Maharashtra

Gondia

CC/12/30

Smt. Adkan Bai Urf Bhagaratabai Dulichand Rahangdale - Complainant(s)

Versus

Mgr, ICICI Lombard General Insurance Company Ltd. through Kamaljit Shivhar Kamle - Opp.Party(s)

MR. UDAY KSHIRSAGAR

30 Aug 2014

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, GONDIA
ROOM NO. 214, SECOND FLOOR, COLLECTORATE BUILDING,
AMGOAN ROAD, GONDIA
MAHARASHTRA
 
Complaint Case No. CC/12/30
 
1. Smt. Adkan Bai Urf Bhagaratabai Dulichand Rahangdale
Vill & Po : Ghoti, Teh : Goregaon, Gondia
Gondia
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Mgr, ICICI Lombard General Insurance Company Ltd. through Kamaljit Shivhar Kamle
Zenith House, Keshavrao Khade Marg, Mahalakshmi, Mumbai - 400034
Mumbai
Maharashtra
2. Mgr, ICICI Lombard General Insurance Company Ltd. Through Amit Dinkar Uplewar
5th floor, Landmark Building, Ramdaspeth Nagpur-440010
Nagpur
Maharashtra
3. Ramesh Vilas Akulwar, Tehsildar
Tehsil Karyalaya Goregaon, Tel : Goregaon
Gondia
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. ATUL D. ALSI PRESIDENT
 HON'BLE MS. VARSHA O. PATIL MEMBER
 HON'BLE MR. WAMAN V. CHOUDHARI MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

(आदेश पारित द्वारा मा. अध्‍यक्ष, श्री. अतुल दि. आळशी)

(पारित दि. 30 ऑगस्‍ट, 2014)

     

तक्रारकर्तीचे पती दुलीचंद लोंढु रहांगडाले यांच्‍या अपघाती मृत्‍युबद्दलचा शेतकरी व्‍यक्तिगत अपघात विमा दावा विरूध्‍द पक्ष यांनी फेटाळल्‍यामुळे तक्रारकर्तीने नुकसानभरपाई मिळण्‍याकरिता सदरहू तक्रार मंचात दाखल केली आहे.  तक्रारकर्तीच्‍या तक्रारीचा आशय थोडक्‍यात खालीलप्रमाणेः-

 

2.    तक्रारकर्तीचे पती यांच्‍या मालकीची मौजा सोनी, तालुका गोरेगांव, जिल्‍हा गोंदीया येथे भूमापन क्रमांक 258/1, क्षेत्रफळ 0.49 हे. आर. शेती असल्‍यामुळे ते शेतकरी या व्‍याख्‍येमध्‍ये समाविष्‍ट होतात.       

 

3.    विरूध्‍द पक्ष 1 व 2 ही विमा कंपनी असून विरूध्‍द पक्ष 3 हे शेतकरी व्‍यक्तिगत अपघात विमा योजना राबविण्‍याचे काम करतात.

 

4.    दिनांक 05/10/2005 रोजी तक्रारकर्तीचे पती शेतातील विहिरीतून पाणी काढत असतांना तोल गेल्‍याने पाय घसरून विहिरीत पडल्‍याने तक्रारकर्तीच्‍या पतीचा मृत्‍यु झाला.  त्‍यामुळे त्‍यांच्‍या मृत्‍युबद्दलचा विमा दावा तक्रारकर्तीने विरूध्‍द पक्ष 3 यांच्‍यामार्फत दिनांक 05/04/2006 रोजी विरूध्‍द पक्ष 1 यांच्‍याकडे संपूर्ण कागदपत्रासह सादर केला.  तक्रारकर्तीचा विमा दावा मंजूर अथवा नामंजूर केल्‍याचे न कळविल्‍यामुळे तक्रारकर्तीने दिनांक 01/06/2012 रोजी वकिलामार्फत विरूध्‍द पक्ष यांना नोटीस पाठविली.  तरी देखील विरूध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्तीचा विमा दावा निकाली न काढल्‍यामुळे तक्रारकर्तीने विमा दावा रक्‍कम रू. 1,00,000/-, मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई म्‍हणून रू. 20,000/- तसेच तक्रारीचा खर्च म्‍हणून रू. 10,000/- मिळण्‍यासाठी सदरहू तक्रार मंचात दाखल केली आहे. 

