तक्रारदार यांनी प्रस्‍तुतची तक्रार ही ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्‍द दाखल केली आहे.
तक्रारदारांची तक्रार थोडक्‍यात अशी की, तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडून घरगुती वापरासाठी विज जोडणी घेतली असुन त्‍यांचा ग्राहक क्रंमाक 587660236679 व मिटर क्रमांक 10115856 असा आहे. परंतु विज बिलावर चुकीचा मिटर क्रं.7610153683 असा देण्‍यात आला आहे.
तक्रारदारांनी ता. 30.6.2009 ते 31.7.2009 चे शेवटचे बिल ता.27.8.2009 रोजी रक्‍कम रु.100/- भरणा केले आहे. तक्रारदारांनी ता.11.9.2009 रोजी सामनेवाले यांनी ता.30.9.2009 ते 31.10.2009 पर्यन्‍तचे चुकीचे वीज बील रक्‍कम रु.42,040/- एवढया रक्‍कमेचे दिले. सदरचे बील देताना ऑगस्‍ब्‍,2009 ची मिटर रिडींग 5166 अशी दर्शविलेली आहे. तक्रारदारांस सदरचे बील मान्‍य नसल्‍यामुळे सदर बीला बाबत सामनेवाले यांचेकडे ता.18.2.2009 रोजी तक्रार केली. त्‍याप्रमाणे सामनेवाले यांनी तक्रारदारांचे मिटर तपासणी करुन विद्युत ग्राहक तपासणी अहवाल दिला. सदर अहवाला प्रमाणे मिटर रिंडींग 426 दाखवण्‍यात आले असुन विज वापराचा उद्देश घरगुती दाखवण्‍यात आलेला आहे. तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडे वेळोवेळी चुकीच्‍या बीला विषयी लेखी व तोंडी कळविले परंतु सामनेवाले यांनी तक्रारदारांना विज बील दुरुस्‍ती करुन दिली नाही, अशी तक्रारदारांची तक्रार आहे. तरी तक्रारदारांची विनंती की, ता.9.11.2009 रोजी देण्‍यात आलेले विज बील दुरुस्‍त करुन देण्‍यात यावे व त्‍यानंतर दिलेले विज बीले दुरुस्‍त करुन द्यावेत.
      सदर प्रकरणात सामनेवाले हजर झाले असुन त्‍यांनी त्‍यांचा खुलासा न्‍यायमंचात ता.8.10.2010 रोजी दाखल केला आहे. सामनेवाले यांचा लेखी खुलाशानुसार तक्रारदारांना नविन मिटर कंपनीमार्फत देण्‍यात आलेले असून त्‍याचा मिटर क्रमांक 10115858 असा आहे. तसेचा नविन मिटरची रिडिंग संगणकामध्‍ये भरतेवेळेस जुन्‍या मिटरची अखेरची रिडींग 5463 युनीट चुकीने संगणकामध्‍ये आली आहे. सदरची चुकीची रिडींग बाबत माहिती मिळाल्‍यानंतर ग्राहकास त्‍यांचे बील दुरुस्‍त करुन त्‍याचे रु.5,258/- दि.12.7.2009 रोजीचे विज बील देण्‍यात आले आहे. तक्रारदाराचे विद्युत बील दुरुस्‍तीसाठी वरिष्‍ठ कार्यालयाकडे परवानगीसाठी पाठविण्‍यात आले होते त्‍यामुळे तक्रारदारास त्‍याचे दुरुस्‍त बील देण्‍यास उशिर झाला आहे.
      तक्रारदारांची तक्रार विज बीला संबंधी असल्‍यामुळे न्‍यायमंचासमोर चालू शकत नाही. विज कायदा 2003 चे कलम 42(5) चे अनुरोधाने विज ग्राहकासाठी विज कंपनीचे कायदयातील तरतुदीअंतर्गत न्‍यायमंचाची स्‍थापना केली आहे. त्‍या न्‍यायमंचाकडे ग्राहकाने तक्रार दाखल केलेली नाही. सरदची तक्रार न्‍यायमंचास ऐकण्‍याचा अधिकार नाही.
तक्रारदारांची तक्रार, दाखल कागदपत्रे, शपथपत्र, पुराव्‍याचे शपथपथ, सामनेवाले यांचा लेखी खुलासा, कागदपत्र, शपथपत्र, यांचे सखोल वाचन केले. तक्रारदारांचे विद्वान वकील बी.ई.येळे यांचेमार्फत लेखी युक्‍तीवाद ता.12.1.2011 रोजी न्‍यायमंचात दाखल केला आहे.
