अंतिम आदेश (दिः 22/03/2011) द्वारा श्री.एम.जी.रहाटगावकर - मा.अध्यक्ष 1. तक्रारकर्त्याचे थोडक्यात कथन खालील प्रमाणे- त्याने सॅमसंग कंपनीचा S/8300 Platinum Red हा भ्रमणध्वनी संच रु.23,500/- किमतीस दि.14/08/2009 रोजी विरुध्द पक्ष 1 कडुन विकत घेतला. सोबत 300 रुपयाचे 4GB मेमरी कार्ड विकत घेतले. या भ्रमणध्वनी संचासोबत अद्यावत तंत्रज्ञान असणारी 3G जोडणी सुविधा, ई-मेल सुविधा, विडियो कॉन्फरेंसिंग .. 2 .. तक्रार क्र. 309/2010 वगैरे उपलब्ध आहे असे विरुध्द पक्षाने त्यास सांगितले. संगणकासोबत संचाची जोडणी करता येईल असेही त्याला सांगण्यात आले. विकत घेण्याचे दुसरेच दिवशी त्यावरील वेळ दर्शविण्याची यंत्रणा काम करित नाही असे आढळले. त्यामुळे दुरुस्तीसाठी संच देण्यात आला. दोन दिवसांनी परत मिळाल्यानंतर तोच दोष परत निदर्शनास आला. तसेच कॅमेरा डेटा रेकॉडींग वगैरे सुविधा व्यवस्थित काम करित नव्हत्या. वारंवार दुरूस्तीसाठी संच विरुध्द पक्षाकडे देणे भाग पडले दि.28/11/2009 रोजी त्याने तक्रार नोंदविली. त्यात "MEP not Opening, software problem and the set being dead” असे तक्रारीचे वर्णन लिहिण्यात आले . विरुध्द पक्षाच्या मायक्रो सर्विस सेंटरने दि.28/11/2009 रोजी याची पावती दिली. मात्र अद्यापही हा संच दुरूस्त करुन त्याला परत करण्यात आलेला नाही. त्याचे पुढे म्हणणे असे की, Consumer Education And Research Society मार्फत दि.17/03/2010 रोजी विरुध्द पक्षाला नोटिस पाठविण्यात आली मात्र त्याची दखल न घेतल्याने दि.05/04/2010 ला स्मरण पत्र पाठविण्यात आले. त्याचीही दखल विरुध्द पक्षाने न घेतल्याने दुस-यांदा स्मरणपत्र पाठविण्यात आले. मात्र विरुध्द पक्षाने दखल घेतली नाही. दि.24/05/2010 ला वकिलामार्फत नोटिस पाठविण्यात आली त्याबाबत विरुध्द पक्षाने कारवाई केली नाही. त्यामुळे प्रार्थनेत नमुद केल्यानुसार रक्कम रु.3,33,172/- व्याजासह विरुध्द पक्षाने त्याला देण्याबाबत मंचाने आदेश पारित करावे अशी त्याची मागणी आहे. तक्रारीचे समर्थनार्थ तक्रारकर्त्याने निशाणी 2 अन्वये प्रतिज्ञापत्र दाखल केले तसेच निशाणी 3(1) ते 3(11) अन्वये कागदपत्रे दाखल करण्यात आले यात बिल दि.14/08/2009 विरुध्द पक्षाकडे नोंदविण्यत आलेली तक्रार, पोस्टाच्या पोचपावत्या इत्यादीचा समावेश आहे.