 

5.    तक्रारकर्तीची तक्रार विद्यमान न्‍याय मंचाने दिनांक 20/06/2012 रोजी दाखल करून घेतल्‍यानंतर विरूध्‍द पक्ष यांना दिनांक 21/06/2012 रोजी मंचामार्फत नोटीसेस बजावण्‍यात आल्‍या.  विरूध्‍द पक्ष यांना नोटीस प्राप्‍त झाल्‍यानंतर विरूध्‍द पक्ष 1, 2 यांनी हजर होऊन त्‍यांचे लेखी जबाब दाखल केले आहेत.  विरूध्‍द पक्ष 3 यांना नोटीस मिळूनही ते सदरहू प्रकरणात मंचासमक्ष हजर झाले नाहीत अथवा त्‍यांनी त्‍यांचे लेखी उत्‍तर सुध्‍दा दाखल केले नाही.  त्‍यामुळे त्यांच्‍याविरूध्‍द प्रकरण एकतर्फी चालविण्‍याचा आदेश दिनांक 21/08/2014 रोजी पारित करण्‍यात आला.   

विरूध्‍द पक्ष 1, 2 यांनी सदरहू प्रकरणात त्‍यांचा जबाब दिनांक 17/10/2012 रोजी दाखल केला.  विरूध्‍द पक्ष 1, 2 यांनी त्‍यांच्‍या जबाबात तक्रारकर्तीच्‍या तक्रारीचे खंडन केले आहे.  विरूध्‍द पक्ष 1, 2 यांनी जबाबात असे म्‍हटले आहे की, तक्रारकर्तीची तक्रार विद्यमान मंचात चालण्‍यास पात्र नाही तसेच सदरहू तक्रार मुदतीत दाखल न केल्‍यामुळे ती खारीज करण्‍यात यावी.  विरूध्‍द पक्ष यांना तक्रारकर्तीने संपूर्ण कागदपत्र न दिल्‍यामुळे तक्रारकर्तीचा दावा निकाली न काढता आल्‍यामुळे दावा प्रलंबित ठेवणे म्‍हणजे सेवेतील त्रुटी नसून तक्रारकर्तीची तक्रार खारीज करण्‍यात यावी.   

 

6.    तक्रारकर्तीने  तक्रारीसोबत दिनांक 05/04/2006 रोजी दाखल केलेला  विमा दावा मिळणेबाबतचा अर्ज पृष्‍ठ क्र. 12 वर दाखल केलेला असून पोलीस स्‍टेशन, गोरेगांव येथील मर्ग सूचना पृष्‍ठ क्र. 13 वर,  पोस्‍ट मार्टेम रिपोर्ट पृष्‍ठ क्र. 16 वर, मृत्‍यु प्रमाणपत्र पृष्‍ठ क्र. 24 वर, सात/बाराचा उतारा पृष्‍ठ क्र. 25 वर, वारसान प्रमाणपत्र पृष्‍ठ क्र. 30 वर, तक्रारकर्तीने विरूध्‍द पक्ष यांना वकिलामार्फत पाठविलेली नोटीस पृष्‍ठ क्र. 32 वर तसेच नोटीस पाठविल्‍याबाबतची पोस्‍टाची पावती पृष्‍ठ क्र. 35 वर याप्रमाणे कागदपत्रे तक्रारीसोबत दाखल केलेली आहेत.           

