नि.29 मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर तक्रार क्र. 20/2011 नोंदणी तारीख – 28/1/2011 निकाल तारीख –13/5/2011 निकाल कालावधी–105 दिवस श्री विजयसिंह दि. देशमुख, अध्यक्ष श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या श्री सुनिल कापसे, सदस्य (श्री.सुनिल कापसे, सदस्या यांनी न्यायनिर्णय पारीत केला) -------------------------------------------------------------------------------- 1. श्री. अर्जुन काशीनाथ गोडसे वय – 64 वर्षे,धंदा – शेती, 2. सौ. मालन अर्जुन गोडसे वय – 56 वर्षे, धंदा - घरकाम दोघेही रा.वडुज, ता. खटाव, जि. सातारा ----- अर्जदार (अभियोक्ता श्री दादासो बळीप) विरुध्द 1. मराठा सहकारी पतसंस्था लि. 506/1, मराठा भवन, प्लॉट नं.87, सदर बझार, सातारा तर्फे अशोक बापूराव काळे 2. संचालक- अशोक बापूराव काळे रा. मोरे कॉलनी, व्यंकटपूरा पेठ, सातारा 3. संचालक श्री किशोर दत्तात्रय शिंदे रा.46, शुक्रवार पेठ, सातारा 4. संचालक, श्री तुकाराम आनंदा धनवडे मु.करंजे पो. मामुडी, ता.जावली, जि.सातारा 5. संचालक, श्री नरेंद्र मोहनराव पाटील रा.27, मॅगझीन कॉलणी, सदरबझार, सातारा 6. संचालक, श्री बापूसाहेब केशवराव निंबाळकर रा. मु. पो. विंचुर्णी, ता. फलटण, जि. सातारा 7. संचालक, श्री. सतिश सर्जेराव पवार रा.60/61, बसप्पा पेठ, सातारा 8. संचालक, श्री सिताराम साहेबराव पवार रा.98, बुधवार पेठ, सातारा 9. संचालक, श्री राजू भानू जेधे रा.513, मंगळवार पेठ, सातारा 10. श्री. रविंद्र हिंदराज कदम रा. 470, कदम बाग कॅम्प, सातारा 11. संचालक श्री. जगन्नाथ ज्ञानू पवार रा.मु.पो. धावडशी, ता.जि.सातारा 12. संचालिका सुमन लक्ष्मणराव पाटील रा.विकास नगर, संगमनगर, सातारा 13. संचालक, श्री. मिलींद लक्ष्मणराव पाटील रा.विकास नगर, संगमनगर, सातारा 14. संचालक, श्री चंद्रकांत लोखंडे रा.हॉटेल मीन, विकास नगर, संगमनगर, सातारा ----- जाबदार (अभियोक्ता श्री डी.एस.घाडगे) न्यायनिर्णय अर्जदार यांनी प्रस्तुतचा अर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 नुसार केलेला आहे. अर्जदार यांचे अर्जातील कथन थोडक्यात खालीलप्रमाणे - 1. अर्जदार यांनी जाबदार संस्थेमध्ये वेगवेगळया ठेवपावत्यांन्वये वेगवेगळया रकमा मुदत ठेव योजनेअंतर्गत रक्कम ठेव म्हणून ठेवलेल्या आहेत. सदरच्या ठेवींची मुदत संपलेली आहे. तसेच अर्जदार क्र.1 व 2 यांचे जाबदार संस्थेमध्ये बचत खाते असून त्यामध्ये काही रक्कम शिल्लक आहे. मुदत ठेव पावतींची मुदत संपलेनंतर देय होणा-या रकमेची मागणी अर्जदार यांनी जाबदार यांचेकडे केली. तथापि जाबदार