2. मंचानी निशाणी 4 अन्वये विरुध्द पक्षाला लेखी सुचना पत्र जारी केले व तक्रारीसंदर्भात जबाब दाखल करण्याचा निर्देश दिला. मंचाच्या नोटिसींच्या पोच पावत्या निशाणी 6, निशाणी 7, निशाणी 8 व निशाणी 9 वर अपलब्ध आहे. रोजनाम्याच्या आधारे स्पष्ट होते की सदर प्रकरण दि.20/11/2010, 21/12/2010, 10/02/2011, तसेच 07/03/2011 याप्रमाणे अनेक तारखा झाल्या . नोटिस प्राप्त होऊनही विरूध्द पक्षाने लेखी जबाब दाखल न केल्याने सदर प्रकरणाचा निकाल ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 13(2)(ब)(II) अन्वये एकतर्फी सुनावणीच्या आधारे करण्याचे मंचाने निश्चित केले. अर्जदारांचे म्हणणे ऐकण्यात आले, तसेच त्यांनी दाखल केलेल्या दस्तऐवजांचे अवलोकन करण्यात आले. त्याआधारे मंचाने खालील मुद्दे विचारात घेतले. मुद्दा क्र. 1 - वादग्रस्त भ्रमणध्वनीमध्ये उत्पादनातील दोष आहे काय? उत्तर – होय. मुद्दा क्र. 2 - सदोष सेवेसाठी विरुध्द पक्ष जबाबदार आहेत काय? उत्तर – होय. .. 3 .. तक्रार क्र. 309/2010 मुद्दा क्र. 3 - तक्रारकर्ता विरुध्द पक्षाकडुन नुकसान भरपाई व न्यायिक खर्च मिळण्यास पात्र आहेत काय? उत्तर – होय. स्पष्टिकरण मुद्दा क्र. 1 - मुद्दा क्र. 1 बाबत विचार केले असता असे स्पष्ट होते की, तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष 2 ते 4 निर्मीत भ्रमणध्वनी संच विरुध्द पक्ष 1 कडुन दि.14/08/2009 रोजी रु.23,500/-या किमतीस विकत घेतला. तक्रारदाराच्या प्रतिज्ञापत्राच्या आधारे असे आढळते की , विकत घेतलेल्या संचात दुस-या दिवसापासुनच दोष निदर्शनास आले. अनेक वेळा त्याने दुरुस्तीसाठी सेट विरुध्द पक्षाकडे दिला जुजबी दुरुस्तीकरुन विरुध्द पक्षाने त्याला संच परत केला मात्र आधी आढळलेले दोष परत वारंवार निदर्शनास येत राहिले. विरुध्द पक्षाने प्रयत्न करुनही दोषांची दुरुस्ती होऊ शकलेली नाही. "MEP not Opening, software problem and the set being dead” अशा आश्याच्या तक्रारी विरुध्द पक्षाकडे त्याने केले. विरुध्द पक्ष क्र.2 कडे त्याने दि.28/11/2009 रोजी आपला भ्रमणध्वनी संच दुरुस्तीसाठी जमा केला. त्याची पावती निशाणी 3(ब) तक्रारीसोबत जोडलेली आहे. मात्र अद्यापही भ्रमणध्वनीबाबत त्याला काहीही कळविले नाही तसेच दुरूस्ती करुन संच परत केला नाही. शेवटी त्याने विरुध्द पक्षाकडे वारंवार पत्र व्यवहार केला या सर्व घटनाक्रमांच्या आधारे असे स्पष्ट होते की, विरुध्द पक्षाने वांरंवार दुरूस्ती करुनही संचातील दोष तसाच कायम राहिला याचाच अर्थ या भ्रमणध्वनी संचात उत्पादनातील दोष आहे. सबब ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 2(1)(फ) अन्वये दोषपुर्ण भ्रमणध्वनी संच तक्रारकर्त्याला विकण्यासाठी विरुध्द पक्ष जबाबदार आहेत. मंचाच्या मते वादग्रस्त भ्रमणध्वनी संच हा विरुध्द पक्ष 2 यांचे ताब्यात आहे वारंवार त्यात बिघाड होत असल्याने न्यायिकदृष्या