      तक्रारीतील कागदपत्रे पाहता, तक्रारदार सामनेवाले यांचे ग्राहक असुन घरगुती वापरासाठी सामनेवाले यांचेकडून विज पुरवठा घेतला आहे. तक्रारदारांनी ता.27.8.2009 रोजी रक्‍कम रु.100/- चे शेवटचे विज बील भरणा केला आहे. तक्रारदार यापूर्वी नियमितपणे वीज बील भरणा केलेला आहे. परंतु त्‍यानंतर चुकीचे रक्‍कम रु.42,040/- चे ता. 11.9.2009 चे चुकीचे वीज बील ज्‍यामध्‍ये ऑगस्‍ट,2009 चे मिटर रिडींग 5266 दाखविण्‍यात आले असल्‍यामुळे तक्रारदाराना मान्‍य व कबुल नाही. या कारणास्‍तव तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडे तक्रार दाखल केली असता सामनेवाले यांनी तक्रारदाराचे मिटर तपासुन विद्युत ग्राहक तपासणी अहवाल ता.18.12.2009 रोजी दिलेला आहे. सदर अहवालानुसार मिटर रिडींग 426 युनिट दाखवलेली आहे. त्‍यानंतर तक्रारदारांना ता.31.3.2010 रोजी रक्‍कम रु.46020 चे बील देण्‍यात आले. तक्रारदारांनी सामनेवाले यांचेक‍डे वेळोवेळी चुकीचे बीला विषयी माहिती देवूनही सामनेवाले यांनी तक्रारदारास विज बील दुरुस्‍त करुन दिले नाही, अशी तक्रारदाराची तक्रार आहे.
      सामनेवाले यांनी तक्रारदाराचे विज बिल चुकीचे असल्‍या बाबत मान्‍य असुन तक्रारदारांना नविन मिटर कंपनी मार्फत देण्‍यात आले असुन त्‍याचा मिटर क्र.10115858 असा आहे. नविन मिटरची रिडींग संगणामध्‍ये भरतेवेळी जुन्‍या मिटरची अखेरची रिडिंग 5463 चुकीने संगणकामध्‍ये चालू आहे. त्‍यामुळे सामनेवाले यांनी तक्रारदारांना वरिल नमुद केलेले विज बील दुरुस्‍त करुन त्‍याचे रु.5458/- रक्‍कमेचे ता.12.7.2010 चे विज बील दिले आहे. सदर विज बील दुरुस्‍तसाठी परवानगीसाठी पाठविण्‍यात आले असल्‍यामुळे सदरचे बील दुरुस्‍ती करण्‍यास विलंब झाले बाबत नमुद केले आहे.
      तक्रारीत आलेल्‍या पुराव्‍यावरुन सामनेवाले यांनी तक्रारदारांना दुरुस्‍त देयक रक्‍कम रु.5258/- एवढया रक्‍कमेचे माहे मे,2010 पर्यन्‍तच विज बील दिलेले असुन सदरचे विज बील भरण्‍याची अखेरची तारीख 12.7.2010 अशी नमुद केली आहे. सदरचे बील तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडे भरणा केल्‍या बाबत दिसून येत नाही. सामनेवाले यांनी तक्रारदारांना त्‍यानंतर ता.10.11.2010 रोजी रक्‍कम रु.7,620/- एवढया रक्‍कमेचे विज देयक दिलेले असून सदर देयका प्रमाणे मागील थकबाकी रु.6,959/- असे दिसून येते. तसेच व्‍याजाची थकबाकी रु.363/- त्‍याचप्रमाणे मागील पावतीचा दि.27.8.2009 रोजीचा असल्‍याचे सदर बीलावर नमुद केले आहे. तसेच दुरुस्‍त मिटर क्रमांक सदर बिलावर नमुद केल्‍याचे दिसून येत आहे. त्‍याचप्रमाणे ता.30.9.2010 ते 31.10.2010 या कालावधीचे विज वापर युनिट 50 एवढे दाखविण्‍यात आले असुन सदर कालावधीचे रक्‍कम रु.299/- चे विज बील आकारण्‍यात आल्‍याचे दिसून येते.