यांनी अर्जदार यांना ठेवीवर व्याजसहित देय झालेली रक्कम देण्यास टाळाटाळ केली. अर्जदार यांनी जाबदार यांना दि.20/11/2010 रोजी वकीलांचेमार्फत रजिस्टर्ड पोस्टाने नोटीस पाठवून रकमेची मागणी केली. सदरची नोटीस जाबदार यांना मिळाली. तथापि जाबदार यांनी अर्जदार यांची रक्कम परत दिलेली नाही. थोडक्यात जाबदार यांनी अर्जदार यांना देण्यात यावयाची रक्कम न दिल्यामुळे सेवेत त्रुटी केली आहे. अर्जदार हे जाबदार संस्थेचे ग्राहक आहेत. त्यामुळे जाबदार संस्थेकडून मुदत ठेव पावतीची एकूण देय रक्कम वसूल होऊन मिळण्यासाठी अर्जदार यांनी प्रस्तुतचा अर्ज केला आहे. सदरचे अर्जामध्ये अर्जदार यांनी ठेवींची व्याजासह होणारी एकूण रक्कम तसेच मानसिक त्रासापोटी रक्कम रु.1,00,000/- ची मागणी केलेली आहे. 2. जाबदार क्र. 1 ते 5, 7, 8 व 10 11 ते 14 यांनी त्यांचे लेखी म्हणणे नि.24 कडे दाखल करुन अर्जदारची तक्रार नाकारली आहे. अर्जदार यांनी रकमांची कधीही मागणी केली नव्हती अगर जाबदार यांनी रक्कम देण्याचे अर्जदार यांना नाकारलेले नव्हते. जाबदार यांनी वडूजची शाखा बंद केली आहे. ठेवपावतींचे नूतनीकरण करुन देणेस जाबदार आजही तयार आहेत. तक्रारअर्जापूर्वी अर्जदार यांनी कोणतीही नोटीस दिलेली नव्हती. जाबदार संस्था आर्थिक अडचणीत आहे. जाबदार संस्थेच्या दि. 16/5/2010 रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेतील ठरावाप्रमाणे संस्थेचे कामकाज चालू आहे. सबब तक्रारअर्ज रद्द करण्यात यावा असे जाबदार यांनी कथन केले आहे. 3. जाबदार क्र.6, 9, 12 व 14 यांना प्रस्तुत तक्रारअर्जाचे नोटीसची बजावणी होऊनही ते नेमलेल्या तारखांना मंचासमोर हजर राहिले नाहीत. तसेच त्यांनी त्यांचे लेखी म्हणणे व शपथपत्र दाखल केले नाही. सबब, त्यांचेविरुध्द एकतर्फा आदेश करण्यात आला. 4. अर्जदार तर्फे श्री. बळीप व जाबदार तर्फे श्री घाडगे वकीलांचा प्रदीर्घ तोंडी युक्तीवाद ऐकला. तसेच अर्जदार व जाबदार तर्फे दाखल कागदपत्रे पाहिली. 5. निर्विवादीतपणे ठेवपावत्यांची रक्कम मागणी करायची किंवा त्यांचे नूतनीकरण करुन घ्यायचे हा ठेवीदाराचे इच्छेचा प्रश्न आहे. अर्जदार वेळोवेळी जाबदारकडे रकमेची मागणी करत होते असे कथन करतात. सबब नूतनीकरण करणेचा प्रश्न येत नाही. अशा परिस्थितीत अर्जदार नूतनीकरण करुन घेणेस आले नाहीत व आम्ही त्यास नकारही दिलेला नाही, सबब तक्रारअर्ज रद्द करावा या जाबदारचे कथनास काहीही अर्थ नाही. 