 

7.    तक्रारकर्तीचे वकील ऍड. उदय क्षीरसागर यांनी असा युक्तिवाद केला की, तक्रारकर्तीच्‍या पतीचा मृत्‍यु हा शेतातील विहिरीत पडल्‍याने झाल्‍यामुळे तसेच तक्रारकर्तीच्‍या पतीच्‍या नावावर 7/12 च्‍या उता-याप्रमाणे शेती असल्‍यामुळे ते शेतकरी या व्‍याख्‍येमध्‍ये समाविष्‍ट आहेत.  तक्रारकर्तीने विरूध्‍द पक्ष यांच्‍याकडे विमा दावा सादर केला असता तिला विमा दावा मंजूर अथवा नामंजूर झाल्‍याचे विरूध्‍द पक्ष यांनी न कळविल्‍यामुळे ही Continuous Cause of action आहे.  त्‍यामुळे सदरहू दावा हा मुदतीत असून तक्रारकर्तीची तक्रार खर्चासह मंजूर करण्‍यात यावी. 

 

8.    विरूध्‍द पक्ष 1 व 2 यांच्‍यातर्फे ऍड. सचिन जैस्‍वाल यांनी लेखी जबाब हाच लेखी युक्तिवाद समजण्‍यात यावा अशी पुरसिस दिनांक 25/02/2013 रोजी दाखल केली.  तोंडी युक्तिवादाकरिता वारंवार संधी देऊनही विरूध्‍द पक्ष 1 व 2 यांचे वकील गैरहजर राहिल्‍यामुळे सदरहू प्रकरण आदेशाकरिता बंद करण्‍यात आले.

 

9.    तक्रारकर्तीचा तक्रारअर्ज, विरूध्‍द पक्ष यांचे लेखी जबाब, तक्रारीसोबत दाखल केलेली कागदपत्रे तसेच तक्रारकर्तीच्‍या वकिलांनी दाखल केलेला युक्तिवाद यावरून खालील मुद्दे उपस्थित होतात.

अ.क्र.

मुद्दे

निर्णय

1.    

तक्रारकर्तीची तक्रार मान्‍य होण्‍यास पात्र आहे काय?

होय

2.

तक्रारकर्ती शेतकरी वैयक्तिक अपघात विम्‍याचे पैसे मिळण्‍यास पात्र आहे काय?

होय

3.

या तक्रारीचा अंतिम आदेश काय?

कारणमिमांसेप्रमाणे

 

 

- कारणमिमांसा

 

10.   तक्रारकर्तीचे पती शेतकरी होते ही बाब तक्रारकर्तीने दाखल केलेल्‍या 7/12 च्‍या उता-यावरून सिध्‍द होते.  तक्रारकर्तीने विरूध्‍द पक्ष 3 यांच्‍याकडे विमा दावा अर्ज दिनांक 05/04/2006 रोजी सादर केला.  पोलीस स्‍टेशन, गोरेगांव यांच्‍या फौजदारी कलम 174 च्‍या मर्ग सूचनेनुसार तक्रारकर्तीच्‍या पतीचा मृत्‍यु हा शेतातील विहिरीतून पाणी काढत असतांना तोल गेल्‍यामुळे विहिरीतील पाण्‍यात बुडून झाला हे सिध्‍द होते.  तसेच दिनांक 06/10/2005 रोजीच्‍या पोस्‍ट मार्टेम रिपोर्टनुसार तक्रारकर्तीच्‍या पतीचा मृत्‍यु हा पाण्‍यात बुडून झाला हा पुरावा Sub Divisional Magistrate यांच्‍या म्‍हणण्‍याला Corroborative Evidence असल्‍यामुळे तक्रारकर्तीच्‍या पतीचा मृत्‍यु विहिरीतील पाण्‍यात बुडुन झाला हे सिध्‍द होते.

 

11.   विरूध्‍द पक्ष 1 व 2 यांनी जबाबात कबूल केल्‍याप्रमाणे तक्रारकर्तीचा विमा दावा निकाली न काढल्‍याचे जबाबावरून सिध्‍द होते.  त्‍यामुळे तक्रारकर्तीचा दावा विरूध्‍द पक्ष यांनी निकाली न काढल्‍यामुळे तक्रारकर्तीला तक्रार दाखल करण्‍यास Continuous cause of action असल्‍यामुळे तक्रारकर्तीचा विमा दावा हा Law of Limitation नुसार  Limitation मध्‍ये आहे.  त्‍यामुळे तक्रारकर्तीची सदरहू तक्रार मंजूर होण्‍यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे.                    