भ्रमणध्वनी संचाची खरेदी किमंत विरुध्द पक्षाने परत करणे योग आहे. स्पष्टिकरण मुद्दा क्र. 2 - मंचाच्यामते विरुध्द पक्षाने केवळ त्याला दोषपुर्ण भ्रमणध्वनी विकला एवढया पुर्ततेच सदर तक्रार मर्यादित नसुन दुरुस्तीसाठी दि.28/11/2009 रोजी त्याने आपला संच विरुध्द पक्ष 2 कडे जमा केला मात्र अद्यापपावेतो याबाबत त्याला काहीही कळविण्यात आले नाही एवढेच नव्हे तर तो संच देखिल विरुध्द पक्ष 2 च्या ताब्यात आहे. एवढी मोठी रक्कम देऊन भ्रमणध्वनी विकत घेण्यात आला त्याचा अपेक्षित उपयोग तक्रारकत्याला झाला नाही. सर्वात महत्वाची व गंभीरबाब म्हणजे दुरुस्तीकरुन अद्यापही संच त्याला परत केला नाही सबब ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम2(1)(ग) अन्वये सदोष सेवेचे निदर्शक ठरतात. स्पष्टिकरण मुद्दा क्र.3 - हमी कालावधीत भ्रमणध्वनी संच वारंवार बिघाड झाल्याने विरुध्द पक्षाने प्रयत्न करुनही संचाची दुरूस्ती न होणे, सर्तेशेवटी विरुध्द पक्ष 2 कडे संच जमा केल्याने विरुध्द पक्षाने त्याला काही न काळविणे व अद्यापही संच तक्रारकर्त्याला परत न करणे या बाबी असमर्थनीय आहे. तक्रारकर्त्याने स्वतः तेसेच वकिलामार्फत .. 4 .. तक्रार क्र. 309/2010 त्याचबरोबर ग्राहक संस्थेमार्फत पत्रव्यवहार केले, पत्र प्राप्त होऊनही विरुध्द पक्षांनी त्याची दखल घेतली नाही. ज्या उद्देशासाठी संच विकत घेतला तो उद्देश सफल झाला नाही, कोणत्याही सुविधेचा लाभ तक्रारकर्त्यास घेता आला नाही. त्याला केवळ मनस्ताप सहन करावा लागला आहे. सबब विरुध्द पक्षाकडुन नुकसान भरपाई रु.5,000/- मिळणेस पात्र आहे. त्याच्या तक्रारीची दखल न घेतल्याने त्याला सदर तक्रार दाखल करणे भाग पडल्याने न्यायिक खर्च रु.5,000/- देणेस विरुध्द पक्ष पात्र आहेत.
3. सबब आदेश पारित करण्यात येतो- आदेश 1.तक्रार क्र 309/2010 मंजुर करण्यात येते. 2.आदेश तारखेच्या 2 महिन्याचे आत विरुध्द पक्ष 1 ते 4 यांनी व्यक्तिकरित्या अथवा संयुक्तरित्या खालीलप्रमाणे रक्कम तक्रारकर्त्यास द्यावी. अ) भ्रमणध्वनी संचाची किंमत रु.23,500/-(रु. तेवीस हजार पाचशे फक्त) दि.14/08/2009 ते आदेश तारखेपर्यंत द.सा.द.शे 12% दराने व्याजासह तक्रारकर्त्यास द्यावे. ब) मानसिक त्रासासाठी रु.5,000/-(रु.पाच हजार फक्त) तसेच न्यायिक खर्च रु.5,000/- (रु.पाच हजार फक्त) तक्रारकर्त्यास द्यावे. 3.विहित मुदतीत आदेशाचे पालण विरुध्द पक्षांनी न केल्यास तक्रारकर्ता उपरोक्त संपुर्ण रक्कम आदेश तारखेपासुन ते प्रत्यक्ष रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे 12% दराने विरुध्द पक्ष 1 ते 4 यांच्या कडुन वयक्तिकरित्या अथवा संयुक्तरित्या व्याजासह वसुल करण्यास पात्र राहिल. दिनांक – 22/03/2011 ठिकाण – ठाणे
(ज्योती अय्यर) (एम.जी.रहाटगावकर ) सदस्या अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे
| [HONABLE MR. M.G. RAHATGAONKAR] PRESIDENT | |