6. जाबदारचे कथनानुसार दि.16/5/2010 रोजी विशेष सर्वसाधारण सभा होवून त्यामधील ठरावानुसार जाबदार रक्कम देणेस तयार आहेत असे कथन आहे. निर्विवादीतपणे दि.16 मे 2010 रोजीचे ठराव नं.1 चे लागूपुरता उता-याची प्रत नि.26 कडे दाखल आहे. त्याचे अवलोकन करता त्यामध्ये अनेक बाबी असून पैकी मुदतपूर्व ठेवी मोडता येणार नाहीत परंतु संचालक मंडळाचे मान्यतेने आजारपण, शैक्षणिक खर्च, लग्न वगैरे साठी 25 टक्के ते 50 टक्के रक्कम देणेत येईल. तसेच मुदत पूर्ण झालेल्या ठेवींसाठी मागणी केलेनंतर 30 टक्के रक्कम देणेत येईल व उर्वरीत सेव्हिंग्ज खातेवरती वर्ग करणेत येईल व ती रक्कम 5 लाख पासून पुढे असेल तर दरमहा रु.10 हजार, रु.3 लाख ते 5 लाख असेल तर रु.5 हजार, रु.2 लाख ते 3 लाख असेल तर दरमहा रु.3 हजार वगैरे प्रमाणे वाटप करणेत येईल, अशा अनेक बाबी नमूद आहेत. निर्विवादीतपणे सदर ठरावास जिल्हा उपनिबंधक यांची मंजूरी संस्थेने घेणेस पाहिजे. त्यानंतर संस्थेच्या रजिस्टर्ड पोटनियमामध्ये मुदतपूर्व ठेवी व मुदत पूर्ण झालेल्या ठेवी याबाबत जे नियम अस्तित्वात आहेत, त्यामध्ये दुरुस्ती केली पाहिजे, ती दुरुस्ती पुन्हा मंजूर करुन घेतली पाहिजे अशा कोणत्याही कायदेशीर बाबी पूर्ण केलेला पुरावा संस्थेने दाखल केला नाही. केवळ कोणताही ठराव जो ठेवीदारांचे हिताचे विरुध्द आहे असा ठराव करायचा व तो ठेवीदारांवरती बंधनकारक आहे असे म्हणायचे व कैफियतीमध्ये कथन करायचे अशा कथनात काहीही तथ्य नाही. कोणतेही बेकायदेशीर ठराव ठेवीदारांवरती बंधनकारक नाहीत असे या मंचाचे स्पष्ट मत आहे. 7. निर्विवादीतपणे अर्जदारने शपथपत्राने जाबदारकडे वेळोवेळी रकमेची मागणी केली आहे व जाबदारने देणेस टाळाटाळ केली आहे असे कथन केले आहे. सबब अर्जदारने वेळोवेळी रकमची मागणी करुनही जाबदारने रक्कम देणेस टाळाटाळ करुन अर्जदारास सदोष सेवा दिली आहे या निर्णयाप्रत हा मंच आला आहे. 8. अर्जदार यांनी नि.1 सोबत नि.2 कडे शपथपत्र दाखल केले असून नि.6 सोबत नि. 7 ते 9 ला ठेव पावत्यांच्या मूळ प्रती व पासबुक दाखल केले आहेत. प्रस्तुत ठेव पावतींचे अवलोकन केले असता अर्जदार यांनी जाबदार संस्थेत ठेव ठेवलेचे स्पष्ट होते. तसेच त्यांची मुदतही संपलेचे दिसून येत आहे. तसेच सेव्हींग ठेव खात्याचे पासबुकाचे अवलोकन केले असता त्या खात्यामध्येही रक्कम शिल्लक असल्याचे दिसत आहे. सबब, नि. 2 कडील अर्जदार यांची शपथपत्र पाहिले असता अर्जदार यांनी ठेव रकमेची व सेव्हींग खात्यातील रकमेची वेळोवेळी मागणी केली आहे हे स्पष्ट दिसते. सबब अर्जदारने वेळोवेळी मागणी करुनही जाबदार यांनी रक्कम न देवून सेवेत त्रुटी केली आहे हे शाबीत होत आहे. सबब जाबदारने अर्जदारच्या प्रस्तुत तक्रारीतील फेरिस्त नि. 6 सोबतच्या ठेवींची रक्कम व सेव्हींग खात्यातील रक्कम व्याजासह द्यावी या निर्णयाप्रत हा मंच आला आहे. 