वरील परिस्थितीचे आवलोकन केले असता, तक्रारदारांना ता.27.8.2009 रोजीचे रु.5258/- एवढया रक्‍कमेचे दुरुस्‍ती देयक सामनेवाले यांचेकडे भरणा केल्‍याचे दिसून येत नाही. त्‍यामुळे सदर देयक भरणा नकेल्‍यामुळे ता.10.11.2010 रोजीचे देयकामध्‍ये सदरची थकबाकीची रक्‍कम तसेच व्‍याजाची थकबाकी समाविष्‍ट करुन सदरचे बील सामनेवाले यांनी तक्रारदारांना दिलेले असल्‍याचे स्‍पष्‍ट होते. अशा परिस्थितीत सामनेवाले यांनी तक्रारदारांना ता.27.8.2009 रोजी दिलेले तसेच त्‍यानंतर दिलेले विज बील तक्रारदारांनी नियमितपणे भरणा करणे आवश्‍यक आहे.
      सामनेवाले यांनी तक्रारदारांना चुकीचे वीज बील दिल्‍याची बाब नमुद केली असुन मिटर तपासणी केल्‍या नंतर तक्रारदारांना दुरुस्‍त विज बील देण्‍यात आले आहे. सामनेवाले यांची कार्यालयातील नियमानुसार वरिष्‍ठ कार्यालयाकडून परवानगी आल्‍या नंतर सदरचे बील देण्‍यास विलंब झाला असल्‍याचे तक्रारीत आलेल्‍या पुराव्‍यावरुन स्‍पष्‍ट होते. अशा परिस्थितीत सामनेवाले यांनी तक्रारदारांना द्यावयाचे सेवेत कसूरी केल्‍याची बाब स्‍पष्‍ट होत नाही असे न्‍यायमंचाचे मत आहे.
सामनेवाले यांनी तक्रारदारांना चुकीचे विज बील दुरुस्‍त करुन दिल्‍यानंतर दुरुस्‍त विज बीलाचा भरणा तक्रारदारांनी करणे आवश्‍यक होते. तक्रारीत आलेल्‍या पुराव्‍यावरुन तक्रारदारांनी सदरचे विज बील भरणा केल्‍याची बाब स्‍पष्‍ट होत नाही. तक्रारदारांनी दाखल केलेला लेखी युक्‍तीवादा प्रमाणे तक्रारदार ता.10.11.2010 रोजीची चालू रिडिंग 990 दाखविण्‍यात आले असुन ता. 30.9.2010 ते 31.10.2010 या कालावधीचे विज बील भरणा करण्‍या तयार आहेत. अशा परिस्थितीत तक्रारदारांनी सदर दुरुस्‍तीचे विज बीलाचा भरणा सामनेवाले यांचेकडे करणे उचित होईल, असे न्‍यायमंचाचे मत आहे.
सामनेवाले यांनी तक्रारदारांना तक्रारीत मागणी केल्‍याप्रमाणे ता.9.11.2009 रोजीचे विज बील दुरुस्‍त करुन दिल्‍यामुळे तक्रारदारांची सामनेवाले यांचे विरुध्‍द कोणतीही तक्रार राहिलेली नाही.
      सबब, न्‍यायमंच खालील प्रमाणे आदेश देत आहे.
                      ।। आ दे श ।।
1.    तक्रारदारांना आदेश देण्‍यात येतो की, ता.10.11.2010 रोजीचे रक्‍कम रु.7620/- चे विज बील आदेश मिळाल्‍यापासुन एक महिन्‍याचे आत सामनेवाले यांचेकडे भरणा करण्‍यात यावा.                          
2.    सामनेवाले यांना आदेश देण्‍यात येतो की, तक्रारदारा कडून वरील नमुद केलेले विज बील ता.10.11.2010 चे भरणा करुन घेवून तक्रारदाराचे विज बील नियमित करण्‍यात यावे.                                     
3.    ग्राहक संरक्षण कायदा 1986 अधिनियम 2005 मधील कलम 20 (3) प्रमाणे  
तक्रारीतील सदस्‍यांचे संच तक्रारदारांला परत करावेत.
 
 
                              ( सौ.एम.एस.विश्‍वरुपे )     ( पी. बी. भट )
                                     सदस्‍या,               अध्‍यक्ष,
                            जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच,बीड जि. बीड
 
 
 
 
[ P. B. Bhat]
PRESIDENT
 
[ A P Bhosrekar]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.