 

12.   माननीय राष्‍ट्रीय आयोग, नवी दिल्‍ली यांच्‍या II (2012) CPJ 413 (NC) - NEW INDIA ASSURANCE CO. LTD.  Versus  SATVINDER KAUR & ANR.  या न्‍यायनिवाड्यामध्‍ये असे म्‍हटले आहे की, Consumer Protection Act, 1986 – Sections 24-A, 21(b) – Limitation – Insurance – Non-settlement of dispute – District Forum allowed complaint and directed petitioner to pay insured sum of Rs. 1 lakh along with compensation – State Commission dismissed appeal – Hence revision – Since claim was not repudiated cause of action subsisted and complaint filed in year 2003 was within limitation – Point based on facts which was not argued before State Commission cannot be permitted to be taken now – Complaint not time-barred.  तसेच माननीय राष्‍ट्रीय आयोग यांच्‍या III (2011) CPJ 507 (NC) – LAKSHMI BAI & ORS. versus ICICI LOMBARD GENERAL INSURANCE CO. LTD. & ORS. यामध्‍ये असे म्‍हटले आहे की, Consumer Protection Act, 1986 – Sections 2(1)(g), 21(b), 24(A) – Insurance – Scheme for protection of persons below poverty line – Cause of action – Limitation – Complaint filed after lapse of two years – Forums dismissed complaint – Hence revision – Contention, complainants are required to inform Nodal Officer about incident of death or incapacitation – Until payment of sum assured, it remains a case of continuous cause of action – Accepted – Remedy under Act cannot be barred on ground that jurisdiction of For a was not invoked within two years from date of death incapacitation – Case remanded to District For a for reconsideration. 

 

13.   तक्रारकर्तीच्‍या वकिलांनी दाखल केलेले उपरोक्‍त न्‍यायनिवाडे हे सदरहू प्रकरणाशी सुसंगत असल्‍यामुळे तक्रारकर्तीची तक्रार मंजूर होण्‍यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे. 

      करिता खालील आदेश.             

 

-// अंतिम आदेश //-

 

1.     तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.

 

2.    विरूध्‍द पक्ष 1, 2 यांना आदेश देण्‍यात येतो की, त्‍यांनी तक्रारकर्तीला तिच्‍या मृतक पतीच्‍या शेतकरी व्‍यक्तिगत अपघात विम्‍याची रक्‍कम रू. 1,00,000/- द्यावी.   या रकमेवर मृत्‍यु झाल्‍याच्‍या दिनांकापासून म्‍हणजेच दिनांक 05/10/2005 पासून ते संपूर्ण रक्‍कम तक्रारकर्तीच्‍या हातात पडेपर्यंत द. सा. द. शे. 9% दराने व्‍याज द्यावे. 

 

3.    विरूध्‍द पक्ष 1, 2 यांना आदेश देण्‍यात येतो की, त्‍यांनी तक्रारकर्तीला झालेल्‍या शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रासाची नुकसानभरपाई म्‍हणून रू. 10,000/- तक्रारकर्त्‍याला द्यावे.   

 

4.    विरूध्‍द पक्ष 1, 2 यांना आदेश देण्‍यात येतो की, या तक्रारीचा खर्च म्हणून त्‍यांनी तक्रारकर्त्‍याला रू. 5,000/- द्यावे.

 

5.    विरूध्‍द पक्ष 1, 2 यांना आदेश देण्‍यात येतो की, त्‍यांनी या आदेशाचे पालन आदेशाची प्रत मिळाल्‍यापासून 30 दिवसांचे आंत करावे.

 

6.    विरूध्‍द पक्ष 3 च्‍या विरोधात ही तक्रार खारीज करण्‍यात येते.    

 
 
[HON'BLE MR. ATUL D. ALSI]
PRESIDENT
 
[HON'BLE MS. VARSHA O. PATIL]
MEMBER
 
[HON'BLE MR. WAMAN V. CHOUDHARI]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.