9. जाबदार यांनी नि. 29 चे अर्जासोबत मे. उच्च न्यायालय, औरंगाबाद यांचेसमोर दाखल असलेल्या रिट पिटीशनमधील निवाडयानुसार संचालक मंडळास वैयक्तिक स्वरूपात जबाबदार धरण्यात येवू नये तसे पक्षकार म्हणून सामीलही करण्यात येवू नये असे कथन करून सदरचे निवाडयाची प्रत याकामी दाखल केली आहे. सदरच्या निवाडयाचे अवलोकन केले असता असे दिसून येते की, मा. उच्च न्यायालय यांनी संस्थेच्या संचालकांना वैयक्तिक स्वरूपात ठेव रक्कम परत करण्यास जबाबदार धरण्यात येवू नये व ठेव रक्कम परतीची जबाबदारी ही संबंधीत पतसंस्थेची राहील असे मतप्रदर्शन केले आहे. सदरच्या मताशी प्रस्तुतचा मंच पूर्णतया सहमत आहे. सदरचा निवाडा विचारात घेता प्रस्तुत कामी जाबदार संस्थेच्या संचालकांना वैयक्तिक स्वरूपात अर्जदारची ठेव रक्कम परत करण्यात जबाबदार धरता येणार नाही ही बाब स्पष्ट होते. परंतु सदरचे निवाडयानुसार अर्जदार यांची ठेव रक्कम परत करण्यास संस्थेस जबाबदार धरण्यात यावे असे मतप्रदर्शन केले असल्यामुळे जाबदार संस्थेस याकामी ठेव रक्कम परत करण्यास जबाबदार धरण्यात येत आहे व जाबदार संस्थेच्या एकूण कारभारास संचालक मंडळ जबाबदार असल्याने अर्जदारच्या ठेव रकमा परत करण्यास जाबदार क्र. 1 संस्था व जाबदार संस्थेकरिता जाबदार क्र. 2 व 14 हे संयुक्तरित्या जबाबदार आहेत असे या मंचाचे मत आहे. 10. या सर्व कारणास्तव खालीलप्रमाणे अंतिम आदेश करण्यात येत आहे. आदेश 1. अर्जदार यांचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येत आहे. 2. आजपासून 30 दिवसांचे आत जाबदार क्र. 1 संस्था व जाबदार संस्थेकरिता जाबदार क्र. 2 ते 14 यांनी संयुक्तरित्या अर्जदार यांना खालीलप्रमाणे रकमा द्याव्यात. अ. ठेव पावती क्र.1309, 356, 357, 358 , वरील मूळ रक्कम ठेवपावतीमध्ये नमूद केल्याप्रमाणे व्याजासह रक्कम द्यावी तसेच ठेवीची मुदत संपलेनंतरचे तारखेपासून संपूर्ण रक्कम पदरी पडेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्केप्रमाणे देय होणा-या व्याजासह द्याव्यात. ब. सेव्हींग खाते क्र. 8/631 वरील शिल्लक रक्कम बचत खात्याचे नियमाप्रमाणे देय होणा-या व्याजासह द्यावी. क. मानसिक त्रासापोटी रक्कम य. 3,000/- द्यावेत. ड. अर्जाचे खर्चापोटी रक्कम रू. 3,000/- द्यावेत. 3. सदरचा न्यायनिर्णय खुल्या न्यायमंचात जाहीर करणेत आला. सातारा दि. 13/06/2011 (सुनिल कापसे) (सुचेता मलवाडे) (विजयसिंह दि. देशमुख) सदस्य सदस्या अध्यक्ष
| Smt. S. A. Malwade, MEMBER | HONABLE MR. Vijaysinh D. Deshmukh, PRESIDENT | Mr. Sunil K Kapse, MEMBER | |